काल्पनिक भयकथा
बिननावाचीगोष्ट... (भाग ~1)
नेहमी प्रमाणे त्यांचं आजही कुठ फिरायला जायच यावर एकमत होत नव्हतं.. पुण्यात जे काही Couples Points होते ते सगळे पालथे घालून झाले होते..अगदी शनिवार वाड्यापासून ते सारसबाग पर्यन्त.
शेवटी त्यातल्या त्यात जरा निवांत म्हणून ते तळजाई टेकडी वर जायला निघाले..
मेघा आणि मयूर कॉलेज मधून असल्या पासूनची मैत्री..
आणि बालपनापासूनचे मित्र मैत्रीण...शेजारी शेजारी राहात असल्याने दोन्ही घरांमध्ये ही एकोपा होता..
वयात आल्यापासून सगळेच त्या दोघांना म्हणायचे तुमच्या दोघांचा जोडा शोभून दिसेल..हाच धागा पकडून त्यांच्या मैत्रीच्या नात्याला त्यांच्या घरच्यांनी लग्नाच्या गाठित बांधायचा निर्णय घेतला होता.. साखरपुडा होऊन बराच काळ झाला होता. दोघांच् कॉलेजच शेवटच वर्ष होतं ते झाल की घरचे त्यांच्या लग्नाचा बार उडउन देणार होते..
पण तरुण वय सळसळत रक्त नव्याने उमलु पाहणाऱ्या नात्यात चोरून होणाऱ्या भेटी गाठी कशा थांबणार?
आजही असेच ते भेटत होते..फुलपाखरी दिवस होते हे त्यांचे...
मेघा ला Selfy च भयानक वेड होत..बसल्या बसल्या तीच तिथच सुरु झाल..
मावळतीकडे जाणारा सूर्य... घरटयाकडे उडनारि पाखरे..वाऱ्याने हलनारी झाडे..दूर कुठून तरी रानफुलांचा येत असलेला कडु गोड सुगंध... त्या सोबत उडनारा पाला पाचोळा...
फोटो काढताना वाऱ्या मुळे तिच्या केसांची उडनारी फजीती.. हे सर्व मयूर bike वर बसून हसत बघत होता.
नंतर त्याकडे लक्ष जाताच तिने स्वतःची जीभ चावली आणि हसून त्याला पण बोलवले.
मग दोघे मिळून Selfy काढू लागले..त्यासाठी चांगले Background शोधत शोधत ते वाडेकरांच्या बंद पडलेल्या बंगल्यात येऊन पोहोचले..
अर्धवट तुटक मुटक रंग उडालेल कंपाउंड..चरे पडलेल्या भग्न भिंती...फुटक्या दारूच्या बाटल्या...
आजुबाजूला वाढलेले खुरटे जंगली गवत..
प्लास्टिकचा केर कचरा...
वाकवलेल्या गजांच्या फुटलेल्या काचांच्या खिडक्या..
पश्चिमेकडे अस्ताला जात असलेला सूर्यनारायण..त्यामुळे पसरलेली गूढ संध्याकाळ..आणि त्या मागोमाग येणारी अंधारी रात्र..
आणि यात सोबत होतं त्या निष्प्राण बंगल्यावर झेपावनार एक पिंम्पळाच झाड...
अस एकंदरित ते दृश्य होत..
फोटो काढन्याच्या नादात ते बंगल्याच्या 1st फ्लोवर वर कसे पोहोचले हे त्यांच त्यांना पण कळल नाही...
त्यांच पाऊल बंगल्यात पडताच् तो एकाकी वाटनारा बंगला स्वतःशीच् खदखदून हसला होता..आज त्या ओसाड बंगल्याला त्याचा 31 वा बळी मिळणार होता..
त्या साठीच तर तो कुप्रसिद्ध होता...
जयवंत वाडेकर 1965 साली त्यानी तो बंगला बांधायला घेतला होता..पण एका एका जागेचा गुण असतो म्हणतात तेच खर... कोणत्या अशुभ मुहुर्ता वर त्याची पायाभरणी केली होती समजले नाही...
कितीतरी हळुवार स्वप्ने उराशी घेऊन त्या परिवाराने त्या बंगल्यात पाऊल टाकले होते...
