पार्ट... 2.....स्वप्न
गेला आठवडा अविनाश ऑफिस ला फिरकलाच नाही की त्याने काही कारण सांगितलं नाही . "सागर पाटील" त्याचा मित्र याच चिंतेत होता.. अवी का येत नाही हे त्याला कळत नव्हतं. त्याचा कोणत्याही प्रकारे contact होत नव्हता.. एक -दोनदा त्याच्या घरच्यानीही सागरला फोन केला. त्यांनाही अवीची खुशाली कळत नव्हती
बरं.. एकटा राहणारा मुलगा..!! सागरला त्याची काळजी वाटू लागली.. त्यानं आपल्या काकांना... उद्धव दादांना ही गोष्ट सांगितली..
उद्धव दादा, सागरचे काका... !एक असीम देवी भक्त !!त्यांची देवी दुर्गा वर अपार श्रद्धा होती... आणि त्यांना सागरने असं सांगताच थोडी हुरहूर लागली.. काहीतरी घडलं आहे असं त्यांचं मन त्यांना सांगू लागलं..
"सागर.... चल पाहू त्याच्या घरी जाऊं... तुला माहित आहे ना तो कोठे राहतो..?? "
"हो.. काका.. त्या वस्तीबाहेर असलेल्या जुन्या इमारतीत तो राहतो आहे...मी आतापर्यन्त कधी गेलो नाही तिथं पण आता जाऊया का आपण??? "
हो.... पण एक सेकंद.. !! उद्धव दादा उठून देवघरात गेले आणि त्यांनी जप माळ हातात घेतली... देवीच्या पायाशी वाकून तिचा आशीर्वाद घेतला, जोडीला दुर्गा मातेचं कुंकू होतंच...आणि ते तोंडानं देवीचा जप करीतच बाहेर पडले.
संध्याकाळ उलटून गेली होती.. सागर आणि उद्धव दादा अविनाशच्या इमारतीजवळ पोहचले. आजूबाजूला काहीच वस्ती नव्हती. मोकळे माळरान होतं ते !!समोर ती एक लांबलचक पण अतिशय जुनी इमारत उभी होती.. तिचा मूळचा निळा रंग पार विटून गेला होता.. त्या इमारती मध्ये कोणीच राहणारे नसावे.
सागरने लांबूनच काकांना ती इमारत दाखविली..
सागर.... या पोरानं इथं कसा काय आसरा मिळवला??
तू त्याला काही मदत केली नाहीस का??
उद्धव दादानं विचारलं...
काका त्याच्या कोणा दूरच्या मित्राचं घर होत इथं !!मी सांगितलं त्याला माझ्या बरोबर रहा पण तो ऐकला नाही.
बर... चल... असं म्हणून ते वळणार इतक्यात त्या मोकळ्या माळावर एकाएकी वावटळ ऊठली.. वारा घूं घूं करत घुमू लागला.. एक विचित्र वातावरण तयार झालं..त्या दोघांना चालणं मुश्किल होऊ लागलं.
उद्धव दादा समजले. ही काहीतरी वेगळीच समस्या होती.. कदाचित हेच काहीतरी अविनाशला त्रास देत असावं असं त्यांना वाटलं.. जसं जसं ते पुढे जातं होते तसं तसे एक गूढ वलय त्यांच्या मागून जाऊ लागलं..
कसेबसे ते अविनाशच्या इमारतीजवळ येऊन पोहचले.. आजूबाजूला कोणीही राहत असल्याची कोणतीच खूण नव्हती तिथे... !! गोल गोल वरती जाणारे लाकडी जिने.., कोंदट वास, आणि तिथं पसरलेला मिट्ट काळोख !!सागरला दादांनी खालीच थांबायला सांगितलं. आपल्याकडील देवीचं कुंकू त्याला लावलं आणि ते स्वतः दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी वळले तर एकदम कोणीतरी अंगावर आल्याचा भास झाला त्यांना !!ते गोल गोल जिने चढत राहिले पण अविनाशची रूम काही गवसत नव्हती शेवटी त्यांनी जोरजोरात देवीचा धावा करायला सुरुवात केली आणि थोडयाच वेळात ते एका रूम समोर येऊन थांबले.. आतमध्ये काहीच हालचाल दिसत नव्हती... त्यांनी हळूच रूमचा दरवाजा लोटला. रूममध्ये एक उग्र दर्प येत होता आणि अविनाश????? बेडवर अविनाश पालथा पडला होता त्याचे डोळे चक्क उघडे होते पण त्यात कसलीतरी भीती ठासून भरली होती.. त्याचे कपडे फाटून चिंध्या झाले होते... हातात भारलेले लिंबू दिसत होते..
"अवी.... अवी.. "दादांनी हाका मारल्या
अवी उत्तर देण्याच्या परिस्थितीत नव्हता.
आता उद्धव दादांची परीक्षा होती... त्या रूममध्ये जे काही होतं त्याला दादांची चाहूल लागली होती.. रूम मध्ये अचानक गारठा वाढू लागला... अविनाश आहे त्याच स्थितीत गोल गोल घुमू लागला....
कोण आहेस तू??? दादानी विचारलं . जपमाळ त्यांनी मस्तकी लावून गळ्यात घातली होती...
