Disclaimer :: This is a horror story. Sensitive people be careful.
रात्रीची वेळ होती... माहीत नाही मला अन्या ने अचानक का बोलावले.. मी आपली घाई घाईत घरच्यांना कसं बसं मस्का लावून निघाली..पावसाने सुद्धा जोर धरला होता..पण अन्या माझा वीक पॉईंट आहे ना..सो माझं मन थोडी ऐकणार आहे..तडक निघाली की मी.. ना पावसाची पर्वा ना रात्रीची तमा..
मी.. एक खूप नॉर्मल मुलगी... वयात आलेली..मोठी मोठी स्वप्न उरात बाळगणारी..आणि अन्या..अगदी काल परवा भेटलेला मुलगा.. ऑनलाईन भेटलो आम्ही..का कुणास ठाऊक कशी काय ओढली गेली मी त्याच्याकडे..सतत त्याच्याशी बोलण्याचं addiction झालेलं मला..आज अचानक त्याने मला बोलावले..त्याचा सूर फार काळजीचा वाटला...पहिल्यांदा त्याच्या घरी जात होते त्यामुळे हात हालवत जावे लागत होते..रात्र असल्याने साधी कॅडबरी सुद्धा नाही घेता आली त्याच्यासाठी!!
बघता बघता अन्या चं घर आलं..घर कसले..टुमदार बंगला च म्हणा की! आजूबाजूने गर्द हिरवी झाडे..सुंदर फुले..आणि बरंच काही..मी बघत च बसले.. बंगल्यात जाण्यासाठी आतला रस्ता होता..त्यावर पूर्ण अंधार..अंगाला बोचणारी थंडी आणि टीप टीप पडणारा पाऊस..अजून काय लागते दोन जीवांना एकत्र यायला? असो.. दरवाजा वाजवण्याची वेळ सुद्धा अन्या ने येऊ नाही दिली..तो तसाच उभा होता दारात..मी अर्ध भिजलेली होती.. आणि अन्या माझ्याकडे एक टक बघत होता..'अन्या..काय रे काय झालं एवढं लगेच मला का बोलावून घेतलंस?' मी विचारले.. त्याने त्याच्या हातांनी माझे हात हळुवार पणे पकडले.. मी एक क्षण शहारून गेले..तेवढ्यात जोरात वीज चमकली आणि त्याने खडबडून जागे व्हावं तसं हात झटकून घेतले..'अं.. क्षिती, तू कॉफी घेणार?' मी म्हटले हो घेईल की..पण तू बस मी करते कॉफी..आणि मी स्वयंपाक घराकडे वळली.. कॉफी साठी दूध गरम करायला ठेवले तेव्हड्यात जाणवले की कुणीतरी माझ्या मागे उभं आहे.. आणि जोर जोरात श्वास घेतय... मी एक क्षण तशीच उभी राहिली...पटकन मागे वळून पाहिले तेव्हा जोरात कुठलीतरी आकृती माझ्या मागून पळून गेली.. केस मोकळे सोडलेली मुलगी कशी दिसते..अगदी तशीच..!!मला काही समजेनासे झाले.. भास असेल म्हणून मी सुद्धा सोडून दिले..बरं एवढा पाऊस असल्याने लाईट चा सुद्धा पत्ता नव्हता.. सगळा कारभार अंधारातला..अंधार आमच्या प्रेमातला ग्लॅमर वाढवायला मदत करत होता जणू! मी कपात कॉफी घोटत असताना परत माला मागे कुणीतरी उभं असल्याचा भास झाला.. मी मागे वळणार तोच अन्या ने मला मागून मिठी मारली होती.. माझी धडधड वाढली.. माझ्यातले oxytocin (लव्ह हॉर्मोन)अचानक उफाळून आले होते..मी काही react होणार एवढ्यात अन्या म्हणाला,' मला तुला एक surprise द्यायचंय'..' मग कॉफी??' मी, 'ते नंतर..