पेन्सिल
पहिल्या भागाची लिंक👇👇👇👇👇
मास्तर दिनेश कडे एकटक बघत होते..एखादं दुसरा अश्रू त्याच्या आईच्या डोळ्यातून वाहत यायचा...मास्तर तिला धीर देत होते..अचानक फोन वाजला...मास्तरांनी फोन उचलला "आव जावई बापू दिनेश दुपार पासन कुठं गायब झालाय...सगळीकडे शोधलं कुठं दिसणा झालाय" सासूबाईच एवढंच वाक्य ऐकून मास्तरांनी फोन कट केला....अचानक कुणीतरी किंचाळत त्या रिंगणातून बाहेर पडले
तात्या जाधवाच पोरगं मारुती पित्याचा मौतीचा बदला घ्यायला धावला...मास्तरांनी त्याला आडवायचा प्रयत्न केला.....मारुती दिनेश वर तुटून पडला..त्याच्या हातात बांबू होता....त्यांन दिनेशच गळपाट पकडलं आणि त्याला ठोसे मारू लागला...बापाच्या मौतीन पागल झालेला मारुती दिनेश ला जोरदार ठोसे देत होता...पण दिनेशवर त्याचा काहीच परिणाम होईना....दिनेश गुरगुरला आणि त्याचा हात हवेतच पकडला...आपल्या लालभडक नजरेने त्याने मारुतीकड बघितलं...10 वर्ष्याच्या पोराने पकडलेला हाथ मारुती सोडवू शकत नव्हता...दिनेशने आपले काळेकुट्ट दात पुढे काढले..त्याच्या कपाळावर आठ्या आल्या....दोन तीन कुत्री भुंकत जवळ येत होती त्यांना दिनेशने इशारा करून मागं केलं

"तुझ्याशी वैर नाय माझं भाड्या....चल निघ इथून"
अस बोलून दिनेश ने मारुतीचा हाथ फिरवला तसा तो मणक्यातून तुटला आणि इकडे तिकडे झुलू लागला...मारुती वेदनेने तडफडत होता...दिनेश ने त्याच्या मोडलेल्या हाताला पकडून गरगर फिरवले आणि परत रिंगणात फेकून दिले...लोकांनी मारुतीला सावरलं...तो वेदनेने तडफडत होता...मास्तर हे बघून अस्वस्थ झाले...."चांडाळा सोड माझ्या लेकाला...माझा जीव घे..." मास्तरांचा धीर गंभीर स्वर घुमला
दिनेश त्या गर्दीकडे बघत एक सैतानी भयाण हास्य करत समोरच्या मोठ्या दगडावर बसला...त्याने खिश्यातला पेन्सिलीचा बॉक्स काढला....दुसऱ्या खिश्यातून गिरमीट काढले आणि पेन्सिलीला टोक करू लागला....मास्तरांनी दिनेश ला वाढदिवसादिवशी गिफ्ट म्हणून दिलेला तो पेन्सिल बॉक्स....दिनेश ला चित्रकलेची आवड....आणि त्यातील पेन्सिलीच्या छटा कागदावर न उमटता लोकांच्या गळ्यावर उमटू लागल्या होत्या....मास्तरांकडे बघत दिनेश पेन्सिलीला गिरमीटात घालून टोक करत होता....आता पुढचं कोण आणि कसं?? हा प्रश्न लोकांच्या मनात होता...सगळ्यांच्या नजरा दिनेशकडे होत्या...त्याने वशीकरण केलेली कुत्री गाववाल्या लोकांकडे बघत लाळ गाळत बसली होती....आमोरासमोर जणू युद्धच होणार आहे की काय अशी स्थिती...एका बाजूला सगळा गाव आणि दुसरीकडे फक्त एकटा सैतानी दिनेश.....