उत्तरादाखल एक खुर्ची त्यांच्या डोक्यात येऊन आपटली.
अविनाश आता उठून बसला होता.. त्याच्या डोळ्यात कोणतेच ओळखीचे भाव नव्हते..
ए... कोण आहेस तू?? आलास तसा निघून जा !!!!अविनाश दातओठ खाऊन बोलत होता...
अविनाशचा अवतार भयानक दिसत होता.. कोणालाच तो जुमानेल असं वाटत नव्हतं.. दादाची ताकत कमी पडल्यासारखी झाली आणि दुसऱ्याच क्षणाला ते दाणकन डोक्यावर आपटले..
तरीही न घाबरता दादांनी आपल्या जवळ असणार
देवीचं कुंकू हातात घेतलं... आणि सपकन अविनाशच्या अंगावर टाकलं.. हा ssssss......इ eeee....
एक विचित्र आवाजानं ती रूम हादरून गेली.. अवी जोरजोरात घुमू लागला. तोंडाने तो विचित्र आवाज काढीत होता. दादा थोडे चिंतेत पडले... नक्की अवीमध्ये कोण आलंय हे त्यांना कळून येत नव्हतं. तसा त्यांचा आणि अविनाशचा काहीही परिचय नव्हता पण त्या पोराकडे बघून त्यांना फार वाईट वाटलं... त्यांनी मनोमन आपल्या देवींची याचना केली... """"माते... या पोराला यातून वाचव "त्यांचं हे देवीशी साकडं घालणं चालू असतानाच अवी मात्र आणखी हिंस्त्र झाला होता... हातात मिळेल त्या वस्तूने तो दादांवर वार करायला बघत होता मध्येच आपल्या अंगावरही जखमा करून घेऊ होता. तोंडाने गुरगुरणे चालूच होतं.. एका क्षणी त्यानं दादांच्या अंगावर झेप घेतली त्यांच्या जवळ जाऊन तो त्यांना पकडणार इतक्यात दादांनी दुर्गाकवच म्हणायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य.. बेभान झालेला अविनाश एकदम शांत झाला. आपलं अंग चोरून बसला.... त्याच्या चेहऱ्यावर भीती दाटून आली.. तो दादांची विनवणी करू लागला...
नको नको.... मला मारू नको... अवी रडतच बोलू लागला...त्याचा चेहरा वेदनेनं पिळवटून गेला होता.. दादांच्या तो हातापाया पडू लागला. दादा जसे त्याच्या जवळ जाऊ लागले तसा तो कण्हत म्हणाला, "मी याला माळरानात पकडलं होतं.. माझं अस्तित्व मला टिकवायचं होतं.. अनायसे हा सापडला.. येथून जवळचं असलेल्या माळरानातलं माझं साम्राज्य याने लाथाडलं, माझं घर मोडून टाकलं म्हणून मी याला घेऊन जाणार होतो... मला हवं ते याला संपवून मला मिळणार होतं.. मला पुन्हा माझं अस्तित्व निर्माण करायचं होतं. बरेच दिवस कोणीच सावज मला मिळालं नव्हतं.. या इमारतीत हा एकटाच राहायला आला.. आजूबाजूला कोणीच विचारणारे नव्हतं.. मग मला अगदीच सोपं होतं ते... हा जाण्याच्या वाटेवर मी उभा राहिलो आणि एका क्षणी त्याच्यात शिरून येथपर्यंत पोहचलो... तऱ्हेतऱ्हेने याला तिथे माझ्या जागेवर नेण्याचा प्रयत्न केला. उद्या पर्यंत वेळ होता माझ्या कडे उद्या अमावस्या. नेणार च होतो इतक्यात तुम्ही आलात... "
उद्दव दादा सारं ऐकत होते.. त्याचं लक्ष नाही बघून अविने पुन्हा एकवार त्यांच्या वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण दादांनी त्याचा वार चुकवला.. अविच्या अंगात असलेला तो जीव दादांना भीती दाखवीत होता.. दादानं समोर तो किती वेळ तो वेगवेगळे आकारात येऊ लागला पण दादा अजिबात घाबरले नाहीत. त्यांनी नेटान आपला जप सुरूच ठेवला, आपसात त्यांचं द्वन्द्व चालू होतं कोणास ठाऊक किती वेळ गेला पण ती रात्र उलटून पहाट होत आली होती. हळू हळू दादांपुढे त्या वाईट शक्तीची ताकत अपुरी पडली आणि शेवटी दादांचा विजय झाला.. एक मोठी किंकाळी मारून अवी धाडकन जागेवर पडला... एक अदृश्य शक्ती स्वतः भोवती गोल घुमत दरवाजा उघडून बाहेर पडली... जाता जाता त्या इमारतीची पार दुर्दशा करून निघून गेली.... एक वादळ शांत झालं.
सागर त्या आवाजानेच धावत वरती आला पाहतो तो काय त्याचे काका अतीव श्रमाने डोळे मिटून स्वस्थ बसले होते..रूम मध्ये कुंकवाचा सडा पसरला होता. अगरबत्ती चा मंद सुगंध दरवळू लागला.. आज दादांच्या चांगुलपणाचा आणि देवावरच्या असीम श्रद्धेचा विजय झाला होता.. एक भयानक स्वप्न संपून अविनाश शुद्धीत आला होता.....