देवयानीचा मृत्यु होऊन पाच दिवस झाले होते. इकडे मीराच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. डमरूबाबांचा मठ रोशनाईने सजवला होता, पंतांच्या घरी पाहुण्यांची लगबग सुरु झाली. घरी सर्व पाहुणे मंडळी आली. पाटलांची सोनी खास चार दिवस आधीच मीरासाठी येऊन थांबली होती. मीरा आतल्या खोलीत हातावर आणि पायावर मेहँदी काढून घेत होती, तिच्या मैत्रिणी तिची हसत तिची चेष्टा-मस्करी करत होत्या. लग्नाचा मुहूर्त संध्याकाळी 7 नंतर होता. सकाळी मीराला हळद लावण्यात आली. रमाबाई खुप खुश होत्या. पंत तिकडे मठावर सर्व काम बघत होते, बाळूही त्यांच्या हाताखाली काम बघत होता. मठाच्या बाहेर केळीचे पानं लावून चौकोनी मंडप टाकण्यात आला. मठावर जाणाऱ्या पायऱ्यावरही रोशनाई करण्यात आली. सोनी आणि तिच्या मैत्रीणी मीराला सजवत होत्या. मिराच्या हातावर मेहँदी रंगली होती तसा लाल गडद शालू आणि त्यावर ओढ़नी घेऊन मीरा स्वर्गात एखादी परी असेल तिच्याशी तुलना करावी अशी सुंदर दिसत होती. तिच्यावर फ़िदा असणाऱ्या गावातील सर्व मुलांचे आज मन मोड़नार होते. देवयानी अजुन कशी आली नाही, मीरा तिची 2 दिवसांपासून वाट बघत होती. तिने देवयानीला कॉल लावला पण तिचा फोन बंद होता. देवयानी लग्नाला येईल अशी मीराला आशा होती कारण मीराने स्वतः तिला लग्नपत्रिका देऊन आमंत्रण दिले होते. संध्याकाळचे 6 वाजले संग्राम, त्याचे घरचे आणि त्यांचे पाहुणे सरळ मठावर पोहोचले. पंतानी बाळूकड़े मीराला मठावर घेऊन येण्याचा निरोप दिला. बाळू ताई ताई करत घरी आला पटकन आवरून मठावर चल म्हणाला. संग्रांम आला असेल म्हणून मीरा गालातच लाजली. घरातून बाहेर पड़ताना तिला थोड़ वाईट वाटू लागले. आता मीराचा घरापासून दुरचा प्रवास सुरु झाला होता. तिकडे नवरदेवाची गावातील मारुतीच्या देवळात फटाके आणि बँड वाजवत वरात काढण्यात आली. पाटलांच्या चार चाकीत बसून मीरा तिच्या मैत्रींनीसोबत मठावर पोहोचली. नवरदेवाची वरात मठावर आली. मीरा संग्राम एकमेकांकडे बघुन हसले. दोघांना ओवालुन मंगलाष्टक सुरु झाले दोघांच्या अंगावर समस्त गावकर्यांच्या, मोठ्यांच्या अक्षता पडल्या. वरती स्टेजवर दोघे उभे होते सर्व पाहुणे त्यांना शुभेच्छा द्यायला वर येत होते. थोडं लांबवर एक काळ्यासाडीवर कोणीतरी आपल्याकड़े बघतय मीराला दिसले. ती देवयानी आहे मीराने ओळखले. देवयानीने लांबुनच मिराला हाय केले. देवयानी नंतर कुठे गायब झाली मीराला दिसलीच नाही. आता सप्तपदी पुजेसाठी दोघ बाहेर चौकोनी मंडपात आले. संग्रामने मिराच्या कपाळाला सौभाग्याचे कुंकु लावले आणि गळ्यात मंगळसूत्र घातले. मीराला पुन्हा लांबवर देवयानी उभी दिसली आणि ती पुन्हा गायब झाली. मीराला विचित्र वाटले. पंडितने दोघांना अग्निभोवती सात फेरे घ्यायला उभे केले. मीरा संग्रामच्या मागे मागे फेरे घेत होती