अंधारकोठडी
भाग ७
लेखक : कनिश्क हिवरेकर
घाबरलेल्या अवस्थेत दोघेही मोहन आणि विष्णू समोरच्या उघड्या दरवाज्यातून आतमध्ये शिरतात दरवाजा बंद करून दोघेही मागे वळून पाहतात तर मागे पाहून दोघानाही आश्चर्याचा धक्का बसतो त्या खोलीमध्ये टेबलाच्या पलीकडे खुद्द प्राचार्य एकावडे उभे असतात...दोघांचीहि अशी अवस्था पाहून प्राचार्य
गोंधळून जातात " तू ? " एकावडे जणू विष्णूला ओळखत होते कारण त्यांनी आज सकाळीच विष्णूच्या पुढ्यात असलेल्या त्या डायरीमध्ये ते चिन्ह पाहिलेलं असत त्याच दानवाच कांतरच्या शीराचे चिन्ह " सर बर झाल तुम्हीच आम्हाला भेटलात. आम्हाला असे येण्यासाठी माफी द्या पण आम्ही संकटात आहोत..
आम्हीच नाहीं तर आपल संपूर्ण कॉलेज संकटात आहे... " विष्णू प्राचार्यांना सांगू लागला... " शांत हो... मला माहिती आहे. आपले कॉलेज धोक्यात आहे इथे राहणाऱ्या प्रत्येकाच्या जीवाला धोका आहे. तू आधी त्याला इथे बसव... " बाहेर पावसाने जोर धरला होता. विजांचा थयथयाट माजला होता..
एकावडेनी मोहनला खुर्चीत बसवायला सांगितले. आणि दोघानाही टेबलावर ठेवलेल्या जगातले पाणी प्यायला दिले. खाली घडलेल्या त्या भयंकर घटनेस डोळ्यांनी पाहिल्यावर आजवर कधी न पाहिलेली गोष्ट एक अस्सल दानव एक सैतान त्यांनी पाहिला होता तो हि एक हात अंतरावरून..मृत्यूच्या जबड्यातून उडी घेऊन दोघेही बाहेर पडले होते..
बऱ्याच रहस्यावरचा पडदा उठला होता नेमके तो सैतान इथे कशासाठी आणि का आला आहे ? विष्णूला आपल्या मित्राचा हि प्रशांतचा शोध लागला परंतु निराशा हाती लागली होती कारण प्रशांत आता हयात नव्हता... पाणी घेतल्या घेतल्या दोघांनी घटाघटा जगानेच पाणी घश्यात ओतून घेतले...
विष्णू आणि मोहन दोघेही घामच्या धारानी भिजून चिंब झाले होते. जागोजागी झालेल्या जखमांमुळे दोघेही रक्तबंबाळ दिसत होते... " इथे बस तू...दैवच म्हणाव लागेल पोरा, मी केलेल्या चुकांना सुधारण्याची नशिबाने मला एक संधी दिलीय..." " सर तिथे बाहेर, आणखीही कोणीतरी आहे... " विष्णू गुरुजीना सांगण्याचा प्रयत्न करत होता.
परंतु धापवून गेल्याकारणाने त्याला बोलायला जमत नव्हते... प्राचार्यांनी आपली छडी हातात घेतली व टेकवत इकडून तिकडे काही विचार करत फेऱ्या मारू लागले... " आता मला सांगा ? तुम्ही दोघे एवढ्या रात्रीचे कॉलेजमध्ये काय करत होतात ? आणि हि तुमची अवस्था कशी काय झाली ? तुम्हा दोघांना माहिती आहे न हे आपल्या कॉलेजच्या नियमात नाही बसत.. "
" होय सर आम्हाला हे चांगलच ठाऊक आहे पण बाबच अशी आहे कि आम्हाला अश्या अवेळी कॉलेजमध्ये थांबाव लागले. आमचा मित्र गायब झाला , कॉलेज मध्ये चार खून झाले..आणि " तोच प्राचार्य म्हणाले " काय ? चार ? " प्राचार्य जागीच थांबले " होय सर पहिले दोन खून त्या रात्री त्याने केले आज हि त्यानेच एक केला आणि चौथा.. "
" हे काय बोलतोयस ? देवा म्हणजे त्याने सुरुवात केलीय एकेक करून तो सर्वाना नाही... हे अस होता कामा नये. नाही तर अनर्थ होईल... " प्राचार्य स्वतःशीच पुटपुटत होते... " सर आम्हाला माहित आहे या खुनाच्या मागे कोण आहे ? " विष्णू म्हणाला " कसे ? कोण आहे या खुनाच्या मागे ? "
विष्णू काही क्षणासाठी थांबला त्याने उरात श्वास भरून घेतला व दोन पावले पुढे सरकून त्याने त्याच नाव घेतले... " कांतार... " विष्णूच्या त्या नाव घेण्यासकटच त्या भयावह वातावरणाने जणू त्या नावामागे दडलेल्या सैतानाच असुरी रूप अवकाशात उमटवले... विजांचा कडकडाट झाला...त्यात प्राचार्यचे भीती व आश्चर्याने मोठे झालेले डोळे स्पष्ट दिसून आले...
