रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 6)
.....ते दुसरे तिसरे कुणी नसून त्याचे काका आणि मंदिराचे पुजारीबाबा होते ,समर्थचा दिमाग चालायचाचं बंद होतो ,एवढ्या मोठया धक्क्याने तो खाली कोसळतो ,त्याचे सख्खे काका जो त्यांना आपल्या वडिलांच्या जागी बघायचा ,ते एवढ्या खालच्या थराला जातील असं त्याला कधीच वाटलं नव्हतं ,आणि दुसरे ते पुजारी बाबा ,ज्यांच्या पायावर पूर्ण गाव डोकं ठेवतं ,देवाचा दूत ज्याला सर्वजण मानतात ,तो असल्या काळ्या शक्तीचा उपासक निघावा ,ज्यांच्या वर डोळे झाकून विश्वास ठेवावा तेच पाठीत खंजीर खुपसणारे निघावेत आणि एवढ्यादिवास आपण त्यांच्या सोबत राहून आपल्याला ,आपल्यात राहणारे गाईचं कातडं पांघरलेले लांडगे ओळखू न यावेत,ह्यावून मोठं दुर्दैव काय असू शकतं ,समर्थ स्वतःलाच कोसत बसतो, वयाने मोठे असल्यामुळे तो त्यांच्यावर हातही उचलू शकत नव्हता म्हणून तो त्यांना जाब विचारतो कि ,का तुम्ही असं केलात ,का पूर्ण गावकऱ्यांच्या भावनांशी खेळालात ,स्वतः च्या स्वार्था साठी का मंदिराला बदनाम केलं ,भरपूर प्रश्नांची उत्तरं समर्थला त्यांच्याकडून घ्यायची होती,आणि मुख्य म्हणजे त्यांच्यासोबत ह्या मध्ये आणखी कोण शामिल आहे हे देखील माहिती करायच होतं, तो आणखी काही बोलणार तोच त्याच्या डोक्यावर मागून कुणीतरी जोरात प्रहार करतो आणि तो खाली पडून बेशुद्ध होतो ,जेव्हां तो शुद्धीवर येतो तेव्हा त्याला दोरीने बांधलेले असते ,त्याच्या आजूबाजूला त्याचे साथीदार सुद्धा बांधलेल्या अवस्थेत असतात ,आणखी 3,4 लोकं त्याला तिथे त्याच पद्धतीने बांधलेले दिसतात ,त्यांच्याकडे बघून असं वाटत होत की खूप दिवसांपासून ह्यांना काही खायला नाही दिल्या गेलं आणि त्यांच्याकडून शारीरिक कष्टाचे काम देखील करून घेण्यात आले असावे ,समर्थला ती दोरी काही सुटत नव्हती ,कसला तरी चमत्कारिक पाश होता तो ,खूप ताकत लावूनही सुटत नव्हता ,इकडे मल्हार हरतर्हेचे प्रयत्न करत होता समर्थ आणि त्याच्या मित्रांची सुटका करण्याचे ,पण त्याला दुसरी पूजा सुद्धा अर्धवट सोडता येत नव्हती,इकडे आड ,तिकडे विहीर अशी त्याची स्थिती झाली ,शेवटी त्याने भगवान शंकरानाचं साकडं घातलं ,आणि मन घट्ट करून पूजेला बसला ,इकडे मंदिरात त्याचे गुलाम त्याला बाहेर काढण्यासाठी जोरजोरात मंत्र म्हणत होते ,समर्थला जमिनी मधून धक्के जाणवायला लागले होते ,तसे त्याचे भक्त खुश होऊन आणखी जोर जोराने ते विचित्र ,कर्णकर्कश मंत्र म्हणत होते ,इकडे मल्हार ने त्याच्या साधनेच्या बळावर यज्ञातून एक अस्त्र मिळवलं ,जे त्या शैतानाला काही काळ तरी रोखून ठेऊ शकणार होतं ,तो आणखी एका महास्त्राच्या प्राप्ती साठी यज्ञ करत होता ,जे साक्षात प्रभू शंभोंकडून त्याला मिळणार होतं,आणि त्याच अस्त्रामुळे त्या शैतानाचा कायमस्वरूपी अंत होणार होता ,पण ते अस्त्र मिळवणं एवढं सोप्प नव्हतं ,सैतान आणि त्याचे गुलाम ह्या कामामध्ये खूप अडथळे आणणार होते ,मल्हार च्या जीवावर बेतणार होतं हे सर्व ,पण त्याला पर्वा नव्हती ,कोणत्याही हालातीत त्याला त्या शैतानाचा अंत करायचा होता ,ते काम प्रभू शंभो करू शकले असते ,पण त्याच्या गुलामांनि त्यांना बंध घातला होता ,त्यामुळे हे काम मल्हार ला करायचं होतं ....(क्रमश:)
