पिशाच्च - भाग 01
खारवडीफाट्यावर एस.टी.सोडली तेव्हा दुपारचे चार साडेचार वाजत आले होते.उन्हाळ्याचे दिवस असल्याने ऊन बऱ्यापैकी होते.फाट्यावर चीटपाखरुही दिसत नव्हते. नाही म्हणायला कधीकाळी चालू असणारे नि आता मोडकळीस आलेले एक टपरीवजा हॉटेल दिसत होते. बाहेरच्या तुटक्या बाकड्यावर थोडा वेळ टेकलो.डावीकडे एक कच्चा रस्ता दिसत होता.तोच खारवडीला जात असणार! चालत जायचे खरच जीवावर आले होते.वाट पहायचे ठरवले पण अर्धा पाउण तास झाला तरी खारवाडीला जाणारे एकही वाहन आले नाही. बर चालत जावे तर अंतर किती हे माहित नाही. कोणाला विचारावे तर कोणाचा तपास नाही. शेवटी वैतागून उठलो नी निघालो चालत! वाट तरी किती पाहणार?आलेच एखादे वाहन तर ते रस्त्यात मिळणारच होते.
खडबडीत कच्च्या रस्त्यावरून चालणे जरा कठीण होते.मधेच वाऱ्याबरोबर फुफाटा उडून नाका तोंडात जात होता. मनातल्या मनात शिव्या घालत चरफडत मी निघालो. आजूबाजूला बाभळीची झाड इतकी माजली होती की कधीकधी पुढचा रस्ताच दिसायचा नाही. शेवटी तासभराची पायपीट केल्यावर मला पहिल्यांदाच मानव प्राण्याचे दर्शन घडले. दूरवर एका झाडाखाली बसलेली एक व्यक्ती मला दिसली.जसजसं मी जवळ गेलो तसतशी ती व्यक्ती स्पष्ट दिसायला लागली.साधारण पन्नाशीच्या आसपासचे वय,वाढलेले मळकट केस व दाढी,अंगावरच्या कळकट कपड्यांच्या चिंध्या झालेल्या आणि नजर संभ्रमित! वेडा माणूस ओळखायला एवढी लक्षणे पुरेशी होती. तो आपल्याच तंद्रीत हातवारे करीत होता.माझी जरावेळ निराशा झाली.कुणीतरी रस्ता सांगणारा भेटायला हवा! नाहीतर रस्ता चुकला तरी मला कळणार नव्हते.मी जवळ जाताच त्या वेड्याने आपल्या जवळचे गाठोड एकदम जवळ ओढले आणि दोन्ही हातात घट्ट आवळले.मला हसू आले.मी काही त्याचे गाठोडे ओढून घेणार नव्हतो पण त्याच्या भावविश्वात काय चालले असेल ? त्यालाच ठाऊक ! मी पुढे निघालो.वेडा काहीतरी पुटपुटत होता.मधेच गुरकत होता.मी दुर्लक्ष केले. ‘आले आले,नाही नाही ’ असे काही असंबद्ध शब्द असावेत.मी गती वाढविली.शक्य तितक्या लवकर त्याच्यापासून दूर गेलेले बरे ! न जाणो एखादा दगड त्याने मारलाच तर काय घ्या ! पळणे शोभा देणारे नव्हते. मी वेग वाढविला. अचानक तो हसायला लागला. मी मागे वळून पहिले तर उभा राहून माझ्याकडेच बघून तो मोठमोठ्याने हसत होता.माझ्या छातीत धडधडायला सुरुवात झाली.पावलांची गती आणखी वाढली.समोर थोडासा चढाचा रस्ता होता.मी पळायचा विचार करत होतो की अचानक त्याचे हसणे बंद झाले.मी मागे पहिले तर...तर... वेडा गायब. अरे! आता तर त्या झाडाखाली होता, मी बुचकळ्यात पडलो.एकाएकी तो गेला कुठे ? कारण झाड मला स्पष्ट दिसत होते.माझ्यापासून साधारण वीसएक फुटांवर असेल.त्याच्या मागे लपणे शक्य नव्हते.शेजारी काही झुडपं होती पण त्याच्यात शिरता येण्यासारखे नव्हते.मागे फिरून पाहावे की काय या विचारात मी उभा होतो आणि अचानक मागून माझ्या खांद्यावर एक हात पडला .केवढ्याने दचकलो मी! छातीत धस्स झाले! तो वेडा माझ्या शेजारी उभा होता. त्याच्या अंगाचा उग्र वास येत होता.