शेवटचा एक फेरा बाकी होता तेवढ्यात वरती आकाशातून मीराला मोठ्याने हसन्याचा आवाज ऐकू आला. मीराने वर पाहिले तर देवयानी हवेत उड़ताना हसत होती. एखाद्या चेटकिन असल्याप्रमाणे मोठ्या डोळ्याने मीराकड़े पहात होती. मीराला काही कळायच्या आत देवयानी मीराच्या शरीरात घुसली. मीराला चक्कर आली आणि मीरा जोरात खाली जमिनीवर कोसळली. सर्वजन घाबरले, मीराला अचानक काय झाले. बाळूने मीराच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले. मीराला शुद्ध आल्यावर पंडितने अग्निभोवती शेवटचा एक फेरा पूर्ण करुन घेतला आणि पूजा संपवली. पुजा झाल्यावर सर्वांनी जेवण केले आणि आता मीराला सासरी वाटी लावण्याची वेळ आली. रमाबाईना वाईट वाटू लागले, त्या मीराच्या गळ्यात पडून रडू लागल्या. बंडोपंतांच्याही डोळ्यांत पाणी आले. शेवटी एकुलती एक मुलगी होती त्यांची. बाळूही फुसफुस करत रडत होता. ताई नको ना ग जाऊ म्हणत होता. त्या लहान बाळूची पाटिल दादा समजुत काढत होते. शेवटी मीरा संग्रामसोबत गाडीत बसली. लग्नकार्य मोठ्या आनंदात पार पडले. नक्षत्रासारखी नटलेली मीरा माहेरच्या कडु गोड आठवणी घेऊन सासरी निघुन गेली. रात्रीचा प्रवास होता. सह्याद्रीच्या घाटात गाडी वेडीवाकड़ी वळणे घेत होती. मध्यरात्री 2 वाजता मीरा तिच्या सासरी पिंपळ वाड्यात पोहचली. ऊंबरठयावरचे माप ओलांडून मीरा आत आली. वाड्यात पाऊल ठेवता क्षणी तुळशीजवळ लावलेला दिवा विझला. काहीतरी विपरीत होत असल्याची जाणीव तिला झाली. घरात आल्यावर लगेच पूजा करण्याची वाड्यात पद्धत नव्हती. उशीर झाल्यामुळे मीराला सरळ तिच्या खोलीत पाठवण्यात आले. दोघांची खोली दुसऱ्या मजल्यावर सजवण्यात आली होती. संग्राम अजुन खालीच होता. मीरा आवरून बेडवर त्याची वाट पहात होती. खिड़कीतून मस्त थंड हवा येत होती. बाहेर पिंपळाचे झाड़ उंच दिसत होते. तिला झोप येऊ लागली, तिचा डोळा लागला. खिड़कितुन कोणीतरी विचित्र आवाजात रडण्याचा आवाज येऊ लागला. मीराची झोपमोड़ झाली. तिला घाबरल्यासारखे झाले. उठून तिने खिड़की बाहेर पाहिले तर कोणीच नव्हते. मागे वळून बघते तर तिला धक्काच बसला. तिने डोळे विस्फारले. काळ्या साड़ीमध्ये देवयानी तीच्या बेडवर बसली होती. "देवयानी तू??? आत्ता ईथे काय करतेय??" मीराने घाबरत विचारले. देवयानी म्हणाली,"अग तूच तर बोलवले मला लग्नाला". मीरा म्हणाली," हो पण लग्न केव्हाच संपले आहे..तू इथे आमच्या बेडरूम यावेळी यायला नाही पाहिजे.तू आत्ताच्या आत्ता इथून निघुन जा." देवयानी डोळे मोठे करत म्हणाली," हे बघ मीरा तूच मला बोलावले म्हणून मी आले आणि इथून कधी जायच हे आता माझ्या मनावर आहे." तेवढ्यात मीराचे लक्ष आरशाकड़े जाते. आरशात देवयानीच्या जागी कोणीतरी दूसरी भयानक स्त्री बसलेली दिसत होती. तिचे केस विसकटलेले होते, तिचे पांढरे बुबुळ पाहुन मीरा घाबरली. बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली पण दरवाजा सुद्धा उघड़त नव्हता. "मीरा थांब..