मध्यरात्र झाली होती...ग्रहण आपल्या लालभडक रंगाने आपल्या लालभडक सावली ने सगळी धरती लालभडक करत होत....एक शिट्टी घुमली...सगळ्या गावकऱ्यांच्या नजरा तिकडे गेल्या...अचानक कसला तरी आवाज आला भेसूर आवाजातील ते गाणं त्या शांततेला आव्हान करत वातावरणात घुमलं

"या रावजी....बसा भावजी
कशी मी राखू तुमची म्हर्जी...तुम्ही बसा भावजी
कशी मी राखू तुमची म्हर्जी...तुम्ही बसा भावजी
दिनेश हे गाणं म्हणत घोळक्यात उभ्या एका बाईकड एकटक बघत होता तिच्याकडे बोट करत तो एका करारी पुरुषाच्या आवाजात बोलला
"अग ए छमकछलो...हा तूच...काय नाव तुझं...हा छाया....अजून जरा सुदीक बदलली नाहीस ग...अजून आहे तशी आहेस गोरी पान...आठवतंय का...जरा शिट्टी मारल्यावर माझी तक्रार करायला सरपंचाकड गेली व्हतीस....हम्मम चल आता मी आलोय ये...करतीस का हिसाब चुकता...मी पण त्यासाठीच आलोय बघ....काय तवा काळजाला आग लावत होतीस माझ्या.... माझ्याजवळ ये बस इथं माझ्याजवळ"
दिनेशचा हाथ छाया ला खुणावत होता....अनेक म्हातारी आणि वयस्कर लोक हे सगळं आ वासून बघत होती....छायाचा सासरा हे वाक्य ऐकून पुढं आला तो दिनेशकडे बघत बोलला "आरं...आरं...आप्पा सावकार"
यज्ञाच्या राखेने आखलेल्या रेषेच्या कडेला उभा राहून छायाचा सासरा कसल्या तरी चिंतेने बोलत होता...आप्पा सावकार म्हंटल्यावर गावातील सगळ्या वायस्करांच्या नजरा दिनेश वर खिळल्या आणि मास्तरांसह अनेक तरुणांच्या मनात एकच प्रश्न "आप्पा सावकार कोण?
गर्दीतून एक किंचाळी ऐकू आली सगळ्यांचा नजरा तिकडे वळल्या "आला ग बाई आला माझा राजा आला" तशी ती बाई गर्दीतून धावत आली
गर्दीतल्या त्या बाईला समोर बघून छाया चा सासरा बोलला "तू कशाला आलीस पुढं...साली आप्प्याची रखेल"
तशी ती बाई जाम चिडली सौन्दर्याबाई नाव तिचे....छायाच्या सासर्याच्या तोंडून हे वाक्य ऐकून सौन्दर्या बाई जाम भडकली
"अय म्हाताऱ्या आता तुझं दिस भरलं...तस बी माझा राजा गेल्या पासन लई तरास दिलाय तुम्ही मला...बघा समोर बघा....त्ये मास्तरांच पोर नाय माझा आप्पा सावकार हाय त्यो"
"अय म्हाताऱ्या आता तुझं दिस भरलं...तस बी माझा राजा गेल्या पासन लई तरास दिलाय तुम्ही मला...बघा समोर बघा....त्ये मास्तरांच पोर नाय माझा आप्पा सावकार हाय त्यो"
हे वाक्य ऐकून सरपंच जरा रागातच पुढे आला "ये गप त्या आप्प्याची रखेल हाईस तू...साली तुला पण त्याच्याबरोबर मारायला पाहिजे हुत...पण दया दाखवली आमी...आणि व्हय तुझ्या आप्प्याला ठेचून मारलंय आम्ही गाववाल्यांनी...त्यो बसला असलं नरकात"
हे ऐकून सौन्दर्या बाई चवताळली ती दिनेश कडे बघत होती...दिनेश दगडावर बसून कसला तरी मंत्र म्हणत होता त्याच्या आसपास कुत्री होती...ती कुत्री त्याचा हात चाटत होती....दिनेश ने आपली मान वर काढली आणि सौन्दर्या बाईकडे हसून बघितलं...त्याचे ते हास्य बघून सौन्दर्या बाई मनात सुखावली आता तिने आपला मोर्चा सरपंचकडे वळवला
