घुंंsss घुंsss करत वा-याचे झोके आणी पावसाचे किंचीत दुस्कारे अंगावर झेलत पुढे बसुन गाडी चालवत ती म्हणाली...
" खरच यार.... काय छान रिसेप्शन होत ग..."
"हो ना.... आणी त्या मुलीचा ड्रेस पाहीलास का...? सतरा हजारांचा होता म्हणे.."
"असेलही पन त्या मुलीपेक्षा तीची आईच जास्त नटुण थटुन आली होती..."
" खुप पैसे खर्च झाले असतील ना...?"
" हम्म....शेवटी आयुष्यात एकदाच लग्न होत..."
"हो ना..."
रात्र बरीच झालेली. म्हणजे 10:30 ते 11:00 वाजले असावेत. एक दुचाकी शहराच्या मधुन सामान्य वेगात धावत पुढे सरकत होती. दोघीही दुचाकीस्वार गप्पा मारण्यात दंग होत्या. म्हणजे मोठ्या शहरात रात्र काय आणी दिवस काय सारखाच त्यामुळे रात्रीचीही वर्दळ असतेच. त्यात पाऊसाची उघडझाप सुरूच होती... तशीच ती दुचाकी एका निर्जन रस्त्यावर आली...
"वैशाली... जरा गाडी थांबव.."
"काय झाल ग..?"
" प्लीज थांबव ना , एक काम आठवल..."
वैशालीन वेग कमी करत गाडी रस्त्याकडेला घेतली तशी मागे बसलेली मनिषा गाडीवरून उतरत म्हणाली.
" फक्त पाच मिनीट. बाबांची औषध घ्यायची आहेत ग.. "
तस वैशालीन मागे पाहील तर काही अंतरावर जेमतेम पंन्नासएक पावलांवर एक मेडिकल स्टोअर होत , दारात थोडी गर्दी होतीच आणी आजुबाजूला दुसरे एखादे मेडीकल किंवा स्टोअर उघड नसल्याने तीथ थोडा वेळ होणार होणार अस दिसत होत.... तशी काळजी वजा विनंतीच्या स्वरात वैशाली म्हणाली
" पन लवकर . नाहीतर घरी ओरडतील. आधीच खुप उशीर झालाय... आणी रस्ताही खुप सुना वाटतोय..."
" काय ग.. ? तुला कधीपासुन भिती वाटायला लागली..?"
म्हणत मनिषा मेडिकलच्या दिशेने निघाली... तशी वैशालीची नजर आजुबाजूला फिरू लागली, उजव्या बाजुला बंद झालेल्या पानाच्या गंजलेल्या टप-या, तर दहा पंधरा फुटांवर कच-याचा कोंडाळा जो तुडूंब भरून इतरत्र ओथंबून वहात होता आणी डाव्या बाजुला अगदी तीच्यापासुन आठ ते दहा फुटांवर एक भल मोठ आंबट चिंचेच झाड होत, त्या झाडाच्या पलीकडे असलेली पंधरा ते वीस फुट उंचीची दगडी भिंत. हे पहात वैशाली स्वताशीच पुटपूटली
" मला नाही भीती वाटत. पन शेवटी अंधार खुप आहे ना.."
" मग भिती वाटणारच..."
एका करड्या पुरषी आवाजान ती काहीशी दचकली पन दुस-याच क्षणी स्वता:ला सावरत वैशालीन मागे पाहील , एक पंचविशीतील उंच तरूण रस्त्याकडेच्या 'त्या' झाडाखाली उभा होता... मागुन येणा-या एका चारचाकी वाहणाच्या प्रकाशात तो दिसला. किंचीत सावळा, खुरटी दाढी आणी किंचीत उभा चेहरा, मध्याम बांध्याच्या त्या तरूणाच्या डोळ्यावर चौकोनी फ्रेमचा चष्मा होता जो लाईटच्या प्रकाशात किंचीत चमकत होता. पांढरा शर्ट आणी डार्क ब्लु जिन्स, पंचवीशीतला असावा... पी... पी.... हार्न देत ते वाहन निघुन गेले तसा पुन्हा अंधार पसरला..