आधी माझं surprise..' अन्या. मला काही पर्याय होता का! मी तयार झाली आणि तो माझे डोळे हाताने बंद करून मला आतमध्ये नेऊ लागला.. मी चालत होते.. तोच मला जोरात धक्का मारून त्याने खाली पाडले.. मला दोन क्षण समजले नाही काय होतंय ते.. मला अंधारात काही दिसत सुद्धा नव्हते.. मी अन्या च्या नावाने ओरडू लागले.. आणि हाताशी काही लागतंय का ते चाचपडू लागले.. तेव्हढ्यात माझया हातांना केसांचा पुंजका लागला..फार विचित्र वाटले.. थोडा हात पुढे केला तर थंड आणि गोठलेलं शरीराचा स्पर्श मला जाणवू लागला.. मी पटकन खिशातला मोबाईल काढला आणि बॅटरी चालू केली.. बघते तर काय.. ज्या मुलीचा मला भास झाला होता तिचं मृत झालेलं शरीर होते ते.. डोळे तसेच उघडे हात ओरबाडलेले आणि शरीरावर असंख्य जखमा.. मला समजत नव्हते काय होतंय.. तेवढ्यात तिने डोळे उघडले आणि त्याच वेळी वीज चमकली..आणि ती जोरात ओरडली..' निघून जा लवकर इथून तो तुला मारून टाकेल' आणि परत ती शांत झाली.. मला काहीच सुचेना.. अन्या तर गायब च झाला होता.. हे काय सुरू आहे, का सुरू आहे, मी कुठे आहे आणि का इथे आली मी..मला काही म्हणजे काही समजत नव्हते..तेवढ्यात माझया समोर कुणीतरी उभं राहिले.. मी अक्षरशः भीतीने डोळे बंद करून शरीर आकसून घेतले.. तो हात मोठा मोठा होत होता.. तेवढ्यात तो इसम म्हणाला.. 'ओ मॅडम इथं काय करताय तुमी?', मी घाबरत म्हणाले..' आहो कोण आहात तुम्ही.. मी फसलेय इथे.. अन्या च्या घरी आले पण अन्या ने मला धोका दिला.. ही बघ कुणाचीतरी डेड बॉडी आहे' मी जिथे बोट दाखवले तिथे तर काहीच नव्हते..'ओ मॅडम काय म्हणताय तुमी.. इथं १० वर्ष झालं कुणी राहत नाई, मी हितला वाचमन हाये, अन तुमी सारखं अन्या अन्या करतायत ते अनिकेत राव मरून जमाना झाला.. त्यांच्या बायकोला त्यांनीच मारलं असा येडा माणूस व्हता तो' मी हे ऐकून शून्यात च गेली होती.. तेवढ्यात तो म्हणाला..'म्या कधीचं बघतूय तुमी यकट्या बंगल्यावर आल्या दरवाजा उघडला अन यकट्या बडबडत व्हात्या... म्या मागे आलू तर तुमी डोळं बंद केल्यागत चालू लागल्या..म्हणून मी गप्प गुमान मागं लपून बसलो' मला काही म्हणजे काहीच समजत नव्हते.. एवढा गुंता झाला होता की मला चक्कर येऊ लागली.. शेवटचं एवढंच आठवते मला की तो वोचमन म्हणाला ,' आता अन्या सायबाची इच्छा मला पुरी करावी लागणार न्हाईतर त्ये माजा बी जीव घेतील..' आणि माझ्या डोक्यावर जोरात दांडूका मारला...
दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली..मी माझ्या सारख्याच ७-८ मुलींच्या ढिगाऱ्यात पडलेली होती.. डोक्यातून रक्त येत होते पण मला जाणीव नव्हती राहिली.. मी फक्त अन्या कधी येतो याची वाट बघत होती.. हळू हळू मी कोण आहे याचा उलगडा मला झाला...आता मी ताशीच दरवाज्यावर लोमकाळत पडलेली असते..अन्या ची वाट बघत..अजून सुद्धा तसंच रक्त माझ्या डोक्यातून वाहते..
उगाच नाही लोक या बंगल्याला भूताटकीचा बंगला म्हणत!!
श्वेता सुधीर