अंधारी वाट : भयकथा
आठ दिवसांची सुट्टी होती म्हणून गावाकडे चाललो होतो.सुट्टीत काय करायचे याचे प्लॅनिंग डोक्यात शिजत होते .बराच वेळ गाडी चालवत असल्याने पाठीला रग लागली होती पण कुठे थांबायला मन तयार होत नव्हते .एकतर मला निघायलाच चार वाजले होते आणि प्रवास जवळपास दोनशे किलोमीटरचा होता. म्हणजे पोहचायला रात्रच होणार होती .पटकन रूमवर जाऊन बॅग उचलली नि गाडीला किक हाणली.एक क्षण मनात पहाटे निघण्याचा विचार येऊन गेला पण आज घरी येतो असे आईला सांगितले होते.त्यामुळे ती वाट पाहणार आणि बऱ्याच दिवसांनी गावी चाललो होतो त्यामुळे मलाही घरी जाण्याची घाई झाली होती.कॉलेजचे शेवटचे वर्ष असल्याने खूप धावपळ चालू होती .त्यामुळे एवढ्या चार पाच महिन्यात गावाकडे चक्कर टाकायला जमले नव्हते.फोनवरूनच अण्णा आईची खुशाली कळत होती.त्यामुळे काळजी नव्हती.
भिगवण पार झाले तेंव्हा सात वाजत आले होते. आता दहा मिनिटातच वडाचा फाटा येईल मग तिथून पुढे 10/12 किलोमीटरवर गाव.आता कधी एकदा पोहचतोय असे झाले होते.अंधार दाटू लागला होता.समोर वडाचा फाटा दिसू लागला तसा मी गाडीचा वेग वाढवला.. फाट्यावर या वेळेला चिटपाखरूही नव्हते. कोण असणार यावेळेला ? मी मनाशी हसलो . मूर्खपणा सगळा! पहा ना आता! गावात विचित्र गोष्टी कशा लगेच पसरल्या जातात! नुसतेच काहीतरी निमित्त घडायला नि लोकांच्या चर्चा सुरू! आईनेही मला उशीर करू नको म्हणून सांगितले होते. ती पण विश्वास ठेवते असल्या भाकड कथांवर! काय म्हणे तर रस्ता वंगाळ आहे ! रात्रीला बाधतो! माझा असल्या गोष्टींवर बिलकुल विश्वास नाही! त्यामुळे मी निर्धास्त होतो.
फाट्यावरून वळलो त्यावेळी पूर्ण अंधार पडलेला होता.मी गाडीचे लाईट लावले. चचच ! गाडीच्या हेड लाईट चे काम करून घ्यायचे विसरलोच मी ! अंधुकसा लागला .... पुढचे काहीच दिसायला तयार नाही ! हळूहळू जावे लागणार ! रस्ता म्हणजे एक रुंद पायवाटच होती. नेहमीची असल्याने काही अडचण येणार नव्हती. पण माझा अंदाज चुकला पुढे गेल्यावर ती जास्तच खराब झाली . मागच्या वेळेला आलो त्यावेळी जरातरी बरी होती! कदाचीत पावसामुळे खराब झाली असेल! मी आपला अंदाज केला. च्यायला ! पाच महिने काय आलो नाही,तर गावचा रस्ता विसरायला झाले! मला वेग कमी करावा लागला . आता या वेगाने अजून अर्धा पाऊण तास लागणार होता. हे शेवटचे अंतर कधी एकदा पार होते असे झाले होते.
अंधार काय काळाकुट्ट पसरलाय!त्यामुळे आजूबाजूची दाट झाडी आणखीनच भयानक वाटत होती. पुण्यात अंधाराची बिलकुल सवयच राहिली नाही. गावचा रस्ता काय अनोळखी वाटायला लागला! अंधाराची सवय काय मोडली!माझे मलाच हसू आले. तर मगाशी काय सांगत होतो...हा गावातले लोक अडाणी ,अंधश्रद्धाळु ! कशावरही पटकन विश्वास ठेवणार!माझ्यासारख्या शिकलेल्याने भूत, प्रेत, करणी, बाधा यावर विश्वास ठेवणे म्हणजे मूर्खपणाचे ठरले असते. अशा गोष्टी अस्तित्वातच नसतात मुळीच ! लोक बऱ्याच वर्षांपासून चंदूची कहाणी सांगतात.पाटलाच्या चंदूला याच रस्त्यावर बाधले.अशाच रात्रीच्या वेळेला तो एकटा येत होता म्हणे.त्या दिवशी अमावस्या होती.काय झाले कुणास ठाऊक पण दुसऱ्या दिवशी तो जंगलात सापडला तेंव्हा त्याची वाचाच बसली होती.काहीच बोलत नव्हता. सात दिवस तापाने फणफणला आठव्या दिवशी खेळ खल्लास! त्यादिवसापासून सूर्य मावळला की कोणी एकटा दुकटा या रस्त्याने येण्याचे धाडस करायचा नाही. मला हे सर्व आठवायला लागले . सहज म्हणून आकाशाकडे पाहिले तर चंद्र दिसला नाही .आज अमावस्या तर नाही ना! मी जरा सटपटलोच.पण पुढच्याच क्षणी ते विचार मनातून झटकून टाकले नि मस्त शीळ वाजवत गाणे गुणगुणत राहिलो.
खरं सांगू का ? फाट्यावर कुणीतरी सोबत मिळाली असती तर बरं झालं असत! छे ! छे !मी काही घाबरलो नाही काय! तेवढीच आपली सोबत! हे काय ? माझा डावा हात का थरथरतोय आणि माझ्या छातीत धडधड व्हायला लागलीय ! मी खोल श्वास घेतला.मनातले विचार धुडकावून समोरच्या रस्त्यावर लक्ष केंद्रित केले.पण ते विचार तेवढ्याच वेगाने पुन्हा येऊन आदळले. त्याकडे दुर्लक्ष करून मी दुसरेच विचार मनात आणले नि स्वतःच्याच नादात गाडी चालवत राहिलो.थोडेच अंतर राहिले होते.फक्त माळ पार केला की झाले! माळावर गेलो की खाली गावातले दिवेच दिसतील या विचाराने मला जरा हायस वाटलं. नकळत वेग वाढला.पण पण ...एव्हाना माळ यायला हवा होता! किती वेळ झाला असावा फाट्यावरून निघून?दहा मिनिटं झाली असावीत ! मी घड्याळाकडे पाहिले. अर्धा तास ! मला धक्काच बसला.एवढ्या वेळेत मी घरी असायला हवे होते.आता मात्र माझा धीर सुटला.हा एकच रास्ता असल्याने रस्ता चुकण्याचा प्रश्नच नव्हता.मग...मग...मला आईचे शब्द आठवू लागले 'रस्ता बाधतो ' .आज अमावस्या तर नाही ना? मी आठवण्याचा प्रयत्न करू लागलो . मला दरदरून घाम फुटला .गाडीही आता हेलकावे खाऊ लागली होती.लक्षणं काही ठीक वाटत नव्हती.खरतर आज निघायलाच नको होतं.पण आता काही फायदा नव्हता.'रस्ता बाधतो' एवढेच शब्द माझ्या डोक्यात घुमत होते.धीटपणाची सर्व पुटे गळून पडली आणि त्याचवेळी माझे लक्ष समोर गेले.एक पांढरी,धूसर आकृती रस्त्याच्या बाजूला उभी होती.आता या वेळेला कोण उभं असणार?मी जसजसा जवळ जाऊ लागलो तशी ती हालचाल करू लागली.माझे हातपाय थरथर कापू लागले.नकळत गाडीचा वेग वाढला गेला आणि गाडी घसरली.मी जोरात फेकला गेलो.त्याचवेळी माझी शुद्ध हरपली.
मी शुद्धीवर आलो तेंव्हा सकाळ झाली होती .मी घरी होतो.शेजारी आई अण्णा चिंताग्रस्त चेहऱ्याने बसले होते.गावातील काही मंडळीही होती.
मी डोळे उघडताच आई जवळ आली.
"बरं वाटतयं ना आता?"आईच्या आवाजात काळजी होती.
"हो ,पण ...मी घरी कसा आलो?" पडल्यामुळे डोक्याला लागले असावे.डोकं खूप ठणकत होते.अंगात ताप भरला होता.
आईने अण्णांकडे पाहिले.अण्णा पुढे झाले.
"तू आराम कर ,जर वेळाने आपण बोलू" अण्णा आजूबाजूच्या लोकांकडे पाहत म्हणाले.तसे सगळे उठले.अण्णा त्यांना निरोप द्यायला बाहेर गेले.आईही बाहेर गेली.बाहेरची चर्चा माझ्या कानावर पडत होती.