"आरं ए भाड्या....तुम्ही माझ्या राजाला ठेचुन मारलं खरं...पण मी त्याचा आत्मा नरकातन बोलवून घेतलाय...लई तरास दिला बघ तुम्ही मला आणि माझ्या आप्पाला....10 वरीस वाट बघितली बघ मी....मला वाटलं नव्हतं आप्पाची आणि माझी भेट होईल....पण मी पण काळी जादू शिकलेली बाई हाय...त्यो लाल भडक चंद्र बघितलास काय...तुमच्या त्या चंद्राला त्या लालभडक राक्षसान गिळून टाकलंय...आता ह्यो दिवस आमच्यासारख्या काळ्या लोकांचा अस्तुया....हे रक्तच लालभडक गिऱ्हाण 10 वरश्यातन एकदा येतंय....10 वरश्या आधी आलं हुत तवा त्या मास्तरांची बायको गरोदर हुती.....तवा मी माझी विद्या वापरून त्या ग्रहणात त्या मास्टरड्याच्या बायकोच्या पोटात माझ्या आप्पाचा आत्मा सोडला...आणि जन्मला की रे त्यो....देवसारख्या मास्तरांचा घरात राक्षस जन्माला घातलाय मी राक्षस...हा..हा...हा...हा"

हे ऐकून मास्तरांची बायको खाली बसली त्यांनी तिला सावरलं ती रडत रडत म्हणाली..."अहो ...बघा बघा तेव्हा मी सांगत होते ना..दिनेश च्या जन्मापूर्वी आपल्या घराला कुणीतरी कुंकवाच रिंगण आखल होत..घरात लिंबू..पक्ष्यांची पिसे येऊन पडत होती..आता बघा ना ही बाई काय बोलते...खरच हिने काहीतरी वाईट केलं नसेल ना? अहो आपल्या दिनेश ला वाचवा हो"
मास्तरांनी तिचे डोळे पुसले आणि धीर दिला
मास्तरांनी तिचे डोळे पुसले आणि धीर दिला
सौन्दर्या बाईचं हे बोलणं ऐकून सगळ्यांचा थरकाप उडाला....ज्यांना आप्पा सावकार काय चीज आहे ते माहीत होतं त्यांची तर बोबडी वळली....छायाचा सासरा सौन्दर्या बाईच्या पुढे आला
"तू...तू गावाच्या जीवावर उठलीस सालीxxx" छायाच्या सासर्याच्या हाथ सौन्दर्या बाईवर उठला...तिकडे हे दृश्य बघून दिनेश चवताळला...कुत्री भुंकू लागली....बाई आपला गाल चोळत रागाने छायाच्या सासर्याकडे बघू लागली...तिचे केस विस्कटले होते...अचानक तिने रिंगणाच्या कडेला उभ्या असलेल्या छायाच्या सासर्याच्या जोराचा धक्का दिला...वय झालेला तो...सौन्दर्याच्या धक्याने कोसळला...अचानक लोकांच्यात गोंधळ माजला...छायाच्या सासर्याच्या काही कळेना त्याने एक नजर लोकांकडे फिरवली आणि दुसरी आपल्या पायाकडे...सौन्दर्याच्या धक्याने तो रिंगणाबाहेर पडला होता...काही तरी गुरगुरण्याचा आवाज येत होता....तिकडून छाया तिची सासू ओरडत रडत होती.....धनी...धनी...इकडं या लवकर त्याला आपल्या बायकोचा आवाज आला...छायाच्या सासर्याच्या मागे वळून बघितले....गुरगुरणारी कुत्री त्याच्या आजूबाजूला गोळा झाली होती....त्याचे ते तीक्ष्ण दात आणि लालभडक डोळे जवळून पाहून छायाचा सासरा थरथरू लागला....दिनेश त्याच्याकडे बघून हसला आणि त्याच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला "छु"