आता पळून काही फायदा नाही. संग्राम आणि माझी खुप आधीपासून जवळची मैत्री आहे. मलाही संग्राम खुप आवडतो. आजपासून आपण त्यालाही वाटून घेऊया. माझी पूजा भंग करून तू मला आधीच मारून टाकले आहे. माझा मृत्यु होऊन 5 दिवस झाले आहेत मीरा." देवयानीचे हे शब्द एकुण मीराला काही कळेनासे झाले. पुढे देवयानी म्हणाली," मी फक्त तुला दिसू शकते मीरा. मला लग्नपत्रिका देऊन तू चूक केलीस मीरा. भूतांना कोणी आमंत्रण देते का?? माझी आत्मा संग्रामसाठी तुझ्याजवळच भटकत राहणार आणि रात्री 7 नंतर तुझे शरीर पूर्णपणे माझे होईल, सूर्य उजाडल्यानंतर दिवसभर पुन्हा तुझे होईल. रात्र पूर्ण माझी आणि संग्रामची असेल मीरा. हा दिवस-रात्रीचा खेळ असाच चालू राहणार. तू आमच्या दोघांच्या मध्ये येऊ नकोस" हे ऐकून मीराला भीती वाटू लागली तिला चक्कर येऊ लागली. काही क्षणातच देवयानीने मीराच्या शरीरात प्रवेश केला. आता मीराचे शरीर देवयानीचे झाले होते. ती बेडवर आडवी झोपलेली होती. काहीवेळाने संग्राम आत खोलीत येतो...दार बंद करुन संग्राम खोलीत आल्यावर मीरा (देवयानी) उठून बसते. संग्रामला ती देवयानी आहे हे माहिती नसते. तो मीराच्या जवळ येऊन बसतो. मीरा लाजत असते. तीच देवयानी खुप दिवसांपासून असलेली तिची वासना आज पूर्ण होणार या आनंदात गालात हसत असते. ती संग्रामच्या चेहर्यावरून हात फिरवते. खुप दिवसांपासून मी या क्षणाची वाट बघत होते असं त्याच्या कानात बोलते. संभोगासाठी चाललेली मीराची घाई त्याला विचित्र वाटते पण तिच्यासोबतच संग्रामसुद्धा गरम होतो. तो तिला जवळ ओढतो. एखाद्या हिंस्र पशुप्रमाणे ती सुद्धा त्याला घट्ट पकडून ठेवते. मीराच्या शरीरात घुसून देवयानी संग्रामसोबत तिची वासना भोगत असते. ती लाईट बंद करते आणि त्यांचा कामुक प्रणय सुरु होतो...
(क्रमशः)
(क्रमशः)
♣ साथसहेली ♣
【भाग ९】
【भाग ९】
मीराच्या अवती-भोवती आता सतत देवयानीचा वावर होता. देवयानी वर विश्वास ठेवून आपण एका भटकत्या आत्माला आपल्या लग्नात आमंत्रण दिले याचा तिला पश्च्चाताप होत होता. तीन-चार दिवस झाले मीराने कोणालाही सांगितले नाही. संध्याकाळी सात नंतर मीरा ख़ाली वाड्यात फिरकली सुद्धा नाही. आजारी आहे म्हणून जेवण सुद्धा वर मागवीले. संग्रामला सुद्धा मीरामध्ये बदल जाणवू लागला. देवयानी सुद्धा तेवढीच चालाख होती. तीला माहिती होते मीराच्या शरीरात घुसून आपल्याला सगळ्यांसोबत मीरासारखेच वागावे लागेल. मीराला आता देवयानीचे हे दिवस-रात्र छळने असह्य होऊ लागले. ती पूर्णपणे खचुन गेली, एकटिच रडत बसु लागली. तिची तब्येतही खराब झाली होती. शरीराला एखादी जखम व्हावी त्यप्रमाणे देवयानी तिचे शरीर सकाळ झाल्याशिवाय सोडत नव्हती. देवयानीने