बायंगी एक सत्यघटना
नमस्कार मित्रांनो आज काल सर्वात जास्त चर्चिले जाणारे दोन विषय एक म्हणजे निळावंती आणि दूसरा बायंगी. साधारण दोन तीन वर्षों पूर्वी तर निलावंती चा 'नि'आणि बायंगी चा 'बा'पण माहित नव्हता पण अचानक ह्या दोन विषया वरच्या पोस्ट viral होऊ लागल्या.आणि socail media वर तर ह्या चर्चेला उधाण आलय आणि ते ही इतक कि तमाम नेटकरी आणि ज्याना ह्या विषयात फ़ारसा रस नाही ते ही ह्या दोन गोष्टी इमाने ईतबारे सर्च करु लागलेत.अगदी लहानग्यान पासून ते गृहिणी व वयोवृद्धान च्या मुखी थोड्या फार प्रमाणात ह्याच्या चर्चा ऐकू येऊ लागल्यात.दर दिवसागणीक व्हाटसप आणि fb वर ह्या सम्भन्दीत माहितिपर अथवा कथेच्या स्वरुपात पोस्ट येत असतात.परवाच बस मधे बाजूला बसलेली एक मुलगी गूगल वर निलावंती टाइप करून सर्च करत होती.इतक वेड लागलेय तरुणाईला आणि का लागू नये प्रत्येकाला रहस्य, गूढ, भुताटकी, जारण मारण, चेटूक ,वशीकरण, बंधन, ह्या संदर्भात जाणून घ्यायची हौस असतेच कितीही नाही म्हटलं तरीही.पण काही वेळा अज्ञानात च सुख आहे म्हणतात ना हे मनोमन पटतं. कारण ही असच असत त्याला.पण काही जण वाचून सोडून देतात पण काही लोकं वाचून अक्षरशः झपाटूनच जातात आणि पुढे काय परिणाम होतील याची तमा ही बाळगत नाहीत.अशीच एक घटना घडली आहे ती मला एक टपरी वरील एका पोराने(विन्या) सांगितली कारण टपरी वर येणाऱ्या पोरां कडे अश्या गोष्टींचा भरपूर स्टॉक असतो. wtsaap fb वर येऊ घातलेल्या बायंगी बाबत च्या पोस्ट वाचून विन्या च्या नात्यातील एक मुलगा सतीश जाम प्रभावित झाला होता पण त्याने ज्या पोस्ट वाचल्या त्याची काळी बाजू ही आहे हे लक्षात घेतलं नाही.काही कामधंदा न करता उनाडक्या करीत फिरतसे म्हणून घरचे खूप त्याला बोलत आणि बोलणी खाण्या पेक्षा तो दिवसभर मोबाईल वर नाहीतर मित्रांबरोबर उनाडत असे.आणि अश्यातच त्याने बायंगी वरची पोस्ट वाचली आणि झपाटून गेला त्याने जास्त भर त्याच ओळींवर दिला ज्यात म्हटले होते हे भूत विकत मिळत आणि त्या माणसाला झटपट श्रीमंत करते,शत्रूंचा नाश करते ,जे हवं ते मिळवून देते आणि ते सर्व काही विशिष्ठ मोबदल्यात त्याला फक्त झटपट पैसे कमवायचे होते एक थ्रिल अनुभवायच होत आणि त्यासाठी तो आता जंग जंग पछाडू लागला आणि त्यातच एक पोस्ट त्याला अशी आली होती की एक माणूस अमुक अमुक ठिकाणी केवळ 10000 रु मध्ये हे बायंगी देतो.
बायंगी एक सत्यघटना पुढील भाग,
बायंगी एक सत्यघटना क्रमशः पुढे
सतीश ने देव्हारा मात्र झाकून टाकला पण बायंगी ची जीवापाड जपणूक करू लागला नित्यनेमाने नेवैद्य चढवत असे.पैसा अडका पुष्कळ येत होता.पण एक काळ सावट एक दुष्ट शक्ती सतत आजूबाजूला वावरत आहे कोणाच्या तरी देखरेखीखाली दबावाखाली आपण सर्व वावरतोय अस सतीशच्या घरच्याना सतत वाटत असे ते अधून मधून त्याला बोलून ही दाखवत पण सतीश हे फक्त तुमच्या मनातील खेळ आहेत.अस काही नाहीये म्हणून त्यांना गप्प करत असे.घरातील पूजा अर्चा बंद पडल्यानेच हे सारं होत आहे त्यामुळे झाकलेला देव्हारा परत मोकळा करून पूजेला उपलब्ध करून द्यायला सतीश च्या घरच्यांनी तगादा लावयला सुरुवात केली.सतीश ची पुरती गोची झाली,कारण परत पूजा अर्चा सुरू झाली तर बायंगी कुणाचा घात करेल हे सांगता येत नाही आणि घरच्या ना बाहुली बद्दल कळाल तर आपली खैर नाही म्हणून त्याने एक खोटी कहाणि रचून देव्हारा बंद का ठेवला हे सांगितलं व थोडा काळ जाऊदे मीच स्वतः देव्हारा उघडून पूजा करिन तो पर्यंत तो बंद च ठेवा अस सांगून त्यांचा विस्वास संपादित केला.काही महिन्यात सतीश च्या बहिणीच लग्न ठरलं घरात पुन्हा पावित्र्याच,मांगल्याच वातावरण निर्माण होऊ लागलं जे बायंगी ला नको असतं पण आता उपाय काय या विचारात असताना त्याला बायंगी विकत देणार्याची आठवण झाली त्याने फोन केला पण आऊट ऑफ सर्व्हिस येत असे इथे आता मुलीच्या लग्नाची पत्रिका छापून आली होती व पहिली पत्रिका देवा पुढे ठेवायला लागेल परत हळदी चा कार्यक्रम लग्नाच्या अगोदर चे विधी करायला लागतील म्हणून त्याच्या वडिलांनी एक चांगला दिवस पाहून देव्हारा वरील कपडा बाजूला केला तर पूर्ण देव्हारा काजळी लागल्या प्रमाणे पडला होता त्यांनी लगेच स्वच्छ करून देवांना स्नान घालून छान पूजा करून देवा समोर पत्रिका ठेवली इतक्यात दुकानांत गेलेला सतीश आला आणि ते बघून त्याला धस्स झालं त्याने परत देव्हारा झाकून ठेवा म्हणून थयथयाट केला मात्र वडिलां समोर काही चालल नाही.सतीश आता काय होईल या काळजीत होता आणि पुढील फटका त्याच्या बहिणीला बसला. काही दिवसांनी दिवाळी होती बायंगीला सण वार ही साजरे केलेले आवडत नाहीत. बिचारी ती मुलगी लग्न ठरल्याच्या आनंदात फटाके उडवत असताना तिच्या साडीचा पदर एका पणतीवर पडला आग लागून मुलगी भाजली ज्यात तिचा चेहरा भाजला गेल्याने तीच लग्न मोडलं.
लेखन प्रथम वाडकर
क्रमशः

Kindly upload next part
ReplyDeleteSorry pan mala as kahi bhoot bit asel as vatat nahi karan he bhoot kuthe kase adhalte yacha konich proper ullekh karat nahi sagle fakt as ahe tas ahe evadhach sangtat. Ugach ekhadya thikanach nav kharab karayla
ReplyDeleteI want address for bayangi bhoot
ReplyDelete