( काल्पनिक कथा - नाव , स्थळ निव्वळ मनोरंजनासाठी आहेत कृपया कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी कोणताही प्रतक्ष्य किंवा अप्रतक्ष्य संबंध नाही )
प्रिय मित्र मैत्रिणींनो पहिल्यान्दाच कथा लिहीत आहे काही चूक झाल्यास माफी असावी
राजेशच्या लग्नाला चार वर्षे झाली होती पण चार दिवसाचे सुख त्याला नव्हते. बायको आई वडिलांनी बघून केली होती . राजेश तरुण दिसायला सुंदर व शांत स्वभाव. कोणत्याही मुलीने पाहताक्षणी होय म्हटले असते पण आई वडिलांच्या मर्जीनुसार त्याने लग्नाला होकार दिला होता. लग्न झाल्यावर बायकोचा भांडखोर स्वभाव दिसू लागला . काही ना काही कारण काढून ती सतत भांडत असे. त्याचा शांत स्वभाव असल्यामुळे तो जास्त काही बोलत नसे. आई वडिलांचा एकुलता एक असल्यामुले घरची सर्व जवाबदारी त्याच्यावर वर होती. नोकरी एका private कंपनी मध्ये . पुण्याला branch ऑफिस व मुंबई ला हेड ऑफिस पुण्याच्या जवळ highway जवळ एका खेडे गावात त्याचे घर होते.
रोज त्याला आपल्या गावातुन branch ऑफिस मध्ये जावे लागे . रोज बायको काही तरी शुल्लक कारण काढुन भांडत असे त्यावेस त्याच्या मनात यायचे arrange marriage करण्या पेक्षा Love marriage केले असते तर बरे असते हि ब्याद तरी आपल्या मागे लागली नसती . आठवडा फक्त बायकोची बडबड आणि टोमणे ऐकण्यात जात असे कारण एकुलता एक असल्यामुळे घरची सर्व जवाबदारी त्याने लहान पणापासून उचली अगदी कॉलेज मध्ये असताना पार्ट time जॉब करून त्याने आपले बी.कॉम पूर्ण केले. राजेश लहान असताना वडिल शिकले नसल्यमुळे छोट्या फॅक्टरी मध्ये तुटपुंच्या पगारावर काम करून घरचा खर्च चालवायचे. वडिलांची छोटी फॅक्टरी असल्यामुळे त्यांना काही फंड सर्विस मिळाली नाहीं त्यामुळे म्हातारं पणी सर्व जवाबदारी राजेश वर पडली . आई वडिलांचे आजारपण, घरची हलाखाची परिस्थिती यामुळे बायकोला भांडण करायला आणि राजेशला पैशावरून टोमणे मारायला संधी मिळत असे.
राजेश या दररोज च्या कटकटीला कंटाळुन देवाला प्रार्थना करायचा, या मानसीक त्रासापासून सर्वांपासुन सोडव

अशातच देवाने त्याची प्रार्थना ऎकली असावी त्याची बदली मुंबई ला हेड ऑफिसला झाली .
हेड ऑफिसला शनिवार रविवार सुट्टी असायची आणि हे दोन दिवस तो आपल्या घरी नाईलाजाने जात असे कारण पाच दिवस त्याला मानसिक संतुष्टी मिळायची आणि परत दोन दिवस तो बायकोच्या तावडीत सापडत असे.
असेच एकदा शुक्रवारी रात्री तो आपल्या फोर्ट मधल्या हेड ऑफिस मधुन दादर ला ST ने पुण्याला जायला निघाला रात्रीचे १० वाजले असतील. त्याने आपले शेवटच्या स्थानकाचे तिकीट घेतले . बस जास्त भरली नव्हती त्याला खिडकीपाशी पुढे जागा मिळाली.
थंडीचे दिवस असल्यामुळे त्याने मफलर स्वेटर तयार ठेवले, मुंबईत थंडीचा गारठा नसतो पण पुण्याला थंडी भरपूर असते हे सर्व पुणेकरांना माहिती असते . कंडक्टर ने घंटी मारली आणि चालक ने बस चालु केली. दादर वरून पुढे थोडे ट्रॅफिक मध्ये बस चा वेगावर मर्यादा होती. पुढे बस ईस्टर्न एक्सप्रेस highway वर आली आणी बस चालकाने शासकीय परिवहन मंडळाचा वेग प्रवाशांना दाखवायला सुरवात केली. जोराचा वारा खिडकीतून येऊ लागला लवकरच नवी मुंबई च्या पुलावर बस आली थोडे ट्रॅफिक असल्यामुळे बस चा वेग मंदावला. नवी मुंबई ला मागे टाकुन पनवेल च्या दिशेने निघाली रात्रीचे ११ वाजले असतील . पनवेल - रसायनी - खालापूर मधील बस स्थानके करत नवीन प्रवाशी तर काही उतारू येत जात होते . खोपोली स्टॉप सोडल्यावर लवकरच खंडाळा लोणावळचा घाट चालू होणार होता. पुढे नेहमीच्या हॉटेल कम ढाब्यावर बस चालकाने बस थांबली , कंडक्टर ने सर्व प्रवाशांना भोजन व इतर कार्यासाठी ( nature कॉल) २० मिनिटे दिली