वैशाली काहीच न बोलता मेडीकल स्टोअरच्या दारात उभ्या मैत्रीणीकडे पाहु लागली...
तसा तो तरूण पुन्हा म्हणाला...
" आपन चारचौघात कितीही धाडशी बनण्याचा प्रयत्न केला तरी आपली खरी परिक्षा घेतो, तो अशा अनोळखी, निर्जन ठिकाणी पसरलेला 'अंधार'..."
वैशाली काहीच बोलत नव्हती तसा आपल्या करड्या पुरषी आवाजात पुन्हा तो तरूण म्हणाला ...
"भिती वाटतेय ना...? माझी...! पन घाबरू नका.... मी भुत नाही..."
" एक्स क्युज मी... माझा भुतांवर विश्वास नाही आणी अनोळखी लोकांसोबत मला बोलायला आवडत नाही..."
किंचीत रागावलेल्या वैशालीकडे पहात तो म्हणाला
"म्हणजे तुम्हाला भिती वाटते तर...? भुतांची नसली तरी माणसांची...ती ही अनोळखी.."
थोडा रागातच तीने आपला मोबाईल काढला आणी मेडीकलच्या दरात उभ्या मनिषाला कॉल केला...
"अजुन किती वेळ लागेल...?"
"पाच मिनीट ग..."
मोबाईल पुन्हा आपल्या जिन्सच्या खिशात ठेऊन तशीच गाडीवर बसुन तीची नजर त्या युवकाला शोधु लागली... पन तो कुठेच दिसत नव्हता ... आजुबाजूला पहातच ती पुटपूटली
" स्टुपिड , इडीयट ."
"मला बोलवलत.."
त्या तरूणाचा आवाज आला तशी ती पुन्हा दचकली... पन दुस-याच क्षणी स्वता:ला सावरत मागे वळली तर तो तरूण तीथच होता...
" न.......न.........नाही......! "
तीच्या आवाजात भिती स्पष्ट दिसत होती..
" तुम्ही घाबरलात...? मला भुत समजून दचकलात...?"
" हे बघा माझा असल्या फालतु गोष्टींवर विश्वास नाही...."
" तुम्ही काही म्हणा... पन तुम्ही घाबरलात...! कारण तुम्ही मघापासुन दहा वेळा माझ्या 'पाया' कडे पाहील... मी नोटीस केल ते...."
तशी वैशाली गोंधळली...
" मी....? नाही......"
" तुम्हाला काय वाटत ...? जे समोर दिसत ते सत्यच असत.....?"
ती आता चांगलीच बुचकळ्यात पडली. मनात विचार येऊ लागले, इथुन मेडीकल मधे उभ्या मैत्रीणीकडे जाव तर याला वाटणार की आपण घाबरलो आणी इथ थांबाव तर याची फाल्तु बडबड ऐकावी लागणार...
" अहो मैडम... मी फालतु बडबड नाही करत आहे...."
त्याच वाक्य ऐकताच वैशाली सुन्न झाली. आता मात्र काळजाची धडधड वाढत असल्याच जाणवल...' भीती ' नाही पन अस्वस्थ वाटु लागल आणी पुन्हा त्याच्या पायांकडे पाहील....
" मैडम... सांगितल ना दिसत तस नसत...म्हणजे जर माझे पाय उलटे असते तर मला भुत समजला असता...? पन त्या मेडीकल स्टोअरच्या दारात ऊभ्या मैत्रीणाला पाहीलत का..?"
तशी तीन आपली नजर मागे मेडीकल कडे फिरवली... मनिषा तशीच उभी होती आणी तीच्या पुढे आणखी काही लोक उभे होते त्यात एक दोन महिलाही होत्या...
त्या मुलाकडे पहात वैशाली म्हणाली...
" हा पाहील... का.....?"