आपल्या सैतान मालकाच्या आदेशाची वाट बघत बसलेली कुत्री त्या म्हाताऱ्यावर तुटून पडली...अक्षरशः लचकी तोडू लागली...म्हातार तडफडत होत त्याचं ओरडणं आणि दिनेश च ते क्रूर हसू....म्हातारा आपलं उरलं सुरल शरीर घेऊन पळू लागला...लचके तोडणारी ती कुत्री आणि जिवाच्या आकांताने पळणारा तो म्हातारा हे फक्त गावकरी बघत होते...अडीअडचणीच्या मदत करणारं गावकरी स्वतः अश्या अडचणीत फसले होते की त्यांची मदत करणार कोणीच नव्हते....रक्ताळलेल अंग घेऊन सैरावैरा पळणारा तो म्हातारा खाली कोसळला ..कुत्र्याचं भुंकणे पूर्णपणे बंद झालं...ती कुत्री शेपूट हलवत लांब उभी होती....आधीच अर्धमेला झालेला तो म्हातारा किणकिन्या डोळ्यांनी आजूबाजूला बघू लागला....तो सरपटत सरपटत आपल्या लोकांकडे जाण्याचा प्रयत्न करू लागला...समोर पॅरागोन चप्पल वाले छोटे पाय दिसले त्याची नजर वर गेली...समोर दिनेश उभा होता...तो आक्राळ विक्राळ हसू लागला
"काय म्हाताऱ्या आणलं ना शेवटी पायाखाली तुला...आरं तुझी सून मला लई आवडलेली बघ...आरं माझी राणी बनवून ठेवली असती मी तिला...एकदा तिला हाथ काय लावला..तू तर माझ्यावर केसच ठोकली व्हतीस...चल आता ठोक केस...ठोक ना....थेट नरकाची सजा भोगून आलोय म्या इथं....काय शिक्षा असते महित्याय"
दिनेश त्या अर्धमेल झालेल्या म्हाताऱ्याच्या छातीवर बसला...म्हाताऱ्याने त्याच्या समोर हाथ जोडले...थरथरणारे हाथ बघून दिनेश हसला आणि त्याने आपल्या खिश्यातल्या बॉक्स मधली नुकतीच गिरमिटाने टोक केलेली पेन्सिल बाहेर काढली..
"चल म्हाताऱ्या घे तुझ्या देवाचं नाव..तस पण आजची रात्र आमची हाय काळ्या लोकांची...तुझा देव नाय वाचवणार तुला"
"चल म्हाताऱ्या घे तुझ्या देवाचं नाव..तस पण आजची रात्र आमची हाय काळ्या लोकांची...तुझा देव नाय वाचवणार तुला"
रक्ताळलेल्या म्हाताऱ्याच्या उरावर बसलेला दिनेश बघून मास्तर अस्वस्थ झाले "दिनेश बाळा अस करू नको रे...जाऊ आपण डॉक्टरकडे...इलाज करू आपण"
ह्या वाक्याने दिनेश सगळ्यांच्या कडे बघून हसला...त्याने पेन्सिल म्हाताऱ्याच्या कानाच्या भोकाजवळ ठेवली.....सौन्दर्या हसत हसत रिंगण ओलांडून आत आली....दिनेश ने एक नजर गावकर्यांकडे टाकली आणि म्हाताऱ्याच्या कानाजवळ असलेल्या पेन्सिलीला दुसऱ्या हाताने जोरदार ठोसा मारला....ती पेन्सिल म्हाताऱ्याच्या कानाच्या भोकातून आत शिरली ते त्याच्या डोक्यात दिसेनाशी झाली....त्या पेन्सिलीने आपलं काम केलं...म्हाताऱ्याच्या कानातून रक्त वाहू लागले...त्याचे डोळे एकटक त्या आकाशाकडे बघू लागले....म्हातार मेलं....रक्ताच्या थारोळ्यात पडलं
दिनेश आता भयाण पद्धतीने हसू लागला त्या गर्दीकडे बघत त्याने आपले बोट म्हाताऱ्याच्या सुनेकडे केलं
"ए छाये....बघ तुझा सासरा मेला ग...चल येती का...चल माझ्याबरोबर नरकात"
त्याची नजर आता दूर उभ्या असलेल्या सौन्दर्याकडे गेली
"अग बाई...बाई....अनेक बाया केल्या पण तूच लई प्रमाणित निघालीस बघ...नरकात सडतोय अस वाटलं हुत बघ मला....ह्या xxx नी मला ठेचून मारलं...तिकडं माझा जीव ह्या गावात घुटमळत होता पण त्याला तू हातपाय दिलंस....हे शरीर दिलंस..आता बघ मी सगळ्याचा बदला घेतो कनी...चल ये ग...ये...मला काय घाबरती....ये बस इथं माझ्याजवळ"