राजेश इतर प्रवाशांबरोबर उतरला. त्याने आपल्या जेवणाची ऑर्डर दिली . लवकरच त्याला त्याचे जेवण वाढण्यात आले आणि ते त्याने वेळेत संपवले आणि आपल्या जागेवर येऊन बसला. कंडक्टर बस मध्ये आला त्याने सर्व आल्याची खात्री केली व बेल मारली. बस चालू झाली आणि बसचा वेग वाढला. पुढे खंडाळा चा घाट लागला. घाटावरची वेडी वाकडी वळणे घेत बस अंधारात हेड लाईट च्या प्रकाशात वाट काढत होती. चढण चालू आसल्यामुळे वेग कमी होता. रात्रीची भयाण शांतंता व मधेच समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाशात घाट चमकून दिसे. त्या प्रकाशात मधेच घाटातले विचित्र आकार मानवाच्या कल्पनाशक्ती च्या पुढे टिकत नव्हते. वेडी वाकडी वळणे घेत बस पुढे चालली. घाटातली बोचरी थंडी वाढली होती राजेशने आपले स्वेटर आधीच घातले होते त्याने मफलर आपल्या डोक्याला बांधले.
पुढे एका बस थांब्यावर बस थांबली काही प्रवाशी खाली उतरले. त्या बस थांब्यावर एक बाई चढली तिने तिच्या लांब केसात मोगऱ्याचा गजरा घातला होता त्याचा सुवास राजेश आला तसे त्याचे लक्ष तिच्याकडे गेले . तिने पिवळी साडी नेसली होती. तिचा बांधा आकर्षक दिसत होता. २५ - २६ वर्षाची असेल तिचे सौदर्य बघून राजेश बघताक्षणी तिच्या प्रेमात पडला. मनात विचार आला कुढे हि सुंदरी आणि कुढे आपली बायको .
त्या बस थांब्यावर ती एकटीच चढली परंतु बस कंडक्टरने तिच्या कडे पहिले सुद्धा नाही आणि ती बसल्यावर तिकिट काढण्यासाठी तिच्या जवळ आला नाही. नेहमी प्रमाणे बस चालू झाली.
शेवटचा स्टॉप आला ती उतरली . राजेश पण तिच्या मागे उतरला . रात्रीचे १२ वाजून गेले असतील . बाहेर जास्त वर्दळ नव्हती . मुख्य रस्ता असल्यामुळे फक्त वाहने येत जात होती . राजेश चे गाव मुख्य रस्त्या पासून पुढच्या लहान रस्त्याच्या फाट्यावर होते. तो चालु लागला त्याचा मागुन ती चालु लागली. पुढे लहान रास्ता लागला तो रस्ता एकदम सामसुम होता. तिने राजेश ला हाक मारली तास राजेश थांबला . त्याने मागे वळुन पहिले तीचे चंद्र प्रकाशात रूप पाहुन तो मंत्रमुग्द होऊन तिच्याकडे पाहत राहिला. थोडा वेळाने राजेश भानावर आल्यावर ती त्याला बोलली अहो माझे घर पुढे आहे माझ्या सोबत कोणी नाही मला माझ्या घरापर्यंत सोडता का ? मला खूप भीती वाटते ,
तसा राजेश तिला बोलला ठीक आहे , मी तुमच्या सोबत येतो तुम्ही रस्ता दाखवा .
ती चालु लागली तसा राजेश तीच्या मागे चालु लागला . तिचे लांब केस तीच्या पाठीवर उडत होते. रस्ता सामसुम होता . मधेच कुत्राचे रडणे चालु झाले आणि शांतता भंग झाली . पौर्णिमा असल्याने चंद्राच्या प्रकाशात रस्ता दिसत होता . पाऊस पडून गेला होता आणि बाजूच्या शेतात पाणी साचले होते. त्या पाण्यात बेडूक डराव डराव करत होते. एका बेडकाने दोघे चालत असलेल्या रस्त्यावर उडी मारली. काही वेळात त्याच्या मागे एक काळा साप पाठलाग करत मागे आला . दोघांच्या समोर तो बेडूक आणि साप रस्ता ओलांडु लागले परंतु दोघांना काहीच भीती वाटली नाही . दुसरा कोणी तिथं असता तर भीतीने ५-६ फुट सापाला बघून घाबर गुंडी उडाली असती. परंतु दोघे शांतपणे चालत होते जसे काही घडले नाही. बेडूक आणि साप समोरच्या शेतात नाहीसे झाले .