तसा गंभिर आवाजात तो म्हणाला
" तुमची मैत्रिण त्या 'बंद' मेडीकलच्या दारात एकटीत ऊभी आहे... हे दिसतय का...?."
त्याच्या या वाक्यान वैशाली पुरती हादरुन गेली... आणी झटकन मान वळवली... पन मेडीकल उघडे होते आणी दारात गर्दीही होती..
वैशाली चांगलीच रागावली
" आर यु मॅड.....? शुद्धीवर आहात की थोडी घेतली आहे....? ते स्टोअर तुम्हाला बंद दिसतय...?"
ती थोडी संतापली होती तसा तो युवक शांतपने म्हणाला...
" मी शुध्दीवर आहे पन तुमची नजर तुम्हाला धोका देतेय... नीट बघा...."
त्याचा करडा , गंभिर आवाज तीच्या कानात घुमू लागला...तीला काय करावे सुचेनास झाल तसा तो पुन्हा म्हणाला ..
" का.... ? मागे पहायच धाडस होत नाही ना...?"
" तुमची फालतू बडबड बंद कराल..?"
" यालाच 'भिती' म्हणतात..."
" तस काही नाही... मला भिती नाही वाटत.. आणी प्लीज तुमची ही बडबड ऐकण्यात मला रस नाही.... सो प्लीज.... लिव्ह मी..."
" आपन कीतीही नाही म्हणालो तरी मनाच्या एका कोप-यात भिती दडलेली असतेच... आणी प्रत्येक शहरात अस एखादतरी ठिकाण असतच, जीथुन जाताना मनात किंचीतशी भिती वाटतेच.... आता भिती वाटत नाही अस चारचौघात बोलणारे असतातच त्यांना भीती नाही , पन मन किंचीत अस्वस्थ होतेच..."
" हो का... आणी ती कोणती ठिकाण....?"
"वाटेत एखादी इमारत जी वर्षानुवर्ष निर्मणुष्य असेल , किंवा शहराबाहेर असलेली स्मशानभुमी जीथ अखंडपने एखादतरी प्रेत अग्नीत दहन होताना मांसाचा करपट वास परिसरात पसरलेला असतो, किंवा सरकारी दवाखान्याच्या मागिल अथवा परिसरात असलेला पोस्ट मॉर्टम विभाग , जीथ मरण पावलेल्याच्या शरीराची चिरफाड होते... ही ठिकाण माणसाच मन किंचीत का असेना अस्वस्थ करतातच..."
"हम्म.... असेल कदाचीत.... पन मग त्यातल इथ काहीच दिसत नाही...."
"आहे ना... "
" काय....?"
" ही सरकारी दवाखान्याची मागची भिंत आहे ... आणी या भिंतीच्या बरोबर पलिकडे एक रूम आहे ... ' पोस्ट मॉर्टम' रूम...जिथ आता ही एखाद्या मृत शरिराची चिरफाड...."
" बास्स्स्स..."
कानावर हात ठेवत तीन डोळे बंद करून त्याच बोलन मधेच थांबवल.. आणी खिशातुन आपला मोबाईल काढून उगाचच कानाला लावला. पन न रहाऊन त्या डाव्या बाजुच्या उंच भिंतीकडे तीरक्या नजरेने पाहील.. तस तीच मन खुपच अस्वस्थ झाल...