मीराचे जगने अवघड केले होते. मीराला एकप्रकारे मानसिक नैराश्य आले होते. याबद्दल कोणाशी बोलावे, कोण माझ्यावर विश्वास ठेवेल? या विचाराने मीरा हैराण झाली. शेवटी हिम्मत करुन तिने तिची सासु चंद्रामाईला सांगायचे ठरवले. सकाळी संग्राम मीराला न उठवता लवकर आवरून कामावर गेला. संग्रामचा अबोलपणा पाहुन मीराला वाईट वाटले. देवयानीने माझ्या अंगात शिरून रात्री नक्कीच काहीतरी त्रास दिला असेल संग्रामला. संग्रामचे ऑफिससुद्धा संध्याकाळी 6 ला सुटायचे. म्हणजे घरात आल्यावर त्याच्यासमोर मीरा नसून देवयानीच असायची. देवयानीमुळे संग्राम आणि मीरा दोघांत दुरावा निर्माण झाला होता. याचा देवयानीला आनंद भेटत होता. मीरा खिड़कीतून बाहेर बघत विचार करत होती. तेवढ्यात खाली चंद्रामाई तुळशीला पाणी देताना दिसल्या. मीराच्या सासुबाई तश्या समजदार, प्रेमळ होत्या. वाड्यात त्यांना सगळे अक्का म्हणून हाक मारायचे. सकाळी चंद्रामाई तुळशीला पाणी घालून देवघरात पूजा करत असत. वाड्यात देवघर म्हणजे देवासाठी एक स्वतंत्र खोलीच होती. आत सागवानाच्या लाकडाचे भले मोठे आकर्षक देवघर होते. चंद्रामाईमुळे देवघरात चोवीस तास अखंड दिवा तेवत असायचा. देवघराच्या बाजूला एका कोपर्यात जुन्या धार्मिक ग्रंथ-पुस्तकांचा संग्रह ठेवला होता. अककांना धार्मिक वाचनाची खुप आवड़ होती. वेळ मिळेल तसे वाचन करुन आत्तापर्यंत त्यांनी वीस-बावीस ग्रंथ पूर्ण केले होते. अक्काची देवपूजा आवरली होती तेवढ्यात मीरा आवरून खाली आली. नमस्कार करते अक्का..म्हणून मीरा त्यांच्यासमोर वाकली आणि तिच्या डोळ्यांतुन ढळाढळा पाणी यायला लागले. "अगं मीरा, तू रडतेयस कशाला?काय झाले?" अक्काने विचारले. काही नाही म्हणून मीराने मान हलवली. "तुला करमत नाहिये का इथे? घरची आठवण येतेय का?? काय होतया तुला?" अक्का वीचारु लागल्या. मीरा म्हणाली," काही नाही अक्का कालपासून अंग जड़ पडलय, करमत पण नाहिये"..."असं व्हय, चल बाहेर तुला आज चंडाईच्या दर्शनाला नेते आज मंगळवार हाय, चल आवर पटकन" अक्का म्हणाल्या आणि देवाला दिवा लावून आरती करू लागल्या. चंडाईचे मंदीर पिंपळ वाड्यापासून थोड़ लांब मागे जंगलात होते, जायला पायवाट होती. अक्का मीराला घेऊन चंडाईच्या मंदिरात आल्या. "हे बघ, हे चंडाई माता मंदीर, आपल्याच वाड्यातल्या जुन्या लोकांनी बांधलया..अठराशेच्या काळात इथं नदिला पुर आलता. तर पाण्यात तरंगत आलेली ही शीळा हाय अस म्हणतात..तीची पूजा केली आपल्या लोकांनी तेव्हा पुर ओसरला.. आपल्या पिंपळ वाड्याच रक्षण करती ही माता..माता कालिकेचा अवतार हाय हा..दर पोर्णिमेला यायच ईथे दर्शनाला."अक्का सांगतच होत्या, मीराने दर्शन घेतले आणि दोघी बाहेर वडाच्या झाडाखाली बसल्या. " अक्का मला तुम्हाला काहीतरी विचारायच हाय..".."