अस म्हणतात की खुप आधी तिकडे एक वस्ती होती...त्यावर मध्यरात्री दरोडा पडला..दरोद्यात् जास्त लूट न मिळाल्याने चिडलेल्या दरोडेखोरांनी म्हातारे-कोतारे, पुरुष बापये,पोरं, आया बाया ,लेकी-सुना,लहान पोर कुणाचीही तमा न बाळगता अमानुषपने सगळ्यांना कापून त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांना तिकडच पुरण्यात आलं असा काहीसा त्या जागेचा काळा इतिहास होता..
हे जयवंत रावांना माहीत नव्हतं..तळजाई च्या टेकडी वरुन समोरचे दरितले विहंगम दृश्य रोज सकाळी दिसावे हाच निर्भेळ हेतु त्यांचा होता...पण नियतीने त्यांच्या प्रांक्तानात अघटित लिहिले होते...
घरात प्रवेश करताच काही दिवसांनी त्यांचा 8 वर्षाचा नातू वरुन खाली पडून मेला...
अजुन थोड्या दिवसांनी त्यांची सहचारिणी ही अल्पशा आजाराचे निदान होऊन देवाघरी गेली..
वडिलांना ,भावाला- वहिनीला धीर देन्यासाठी माहेरी आलेली त्यांची गर्भवती मुलगी जिन्यातून पाय घसरण्याचे निमित्त होऊन तिच्या बाळासोबत देवाघरी गेली...
मृत्यूचे हे थैमान त्या घरात चालूच होते..
घरातील वास्तुपुरुष जणू लोप पावला होता...
त्यांच्या मुला आणि सुनेला तिकडे रहाणे ही नको वाटत होते..शेवटी ते तिघे त्या घरातील कटु आठवणीं पासून सुटका मिळवन्यासाठी दुसरीकडे रहायला जायचे ठरवतात...पण नियतीचे दुष्टचक्र अजूनही थांबलेले नसते...त्या घराला याची कुनकुन लागून का होईना..
विपरीत घडते..जयवंत रावांची सुन आणि मुलगा अंगनातल्या पिंपळाच्या झाडाला फास लाउन घेतात..
स्वतःच्या वंशाची एका एकी अशी झालेली वाताहत बघुन जयवंत राव घराच्या उंबऱ्यातच जीव सोडतात...
सगळे लोक हळहळतात एका चांगल्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झालेला असतो..
तेव्हा पासून तो बंगला वारसा हक्काने कुणाच्या ना कुणाच्या ताब्यात जात होता. पण काहीतरी वाईट घडून पुन्हा रीता होत होता..जणू खोल तळ नसलेल्या विहिरी सारखा ..
शेवटी शेवटी तिकडे एक वृद्धाश्रम सुरु करण्यात आले. घराची नव्यानी डागडुजी केली. पण हाय..!!!
राहायला आलेल्या वृद्धानच्या अंगावर त्याचा Slab कोसळून सगळे जागीच ठार झाले.
आणि तेव्हा पासून तिकडे भटक कुत्र..वाट चुकलेला वाटसरू..चेंडू आनायला गेलेली लहान मुले कोणीही परत आले नव्हते..असे 30 जन तरी त्यात आता पर्यन्त मेले असतील..
आणि अशा बंगल्यात आज त्या दोन अजान जीवांनी प्रवेश केलता...
त्या दोघांच भारावल्या सारख Selfy Session चालल होत. एका मोठ्या खिडकी मागे दिसनारा सूर्यास्त ते Capture करायचा प्रयत्न करत होते..
आणि अचानक काहीतरी वाजल..
टुक...टुक.... टुकsss.....
तसे दोघ जन एकदम स्तब्ध झाले.
तो आवाज दोघांनी पण ऐकला होता..आणि दोघ जणू भानावर आले होते.
आणि परत तोच आवाज आला..
Battery Low च notification होत होतं ते..!!
फोटो काढून काढून battry च संपली होती फोन ची..
हिरमुसली होऊन फोन मयूर ला दाखवत मेघा म्हणाली,
ए बघ ना रे मयु हा फोन.. किती मस्त फोटोज काढत होते मी.! आणि याला पण आत्ताच बंद पडायच होतं..
