भासातले_जग ( गुढकथा )- Marathi Gudhkatha,romanchakkatha |
भासातले_जग ( गुढकथा )
"काकू हिला जरा घ्या हो 5 मिनिट...झोपली आहे.
मी जरा सुचिता ला बाय बोलून येते."
"आणि निघते आता बर का मी. लग्न खुप छान झाल.जेवण पण अगदी लाजवाब होत.
सूची पण किती गोड दिसत आहे... नजर काढा हा तिची नक्की.!!"
.
"अग मंजिरी, थांब की अजुन थोड. आणि अनिश नाही दिसला बर लग्नात? आला नाही का तो?"
.
"अहो नाही ना, त्याची टूर आहे आज तेच पॅकिंगचा घोळ चालला आहे घरी. म्हणुन तर यायला नाही जमल त्याला."
"चला आलेच मी . चप्पल शोधते आता."
.
मोरपंखी रंगाची साडी घातलेली.. नखशिखान्त दागिन्या नी नटलेली, मंजिरी छुन छुन पैंजन वाजवत हॉल भर तिची चप्पल शोधत फिरू लागली...
शी बाबा! ही चप्पल पण ना ..
कुठ काढली होती बर...
एकतर हे लग्नघर.. कुणी घालून तर नसेल ना गेल.?
शीट! काय यार... आता मी घरी कशी जाणार.
अनिश ला फोन करते. निघाला असेल ना तो घ्यायला...
.
ट्रिंग ट्रिंग...
ट्रिंग ट्रिंग...
.
The Number You Hav Dial Is Currently Busy. Please Try After Sometime.
.
हा अनिश पण ना...
कधीच वेळेत फोन उचलनार नाही.
आता दत्त म्हणून हॉल च्या दारात उभा राहील आणि चला चला म्हणून घाई करत बसेल...
.
जाऊ दे पण...एवढ्या घाईत पण तो न्यायला येतोय हेच खुप आहे.
.
(चप्पल शोधत हॉलच्या बाहेर पायर्या उतरत येते)
.
परत एकदा अनिशला फोन लावायला बघनार इतक्यात,
मागून आवाज
येतो.
.
"काय रे विशाल संपल का लेक्चर?"
.
"ह्या? इथ लग्नघरात कसल आलय लेक्चर?"
.
माग एक मुलगा थांबून तिलाच बोलत असतो...
आवाजा सरशी मंजिरी गर्रकन माग वळून बघते...
.
तसा सगळा मागचा नजारा बदलतो...
मागचं हार फुलांनी सजवलेल कार्यालय जाऊंन एक कॉलेजची बिल्डिंग उभी असते..
.
अरेच्चा हे काय झाल? आत्ता मी सूची च्या लग्नात आले होते ना..?? चप्पल शोधत हॉलच्या पायर्या उतरून मी अनवानी खाली आले... आणि....
अस काय झाल हे? हॉल कुठ गेला? माझा नवरा मला घ्यायला येत होता ....माझी मुलगी? ती तर आतच राहिलीए...अरे देवा...
तिला दरदरुन घाम फुटला...
.
कुठ जाव हे न कळून ती चार पावलं पुढे गेली.
पण तिचे पैंजन वाजले नाही.. अरे देवा पैंजन पण पडले की काय आता..????
चेहर्यावर आलेला घाम पुसायला तिने हात जवळ नेला.
आणि अगदी झटका लागल्यासारखा हात झटकला. तिच्या गालाला तिला चक्क खुरटी दाढी लागली... पार्किंग मध्ये थांबलेल्या एका कारच्या आरशात तिला तिच रूप दिसल.
.
पिवळ टी शर्ट आणि काळी जीन्स...
चेहऱ्यावर खुरटी दाढी..
पडता पडता त्याने आधारासाठी काही पकडायचा प्रयत्न केला. त्याचा मित्र मागून त्याला आधार देण्यासाठी पळत आला...
.
"तरी मी म्हणत होतो अजुन जरा आराम करायचा होता तू..एक महिना पण नाही झाला तुझ हार्ट ट्रांसप्लांटच ऑपरेशन होऊन आला लगेच तू उड्या मारत कॉलेजला..!!"
.
आता त्याला हा काय सांगणार होता..शुद्धिवर आल्या पासून हा त्याच आभासी जगात अडकला होता ते...
.
त्या दिवशी टुर ला जायला उशीर होईल म्हणून अनिश फास्ट गाडी पळवत असतो..त्यात त्यांचा अपघात होतो.
मंजिरी जागीच मरते आणि तिच ह्रदय विशालला लावल असत