.....पण त्याच्या गुलामांनि त्यांना बंध घातला होता ,त्यामुळे हे काम मल्हार ला करायचं होतं ,एक एक क्षण महत्वाचा होता ,कारण "तो" पाताळातून हळू हळू पृथ्वीकडे झेपावत होता,एक एक अडथळे त्याच्या गुलामांमुळे त्याला पार करता येत होते ,तो जसा जसा वर येत होता ,तसा तसा मल्हार च्या साधनेत व्यत्यय येत होतं, कधी रूम मध्ये सोसाट्याचा वारा जानवे, तर कधी पाऊस,कधी त्याच्या परिचित व्यक्ती त्याला दिसायचे ,त्याला बाहेर चल म्हणायचे ,पण मल्हार ला माहिती होतं हा सर्व त्याने केलेला भ्रम आहे म्हणून,त्यामुळे तो तिकडे लक्ष देत नव्हता,इकडे त्याचे गुलाम फक्त रात्रीचे बारा वाजायची वाट बघत होते ,कारण तेव्हा एकच विधी करण्यात येणार होता ,आणि त्यांचा मालक कायमस्वरूपी बाहेर येऊन अमर होणार होता ,समर्थ चे काका आणि ते पुजारीबाबा समर्थ जवळ येऊन त्याला हिणवायला लागले ,"समर्थ बाळा तुझा काळ जवळ येतोय ,तुझ्याकडे दोन पर्याय आहे एक तर त्याच्या समोर शरण ये ,नाहीतर मरायला तयार हो तुझ्याबापासारखं,"बापाचं नाव ऐकून समर्थ चवताळला ,
"होय,तुझ्या बापाला आम्हीच संपवलंय,ह्याच ठिकाणी ,तो देखील तुझ्यासारखाचं आमच्या कामात अडथळा बनु पाहत होता , ह्या मंदिराच्या खऱ्या पुजाऱ्यामुळे आणि तुझ्या बापामुळेच आमच्या मालकाला पृथ्वीवर यायला वेळ लागत आहे ,नाहीतर 24 वर्षा पूर्वीच आमच्या मालकाचं इथे राज्य सुरु झालं असतं ,ह्याचं ठिकाणी मुडदा पडला होता तुझ्या बापाचा आणि त्या पुजाऱ्याचा ,आणि मग ,आम्हीच मंदिराची दान पेटी पळवली आणि त्याचा आरोप तुझ्या बापावर लावला, खबरदारी म्हणून नंतर आम्हीच त्या सर्व गोष्टी करायला सुरुवात केली ,कारण नंतर आम्हांला आमच्या कामात कुणाचाही हस्तक्षेप नको होता ,म्हणून आम्हीच जाणून बुजून महाशिवरात्रीच्या अगोदर गावात अंधश्रद्धा पसरावी म्हणून ,जनावरे गायब करायचो ,आणि एका विशिष्ठ हत्याराने त्यांचं मुंडक कापून फक्त धड मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात फेकायचो,रात्री आमचेच काही लोकं विचित्र आवाज काढून जागलीला आलेल्या शेतकऱ्यांना घाबरवायचे ,आणि लोकं आणखी घाबरावे म्हणून आम्ही ह्याला पुजारी बनवून लोकांसमोर हजर केलं आणि सांगितलं के हे जे सर्व होतंय तो देवाचा कोप आहे प्रभु शंभो शंकर गावावर नाराज आहे ,त्यामुळे काही दिवस मंदिर बंद ठेवावे लागेल ,आणि आम्ही मंदिर जाणून माघ पौर्णिमेच्या यायच्या अगोदर काही दिवस बंद करायचो जेणे करून मंदिरात आमचे हे उद्योग कुणाला कळू नये म्हणून,भीतीमुळे रात्री कुणीही मंदिराकडे भटकायचं नाही ,आमचं काम सोप्प होत होतं ,पण एके वर्षी पुजाऱ्याने आम्हांला असं करतांना बघितलं ,तेव्हा त्याला लगेच मारावं लागलं ,आणि नंतर तुझ्या बापाने बघितलं ,तो आमचं सर्व गुपित उघड करणार होता ,त्याला किती लालूच दाखवली तरीही तो ऐकला नाही ,म्हणून ह्या ह्या हाताने मला माझ्या सख्ख्या भावाचा जीव घ्यावा लागला,अन आता तू आलाय,तुला काय वाटलं की आम्ही एवढे मूर्ख आहोत ,तू जेव्हा गावात आलो तेव्हांच मला तुझा संशय आला होता की हा नक्की आपल्याला अडथळा बनणार म्हणूनच तुला सहानुभूती दाखवत आम्ही दोघांनी तुझ्या टीम मध्ये