मी कुठे आहे..?
By Sanjay Kamble
बराच वेळ झाला मी एक गोष्ट नोटीस करतोय की कोणीतरी माझा पाठलाग करतोय.. कोण आहे ते मात्र दिसत नाही.. दिसत नाही, म्हणजे अदृश्य आहे असं नाही... रात्रीच्या या मिट्ट काळोखामुळ आजुबाजुला कोण आहे हे समजत नाही... खरंतर हा रस्ता माझ्या नेहमीच्या येण्याजाण्याचाच आहे.. मी लहानपणापासून इथं वाढलो मोठा झालोय त्यामुळे डोळ्यांवर कोणी पट्टी बांधून या वाटेवर सोडलं तरी मी न धडपडता घरापर्यंत पोहोचेन... ते ही कोणाच्या मदतीशिवाय.. पन आज असं का जाणवतय की कोणीतरी या वाटेवर चालत आहे , माझ्या मागे... पाठलाग करतय, की नजर ठेवून आहे हे समजत नाही. रात्रीचा साधारण दिड वाजलाय.. आणि त्यात काही वेळा पुर्वी सुटलेल्या वा-यामुळ लाईट पन गेली आहे... ना कोणाच्या दारात लाईट आहे, ना कोणाच्या घरात आणी ना रस्त्याच्या कडेला असलेल्या लाईटच्या खांबावर... आता आधार आहे तो आकाशातुन चमकणा-या विजांचा... काही सेकंदांची ते आभाळात उमटणारी लख्ख प्रकाशाची पांढरी रेघ सारं काही उजळून टाकतेय... आणी त्या शुभ्र प्रकाशात हा निर्मनुष्य रस्ता मला स्पष्ट दिसतोय.. आता या एक दोन सेकंदाच्या मर्यादित वेळेत मी मागे वळून पाहिलं पन मागेही रस्ता अगदीच निर्मनुष्य आहे...आता दिसायला ओसाड, निर्जन, निर्मनुष्य असला तरी मला जाणवतय की कोणीतरी आहे माझ्या आजूबाजूला , मागे...
वेगाचा वारा सुटलाय. डाव्या बाजूला मगदुमांच्या बंगल्याच्या उंच आणि लांब भिंतीच्या आत असणारी ती नारळाची उंच झाडे वा-याने हेलकावे घेताना असं वाटतंय की या झाडावर कोणीतरी बसलं असाव... आणि लहान मुले लाकडी घोड्यावर बसून झोके घेतात अगदी तसंच ते नारळीच उंच झाड मागे पुढे झोके घेतय...आता जरी भीती वाटत असली तरी क्षणभर जागेवरच थांबुन त्या झाडाला पहाण्याचा मोह आवरत नाही... तुम्हीही असं रात्रीच्या वेळी , ते ही लाईट गेल्य वर मीट्ट काळोखात फिक्कट पांढऱ्या दिसणा-या आभाळात उंच गेलेली आणि वा-याच्या झोक्यांनी जोरजोरात हेलकावे घेणारी नारळाची झाडे कधी पाहीली आहेत का...? नसेल पाहीली तर पहाण्याच धाडसही करु नका...? जाम डेंजर दिसतंय.
मी संजु.. तसा मी घाबरट आहे, भुतं बीत यांची भीती स्वाभाविकच वाटते.. खरं सांगायला लाज काय वाटायची...? उगाच स्वताला धाडशी दाखवायचा किडा लहानपणापासून माझ्यात नाही.. माझ घर तसं बरच लांब आहे. अजुन बरच अंतर पार करायचं आहे.. तेव्हा येईल माझं घर.. हो माझं घर..
घर , आपल्या सर्वांसाठी जगाच्या पाठीवरच एकमेव आणि सर्वात सुरक्षित ठिकाण...जीथ एकांतात आपन काही करू शकतो.
एकांत ...आपल्या तरुण वयासाठी देणगीच जणु.. त्यात आपली रुम.. ज्या खोलीत आपल्या परवानगी शिवाय कोणी येऊ शकत नाही . असं ते आपलं सोनेरी जगच बनलेल असतं... पन कधी असं घडलंय का की तुम्ही आपल्या त्या सोनेरी स्वप्नांच्या घराकडे जायला निघाला आहात... ते ही अशा लख्ख काळोखात. तुम्ही बराच वेळ चालून अंतर पार करताय आणि आता काही अंतरावर तुमचं घर राहिलं आहे आमी काही वेळात ते अंतरही संपत.. तुम्ही तुमच्या घराच्या दारात आहात.. आणि तुम्ही दरवाजावर थाप देताय... एक दोन वेळा दरवाजा वाजवल्यानंतर आतुन हलकीशी हालचाल जाणवतेय... कोणीतरी लाईटच बटन दाबल्याचा 'टीक' असा आवाज आला आणि तुम्ही दरवाजा उघडण्याची आतुरतेने वाट पाहत आहात.. दरवाजाला आत असणारी कडी सरकवल्याचा आवाज येत आणी तुम्ही समोर पहाता... दरवाजा उघडताच आतल्या बल्बचा पांढरा प्रकाश उघडलेल्या दरवाजातून बाहेर तुमच्या अंगावर पडतो.. तुम्ही तुमच्या घरात जाता आणी थेट आपल्या खोलीत शिरताय पन इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात येते की... ते घर , ती खोली , ती माणसं सारं काही अनोळखी आहे... तुम्ही यांपैकी कोणालाच ओळखत नाही... आणि त्या घरातील लोक आरडाओरडा करण्याआधी आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात येते आणि ती म्हणजे ज्या अनोळखी व्यक्तीन दरवाजा उघडला ती व्यक्ती तुम्हाला अगदी शांतपणे सांगते की...
