रहस्यमयी मंदिर :एक षडयंत्र (भाग 2)
......तुझा बाप अचानक गायब झाला आणी नेमकं त्याचं दिवशी मंदिरातून देवाची दानपेटी सुद्धा गायब केली होती,त्याचा आळ गावकऱ्यांनी तुझ्या बापावर घेतला होता ,देवाचे पैसे घेऊन पळून गेला असं सर्वत्र त्याची बदनामी केल्या गेली ,पण पोरा मला माहिती आहे रे तुझा बाप असा नव्हता रे ,लय देव माणूस होता रे तो ,तो अशी देवाच्या दारी चोरी करणारा नव्हता रे ,पण गावच्या पाटलाच्या पुढे बोलायची कुणाची हिम्मत होत नव्हती रे ,पाटलांनी तुझ्या बापाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली होती की आमच्या देवाची पेटी घेऊन गेला म्हणून तो ,बापाच्या आठवणीने समर्थ च्या डोळ्यात पाणी आलं होतं,किती वर्षे त्याने आणि त्याच्या घरच्यांनी त्याच्या वडिलांना शोधण्यात घालवले होते ,पण त्यांचा कुठेच पत्ता लागत नव्हता,त्याला त्याच्या वडिलांचा खूप अभिमान वाटायचा ,त्यांच्यासारखाच त्याला कर्तबगार,कर्तव्यदक्ष पोलीसअधिकारी बनायचं होतं , पण ते असे अचानक नाहीसे झाल्यामुळे आणि त्यांच्यावर असलेल्या त्या आरोपामुळे त्याच्या आई ने म्हणजे सुमन ने त्याला शपथ घातली होती की काहीही झालं तरी तू पोलीस बनणार नाहीस म्हणून ,झाला एवढा मनस्ताप पुरे आहे असं ती नेहमी म्हणायची आणि प्रतापरावांच्या आठवणीने टीप गाळायची,समर्थ त्या वेळी जाणत्या वयाचा असल्यामुळे त्याला सर्व कळायचं आणि म्हणूनच त्याने ठरवलं होतं ,कि तो त्याच्या वडिलांना शोधून काढणार आणि त्यांच्यावरचा खोटा आरोप सुद्धा मिटवणार ,समर्थ आता एक एक कड्या जुळवायचा प्रयत्न करत होता ,त्यातून तो एका निष्कर्षाला पोहचला कि ह्या मागे नक्कीच काहीतरी मोठं षडयंत्र आहे त्यामुळे मंदिर विनाकारण बदनाम होत आहे,आणि हा काही दैवी प्रकोप नसून मुद्दाम तयार केलं गेलेलं आहे कि ज्यामुळे लोकांच्या मनात भीती बसेल आणि ते मंदिरापासून 4 हात दूर राहतील,समर्थ ने पक्का निर्धार केला ह्यावेळी काहीही झालं तरी मंदिराचं रहस्य शोधून काढायचं आणि मंदिराला गतवैभव प्राप्त करून द्यायचं ,त्यासाठी प्राणाची आहुती द्यावी लागली तरी चालेल पण ह्या मागे जो कुणी आहे त्याचा चेहरा सगळ्यांसमोर आणून ठेवील असा त्याने प्रण केला,बघता बघता हि गोष्ट गावभर पसरली ,काहींनी त्याच्या धडासावर नाकं मुरडली तर काहींनी त्याच्या हिमतीला दाद दिली ,"एवढया वर्षात आम्ही जीवाचं रान केलं पण काहीच हाती लागलं नाही ,अन काल परवा आलेलं हे पोरगं रहस्य खोलनार म्हणे" ,गावचा पाटील पारावर बसून लोकांना सांगत होता,पण समर्थचे काका,मंदिराचे पुजारी बाबा (जे नवीन आले होते कारण आधीचे पुजारी बाबा मंदिरातून अचानक पणे गायब झाले होते), आणि गावचा सरपंच ,हे जाणकार लोकं मात्र समर्थला पाठिंबा देत होते ,वेळोवेळी योग्य ती माहिती पुरवत होते ,समर्थला एक जाणवलं की हे काम तो एकटा करू शकत नव्हता म्हणून त्याने गावातील त्याच्याच वयाचे मित्र विश्वासात घ्यायला सुरुवात केली ,त्यात त्याची बालपनाची मैत्रीण कल्पना देखील होती ,कल्पना सरपंचाची मुलगी होती ,त्यामुळं गावात तीच थोडं वजन होतंच ,ती समर्थवर खूप मरायची पण समर्थ फक्त तिला आपली चांगली मैत्रीण मानायचा ,तिच्याशी तो खूप फ्री वागायचा त्यामुळे तिने असं गृहीत धरलं होतं की समर्थसुद्धा तिच्यावर प्रेम करतो म्हणून ,तिची समर्थसोबत असलेली जवळीक गावातल्या काही टाळक्यांना काही रुचली नव्हती ,त्यामुळे त्यांनी सरपंचाचे कान भरायचा प्रयत्न केला पण सरपंचानी त्यांना फाट्यावर मारलं ,त्यांना ह्या