https://marathighoststories.blogspot.com/2019/08/blog-post_16.html |
नमस्कार वाचकहो मी अनुप देशमाने घेऊन आलो आहे एक कथा, जी आहे एका खेड्यातील मुला बद्दल.... ह्या आधीचा कथांना जसा भरभरून प्रतिसाद दिला तसाच ह्या ही कथेला मिळेल ही अपेक्षा.....
कथा सत्य घटनेवर च असल्यासारखी आहे फक्त त्यात भूत जे आहे ते कल्पना करून आणले आहे.. आणि कथेतील पात्रांची नावे हे काल्पनिक ठेवले आहेत...
कथा : #सहचरणी भाग १ ला
लेखक : #अनुप_देशमाने
अय रामा हिकडं ये... आमचं पोरग दिसलं का र तुला सकाळ पासन घरातून गायब झालंय.. काय डोकच चालत नाही गड्या.... तात्या गावातील दूधवाला रामा ला विचारत होते...
तात्या (गावातील एक दारुडा म्हणून ओळखला जाणारा माणूस त्याला 2 मुली आणि 2 मूल होती त्यातील श्रीपाद मोठा मुलगा त्याला शोधत होते ते)
तात्या शेवटी चालत येऊन गावातील मंदिराचा कट्ट्यावर बसला.. गळ्यातील गमजा ने घाम पुसत मंदिरातील लोकांना विचारू लागला, " अय गण्या आमचं ऍडपट दिसलं का र, कुठं कोलमडलाय देव जाणे"
गण्या : "अररर तालमी कड असलं बघ"
तात्या : त्या शिरप्या चा तर आता तंगडच तोडतो बघ, जवा बघावं तवा तालीम तालीम करत असतंय" म्हणत तो तालमीकडे वळला....
श्रीपादच्या मित्राला याची भुणक लागली म्हणून तो पळत तालमीत येऊन श्रीपाद ला सांगू लागला, " शिरप्या पळ तुझा बाप तालमीकडे येतूया"
आणि हा शिरप्या लाल मातीत मस्त पैकी मर्दानी कुस्ती चा खेळ खेळत होता, अंगाने काही भरला नव्हता पण तालीम करायला खूप आवडतं होती, सोलापूरचा असल्या मुळे नसा नसात कुस्ती आणि तालीम ह्याच गोष्टी सर्रास बघायला मिळतात सोलापूर चा खेड्यात, सोलापूर आणि कोल्हापूर मध्ये सर्वत जास्त तालीम आहेत...असो
बाप येऊ लागला म्हणून शिरप्या तसाच लंगोट वर पळत सुटला कपडे घेऊन ते डायरेक्ट नदीवर...
शिरप्या अय शिरप्या बाहेर ई, तात्या तालमी बाहेर उभारून हाक मारू लागला
तालमीतून वस्ताद बाहेर येऊन सांगू लागला, " त्यो तिकडं नदीकड पळून गेलं बघ तुझं ल्योक"
तात्या नदीकडे आता पळत च चालला होता...हिकडं शिरप्या ने नदीत उडी घेऊन पोहायला पण चालू केलं होत, तात्या आला त्याने शिरप्या चे कपडे उचलले आणि घरी निघून गेला...शिरप्या बाहेर आला आणि बघतो तर काय कपडे गायब, त्याला खरखरा आलाच की बापाने च कपडे नेले म्हणून, आता काय लंगोटीवर असणारा शिरप्या निघाला चालत चालत घरी, वयाने 17- 18 वर्षाचा होता, चालताना लाज वाटत होती त्याला म्हणून झाप झाप चालला होता तो घरी, घरी आल्यावर बघितले तर तात्या बाहेरील बाजेवर मस्त बिडी फुंकत बसला होता आणि श्रीपाद ची वाट बघत होता...पारा चांगलाच चढला होता, श्रीपाद ला पाहून त्याने जवळील काठी उचलली आणि जोरात बदडू लागला...जिवाच्या आकांताने श्रीपाद आई ग आई ग म्हणून विव्हळू लागला... तेवढ्यात त्याची आई आली तिने ती काठी घेऊन लाम्ब फेकून दिली आणि तात्याला भांडू लागली, "जीव घेता एक दिवस माझ्या पोराचा, स्वतः काही करायचं नाही आणि नुसतं लेकराला खाऊ की गिळू करायचं"
तात्या : "ये उषे तुझं ल्योक कॉलेज बुडवून तालीम करतय त्यामुळं मारलंय त्याला मी"
उषा : "डोकं थाळ्यावर आहे का आज रविवार आहे, पोराला कसलं मारलत ओ, पाठीवर व्रण उमटली"
तात्या डोक्यावर हाथ ठेऊन खालीच बसला, हिकडे श्रीपाद कण्हत होता, तात्या ला वाईट वाटले म्हणून तो घरा बाहेर जाऊ लागला, आईनं श्रीपाद ला जवळ घेऊन सांगितलं, "नग र तालीम बिलीम अभ्यास कर मोठा हु, लय पैका कमव गाडी घे बंगला घे" तसा शिरप्या मानेनेच होकार देत घरात गेला...