अक्का, गावात भूतं-बितं असतात का ओ?? म्हणजे जादूटोणा वगैरे? तुमी पाहयलय का कधी?".... अक्का बोलल्या," नाइ ग पोरी पण माझ्या सासुला दिसल होतं एकदा रात्री वाड्याच्या बाहेर झाडावर, तेव्हा पासून त्या लई आजारी पडल्या आणि शेवटी गेल्या बघ सोडून..आपल्या गावातली धनगरांची बाई तिला पण हाय म्हणतात असं काहीतरी. तेव्हापासून आम्ही बायका कोणीच जात नाही तिच्याकडं.पण तू का विचारतिया??"...मीरा खाली मान करुन रडत सांगू लागली," अक्का, मला पण काल वाड्यात भुत दिसलय..अंन ते दुसरं तिसरं कोणी नसुन माझी मैत्रीण हाय.."..अक्का घाबरल्या," अगं बाई..काय बोलतीये हे..आपल्या पिंपळ वाड्यात भुत?? कोणाच?? कोण हाय ती??". जीभ थरथरत अककांचे प्रश्न वाढू लागले त्यांचा घाबरलेला चेहरा पाहुन मीरा सांगू लागली," मी मागच्या वर्षी मुंबईला नाटकात काम पहायला गेलते तिथे देवयानी नावाची एक मैत्रीण भेटली, आम्ही खुव जवळच्या मैत्रिणी झालो पण तिने जादूटोना करुन मला काबूत ठेवले..लग्नाआधी संग्राम आणि मी मुंबईला गेले तेव्हा कळाले की ती संग्रामला आधीपासून ओळखते..तेव्हा आम्ही तिला पत्रिका देऊन लग्नाला बोलवले..त्याच्या आधीच तिचा मृत्यु झाला होता..लग्नाला न येता काल ती आपल्या वाड्यात आली आणि आता ती म्हणतेय की तुझ शरीर आणि नवरा मला दे.." मीरा रड़ू लागली, अककांनी डोळे विस्फारले..हे सगळं ऐकून त्यांना घाम फुटला..अक्का म्हणाल्या," बाई गं..कोणाची काळी नजर लागली आमच्या पोरांना..तुम्ही तर तिच्या भुतालाच आमंत्रण देऊन आलात...म्हणून ती वाड्यात आली..बिना आमंत्रणाच भूतं येत नसतात..त्यांना बोलवल तर येतात..त्यासाठी तर चकवा खेळतात आपल्याशी.."अक्का सांगत होत्या.पुढे मीरा बोलली" देवयानी रात्री 7 नंतर माझ्या अंगात शिरते..मला काहीच समजत नाही तेव्हा..ती फक्त रात्रीच दिसते मला...मला थेट सकाळी जाग येते..पूर्ण रात्र तीच असते संग्राम सोबत..संग्रामला माहिती पण नाही हे.." अक्का म्हणाल्या," बाईं गं..हे तर खुप अवघड होऊन बसलय..संग्रामला सांगितल तर त्याच काही बर-वाईट करेन ही चेटकीन..लवकर काहीतरी कराव लागेल..तिला वाड्यातून लवकर बाहेर काढावे लागेल नाहीतर सगळा पिंपळवाडा गिळून घेईल ती भूताटकी"..मीरा म्हणाली," पण माझ शरीर कस सोडल ती बया?? मला तर आता रात्री वाड्यात राहायची भीती वाटू लागलीये.." अक्का म्हणाल्या," हे बघ पोरी, देवावर आणि माता चंडाईवर विश्वास ठेव..आत्तापर्यन्त चंडाईनेच आपल्या वाड़याची रक्षा केलिए..तीच आपल्याला रस्ता दाखवेल आणि देवयानीला बाहेर काढ़ेन वाड्यातून..घाबरू नको पोरी मी पण हाय तुझ्यासोबत..माता चंडाईच्या पायाच् कुंकु लाव कपाळाला आणि चल वाड्यावर.." दोघी पाय वाटेने चालत निघतात, तूफानी वारा सुटतो, काहीवेळाने दोघी वाड्यापर्यन्त येतात. पिंपळ वाड्याच्या बाहेर गर्दी दिसते. गर्दी बघुन अक्का आणि मीरा घाबरतात...
(क्रमशः)
(क्रमशः)