भागो भूत आया एक सत्यघटना
सदर ची घटना 2000 सालची, आम्ही पूर्वी जिथे रहात होतो तेथे आमच्या समोरच्या बाजूला एक चाळ होती त्याच्या बाजूला रस्ता थोडं पुढे गेल्यावर एक छोटंसं मैदान आणि त्याला लागूनच एक कब्रस्ताना होतं. चाळीतील छोटी मुलं त्या मैदानात खेळत असत आणि त्यांचा आवडता खेळ म्हणजे भागो भूत आया. त्यात एक लहान मुलगा/मुलगी पूर्णअंगावर काळ कांबळ घेऊन हाहाहा हुहुहू विचित्र हावभाव करत आणि इतरांना पकडत व बाकीची मुले भागो भूत आया भागो भागो करत स्वतःला वाचवत कुठे तरी लपत असे,असच एक दिवस खेळ चालू होता आणि ज्या पोरावर राज्य आलं होतं म्हणजे ज्याला भूत बनून पकडायच होत तो त्या मैदानात मधोमध कांबळ ओढून थांबला होता तोवर बाकीचे सर्व लपायला गेले होते.आणि नेमकी त्याला 2 नंबर ला घाईची लागली होती म्हणून आजूबाजूला कोणी नाही बघून तो ते कांबळ तिथेच टाकून घरी पळाला खूप वेळ झाला तो मुलगा पकडायला आला नाही म्हणून बाकीची मुलं हळूहळू त्या ठिकाणी येऊ लागली तेव्हा तिथे कांबळ ओढून कोणी दुसरंच उभं होतं मुलं जसजशी जवळ येत होती तस ते त्यांच्या जवळ डुलत सरपटत येत होतं.जेव्हा मुलं ते कांबळ ओढलेले कोण आहे पाहण्यासाठी चेहर्यावरन बाजूला केलं तेव्हा एक अमानवीय विद्रुप चेहऱ्याची बाई त्या मुलांच्या मागे लागली राक्षसी हसणं ते पाहून मुलं आरडाओरडा करत सैरावैरा पळू लागली आधी आम्हाला वाटलं नेहमीच खेळताना ओरडत खेळत असतात म्हणून लक्ष नाही दिल पण ती अमानवीय शक्ती बराच वेळ त्या मुलांना घाबरून शेवटी कब्रस्तानात जाऊन अदृशय झाली.हे पाहून मुलं जोरजोरात रडायला लागली काही बेशुध्द पडली ओरडणं आता भीतीदायक राडण्यात बदललं होत तेव्हा सर्व लोक बाहेर त्या मैदानात आली काय झालं का रडत आहेत विचारले असता मुलांना आधी निट पणे सांगता येईना पण त्यांना धीर दिल्यावर हळूहळू मुलांनी त्या प्रकारचं वर्णन केलं सर्व मुलं एकाच पध्दतीने सांगत होती कशी ती बाई त्या कांबळ मधून आमच्या मागे लागली आणि कब्रस्तानात गायब झाली हे ऐकल्यावर तर सगळेच घाबरून गेले होते आणि लहान मुलं कधीच खोट बोलत नाहीत कारण काही ते दृश्य पाहून बेशुद्ध ही पडले होते त्या दिवसापासून तो खेळच बंद करून टाकला पोरांनी,जेव्हा इतर मैदानी खेळ खेळले जाऊ लागले तेव्हा तो प्रसंग पुन्हा कधीच घडला नाही.
लेखन प्रथम वाडकर