12 वी चे वर्ष होते म्हणून तात्या जास्त लक्ष देत होता, त्याने पण आता दारू पिणे कमी होते, शेती काही नव्हती त्याला, उषा खानावळ चालवत होती कारण गावातच शेजारी कॉलेज आणि साखर कारखाना असल्या मुळे तेथील डब्बे करायची आणि 6 जणांचा संसार चालवत होती, डब्बे ने आन शिरप्या करत होता, गावात सर्व जण त्याला शिरप्या म्हणत होते, आईला आवडत नव्हतं ते पण काय करणार ती बिचारी, बापा चा दारू मुळे वाटणीत काही आले नाही, राजा चा रंक झाल तात्याच कुटुंब वाटणी नन्तर, गॅस वर सर्व काही बनवून खाणारे कुटुंब आता चुलीवर स्वैपाक करून खात आहे, एके काळी घरात 6 7 गडी कामाला होते पण आज दारू मूळे हातात काहीच दिलं नव्हतं तात्या चा वडिलांनी, एक काळ तात्या शेट म्हणणारे गावकरी आता त्याला एकेरी नावाने हाक मारत होते, श्रीपाद आईला घरातील संसारात मदत खूप करत होता, काम करत करत अभ्यास करत होता 12 वि नन्तर इंजिनीरिंग करायची होती त्याला,
12 वी चे पेपर झाले, पेपर सर्व मस्त गेले होते म्हणून शिरप्या खुश होता, पण घरातील कामा मुळे तो मित्राकडे जास्त लक्ष देऊ शकत नव्हता, त्याला आई वडिलांच्या संसाराची खूप काळजी होती म्हणून प्रत्येक काम चोख बजावत होता.
एके दिवशी उन्हाळ सुट्टी मध्ये त्याचा अत्याची मुलगी अनघा अली होती पण ती त्याचा चुलत्याच्या घरी रहात होती, अनघा ला पाहताच श्रीपाद ला अनघा खुप आवडली, पण तिचा अंगावरील आणि आपल्या अंगावरील कपड्यात खूप जमीन अस्मान चा फरक आहे हे ही त्याच्या लक्षात आले, अनघा न चुकता सकाळी उषा मामी कडे यायची, त्यामुळे श्रीपाद आता जास्त घरीच वेळ घालवू लागला, त्यामुळे अनघा आणि श्रीपाद मधील जवळीक वाढली आणि त्याचे प्रेमात रूपांतर झाले, फक्त नजरेतुन प्रेम व्यक्त करत होते ते दोघे पण थोड्या दिवसात आत्या आली आणि तिने दोन दिवसांनी अनघा ला घेऊन गेली, श्रीपाद ला खूप वाईट वाटले पण काय करणार परिस्थिती पुढे काहीच करू शकत नव्हता, तरी पण त्याने वडिलांचा डायरी तुन आत्या चा नंबर काढला, आणि जवळील किराणा दुकानात जाऊन तेथील कॉइन बॉक्स वरून नंबर फिरवला,
रिंग वाजली
हॅलो.... कोण बोलतय
अत्याचा आवाज आहे वाटत म्हणून त्याने फोन कट केला, पण परत विचार आला आत्याला बोलले पाहिजे म्हणून परत त्याने फोन लावला..... रिंग वाजली
हॅलो ...कोण बोलतंय
आत्या मी श्रीपाद आहे..
आत्या: अरे श्रीपाद बोल कसा आहेस
श्रीपाद : मी ठीक आहे आत्या, तुमची आठवण आली म्हणून फोन केला..
मनातलं ओळखावे अस झालं आणि चक्क आत्याने अनघा कडे फोन देत म्हणाली.. अनघा ला बोल मका थोडं काम आहे...
अनघा : कसा आहेस रे "येडू"
श्रीपाद : मी येडू नाही ग, तुझी आठवण आली म्हणून कॉल केला...
अनघा : तू येडूच आहेस माझा, हा नंबर सेव करते तुझ्या नावाने
श्रीपाद : हो कर, रोज ह्या वेळेत फोन लावत जाईल तुला आणि........... कॉइन सम्पले फोन कट झाला, बोलयच राहिले होते काहीतरी म्हणून खिसे चाचपत पैसे शोधू लागला पण पैसे काही सापडले नाही...तसाच रेसिव्हर ठेवून मान खाली घालुन घरी परतला आणि फ्रेश होऊन तालमीत गेला, थोड्या दिवसात कुस्ती चा स्पर्धा आहेत म्हणून तो मन लावून तालीम करत होता, आता तात्या देखील त्याला मदत करत होता...
कुस्ती स्पर्धा झाल्या श्रीपाद ने 501 रुपयांची कुस्ती जिंकली होती, पण कुस्ती खेळताना श्रीपाद ला खूप धाप लागली होती तो घामेघुम झाला होता म्हणून तात्याने त्याला दवाखान्यात घेऊन गेला, डॉक्टरने चेक केले तेव्हा सांगितले की ह्याला कुस्ती खेळू देऊ नका कारण ह्याचा हृदयाचे ठोके कमी जास्त होत आहेत..
काळाचा घात झाला होता, आवडत्या गोष्टीला आता तो मुकला होता, लाल मातीला सोडून त्याला जायचं होतं . तात्याला वाईट वाटले पण श्रीपाद ला त्याचे काहीच वाटले नाही... औषध आणि पथ्य काय ते ऐकून तात्या आणि श्रीपाद घरी आले.....
आईने तर हंबरठा फोडला, श्रीपादने आईला सांगितले, आता इंजिनिरच होणार आई... आणि त्याने खिशातील 500 रुपयांची नोट काढून आईचा हातात सोपवली...
क्रमशः
#सहचरणी
#अनुप_देशमाने
कथा : #सहचरणी भाग 2
https://marathighoststories.blogspot.com/2019/08/blog-post_14.html