दोघांच्या निखळ मैत्रीवर पूर्ण भरवसा होता ,तर समर्थ ने कल्पना,सरपंच ,पुजारी बाबा आणि आणखी 2,4 जण जमा करून एक टीम बनवली आणि ते त्यांचे गुप्त प्लॅन आखू लागले ,पण ज्या दिवसापासून समर्थ ने ती घोषणा केली ,त्या दिवसापासून त्याला रोज विचित्र अनुभव यायला लागले ,रात्री अपरात्री कुणीतरी जोरजोरात दार ठोठावल्याचा आवाज येई,पण दरवाजा उघडल्यानंतर कुणीच दिसत नसे,दोन वेळा रात्री उशिरा घरी परततांना त्याच्यावर हल्ला देखील करण्यात आला,तो सेल्फ डिफेन्स करण्यात ट्रेन असल्यामुळे एका हल्लेखोराचा हात फ्रॅक्चर करतो ,हातात येता येता ,हल्लेखोर पोबारा करण्यात यशस्वी होतात,कधी रात्री बेरात्री त्याच्या फोन वर प्रायव्हेट नंबर वरून फोन यायचा, पण फोन वर मात्र कुणीच बोलत नसे ,कधी त्याच्या घराबाहेर असंख्य टोचण्या लावलेली हळद कुंका मध्ये माखलेली काळी बाहुली सापडत असे तर कधी टाचण्या टोचलेलं निंबु,एकंदरीत समर्थला त्याच्या धेय्यापासून रोखण्यासाठी विरोधक सर्व प्रकारचे प्रयत्न करत होते,समर्थ त्याच्या टीम ला सर्व समजून सांगत असतांना त्याचे काका तिथे येतात ,हात गळ्यात बांधून सर्वजण विचारतात काय झालं तर ते सांगतात की, रात्री गोठ्यात गेलो होतो जनावरांना चारा टाकण्यासाठी ,मागून कुणीतरी धक्का दिल्यासारखं वाटलं ,तोल जाऊन म्हशीच्या शिंगावर पडलो अन हात तुटला ,डॉक्टर कडे जाऊन प्लास्टर करून आलो ,समर्थ आता टेन्शन मध्ये येतो की ते लोकं माझ्यासोबत ,माझ्यापरीवाराला देखील नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे ,माझं पूर्णपणे ते खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे ,उद्याच आपल्याला काहीतरी ठोस पाऊलं उचलावे लागतील ,दुसऱ्या दिवशी तो ग्राम सभा बोलावतो आणि सर्वांना सांगतो की नक्कीच त्या मंदिरामध्ये असं काही रहस्य आहे ज्यामुळे मला ते रहस्य सर्वांसमोर आणण्यापासून कुणीतरी सतत अडथळे आणत आहे ,हा काही देवाचा कोप नाहीये ,नक्कीच कुणीतरी आपल्यासारख्या देवभोळ्या लोकांच्या मनात देवाची भीती घालून त्यांचा कार्यभाग सिद्ध करू बघत आहे ,तेवढ्यात तिथे गावचा पाटील लंगडत लंगडत ,आणि तुटलेला हात गळ्यात घालून येतो ,समर्थ वर एक तुच्छतेचा कटाक्ष टाकून तो पारावर बसतो ,समर्थ त्याच्याकडे बघून विचारात पडतो की तो हल्लेखोर हा गावचा पाटील तर नसावा ,कारण सर्वात पहिला विरोध मला पाटलानेच केला होता ,आणि मी त्या दिवशी त्या हल्लेखोराचा डावाच हात तोडला ,होता आणि पाटलाचा पण डावाच हात गळ्यात आहे ,पाटलावर नक्कीच नजर ठेवावी लागेल ,काहीतरी आहे जे पाटील लपवत आहे सर्वांपासून ,सर्वांनी पाटलावर पाळत ठेवायला सुरुवात केली ,एक दोन वेळा रात्रीच्या टाइम ला पाटील मंदिराकडे हिंडताना पोरांना दिसला ,त्यामुळे समर्थ चा पाटलावर संशय पक्का होत होता ,इकडे वेळ हातातल्या वाळू प्रमाणे निसटत चालला होता ,शिवरात्री जवळ येत होती पण समर्थला हवा तसा पुरावा मिळाला नव्हता ,समर्थ नाउमेद होत चालला होता ,पण कल्पना त्याला धीर द्यायची सोबत पुजारी बाबा होतेच ,रात्री अपरात्री त्याला घराबाहेर विचित्र आवाज यायचे ,जस काय कुणीतरी त्याला बोलवत आहे ,एक रात्री तो असाच त्या आवाजाचा पाठलाग करत करत मंदिराच्या मागे जाऊन पोहचला ,मंदिराच्या मागे मोठं तळं होतं, समर्थ यांत्रिक हालचाली करत तिथपर्यंत आला होता ,तो आता तळ्यात जाणार तोच कुणीतरी त्याला जोराने पाठीमागे खेचलं ,तो तसा शुद्धीवर आला ,त्यालाच कळत नव्हतं कि तो इथपर्यंत कसा आला ते .........😢
(क्रमश:)