https://marathighoststories.blogspot.com/2019/08/blog-post_16.html
आधीचा भाग वरील लिंक मध्ये आहे...👆👆
आपण विचार करत असाल, कथेच नाव तर सहचरणी आहे मग कुठे आहे सहचरणी.... आहे एक सुंदर व्यक्ती पण ती ह्या पार्ट मध्ये पण नाही येणार आपल्या भेटीला...कथा वाचत रहा काही चुकत असेल तर बिनधास्त सांगा..👍
कथा - #सहचरणी भाग २ रा
लेखक - #अनुप_देशमाने
त्याने त्याचा हिमतीवर आणि टाकतीवर जिंकले होते ते पैसे..त्यावेळेस 500 रुपये म्हणजे खूप होते... श्रीपाद घराबाहेरील बाजे वर निवांत झोपला होता.. आईला काळजी वाटत होती, कारण तिचा खूप जीव होता त्याच्यावर, तो 10 महिन्याचा असताना त्याला तीव्र मेंदूचा झटका आला होता तो मरता मरता वाचला होता... आणि आता त्याचा नशिबी असे काहीतरी घडेल याची जाणीव नव्हती.
श्रीपाद आता तालीम कडे जात नव्हता, त्याचा डोक्यात अनघा घोंघावत होती, तिचा चेहरा नेहमी त्याचा डोळ्यासमोर येत होता...
काही दिवसानंतर 12 वी चा रिझल्ट लागला श्रीपाद ला चांगले मार्क मिळाले, तो आता इंजिनेरिंग चा फॉर्म भरण्यासाठी मित्रा बरोबर सोलापूर ला गेला, त्याने फॉर्म भरून घरी आला, आई आता त्याची खूप काळजी करत होती.. घरी बहिणीला बघण्यासाठी स्थळ हि येऊ लागली होती, ह्या दिवाळीत लग्न नक्की होणार हे फिक्स झाले होते... श्रीपाद ने वालचंद जैन मायनोरीटी कॉलेज ला देखील जैन कोट्यातून फॉर्म टाकला होता.. थोड्या दिवसात लिस्ट लागली त्याचा नंबर पहिल्या राऊंड मध्ये नाही लागला, पण वालचंद कॉलेज सोलापूर येथे त्याला सिविल हा ट्रेड भेटला. त्याने ऍडमिशन पण घेतले पण त्याचे मन रमेना गेले म्हणून त्याने ते कॉलेज सोडून घरी आला, तात्याने त्याला जाब विचारले याचे कारण तर तो म्हणाला की कॉलेज नाही आवडले... मग काय त्याला आवडेल ते कॉलेज घे म्हणून तात्या ने सुचवले... नशीबाने साथ दिली , त्याला चक्क आई तुळजाभवानी ने बोलवलं सारख झालं त्याला तुळजापूर मधील अभियांत्रिकी कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला...
14 ऑगस्ट 2007 ला श्रीपाद चा पहिला दिवस होता.... कॉलेज आवडले होते त्याला आणि त्याचा आवडतीचा मेकॅनिकेल चा ट्रेड पण भेटला होता.... सर्व त्याचा आवडीने चालले होते. तो रोज अनघा ला फोन करत होता.. त्यांचे प्रेम आता भेटण्यासाठी आतुर झाले होते.. आणि तो दिवस आलाच, श्रीपाद च्या बहिणीचे लग्न ठरले आणि पुढील महिन्यातच होते... स्थळ बारामती चे होते, घरात खूप वर्षांनंतर एक शुभ कार्य होणार होते म्हणून सर्वजण खुश होते.. भावकी देखील आता बोलू लागली होती, सर्वजण मिळून घरातील कामे पार पाडत होती, तात्याने दारू देखील बंद केली होती, सर्व कसे छान चालले होते, श्रीपाद आज घरी जाणार होता.. म्हणून तो एका कॉइन बॉक्स वर जाऊन अनघा ला फोन लावला...
श्रीपाद : हॅलो , अनु काय करतेस??
अनघा : बोल ना येडू, काम करतेय रे..
श्रीपाद : मग लग्नाला येणार आहेस ना??
अनघा : अरे मम्मी पप्पा येतील , मी नाही येऊ शकत रे..
श्रीपाद : अग येणं मला तुला भेटायचं आहे रे, अस नको करुस
अनघा : अरे आईक मी खरच नाही येऊ शकत माफ कर .. तू मस्त एन्जॉय कर, माझ्या ममी शी बोल त्यांना बरे वाटेल...
श्रीपाद : नको बोलूस जा... आणि त्याने फोन कट केला..
दिसायला शांत असला तरी श्रीपाद ला राग खूप येयाचा.. रागावर कन्ट्रोल नव्हते त्याचे.. श्रीपाद ने बस पकडली आणि गावी निघाला.. दोन दिवसावर लग्न आले होते, म्हणून घरी सर्व पाहुणे जमा झाली होती.. घरात नुसता गोंधळ चालु होता, प्रत्येकाची लगबग चलू होती, कोण लिस्ट तयार करत होते, तर कोण सामान पॅक करत होते, तर कोण पाणी भरत होते, दारात मांडव येऊन पडला...श्रीपाद पण घरी आला व त्याचा चेहरा पडलेला.... गडबडीत आईचे लक्ष नाही गेले त्याचा कडे कारण त्या दिवशी बांगड्या भरायचा कार्यक्रम होता....