"मी म्हणते पोरानं एवढ्या राती कशापायी यायचं ? बरं तेही अवशीच्या राती !"
शेजारच्या द्वारका काकूंचा आवाज मी ओळखला.त्यापाठोपाठ आईचा हुंदका ऐकू आला.
काल अमावस्या होती तर!
मी शांत डोळे मिटून पडून राहिलो.मला रात्रीचा प्रसंग आठवत होता.आपल्याला बाधा तर झाली नसेल ना?त्या चंदूसारखी तर आपली अवस्था नाही होणार?नाही नाही ते विचार मनात येऊ लागले.मला एकदम घुसमटल्यासारखे झाले .केव्हातरी मला झोप लागली.
दुपारी जाग आल्यावर अण्णा लगेच रूममध्ये आले .

"तू कंपनीच्या रोडला कशाला गेला होता?" आल्याआल्याच त्यांनी प्रश्न विचारला.
"कंपनीचा रोड?"मला काहीच उमगले नाही.
""अरे फाट्यावरून थोडं आत आलं की डावीकडे रोड फुटतो तो"
"कसला रोड अण्णा ,मला कसा ठाऊक नाही?"

जरा विचार करून अण्णा म्हणाले ,
"तुला कसा माहीत असणार? महिनाभरापूर्वी एका नवीन कंपनीचं काम सुरू झालाय त्याबाजूला! पाण्याच्या बाटल्या भरण्याची कंपनी आहे. त्यांनी रोड केलाय तात्पुरता ! तू चुकून त्या रस्त्याने गेला असशील! "

आता मला हळूहळू उलगडा होऊ लागला की मला रस्ता अनोळखी का वाटत होता ते! पण पण ती आकृती कोण होती ?
"पण अण्णा ! तिथं एक पांढरट,धुरकट आकृती होती.मी जवळ जाताच हालचाल करायला लागली! तिला घाबरून मी पडलो ! "
यावर अण्णा मोठमोठ्याने हसू लागले.त्यांचा हसण्याचा आवाज ऐकून आईही लगबगीने आत आली.
"अरे तो कंपनीने बाटलीच्या आकाराचा फ्लेक्स बोर्ड लावला आहे तिथं! तो वाऱ्याने हालत असेन! आणि तुला तो भुतासारखा वाटला की काय ? "
आता मात्र मला माझ्या मुर्खपणाची लाज वाटली.मीही मोठ्याने हसू लागलो .त्या हसण्यात मला भुताची बाधा झाली नाही याचाच आनंद जास्त होता.आईचीही चिंता मिटली तीही हसू लागली.
मला एकदम मोकळे मोकळे झाल्यासारखे वाटू लागले.

श्री.आनंद निकम,