" तुला... हे नाव कस माहिती ? " प्राचार्यांनी जागीच थांबून विष्णूकडे प्रश्न केला... " माफ करा सर , पण आम्ही प्रशांतच्या शोधामध्ये त्याच्या खोलीत गेलो होतो तेव्हा मला एक डायरी सापडली.. " विष्णूने बोलता बोलता आपल्या शर्टमध्ये दडवलेली डायरी बाहेर काढली. कदाचित त्याने ती या चकमकीत ती डायरी आपल्या जवळच ठेवली होती.
विष्णूने ती डायरी बाहेर काढून समोर कंदिलाच्या प्रकाशात टेबलावर ठेवली... " या डायरीद्वारे आम्हाला समजले कि प्रशांत आपल्या संग्रहलयात दडवून ठेवलेल्या नवीन मूर्ती बद्दल जाणून घेऊ पाहत होता हा त्याचा छंदच होता. परंतु या छंदापायी त्याने आज आपला प्राण गमावला...." विष्णूच्या वर्तव्यामध्ये हा प्राचार्यांना दुसरा झटका बसला होता.
प्रशांत हि हयात नव्हता... " हि तीच डायरी आहे आज तुम्ही सकाळी आमच्या क्लासमध्ये आला होतात तेव्हा पाहिलेली. आणि हे तेच कांतार च्या मुखाचे चिन्ह... "विष्णूने त्या डायरीचे शेवटचे पान उघडून प्राचार्यांना दाखवले..." थरथरत्या हातांनी प्राचार्यांनी त्या चिन्हाला स्पर्श केला... असे करत विष्णूने भराभर
सर्व घटना क्रमानुसार प्राचार्यासमोर मांडल्या प्रत्येक भयाण घटना वेळेच्या वेगात घडलेल्या घडामोडी प्रत्येक घटनेतून एकावडे प्राचार्यांना धक्का बसत जात होता लखलखत्या विजेंचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावरील एकेक भाव टिपून घेत होता. वास्तव्य आणि रहस्य एक झाल होत. मानवाच्या तर्कश बुद्धीला आव्हान होत हे एक भयान.
विष्णूने प्राचार्यांना घडलेल्या घटना सांगून टाकल्या कसा तो आणि मोहन लायब्ररीमध्ये गेला त्या पुरातन मूर्तीबद्दलच रहस्य त्यांना कसे समजले कांतारशी झालेला सामना त्यामध्येच सुकडे हवालदारचा मृत्यू..सांगता सांगता विष्णू शेवटच्या एका नवीन घटनेवर व त्या घटनेत आलेल्या त्या संदिग्ध इसमाबद्दल...
" आम्ही दोघेही त्या हवालदार काका सोबत वरती आलो त्यांनी आम्हाला आत जाण्याचा आग्रह केला व स्वतः इन्स्पेक्टर कदम यांना बोलवण्यासाठी निघालेच कि तोच वाटेत त्यांना कोणीतरी काळा कपडा पांघरलेल आडव आले त्यान बघता बघता क्षणातच त्या हवालदारचा धारदार सुरीने गळा चिरला... "
" काय ? कोण होता तो व्यक्ती तुला त्याचा चेहरा दिसला ? " " नाही पण मला त्याच्या हातावरती कांतारच्या चेहऱ्याचे गोंदण दिसले... "राका... नाही, हे शक्य नाही, हे कदापि शक्य नाही...तो इथे कसा येऊ शकतो ? " विष्णू आणि मोहन दोघे एकमेकांकडे पाहू लागले प्राचार्य हे कोणाबद्दल बोलताहेत ?