एका ठिकाणी ती थांबली आणि रस्ता ओलांडु लागली तसा राजेश तीच्या मागे जाऊ लागला . बरोबर रस्त्याच्या मध्ये तो आला आणि तिकडेच थांबला तितक्यात एक ट्रक भरगाव वेगाने त्यांच्या दिशेने आला. जोराचा हॉर्न वाजवु लागला परंतु राजेशने कोणतीही प्रतिक्रिया केली नाही.एवढ्या रात्री निर्जन ठिकाणी कोणी रस्त्यात उभे आहे आणि काहीच प्रतिक्रिया देत नाही अशा परिस्थितीत कोणता ड्राइवर ब्रेक मारेल . घाबरुन त्याने ट्रक चा वेग अजुन वाढवला.
आता ट्रक राजेशच्या एकदम जवळ आला आणि काही क्षणात राजेशचे तुकडे होणार इतक्यात कोणीतरी राजेशने बांधलेले गळ्याचे मफलर ओढले आणि तो मागे खेचला गेला. राजेश खाली पडला त्याच्या बाजूने कर्कश आवाज करत तो ट्रक वेगाने गेला त्याच्या वाऱ्याने राजेश भानावर आला ट्रकचे मागचे लाल सिग्नल लाईट दिसेनासे झाले . त्याला वाटले ट्रक ने तिला उडवले
ती कुठे पडली असेल, त्याची नजर वेड्या सारखी तीला शोधु लागली . . कदाचीत तीला ट्रक ने उडवून तीच्या शरीराचे रक्त मासाचे तुकडे विखरले असतील म्हणून तो रस्त्यावर बघु लागला पण त्याला काही दिसले नाही

अचानक त्याची नजर रस्त्या पलीकडल्या झाडावर गेली . ती त्या झाडावर बसली होती. तीचे रूप बदले होते . तीचे लांब केस हवेत उडत होते. चेहरा पांढरा फटक दिसत होता. पिवळ्या साडीत ती भयानक दिसत होती . ती तीच्या लाल डोळ्याने रागाने त्यांच्याकडे पहात होती. सावज हातातुन निसटलं ! तीला ह्या भयंकर रूपात पाहुन राजेशच्या डोळ्या समोर अंधारी आली . त्याने त्याचे डोळे मिटले.
सकाळी राजेशला जाग आली. त्याच्या डोळ्यासमोर त्याचे आई , बाबा आणि बायको उभी होती
रात्रीच्या प्रसंगाने तो अजुन सावरला नव्हता . त्याला प्रश्न पडला मी इकडे कसा?
त्याचे बाबा राजेशला बोलले, बाळ वेळ आला होता पण काळ आला नव्हता. तु वाचलास.
काल रात्री आपल्या गावातील राजु आणि संदीप त्यांची सेकंड शिप्ट आटपून बाईकने येत होते . तेव्हा त्या रस्त्याच्या मध्ये तु उभा असलेला त्यांनी तुला पाहीले. ते विरुद्ध दिशेने येत होते त्यांनी त्यांची बाईकची स्पीड वाढवली आणि तुझ्या मागे येऊन मागे बसलेल्या संदीपने तुझ्या गळ्यातील मफलर पकडुन तुला मागे खेचले आणी काही क्षणात तो ट्रक तुझ्या बाजुने पास झाला

आपला
मंदार राऊत
मंदार राऊत