"तुझ्या आईची तब्येत बरी नाही तेव्हा तुच तुच जेवण गरम करून जेवून घे.."
एखादा अनोळखी इसम घरात शिरला की लोक सामान्यतः त्याला हाकलून लावतात, किंवा आरडाओरडा करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देतात पन जे काही माझ्या सोबत घडतंय हे समजण्यापलीकडच आहे... काही दिवसांपासून हे जे काही माझ्या सोबत घडतंय माझ्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तरी त्याची अवस्था माझ्यासारखीच झाली असती... कधीपासून घडतंय हे ही लक्षात येत नाही पन काही महिने ...? काही वर्ष....? असतील... काही वर्ष झाली असतील..
मी माझ्या घरी जायला निघतोय पन घरी पोहोचल्यावर समजतंय की हे घर माझं नाही... कोणी दुसरीच माणस माझ्या घरात रहात आहेत... मग समजत की हे घर देखील माझ नाही...
मला नेमकं काय झालंय हेच समजत नाही... स्मरणशक्ती कमी झाली आहे की गेलीच आहे...
हे सारं घडलं एका अपघातानंतर...

सायंकाळची दीवे लावनीची वेळ असेल... नेहमी प्रमाण घरी येत होतो.. मित्र मंडळी सोबत चौकात थोडावेळ गप्पा मारल्या, विजय च्या आईची तब्येत बरी नव्हती म्हणून त्याला थोडे पैसे हवे होते.. त्याच्या हाती पैसे दिले आणि बाजूला जाधव काकांच्या दुकानातून माझा आवडता खुराक चिरमुरे, फरसाना आणि खारीडाळ घेतली... तुम्हाला वेगळा संशय आला असेल पन मी तसल काही घेत नाही.. साहित्य हॅंडेलला अडकवत बाईक वरुन जायला निघालो ... तोच समोरून एक पंधरा सोळा वर्षांचा सळसळत्या रक्ताचा बाईक रायडर बाईकची मुठ वाढवत असा काही वेगात येत होता की हाॅस्पिटलच्या बेडवर बाप शेवटच्या घटका मोजतोय आणी पाणी घालायला यालाच बोलवलय ... तो गाडीचा कर्कश आवाज करत तो समोरून आला आणी सुसाट वेगाने निघूनही गेला तसा मी पुन्हा आपल्या विचारांमध्ये गुरफटून गेलो... तोच काही सेकंदातच मागुन पुन्हा त्या रायडर च्या बाईकचा आवाज आला... आवाजावरून वाटत होतं की जीतका वेग मघाशी होता त्याहुन अधिक वेगानं तो येतोय... रियर व्यु मिरर मधे मी त्याला पहात होतो.. तो काही फुटांवर असेल की अचानक माझ्या समोर दुसऱ्या बाजूला रस्त्यावरून एक लहान मुलगा धावत येताना दिसला. मी बाईकचा वेग कमी केला पन मागुन येणाऱ्या रायडर ने आपली गाडी मला ठोकलीच... रस्त्यावर डोकं आपटलं आणी सारं काही अंधुक अंधुक दिसायला लागल.. हैंडेलला अडकलेल खाण्याच साहीत्य रस्त्यावर सर्वत्र विखूरल गेलं.. त्या दिवसापासून लोक मला ओळखतात पन मला ते अनोळखी वाटतात..
पन एक समजत नाही की मी नेहमी वेगवेगळ्या घरात का जातोय... घर वेगळी.. त्यातली माणसे वेगळी.. असं असलं तरी ते मला ओळखतातच...
या अनोळखी लोकांसोबत काय बोलायचं म्हणून मी गप्पच असतो.. तर हे उगाच त्रास देत रहातात..
" असं का करतोस रे.. ? बोल काहीतरी...?"
हे वारंवार ऐकु येतं, आणि त्या घरात असणारी माझी आई की जी मला मुलगा मानतेय पन मी तीला नाही ओळखत .. ती रडते. डोकं बडवुन घेते...