'इथुन निघालेल बर '
मनात पुटपुटत मनिषाला औषध भेटली का हे पहायला तीन मेडीकल स्टोअर कडे पाहील आणी काळजाचा ठोकाच चुकला... सर्रर्रर्रर्रर्रर्रर कन अंगावर काटा आला. भितीची एक लहर सर्वांगातुन उठली... ते 'मेडीकल' बंद होत आणी दारात मनिषा एकटीच उभी शांतपणे वैशाली कडे रखरखत्या नजरेन पहात होती... ते दृष्य पहाताना तीच्या घशाला कोरड पडली.... त्या क्षणी वाटल की संपुर्ण जग जागेवर थांबल आहे, काही क्षण ती तशीच पहात राहीली आणी डोळ्याच पात न लवत तोच सर्व काही पुर्ववत झाल... मेडिकल उघड होत आणी मनिषा त्या स्टोअरवाल्यासोबत बोलत होती.. वैशाली ने झटकन मान फिरवली आणी मघापासुन बडबड करणा-या त्या तरूणाला पाहु लागली पन तो कुठेच दिसत नव्हता ... अजुनही काळीज धडधडत होत.. त्या चिंचेच्या झाडाखाली उभी तीची भेदरलेली नजर आणी काळजाचे वाढलेले ठोके 'भीती' ची जाणीव करून देत होते... तसा एका कुत्र्याच्या भुंकण्याने पुरती दचकली... त्या आवाजाच्या दिशेने पाहील तर शरीराचा पिंजरा झालेले , फिक्कट तपकीरी रंगाचे केस आणी एका पायाने किंचीत लंगडणारे एक गावठी कुत्रे रस्त्यापलिकडून उजव्या बाजुने जोरजोरात भुंकत होते... वैशालीची नजर त्याच्याकडे गेली तर ते भटके कुत्रे त्या चिंचेच्या झाडाकडे पहात सारी शक्ती एकवटुन भुंकू लागले... त्याच्या भुंकण्याने काही वेळातच परीसरातील इतर भटक्या कुत्र्यांचाही भुंकण्याचा आवाज येऊ लागला... तशी वैशाली मनात पुटपूटली....
" आता यांच्या शेपटावर कुणी पाय दिला... आणी तो मुर्ख मुलगा कुठे गेला ....? इथच तर होता.. उगाच भिती दाखवली मुर्खाने...."
" मला बोलवलत...?"
त्याचा आवाज येताच झटकन तीन पाहील तो बाजुलाच होता... वैशाली कडे पहात तो म्हणाला....
" भिती वाटली ना....?"
वैशाली कडे गंभिरपने पहात आपली नजर त्या कुत्र्याकडे वळवून तो पुन्हा म्हणाला ...
" पहा. ज्यावेळ कुत्री अशी विनाकारण भुंकतात तेव्हा त्यांना परिसरात एखाद्या वाईट शक्तिची जाणीव झालेली असते..."
त्याच बोलण ऐकताच वैशालीन त्या कुत्र्याकडे पाहील तर ते पलिकडुनच त्या झाडाकडे पहात भुंकत होत...
" म्हणजे ..... मला नाही समजल....?"
वैशाली प्रश्नार्थी नजरेन त्याला पाहु लागली
तसा तो युवक पुन्हा बोलु लागला..
" म्हणजे ..... भुत, पिशाच्च, चेटकीन, हडळ अशा वाईट शक्ति जी सर्वच सामान्य माणस पाहु शकत नाहीत... ते कुत्रे पाहु शकते.... आणी जेव्हा कुत्रे विव्हळते, रडते तेव्हा ती शक्ती कोणालातरी आपल्या सोबत न्यायला आलेली असते..."
"म्हणजे तुला म्हणायच आहे इथ भुत आहे....."
"असेल ही...या झाडावर बसल असेल अथवा ते तुमच्या जवळ , तुमच्या गाडीच्या मागे, सिटवरही बसल असेल....कुठही...."
आता वैशालीचा संताप अनावर झाला...
" कोण आहात तुम्ही...? आणी प्लीज माझ्याशी बोलूच नका... "
वैशाली आता पुरती घाबरली होती आणी मोबाईल काढुन उगाच बटन दाबत या सर्वांकडे दुर्लक्ष करण्याची धडपड चालवली...
तोच मनिषा गाडीवर येऊन बसत म्हणाली...
"चल ग "
"स्टुपिड..." मोबाईल खिशात ठेवतच वैशाली पुटपूटली
" सॉरी ग. ही औषध दुसरीकडे भेटत नाहीत. "
तशी गाडी चालवत वैशाली म्हणाली ..
"तुला नाही ग.... त्या मुलाला बोलले, जो मघापासुन फालतू बडबड करून मला बोर करत होता..."