डाव्या हातात गाठोड धरून रोखून माझ्याकडे पाहत होता. भीतीची जागा आता रागाने घेतली.एक कानफटात द्यावी असे वाटले! पण राग गिळला.त्याचा उजवा हात अजून माझ्या खांद्यावर होता,तो जोरात झिडकारला नि तडक निघालो ! एका दमात चढ चढून जवळजवळ पळतच वरच्या माळावर आलो.दम लागला होता.थोडावेळ थांबून कानोसा घेतला.वेडा पिच्छा करत नव्हता.थोडस हायसं वाटले.अचानक गायब झालेला वेडा कुठून आला हेच मला समजत नव्हते.घड्याळात पाहिले,सहा वाजत आले होते. सूर्य मावळतीला निघाला होता. आता भरभर चालायला हवे! गाव आणखी किती लांब आहे कुणास ठाऊक? थंडगार वा-याने जरा बरे वाटले! मी आता भरभर चालायला सुरुवात केली.कधी एकदा गाव येतेय असे झाले होते. पुन्हा तो वेडा अचानक प्रकटला तर! माळ ओलांडून उतराला लागल्यावर मला अखेर गावातले दिवे दिसले.

खारवडी चार पाचशे उंबऱ्याचे गाव होते.शेजारून पूर्व पश्चिम वाहणारी खारनदी आणि नदी पलीकडे जंगल होते. गावात प्रवेश केल्यावर चौकातच मराठी शाळा होती.त्याच्या शेजारी ग्रामपंचायत कार्यालय होते.पुढे एक मोठे शंकराचे मंदिर होते.तिथे दोनचार म्हातारे गप्पा मारत बसले होते.आजूबाजूला छोटीमोठी दुकाने होती.मी गावात पोहोचलो त्यावेळी दिवेलागण झाली होती.चौकातल्या एकुलत्या एका खांबावर मिणमिणता बल्ब लावला होता.त्याचा भकास उजेड पडला होता.आजूबाजूच्या घरातून थोडासा प्रकाश बाहेर येत होता.एकूण लगबग कमीच होती.गर्दीची,रहदारीची सवय असलेला मी. गावच्या प्रथमदर्शनाने माझा हिरमोड झाला. पण आता सवय करावी लागणार होती. मन उदास झाले होते.चांदलेकरांना भेटून मी रहायची सोय करायची होती.बाजूच्या चहाच्या टपरीत चौकशी केली.त्यांनी दाखविलेल्या दिशेने निघालो.
चांदलेकरांनी मनापासून स्वागत केलेले पाहून जरा हायसं वाटलं. चांदलेकर एकटेच राहत होते.लग्न केले नसल्याने एकट्याचा संसार होता. मागेपुढे दोन प्रशस्त खोल्या,समोर व्हरांडा नि मागच्या खोलीतून एक दार परसात उघडत होते. परसात पाण्यासाठी विहीर होती. घर गावापासून, वस्तीपासून जरासे तुटक पण आटोपशीर होते. त्यांनी माझी आस्थेने विचारपूस केली. मी चालत आलेलो पाहून त्यांना वाईट वाटले.
“ या आडगावात तेवढीच एक वाईट गोष्ट आहे बघ जयदीप.....जयदीपच नाव आहे ना तुझं ! ”
मी होकार देताच पुढे म्हणाले,
मी होकार देताच पुढे म्हणाले,
“रिटायर मेंटला तीन वर्ष राहिली,एक एक दिवस मोजतोय आता”
‘हो ना ,या आडगावात कंटाळाच येत असेल नाही?’ मी.
माझ्या बोलण्यावर चांदलेकर मनापासून हसले. गावात येणाऱ्या अडचणी ,गैरसोयी याविषयी बरेच सांगत राहिले. आम्ही पहिल्यांदाच भेटत असूनही अतिशय आपुलकीने बोलत होते. मधेच स्वत:च्या विनोदावर मोठ्याने हसत होते. एकंदरीत माणूस मोकळ्या स्वभावाचा नी बोलका होता. त्यांच्या नी माझ्या तारा लगेच जुळल्या .
‘’चला मला रूम पार्टनर मिळाला! माझा एकांतवास संपला, द्या टाळी! "
खुशीत येऊन चांदलेकरांनी हात पुढे केला,मीही मनापासून टाळी दिली.