हे आता माझ्या साठी नेहमीचच झालंय.. कधी कधी असं वाटतंय की जोरात डोकं या काळ्याकुट्ट डांबरी रस्त्यावर आपटाव किंवा घराच्या भिंतीवर आपटाव आणि पहावं माझी स्मरणशक्ती परत येतेय का ते... तसा प्रयत्नही खुपदा केलंय... मी असं केलं की घरातले सर्वच घाबरतात पन माझा त्रास त्यांना नाही समजणार..मी हे करतोय कारण माझी स्मरणशक्ती परत यावी, पन ते सारं हिंदी पिक्चर मधेच घडत.. रियल लाईफ मधे नाही.. आजही मी नेहमी प्रमाणेच घरी निघालोय.. नेहमी प्रमाण सामोरं जायचं.. सर्वच अनोळखी असतील यात शंका नाही पन ते मला ओळखत असतील... घर तर आलंय माझं. पन त्या घरात कोण असेल.. दरवाजा वाजवलाय आणि तो उघडायची वाट पाहतोय.. आत किंचित हलचाल जाणवतेय.. बाहेरच बटन लावल्याचा आवाज आला पन लाईटच नाही.. कडी सरकवल्याचा आवाज आला आणि तो लाकडी दरवाजा उघडला... पुन्हा तेच.. एक अनोळखी व्यक्ती समोर उभी आहे... मी काही न बोलता आत शिरलो घर तरी ओळखीचं वाटतंय...
माणसं पन किंचित ओळखीची वाटताहेत.. मेणबत्ती च्या प्रकाशात निटस काही दिसत नव्हत..
" लवकर घरी येत जा बाळा.."
आणि माझ्या लक्षात आलं की मी आज माझ्याच मित्राच्या, म्हणजे विजय च्या घरी आलोय... आणि ते ही मला विजयच समजत आहेत... विजय कदाचित त्याच्या रुममध्ये असेल...
पाहुया...
रूम कशी निटनेटकी ठेवली आहे.. बेडवर विस्कटलेली पुस्तक, टेबलवर बुद्धीबळाचा अर्धवट मांडलेला डाव, आरशावर चिकटवलेले सनी लियोन च स्टीकर.. हाॅट दिसतेय...
काय रे देवा...? विजय च्या आई ने बघायच्या आत हे पोस्टर काढायला हवं नाहीतर लवकरच लग्न करतील बिचा-याच... पन साहेब कुठ आहेत...? आरशावर चिकटवलेल हे पोस्टर ओरबाडून काढलं पन हे काय...? आरशात विजय च प्रतिबिंब दिसतय...?
तर मग....? मी कुठे आहे..?

समाप्त..
वाचकांची तक्रार आहे की आपल्या पैकी ब-याच जणांना कथा समजली नाही. कदाचित एक सामान्य भयकथांची म्हणजे एक नायक मग भुताचा सामना , मग एक लढाई, मग वाईट शक्ती चांगली शेवट अशा पठडीतील कथांची आवड असल्या कारणांमुळे असेल. माझ्या भयकथा नेहमीच जरा हटके असतात. वाचकांच्या कल्पना शक्ती पलिकडे जाऊन लिहायचा प्रयत्न करतो . कदाचित यामुळेच इथल्या ब-याच वाचकांना ही कथा समजली नाही...
कथा साधी सोपी आहे.
ज्यांना समजली नाही त्यांच्यासाठी.
कथा साधी सोपी आहे.
ज्यांना समजली नाही त्यांच्यासाठी.
कथेमधल प्रमुख पात्र रात्रीच्या काळोखात निर्जन निर्मनुष्य रस्त्यावरून एकटच निघालेल असतं. त्याची एक तक्रार आहे की ते प्रत्येक वेळी आपलं घर समजून दुसऱ्या घरात जातो जीथ सारे अनोळखी असतात, पन ती अनोळखी माणसं याला ओळखत असतात.. आता हे तेव्हा पासून घडतंय जेव्हा एक अपघात घडला त्यानंतर हे सुरू झाल. यावेळी तो आपल्या मित्राच्या विजय च्या घरी पोहोचतो.. विजय च्या रूम मध्ये विजय ला शोधत असतो . तीथ आरशावर चिकटवलेल पोस्टर फाडल्यावर लक्षात येत की तो विजयच आहे.. मग हा कुठे आहे... तर हा काही वर्षांपूर्वी घडलेल्या त्या अपघातात मरण पावला. पन त्याचा आत्मा लोकांच्या शरिरात प्रवेश करतो रहातो.. त्यामुळे याला वाटत की आपन नेहमी अनोळखी घरात जातोय.. शेवटी विजय च्या शरिरात प्रवेश करतो.. आणि आरसा पाहिल्यावर समजत की शरिर विजय च आहे.. याच शरिर तर केव्हाच संपलय...
आशा करतो की भयकथा आतातरी समजली असेल....???