" कायपन बोलु नकोस मी मघापासुन तुझ्याकडे पहात होते.. तु एकटीच उभी होतीस, कोणीच दुसर तीथ नव्हत ... "
" अग त्या चिंचेच्या झाडाखाली, एका बाजुला होता... तुझ लक्ष गेल नसेल त्याच्यावर..."
"हम्म... कदाचीत... पन अस म्हणतात की चिंचेच्या झाडाखाली वाईट शक्तिंचा वास असतो..."
" म्हणजे ......?"
" म्हणजे. भुत वगैरे...."
मनिषाच बोलण ऐकताच वैशाली एकदम शांत झाली.. आणी इतक्यात मागुन आवाज आला, मघापासुन भुंकणारे ते गावठी कुत्रे अचानक विव्हळु, रडु लागले.. तस तीच मन अस्वस्थ झाल... काहीच न बोलता ती विचार करू लागली की 'इतका वेळ मी कोणाशी आणी का बोलत होते...? तो होता तरी कोण....?'
तसा सर्रर्रर्रर्रर्रर्रर कन अंगावर काटा आला.. तशीच ती गाडी चालवत होती तीच मन विचारात गुरफटल होत... तीच्या मोबाईलची रिंग झाली आणी ती विचारातून बाहेर पडली ...
" बाबांचाच फोन असेल. आता मला चांगलेच ओरडणार..."
म्हणत गाडी बाजुला घेतली आणी कॉल रिसीव्ह केला... पन पलिकडच्या व्यक्तिचा आवाज ऐकताच तीच डोक सुन्न झाल... डोक्यात लाल मुंग्यांच वारूळ उठल होत... काहीच न बोलता ती फक्त ऐकत होती...तीनं आपल्या आजुबाजूला पाहील तसे भीतीन ढोल वाजावा तसे आपल्या काळजाचे ठोके तिला वाटत होते.... शेवटी एका भयंकर मानसिक दबावान तीला भोवळ आली आणी जागेवरच कोसळली...
****
दुस-या दिवशी रात्री 10 ची वेळ..
" अहो.... वैशाली शुद्धीवर आली... "
डॉक्टर आणी तीचे बाबा धावतच जवळ आले...
" बाळ... आता कस वाटतय... आणी काल रात्री काय झाल होत...? आठवतय का....?"
डोळे उघडुन आजुबाजूला पाहील तर ती हॉस्पिटल मधे होती...
वैशाली अजुनही त्या धक्क्यातुन सावरली नव्हती, डोक जड झालेल तर तापान अंग भाजत होत. तीची भेदरलेली अस्वस्थ, नजर प्रत्येकाच्या चेह-यावर फिरत होती.. पन काही न बोलता ती बेडवर पडून राहीली... मनिषा आणी घरातील सर्व लोक तीच्याकडे काळजीन पहात होते...
तशी मनिषा आपल्या आईला सांगु लागली...
" अग रिसेप्शनवरून येताना बाबांची औषध घ्यायला त्या मेडीकल मधे थांबलो होतो .. गर्दी होती त्यामुळे थोडा वेळ झाला आणी...."
मनिषाच बोलन ऐकताच वैशालीच्या समोर सगळा प्रसंग उभा राहीला... 'मनिषान औषध घेतली आणी गाडीवरुन घरी यायला निघले . तर येताना एक कॉल आला... बाबांचा.... नव्हे... तर 'मनिषा'चा... ती रागान बोलत होती
"अग कुठ आहेस...? मला एकटीला मेडीकल मधे सोडुन कुठ गेलीस...? तुझी वाट पाहुन शेवटी मी औषध घेऊन रिक्षान घरी आले... दोन तास झालेत सगळे तुला शोधत आहेत... आणी कॉल का रिसीव्ह करत नव्हतीस...?"

फोनवर मनिषाच बोलन ऐकताच डोक सुंन्न झाल...