सौन्दर्या जरा घाबरतच दिनेश जवळ येऊ लागली...म्हाताऱ्याच्या प्रेतावर ती पचकन थुकली आणि दिनेश जवळ येऊन बसली...दिनेश ने आपला रक्ताने माखलेला हाथ तिच्या गालावरून फिरवला....तिचा गोरा गाल त्या रक्ताने लाला भडक झाला
"आव सरकार तुम्ही माझं माय बाप हाईसा...गावात आली तवा तुम्हीच आधार दिला हौसमौज पुरवली...आता ह्या गावाची नियत खराब..तुम्ही गेल्यावर मला बी गावाबाहेर करणार होतीत...पण ह्या लोकांचा मार खाऊन शिव्या खाऊन मी इथं राहिले...मला सूड पाहिजे होता...आता तुमि आलाय तवा कसली बी काळजी नाय बघा..आता जीव गेला तरी बेहत्तर पण ह्या लोकांना सोडायच नाय बघा"
हे ऐकून दिनेश ने तिच्या गालावर हाथ फिरवला
"वाह रं वाह माझ्या वाघिणी....बदला तर घेणार ह्यो आप्पा सावकार पण एकटाच...तू आता निवांत हो जरा...खुप काम केलं तू...आणखी एक काम हाय तुझ्याकड"
"वाह रं वाह माझ्या वाघिणी....बदला तर घेणार ह्यो आप्पा सावकार पण एकटाच...तू आता निवांत हो जरा...खुप काम केलं तू...आणखी एक काम हाय तुझ्याकड"
गालावरून फिरणारा हाथ सौन्दर्याने आपल्या हातात घेतला "आव तुम्ही नुसता हुकूम करा हुकूम...ही सौन्दर्या आपला जीव देईल जीव तुमच्या साठी"
"हम्मम्म अग बाई मला खूप भूक लागली मला"
हे ऐकून कपाळावर आठ्या आणत सौन्दर्या बोलली "आव ह्या माळरानावर कुठलं जेवण देऊ मी"
दिनेशने तिला जवळ ओढले आणि तिच्या गालाचा मुका घेतला तिला मिठी मारून त्याने आपले ओठ तिच्या कानाजवळ नेले
"सैतान हाय मी मला अन्नाची नाय रक्ताची भूक हाय"
सौन्दर्या क्षणभर गोंधळली....ती स्वतःला त्या मिठीतुन सोडवून घेण्याचा प्रयत्न करू लागली....दिनेशचा हाथ खिश्याकडे गेला आणि बॉक्स मधून एक पेन्सिल बाहेर आली....दिनेशचा हाथ वर गेला आणि सौन्दर्याच्या गळ्यावर पेन्सिलीचा वार झाला....ती किंचाळी पण त्या सैतानाची मगर मिठी काही सुटली नाही....खोलवर घुसलेली पेन्सिल बाहेर आली ती रक्ताची धार बाहेर घेऊनच....त्या छिद्राला दिनेशने तोंड लावले....गरम रक्ताने तो आपली तहान भागवत होता....अक्षरशः त्याने सगळं रक्त ओढून घेतलं आणि बाजूला झाला...बाजूला पडला तो फक्त सांगाड्याला चिटकलेले सौन्दर्याचा शरीर...काळीनिली पडून तिचा जीव गेला...दिनेश ने त्या उभ्या असलेल्या गावकर्यांकडे बोट केलं..."सबकी बारी आयेगी" अस तो इशाऱ्यातुन सुचवत होता.....त्याने परत दगडावर बसून मंत्र म्हणायला चालू केले
सगळं अनपेक्षित आणि स्वप्नाप्रमाणे वाटणारे मास्तर गर्दीतून वाट काढत राम आण्णा जवळ आले...राम आण्णा देवळात जप करीत बसला होता...मास्तरांनी राम अण्णांच्या दंडाला धरून हलवले तसे ते समधीतून बाहेर आले
"आण्णा...आण्णा काय चालू आहे हे...माझं 10 वर्ष्याच पोरं भराभर लोकांचे मुडदे पाडत आहे..रक्त पीत आहे..काल पर्यंत लाडक आसलेलं माझं पोर...आता मला त्याची किळस येत आहे...आणि कोण हा आप्पा सावकार??"