" सर हा कोण आहे ? राका ? त्याचा या सर्वाशी काय संबंध ? " विष्णूने विचारले. तोच प्राचार्यांनी पटकन जाऊन आपल्या दरवाज्याची कडी लावली. आणि माघारी आले आणि तसेच आपल्या खुर्चीत बसले छडीवर दोन्ही हात ठेऊन. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली... " हि तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी आणि माझे साथीदार तिथे त्या मूर्तीच्या शोधात गेलो होतो. परंतु कांतारच्या त्या सैतानी रूपापासून आम्ही
अनभिज्ञ होतो. त्या लोकांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तो आमच्या हितासाठी पण आम्ही त्याचं ऐकल नाही व त्या मंदिरात ती मूर्ती मिळवण्यासाठी पोहोचलो...पण जेव्हा माझ्या साथीदारांनी त्या मंदिरात प्रवेश केला तेव्हा त्यांच्यापैकी कोणीच वाचू शकले नाही. मी तिथून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढला... परंतु जखमी अवस्थेत मी जास्त दूर नाही जाऊ शकलो. तिथल्याच स्थायिक लोकांनी माझ्यावर उपचार केले.
त्या दरम्यान मला समजले कि तिथे काही लोक अचानक गायब होतायत. त्यामागे शोध घेण्यासाठी मी त्या लोकाची मदत केली तेव्हा मला राका बद्दल समजले...राका त्याच कबिल्यातला होता त्याच आदिवासी लोकांच्या जमातीमधला...त्याला ती मूर्ती हवी होती त्यात असणाऱ्या अलौकिक शक्ती
मिळवून जगावर राज्य करायचं होत. त्याने ती मूर्ती मिळवण्यासाठी कांतारशी करार केला होता. कांतारला तो शंभर मानवी शरीराचे बळी देऊन ती मूर्ती मिळवणार होता. त्याच्या या दुष्ट कार्याने तिथल्या लोकांमधील एकेक करून लोक मारले जाऊ लागले. त्या लोकांना काही उमगत नव्हत ते कांतार
ला आपला देव मानत असून देखील त्यांच्या कबील्यामधले लोक असे मारले जात होते. मी त्यांना या मागचा छडा लावून दिला तेव्हा समजले तो राका होता. एक दुष्ट तांत्रिक. त्याला बेदम मारून कबिल्यातून बाहेर करण्यात आला पण जाता जाता त्याने ती मूर्ती मिळवण्याचा आणि माझ्याकडून प्रतिशोध घेण्याचा प्रण केला.
त्या नंतर काही बऱ्याच वर्षांनी त्या आदिवासी जमातीमधील लोक संपुष्टात येऊ लागले. ते मंदिर देखील ओस पडून गेले...कांतारबद्दल त्यानंतर त्या जमातीमधून काही ऐकावयास नाही आले. कांतार आपल्या अगम्य निद्रेत निजून गेला होता. " पण मग ती मूर्ती ? " मोहनने विचारले..." त्या काही दिवसानंतर एक मोठ युनिट तिथे गेल होत. त्या मंदिरात त्यांना ती मूर्ती भेटली.
व त्यांनी माझ्याशी संपर्क केला...मला आश्चर्य वाटले त्यांना हि मूर्ती कशी भेटली ते हि कोणाचा जीव संकटात न पडता..." प्राचार्य आणि विष्णू दोघेही विचारात पडले तो पर्यंत इकडे वेदना असह्य झाल्यामुळे मोहन शुध्द हरपू लागला.. " विष्..नु .. " मोहन विष्णूचे नाव घेत बेशुद्ध झाला... " मोहन ? ए मोहन ? " विष्णू धडपडत त्याच्याजवळ गेला...
" सर? मोहन..." विष्णू उद्गारला.... " त्याला आराम करूदेत माझ्याकडे पेनकिलर असेल ड्रोव्हरमध्ये त्याला दे ती " विष्णूने गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे तसे केले व मोहनला सोफ्यावरच निजवले... " एका मागोमाग एक संकट तोंड वासून येतायत. यातून मार्ग कसा निघेल सर ? हॉस्टेलवरची सर्व मुले मुली यांच्याही जीवाला धोका आहे." विष्णू म्हणाला..