' मग मागे गाडीवर कोण येऊन बसल होत..? ' तीची भेदरलेली नजर बाजुला गेली... तर ती फिरून 'त्या' चिंचेच्या झाडाखाली आली होती... मागे ते मेडीकल होत जे बंद झालेल... ते 'कुत्रे' आता वैशालीकडे पाहुन रडत होते.. हे सगळ पाहुन भितीन सर्वांग थरथरत होत आणी तीला तो तरुण आठवला आणी सर्रर्रर्रर्रर्रर्रर कन अंगावर काटा आला.. तो इधच असणार.... आणी तीला आवाज आला...
" मला बोलवलत...?"
काळजाचे ठोके वाढले होते. न रहावून तीन आवाजाच्या दिशेने पाहील तर तो तरुण त्या भिंतीजवळ उभा होता... डोळे विस्फारून ती त्याच्याकडे पहात होती... वैशाली कडे पहात त्यान विचित्र हास्य केल आणी दुस-याच क्षणी तो त्या भिंतीतुन आरपार गेला.. ते पाहुन तीला भोवळ आली... '
तीला सगळ आठवत होत... पन हे कस आणी कोणाला सांगणार...
'आजवर भुत वगैरे या फालतू , गावंढळ कल्पना मानणारी मी आज त्यांना घाबरले आहे हा किती मोठा अपमान आहे माझा, स्वताचा..'
*****
रात्र खुप झाली तशी आई तीच्याजवळ हॉस्पिटलमधे थांबली आणी बाकीचे सर्व घरी गेले...
डॉक्टरांनी दिलेली औषध घेऊन वैशाली बेडवर आडवी झाली... डोळ्यावर झापड आलेल त्यामुळे झोप कधी लागली हे तीच तीलाच कळलच नाही...
पन मध्यरात्री कसलस दडपन मनावर आल आणी 'आई ग' म्हणुन दचकून जागी झाली.. अंग पुरत घामान भिजल होत तर काळजाची धडधडही वाढलेली... बाजुला पाहील तर आई शांत झोपलेली... थोडा वेळ तशीच बसली... छतावर गरगरणा-या पंख्याला पहात चेह-यावर आलेले केस कानामागे सरकवले आणी पुन्हा आडवी पडणार तोच खड कन आवाज आला तशी तीची नजर उजव्या बाजुला असणा-या खिडकीवर गेली... खिडकीवर लावलेला फिक्कट गुलाबी पडदा घुंं घुं करत घोंघावणा-या वा-याने हेलकावे घेत होता... बेडवरून खाली उतरून ती चालत खिडकीजवळ गेली... पडदा बाजुला करत पाहील, बाहेर पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. खांबावरील पिवळ्या नारंगी दिव्यांनी रस्ता उजळुन निघालेला... तशी तीची नजर एका ठिकानी स्थिरावली...
मंद वा-याने हेलकावे घेत एक चिंचेच झाड रस्त्याकडेला उभ होत... ते पहाताना तीच मन किंचीत अस्वस्थ झाल... आणी तीला मनिषाच ते वाक्य आठवल...
'अस म्हणतात की चिंचेच्या झाडाखाली वाईट शक्तिंचा वास असतो.'
आणी ती विचारात गुरफटली...
'खरच तो मुलगा एक आत्मा असेल....?'
आणी दुस-याच क्षणी त्या झाडाखाली तो तरूण उभा दिसला... तो तीच्यकडेच पहात होता... भितीन सर्वांग शहारल तशी ती झटकन बाजुला झाली... भास आहे की सत्या.... पन न रहावून पुन्हा किंचीत डोकाऊन पाहील पन तो तीथ नव्हता ..
" बाप रे.... तो खरच तीथ होता..? की मला भास झाला...."
तीच काळीज जोरजोरात धडधडत होत... घशाला कोरड पडलेली त्यामुळे बाजुच्या टेबलवरील पाण्याच्या बॉटलमधल दोन घोट पाणी पीऊन बॉटल पुन्हा टेबलवर ठेवणार तोच तीची नजर टेबलवरच्या वर्तमानपत्रातील एका बातमीवर गेली....