"आण्णा...आण्णा काय चालू आहे हे...माझं 10 वर्ष्याच पोरं भराभर लोकांचे मुडदे पाडत आहे..रक्त पीत आहे..काल पर्यंत लाडक आसलेलं माझं पोर...आता मला त्याची किळस येत आहे...आणि कोण हा आप्पा सावकार??"
राम आण्णा देवाला नमस्कार करून त्या जागेवरून उठले..."बस इथं बाळ...आता ऐक सगळंच वंगाळ घडलंय बघ...हे आता थांबायचं नाही...आरं ही ग्रहणाची रात्र गेली पाहिजे...ते ग्रहनच त्या सैतानाला ताकत देत हाय....आप्पा सावकार तसा गावची घाणच म्हण की...मारामारी...हप्ते वसुली...गरीब लोकांना धमकावून पैसे लुटणे हा त्याचा रोजचा खेळ असायचा..गावातली 4 टाळकी होती त्याच्या बरोबर त्यांना घेऊन बायांची छेड काढणे असली काम त्यो करायचा आर त्यानं कित्येक खून आणि बलात्कार पचवलेत बघ...आप्पा सावकार म्हंटल्यावर आपल्या खानदानाचा नाश करील ह्या भीतीने कुणी साक्ष पण देत नव्हतं...ती बाहेरची छाया नवीन लग्न करून गावात आली पण त्याचा तिच्यावर डोळा आर घरात घुसून छेडलं होत तिला...तवा गाव सोडून गेली बिचारी...मधी मधी त्याला काळ्या जादूचा नाद लागला....कुठल्या तरी अघोरी बाबाच्या सांगण्यावरून त्यानं गावातल्या दोन पोराचं बळी दिलं की रं..त्याची मुंडकी छाटली होती ह्या सैतानान....त्या घटनेनं गाव चिडला...त्याला चौकात आणून बेदम मारहाण केली आमी...त्यातच "एकेकाला बघून घेऊन" अस बोलत बोलत जीव सोडला त्यानं...आता त्योच आलाय बघ...आणि हे ग्रहण 100 वर्ष्यातल सगळ्यात मोठ आणि भयाण ग्रहण हाय त्यात ह्यो सैतान म्हणजे"
राम आण्णा आणि मास्टर त्या रिंगणजवळ आले आणि त्यानी दिनेशकडे बघितलं...तो त्या दगडावरून उठला आणि त्यावेळच त्याच फेव्हरेट गाणं गुणगुनू लागला...गावकरी रिंगणाच्या आत घाबरून बसले आणि तिकडे दिनेश ने एकदा त्या लालभडक ग्रहणाकडे बघितलं आणि तो रक्ताळलेला पेन्सिल पकडलेला हाथ वर करून
"जी हाँ"
मैं हु खलनायक....नायक नही खलनायक हु मैं"
भयाण हसू आणि ते कुत्र्याचं विचित्र ओरडणं अजून किती वेळ चालणार ह्याचा प्रश्न सगळ्यांना पडला....
मैं हु खलनायक....नायक नही खलनायक हु मैं"
भयाण हसू आणि ते कुत्र्याचं विचित्र ओरडणं अजून किती वेळ चालणार ह्याचा प्रश्न सगळ्यांना पडला....
(क्रमशः)