तंबाखू भाग 3 रा
लेखक - #अनुप #देशमाने
"गेली आता ती मला तंबाखू दे आता"
तात्या त्या विद्रुप आशा चेहऱ्याकडे पाहून खूप घाबरला कारण बायकोने जसा वर्णन केले होते तसाच होता तो...
तात्या: रडक्या आवजात न्हाय र माझ्याकड तंबाखू म्या सोडलिया
तो : म्या म्हणलो हुतु ना तंबाखू घेतल्या बगैर नाही सोडणार हे बघ आलोय
तात्या : घाबरत घाबरत देतु देतू म्हणत बाहेर जाऊ लागला
तो : म्या इथंच हाय र घेऊन ये 16 जनाना खायची आहे
तात्या थबकला आणि पाठी मागे फिरून त्या विद्रुप अवतराला बघून बोलला... अरर कोण हाय र तू...
(कारण गुढी पाडव्याला 16 जण गावातले जागीच गेले होते त्यातील एकाचे आत्मा भटकत होते .... कारण जेव्हा ते 16 जण बस मध्ये तंबाखू खात होते तेव्हा ह्या मग्यां ला तंबाखू मिळाली नव्हती त्याला खूप तलब झाली होती तंबाखू खायची पण तो ऍकॅसिडेंट होतो आणि ते 16 जण जागीच ठार होतात... त्याची अतृप्त इच्छा राहिली म्हणून तो येण्या जाणार्याला हटकत असे पण काहींना त्याचा आवाज ऐकू याचा तर काहींना नाही... तंबाखू असून देखील ते 2 बेवडयांनी तंबाखू दिली नव्हती म्हणून तो त्यांचा पाठी लागला होता पण एकाने त्याला ओळखले होते म्हणून त्याने त्याला त्रास नव्हता दिला... तात्यांची बायको विद्रुप दिसणाऱ्या चेहऱ्याला पाहून घाबरली होती आणि तो विद्रुप आता घरी आल्यावर काय होणार ह्या विचाराने ती हृदय विकाराचा तीव्र झटक्याने मरते.....)
तात्या बाहेर गेला त्याने तंबाखू आणली आणि त्याला मळून दिली तसा तो गायब ही झाला .... तात्या खुश झाला हीचा मुळे ह्यो माघे लागला होता आणि हिचा मुळे परत गेला.. म्हणून एक विडा लावतो आणि टाकतो तोंडात...
रात्र होताच
धड धडा धड धड....
तात्या : कोण हाय र
तो : म्या परत अलौय तंबाखू खायला...
तात्या न घाबरता तंबाखू घेऊन दार उगडण्यास गेला....
दार उघडताच त्याला 1 नाही 2 नाही चक्क 16 जण तंबाखू मागत होते काहींचा तोंडातून रक्ताची लाळ येत होती
आधी मला दे तंबाखू आधी मला दे तंबाखु
आधी म्या खाणार आधी म्या खाणार म्हणून भांडत देखील होते
त्यांचे ते आवाज त्यांचा तो विद्रुपी चेहरा पाहून तात्या खूप खूप घाबरला आणि त्याने पॅण्ट मधेच स्वाहा: ........
तात्या एक एकेला तंबाखू मळून देऊ लागला तसे खाल्लेलं गायब होऊन जाऊ लागली
तशी तंबाखू पण सम्पली राहिलेले थांबले तंबाखू ची वाट बघत...
तात्या: म्या घेऊन येतो तंबाखू कुठं बी जाऊ नकासा
ते : तंबाखू घेतल्या बगैर आम्ही जाणार न्हाय
तात्या बाहेर जाऊन शेजारचा आप्पा ला उठवले तसे आप्पा उठले आणि विचारू लागले... काय र काय झालं एवढ्या रात्री का उठवलसा..
तात्या ने सर्व हकीकत सांगितली बायको जन्य पासून ते हे अस घडल्या पर्यंत
आप्पा पायात चप्पल घालून तात्या चा घरी निघाले पण आप्पा ला तिथे कोणीच दिसलं नाही अप्पा ला वाटले बायको गेल्याचा जोरात झटका बसला असावा म्हणून तात्या ची ही अशी अवस्था झाली असावी म्हणून अप्पा ने अप्पा जवळील 2 तंबाखू ची उडी दिली .... तसा तात्या घरी येऊन एक एकाला तंबाखू देऊ लागला तसे ते गायब होऊ लागले...
तात्या खुप घाबरला त्याने विचार केला जर उद्या तंबाखू सम्पली आणि हे 16 जण आले तर काय करू ते घरी येतील .... आल्यावर जाणार नाहीत ह्या विचाराने तो खूप भयभीत होऊ लागला.....
दुसऱ्या दिवशी तात्याने ठरवले आज घरी जायचं नाही म्हणजे ते 16 जण येणार नाहीत.... म्हणून तात्या त्या रात्री शेतात झोपला सोबतीला त्याचा शेजारील शेतातला शेत मजूर होता ते दोघे गप्पा मारत मारत देशी दारूचा आस्वाद घेत होते चकण्याला लिंबू आणि त्यावर मीठ टाकून चाखत होते... दारू पिऊन झाल्यावर भाकर तुकडा खाल्ले.....
नन्तर तात्याने तंबाखू काढली आणि हिकडे तिकडे बघू लागला कारण तात्याला भीती वाटत होती ते 16 जण येतायत की काय...... तरीही थोडी डेरिंग करून तंबाखू खल्लीच आणि झोपी गेला.....
रात्र होताच सर्वत्र फक्त रात किड्याचा किररर करणारा आवाज येत होता...
तात्याने झोपेतच डोळे उघडले आणि पाहतो तर काय ते विद्रुप 16 जण चक्क त्याचा कडे डोळे मोठे करून पहात होते तात्या जागीच बेशुद्ध झाला.....
क्रमशः
नोट- पुढील पार्ट हा शेवट असल्या मुळे हा पार्ट थोडा लहान आहे