मीही खुश होतो, कारण राहण्याची आणि खाण्याची माझी सोय बिनबोभाट झाली आणि महत्वाचं म्हणजे चांदलेकरांसारखा मनमिळाऊ वरिष्ठ सहकारी मिळाल्याने माझे निम्मे टेन्शन पळाले.
"तू फ्रेश होऊन ये,तोपर्यंत मी जेवण्याचे पाहतो"
माझ्यासाठी परसाचे दार उघडीत चांदलेकर म्हणाले.
आठ वाजत आले होते .परसात दाट काळोख माजला होता.रातकिड्यांचा किर्र् आवाज त्याची भयानकता वाढवीत होता.बाकी कसलाच मानवनिर्मित आवाज नाही! भयाण शांतता पसरली होती. अशा शांततेची मला बिलकुल सवय नव्हती.माझे हृदय उगीचच गलबलले! पुढे जायचे धाडसच होईना ! डोळे अंधाराला थोडेसे सरावल्यावर मी बारकाईने पाहिले तर परसाला करवंदीचे दाट नैसर्गिक कुंपण झाले होते.एका कोपऱ्यात विहीर दिसत होती.विहिरीशेजारी भरपूर झाडी दिसत होती . आता तिथं अंधार माजला असल्याने पलीकडची बाजू लक्षात येत नव्हती .
हि कसली जाणीव ....कोणी तरी रोखून पाहतंय ....माझ्या अंगावर सर्रकन काटाच आला ! .... शी ! काय घाबरतो आपण ! ...आपल्याला इतक्या अंधाराची सवय नसल्याने असे भास होतायत ! मी सरळ विहिरीजवळ गेलो नि बादली पाण्यात सोडली. पुन्हा तीच जाणीव ! काहीतरी विचित्र जाणवत होते. अस्वस्थ वाटत होतं. मी पटकन पाणी काढले नि हातपाय धुवायला सुरुवात करणार तोच......तोच माझी नजर तिकडे गेली.....

“जयदीप....जयदीप.....”
ओरडतच चांदलेकर बाहेर आले.मी दचकलो.किती वेळ गेला कुणास ठाऊक ?
माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाले,
माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाले,
“ काय करतोस ? चल लवकर आत ! ”
मी काही बोलायच्या आत मला जवळजवळ ओढतच आत घेऊन गेले.
मला काहीच आठवत नव्हते. डोकं सुन्न झाले होते.

"चांदलेकर......"
"चला ,जेवून घेऊ आपण"
माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून म्हणाले.माझा नाईलाज झाला.
बाकी काही असो पण चांद्लेकरांच्या हाताला उत्तम चव होती.जेवण मस्त झाले.
सर्व आवरून आम्ही दोघे बाहेरच्या व्हरांड्यात येऊन निवांत बसलो. काहीच घडले नाही अशा अविर्भावात चांदलेकर वावरत होते. मगाचा विषय ते टाळत होते. असे काय घडले होते ? आणि मुख्य म्हणजे मला काहीच कसे आठवत नव्हते? दिवसभराच्या प्रवासाने मी दमलो होतो. केव्हा एकदा अंग टाकतो असे झाले होते. पण चांदलेकरांचा गप्पा मारायचा मूड बघून मी तसे जाणवू दिले नाही. चांदलेकरांकडे भल्या बुऱ्या अनुभवांचा खजिनाच होता. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या. हळूहळू गप्पांचा ट्रॅक भराभर बदलू लागला. मी माझ्याच विचारात होतो. चांद्लेकरांचे बोलणे ऐकल्यासारखे दाखवत होतो. अधून मधून त्यांना प्रतिसाद म्हणून एखादा शब्द बोलत होतो .आणि आलेली डुलकी बळेच परतवून लावत होतो. मला झोपेची नितांत आवश्यकता होती. अखेरीस मला डुलकी लागली असावी आणि त्याचवेळी ...माझी तंद्री अचानक भंग पावली. कारण ...कारण .... चांदलेकरांच्या बोलण्यात कोणीतरी 'वेडा' आला होता. मला दुपारचा प्रसंग आठवला . खाडकन माझी झोप उडाली. मी लक्षपूर्वक ऐकू लागलो...

क्रमश ...पुढील भाग लवकरच
श्री. आनंद निकम,
पुणे २४
पुणे २४