" कांतार किंवा राका दोघाचाहि धोका वाढला आहे सर आता. यावर काहीच उपाय नाहीये का ? " विष्णू म्हणाला... " पण हे कस शक्य आहे कांतार मात्र निद्रेत होता तो सक्रीय कसा झाला असेल ? " प्राचार्य विचाराने गुरफटून गेले होते पण या मागचे मूळ कारण त्यांना समजत नव्हते... तोच विष्णू म्हणाला...
" सर तुम्हीच आत्ता म्हणालात ना कि कांतार निद्रेत होता. आणि राकाने त्याच्या सोबत करार केला होता. याचा अर्थ हा असणार कि राकाला त्या गोष्टीची भनक लागली असणार इतकी वर्ष तो त्या मूर्तीच्या मागावर असेल त्याला जसे समजले कि ती मूर्ती तिथून बाहेर काढण्यात आलीय मूर्तीच्या शोधात तो इथपर्यंत आला असणार आहे. आणि त्यानेच कांतारला त्या सैतानाला निद्रेतून जाग केल असणार.. ती मूर्ती मिळवण्यासाठी... "
" होय बरोबर...पण राका कॉलेजमध्ये असताना मला समजले कसे नाही ? तो दडूनहि नाही राहू शकत या कॉलेजचा एक न एक कोपरा मी ओळखतो. " प्राचार्य म्हणाले... " दडून नाही सर ! नक्कीच त्याने आपली ओळख बदलली असणार रुपांतर केले असेल त्याने स्वतःचे जेणेकरून तो तुम्हालाहि ओळखू नाही येणार. पण कोण असेल ? "
तोच प्राचार्याच्या दारावरती कोणीतरी बाहेरून ठोठावले... " ठक ! ठक ! ठक...! " तोच विष्णू आणि एकवडे गुरुजीनी एकसाथ आपली नजर दरवाज्याच्या दिशेने फिरवली.. " यावेळी कोण असू शकत ? " प्राचार्य म्हणाले... " कोण आहे ? " बाहेरून काहीच आवाज आला नाही परत एकदा तसेच कोणीतरी ठोठावले...
" कोण आहे बाहेर ? " पण यावेळी उत्तर आले " सर मी आहे, प्रोफेसर गोडे... " प्राचार्यांनी काही विचार न करता दरवाजा उघडायला जाऊ लागले तोच मागून विष्णूने त्यांना अडवले " सर एक विचारू ? "
"काय ते ? "
" माफ करा सर पण , जशी माझ्याकडे प्रशांतची हि डायरी होती तसेच हॉस्टेलवरती आल्यावर प्रोफेसर गोडेना देखील काही नोट्स आणि कात्रणे भेटली होती अगदी महत्वाची त्या बद्दल त्यांनी तुम्हाला काही सांगितले ? किंवा काही बोलले होते का ? "
" नाही तर ! "
" मी आज सकाळीच खांबांच्या आड उभा एका माणसाला शिंदेशी बोलताना पाहिलं होत त्याच्या हातावरती मला ते चिन्ह दिसले कांतारचे म्हणजे तो राकाच होता आणि तो इथे सर्वांशीच ओळख ठेऊन असणार सर्व त्याला ओळखत असणार आपले नवीन नाव ठेऊन. आणि त्याच नाव म्हणजेच... "
विष्णू काही पुढे काही बोलणारच होता कि तोच त्याचे वाक्य अर्ध्यातच थांबवत त्यांनी पूर्ण केले... " ते नाव म्हणजे प्रोफेसर गोडे...! " विष्णू आणि प्राचार्य एकावडे दोघांच्या श्वासात भर आणि भीती दोन्ही पडले... कारण दरवाज्याच्या पलीकडे प्रोफेसर गोडे उर्फ राका तांत्रिक स्वयं उभा होता...
क्रमश:

Pudhcha bhag lavkar post kara
ReplyDeleteखूपच छान गोष्ट आहे. पुढचा भाग पोस्ट करा
ReplyDelete