रात्र झाल्यावर आई ने श्रीपाद ला हाक मारली, तसा तो जवळ आला आईने त्याला कुशीत घेतले आणि बोलू लागली...
"दीदी जाणार आहे म्हणून, चेहरा पडला आहे का"
"नाही ग आई, चेहरा कुठं पडला आहे माझा तुझं आपलं काही ही" म्हणत श्रीपाद बाहेर गेला..
सर्व तयारी जवळ जवळ झाल्यात जमा होती, काही राहिले का म्हणत सर्व जण आपली आपली कामे नीट तपासून पहात होती... रात्रीचे जेवण झाल्यावर सेव पाहुणे मंडळी अंगणात बसली होती... सगळ्यांचा गप्पा चालू होत्या, श्रीपाद चा राग आता शांत झाला होता, रात्रीचे 11 वाजत आले होते, श्रीपाद ने मामा चा मोबाईल वरून अनघा ला मेसेज केला, तिकडून पण रिप्लाय आला..
मेसेज मध्ये परत श्रीपाद ने तिला येण्यासाठी विनवणी केली, पण तिने ही जमत नाही रे समजून घे येडू असे उत्तर दिले... श्रीपाद आता रडके तोंड घेऊन घरात जाऊन झोपला...
1 दिवसानंतर...
पहाटेचे 4 वाजले , घड्याळाचा गजर झाला, हळू हळू सर्व पाहुणे मंडळी उठू लागली, घरातील बायका मिळून कामे करू लागली, कोण पाणी तापवून देऊ लागले, कोण चहा तयार करू लागले, कोण नाश्ता साठी पोहे करू लागले, प्रत्येकीने आपली आपली कामे वाटून घेतली होती, बारामती ला हे लग्नाचे वर्हाड जाणार होते... बारामती ला जाण्यासाठी जवळ जवळ 4 तास लागत होते त्यामुळे सर्व जण पटपट आवरून तयार होत होते.... पहाटेचे 6 वाजत आले होते सर्वांचे आवरून झाले होते.. कोणी राहिले नाही ना म्हणत सर्व जण घराबाहेर पडले... श्रीपाद चा आईने देवापुढे दिवा लावला आणि हाथ जोडून नमस्कार केला.. आणि ती व बाहेर पडली.. घराला कुलूप लावले घराबाहेर मोठा 6 चाकी टेम्पो उभारला होता बारामती ला जाण्यासाठी... सर्व जण गाडीत चढून बसले.. गाडीचा पुढील चाकाखाली नारळ ठेवण्यात आला... देवाचे नाव घेतले आणि ड्रायव्हर ने स्टार्टर मारून गाडी चालू केली आणी ती निघाली बारामती कडे....गाडीत मस्त पैकी अंताक्षरी ची मैफिल रमली होती, सर्व जण हसत हसत एकमेकांकडे बघत गाणे म्हणत होते... काही तासानंतर गाडी चहा साठी एका गावी थांबली, सर्व जण उतरले गाडी मधून...व श्रीपाद नाही उतरला... तो तसाच मोगा तोंड घेऊन गाडीत बसला होता...सर्वानी चहा पिऊन परत आपली आपली जागा धरून बसले आणि गाडी थेट बारामती रस्त्याला लागली... कहीवेळेत च आता बारामती येणार होते....सर्व जण आता शांत झाले होते, एकदम च गाडीत शांतता पसरली होती, श्रीपाद च्या आईचा डोळ्यातून डब डब पाणी गळत होते, बाकीच्याही लेडीज आता रडु लागल्या होत्या....
गाडी बरोबर लग्न कार्यालयात येऊन पोहचली, वऱ्हाड आले म्हणून त्यांचे बँड वाजवून स्वागत करण्यात आले, हाथ जोडणे चालू झाले, बाहेर मुलाचे आई वडील सर्वांचा स्वागतासाठी उभे होते.....
"ऋणानु बंधाचा कुठून पडल्या गाठी" गाणे वाजू लागले..
श्रीपाद नजर हळूच वर उभ्या असलेल्या गर्दी कडे गेली, आणि त्यातील एक व्यक्तीला बघून श्रीपाद आनंदी झाला, कारण ती व्यक्ती दुपारी तिसरी कोणी नसून अनघा होती, ती येणार नव्हती तरी पण ती आली माझ्या विनवणी ला मान देऊन ती आल्यामुळे श्रीपाद खूप खुश झाला... एकमेकांचा डोळ्याला डोळे भिडले... खूप दिवसानंतर म्हणजे प्रेम वक्त झाल्यानंतर ते पहिल्यांदा भेटणार होते...
क्रमशः
#सहचरणी
#अनुप_देशमाने