तू ना मला आपल लग्न झाल्यावर एक मस्त फोन घेऊन दे हा.. ज्याने मी खुप खुप फोटोज काढीन.
यावर मयूर बोलला, हो देतो हा घेऊन नक्की रानीसरकार. पण आता आपण घरी जाऊ, अंधार पडला बघ' त्यात माझा फोन पण जास्त चार्ज नाहीए.
अस म्हणत ते आजुबाजूला उतरण्यासाठी जिना कुठ दिसतोय हे पाहू लागले.
आणि तेवढ्यात खाली कसले तरी आवाज येऊ लागले काहीतरी खनखनत खाली पडल्याचे..
त्या आवाजाने दोघेही दचकले..
आणि हळूच खाली वाकुन पाहू लागले..
तीथ खाली दारु प्यायला 4 जन झोकांडया खात येऊन बसत होते. त्यांच्या वागण्यावरुन ते आधीच थोडी पिऊन आल्या सारखे वाटत होते.
ते चौघे काहीतरी बडबड करत तसेच खाली मातीत फतकल मारून आडवे तिडवे बसले. आणि दारू प्यायला सुरुवात केली.
आता इथून बाहेर कस पडायचं हा गहन प्रश्न दोघांपुढे येऊन ठाकला होता.
असच खाली जान्यात Risk होती. ते 4 जन होते. मेघाला ते काहीही करू शकले असते. म्हणून त्यांनी थोडावेळ तिथच थांबायच ठरवल.
हळू हळू सूर्य अस्त होत होता..
अंधुक प्रकाश सगळीकडे पडला होता..
आणि तेवढ्यात सगळ्या घरात कुजबुज एकु येऊ लागली.. बाहेरच पिंपळाच झाड ही जोरात सळसळ करू लागलं. जस त्याच्या पारंब्याना कोणीतरी हलउन झोका खेळत होत.
आणि तेव्हाच मयुरच्या डोक्यात प्रकाश पडला सगळीकडे होणारी या बंगल्याच्या इतिहासाची चर्चा त्याला आठउ लागली आणि त्याला उभ्या उभ्याच् घाम फुटला..त्याने पळन्यासाठी मयुरीचा हात हातात घेतला..
तोच खालुन जोरात पडझडीचा आवाज येऊ लागला.
त्यातल्या एका दारुद्या जवळ एक बाटली घरंगळत आली..
आणि खळकन त्याच्या तोंडावर फुटली हे पाहून बाकीच्या 3 ची पण नशा झटक्यात उतरली...
ते त्याला धडपडत उठवायला जाऊ लागले..
आणि मधुनच भांडू लागले कोणी मारल याला..??
आणि तेव्हाच एका एकी त्या घरात रडन्याचे, किंचाळन्याचे, ओरडनयाचे...हसन्याचे...कुज्
मेघा तर रडूच लागली होती...अणि अचानक सगळ शांत झाल.. ते खाली भांडणारे चौघे कुठ तरी गायब झाले होते.. आणि घरात खाली पैसेज मध्ये जुन्या नवीन काळातले पोशाख घातलेली पांढऱ्या तोंडाची माणस जमा होउ लागली...
दोघांचे श्वास रोखले गेले होते..
आणि अचानक हसन्याचा आवाज येऊन मयुरच्या मागच्या खिडकीतला तुटका गज त्याच्या पाठीतुंन शिरून छातीतून बाहेर आला.. पहिली शिकार झाली होती...
तो मोठ्यानी ओरडला..मेघाला लवकर काय झाले ते समजलेच नाही.. ती किंकाळी फोडून खाली कोसळली..
तेव्हाच तिला दिसले एक गर्भवती मुलगी हलके हलके जीना चढत वर येत होती..पण तीच ते पोट?? एवढ मोठ कस दिसत होत?? हे शक्य नाही..
तिची लांब काळी नखे जिन्यात खर-खर आवाज करत घासली जात होती..
आणि हे काय???
तिच्या छातीत जोरदार कळ आली...
तिच्या पाया जवळ एक 8 वर्षाचा मुलगा भिंती वर काहीतरी त्याच्या नखांनी खरवडत होता...
तो एक आकड़ा होता..
32.....
आणि तिने प्राण सोडला...
समाप्त.