'एका युवकाचा अपघाती मृत्यु' पेपर हातात घेऊन नीट पाहील तर त्याचा फोटो होता. तो पाहताच तीच्या काळजात धस्स झाल... ती सुन्न झाला....
"म्हणजे ...... तो...... एक ...... आत्मा......त्या भिंतीच्या पलिकडे पोस्ट मॉर्टम रूम मधे त्याच्याच शरिराची चिरफाड सुरू होती तर....."
ते आठवल तस तीच अंग शहारल...
आणी तीला पाठीमागुन आवाज आला..
" मला बोलवलत....?"
तो करडा पुरषी आवाज कानावर पडताच तीन ओळखल आणी भितीन डोळे पांढरे झाले.. कपाळावर घामाचे थेंब जमा होऊ लागले. तोंडातुन शब्द बाहेर पडेनासे झाला.. हातातली ती पाण्याची बॉटल निसटली आणी खट्टकन जमीनीवर पडली.. काळजात जोराची कळ आली आणी कोणीतरी अंगातील सारी शक्ती काढुन घ्यावी तशी धाडकन ती खाली कोसळली..
... त्या आवाजाने तीची आई जागी झाली, वैशाली जमिनीवर पडली होती तीला अस पाहुन आई जवळजवळ ओरडलीच
"बाळ काय झाल तुला....? "
आई धावतच वैशाली जवळ गेली
आईच्या आवाजाने एक नर्स धावत आली...
"डॉक्टरांना बोलवा... लवकर..."
तशी ती नर्स धावत डॉक्टरांना बोलवायला गेली ...तीची आई रडत होती तर आजुबाजूच्या रूग्णांचे नातेवाईकही वैशाली कडे पहात होते.... वैशालीन आपली मान किंचीत तीरकी करून त्या खिडकीकडे पाहील तर त्या हेलकावे घेणा-या पडद्यावर मानवी आकार उमटू लागला... तसे त्या तरूणाचे ते शब्द तीच्या कानात घुमू लागले
'ज्यावेळ कुत्री अशी विनाकारण भुंकतात तेव्हा त्यांना परिसरात एखाद्या वाईट शक्तिची जाणीव झालेली असते...'
सार काही अंधुक होत चालल होत पन
त्याचे धुसर शब्द अजुनही ऐकु येत होते..
'जेव्हा कुत्रे विव्हळते, रडते तेव्हा ती शक्ती कोणालातरी आपल्या सोबत न्यायला आलेली असते...'
झपाझप पावल टाकत डॉक्टर धावत आले तशी आई म्हणाली ...
" डॉक्टर .... बघा माझ्या मुलीला काय झालय ते..."
" हो पाहातो..... तुम्ही बाहेर थांबा...." सर्वांना बाहेर काढत नर्स ने दरवाजा बंद करून घेतला...
वार्डबॉय नी वैशाली ला उचलुन बेडवर ठेवल. तीची आई दरवाजा वरील काचेतुन आत पहात अश्रु टीपत होती ... डॉक्टरांनी स्टेटस्कोप काढत तपासनी सुरू केली आणी नर्स वार्डबॉय यांची धावाधाव सुरू झाली... ऑक्सिजनचे सिलेंडर सोबत इतर विद्युत उपकरण सुरू झालीत...
तीच शरिर सुंन्न पडत चालल, आजुबाजूला सुरू असलेला गोंधळ गडबड अंधुक दिसत होत पन काहीच ऐकु येत नव्हत.. तोच बाजुच्या उघड्या खिडतीतुन थंड वा-याचा एक झोका अंगाला स्पर्श करून जातान कानात घुमलेल
एक वाक्य तीनं अगदी स्पष्ट ऐकल...
" निघायच ना....?"
काही वेळात डॉक्टर बाहेर येत शांतपने म्हणाले ..
"आय एम सॉरी मैडम.......आणी तुम्हीही स्वता:ला सावरा.."
समाप्त..