स्थान मिळवलं ,त्यामुळे तुझी प्रत्येक चाल आम्हांला अगोदर कळायची आणि आम्ही सतर्क व्हायचो,पण तू किती रे बावळट ,आम्हांला एका सेकंदाने सुद्धा तू ओळखू शकला नाही , तुझ्या गफलतपणामुळे तुझे दोन साथीदार विनाकारण जीवानिशी गेले,आम्हीच त्यांना आमच्या ह्या हाताने मारलं ,आणि तिथे मुद्दाम तो संदेश लिहून ठेवला, तुला संशय आलेला एकदा कि टीम मधलंच कुणीतरी गद्दार आहे ,तेव्हा मात्र आम्ही मात्र घाबरलो होतो ,पण तुला कसं तरी समजावून सांगितलं आणि नंतर आम्ही सुद्धा थोडं सावधगिरीने वागायला लागलो, मग रात्री बेरात्री तुझ्या घराचा दरवाजा आमच्यापैकीच कुणीतरी वाजवायचं ,तुला सुद्धा किती भीती दाखवायचा प्रयत्न केला पण तू बधला नाही म्हणून शेवटी तुला सुद्धा संमोहित करून त्या दिवशी तलावात बुडून मारायचा प्लॅन केला होता ,पण ऐन टाइम ला तू वाचलास आणि तू त्या बिचाऱ्या पाटलावर विनाकारण संशय घेत बसला ,पाटील थोडा फटकळ स्वभावाचा आहे आणि त्याचाच फायदा आम्ही घेतला ,त्याच्याविरुद्ध तुझे कान भरले आणि तुझं बाकी गोष्टींवरून लक्ष कमी केलं पाटलावर लक्ष केंद्रित करायला प्रेरित केलं,तू आपोआप आमच्या जाळ्यात अडकत गेला आणि फसलास,आता मरायला तयार हो,कोणत्याही क्षणी आमचा मालक बाहेर येऊन पहिला बळी तुझा घेईल ,कारण तुझ्यामुळे त्यांना बाहेर यायला विलंब होतं आहे ,हे सर्व ऐकून आता समर्थ जोर जोराने हसायला लागला ,आणि त्याच्या काकाच्या जोरात कानफाडात वाजवली ,अन म्हणाला अरे मूर्खांनो तुम्हांला काय वाटलं ,कि मी तुमच्या जाळ्यात अडकलोय ,अरे मंदबुद्धी लोकांनो तुम्ही माझ्या जाळ्यात अडकलात ते पण तुम्हांला काहीही न समजु देता, तुम्ही तुमच्या तोंडानेच आतापर्यंत केलेल्या सर्व गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि ते सर्व इथे लावलेल्या सर्व कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे , आणि तुम्हांला जे हे वाटतंय कि तुम्ही मला किंवा माझ्या टीम ला बंदी बनवलयं हे आम्हीच मुद्दाम तुमच्या कडून बंदी बनून घेतलं कारण मग तुम्ही तुमच्या केलेल्या गुन्ह्याची कबुली कशी दिली असती ,खूप वर्षांपासून तुमच्या पाळतीवर होतो आम्ही पण तुमच्या विरुद्ध कुठला ठोस पुरावा सापडत नव्हता ,होय मी CBI इन्स्पेक्टर समर्थ ,काका तुम्हांला आणि ह्या गावाला मुद्दाम हि गोष्ट सांगितली नव्हती मी कारण जेव्हा माझे वडील गावातून अचानकपणे गायब झाले त्याच्या काही दिवसांनी मला त्यांची एक डायरी मिळाली जी त्यांनी मला पोस्टाने पाठवली होती आणि त्यात मंदिराबद्दल सर्व लिहिलं होतं ,त्यांना तुमचं रहस्यपण माहिती झालं होतं ,आणि त्यांना त्यांच्या जीवाला धोका आहे हे पण माहिती होतं म्हणून सर्व एका डायरीत लिहून त्यांनी ती मला पोस्ट केली होती मी ती सहज पोलिसांच्या स्वाधीन करू शकलो असतो,पण मला माझ्या वडिलांवर लागलेला डाग पुसायचा होता म्हणून मी पोलिसात भरती झालो, मला तुम्हांला रंगे हात पकडायचं होतं म्हणून आणि हा सर्व प्लॅन रचला त्या डायरीत त्यांनी सर्व व्यवस्थित टिपलेलं होतं ती आता सुरक्षित हातात आहे माझ्या केसांनादेखील धक्का लागला ना तर तुम्ही एन्काऊंटर मध्ये मारले जाल एवढी पुढची तयारी करून आलोय मी .........
(क्रमश:)