#पेन्सिल-पेन्सिल- PENCIL A HORROR TERROR
P....for.......पेन्सिल.......शाळेत शिकवत असताना शिंदे मास्तरांचा फळ्यावर फिरत असलेला हाथ अचानक थांबला....मुले मागून सूर ओढत होती....मास्तरांनी हातातला खडू टेबलावर ठेवला...."मुलांनो काल दिलेला अभ्यास पूर्ण करत बसा" असा आदेश देऊन मास्तर खुर्चीवर विचार करत बसले
"पेन्सिल" ह्या शब्दाने त्याच्या डोक्यातून गेलेला विषय परत घुमू लागला....गाव तस आदर्श....गेल्या 20 वर्षांपासून गावाला आदर्श गाव पुरस्कार मिळाला....पण हे पेन्सिल प्रकरणाने सगळ्यांच्या नजरा गावाकडे लागल्या होत्या...शिंदे सर तसे गावचे आदर्श....गावात अनेक चांगली कामे...अनेक तरुणांना मार्गदर्शन करून स्वावलंबी बनवण्यात त्यांचा हात होता....एकूणच गावासाठी आपलं जीवन झोकून देणारा माणूस....पण काही दिवसांपासून अस्वस्थ....गावची काही जुनी मंडळी....जुने तसे सोने...कारण त्याच लोकांमुळे गाव आदर्श बनला...भारताच्या नकाशावर गौरवाने ह्या गावचं नाव येऊ लागलं....त्याच काही 20,25 लोकांवर हे गाव आदर्श गाव म्हणून गाजत होतं....त्याचं काही लोकांच्या हत्या होत होत्या.....एकदम निर्दयी पणे मारलं जात होतं त्यांना....आणि खुनी त्यांचा खून एका पेन्सिलीने करायचा......अक्षरशः त्याच्या मानेवर पेन्सिल भोकसून त्यांना रक्तबंबाळ करून मारलं जायचं....कोण करत असेल हे? सिरीयल किलर तर नसेल? अश्या अनेक प्रश्नांनी मास्तरांच्या डोक्याचा भुगा केला होता
सिरीयल किलर कसा असेल? अरे म्हातारी लोकं ती काय कुणाचं वाईट करतील?? का होतंय हे सगळं?? माझ्या गावाला हा बट्टा का लागत आहे...हा विचार करता करता शिपायाने घंटा वाजवली तशी पोरं कल्ला करत बाहेर पळू लागली...पोरांच्या आवाजांनी मास्तरांना सूद आली आणि ते घराकडे निघाले....एका पाठोपाठ 6 माणसं गेली...गावाचा आधार...त्याच भयानक पद्धतीने...पेन्सिल गळ्यावर भोकसून भोकसून....गावात अंधार पडला की चिटपाखरूही नसायचं....गावातली तरणी पोर हातात काठ्या घेऊन गस्त घालत होती....7 वाजले की अक्खा गाव रिकामा व्हायचा....पाठोपाठ पडणारे मुडदे आणि ते पण कश्यात काही नसणाऱ्या लोकांचे...पोलीस सुद्धा तपास घेत होते...एकदा एक खून पडल्यावर एकाच्या मागे पोलीस धावले पण एखादं माकड सरसर करीत झाडावर चडावे तसे ते झाडावर चढुन बसलं आणि भयानक आवाजात "माझ्या आडवं येऊ नका...सगळ्यांना मारून टाकणार हाय म्या..जान प्यारी असलं तर निघा इथन" असा आवाज ऐकू आला होता...त्या आवाजनेच 4,5 पोलीसांच्या प्यांटा ओल्या झाल्या होत्या...गावचे पोलीस पाटील सुद्धा हैराण झाले होते....हे बघून गावची काही लोकं आणि सरपंच मिळून गावचे जागृत देवस्थान असलेल्या मारुतीच्या देवळाचा पुजारी रामा आण्णा जवळ आले

"आरं ए आण्णा...आरं काय चालू हाय गावात...आरं माझं सवनगडी मारलं की रं त्याना...कुठं हाय देव तुझा??आरं त्यो पोलीस म्हणतोय काय तरी विचित्र केस हाय...आरं भूतबाधा असली तरी माझ्या गावकऱ्यांना का मारत हाय बाबा...आरं परवा त्यो शिरप्या सुदीक म्हणत होता सदाभाऊंचा जेव्हा खून झाला तेव्हा काही पोर त्या पिशाच्च च्या मागे धावली पण ते पिशाच्च एका झाडावरन दुसऱ्या झाडावर करत डोंगरावर गायब झालं...आरं गावकरी लई भ्यालीत बघ...आरं शिस पेन्सिल न भोकसून मारत हाय त्ये....बघ बाबा तुझ्या देवाला इचार...उपाय काढ बाबा ह्यातून...लोकं लई भ्यालीत बघ" सरपंचाचा गंभीर स्वर त्या मंदिरात घुमत होता
राम आण्णा कसलं तरी पुस्तक वाचत होता..सरपंचाच बोलणं ऐकून त्यानं ते पुस्तक खाली ठेवलं...आपल्या डोळ्यावरचा चष्मा काढला राम आण्णा च्या तोंडावरचे भाव बदलत होते...त्याच्या डोळ्यांची बुबुळे इकडे तिकडे फिरत होती मधूनच तो मागे वळून मारुतीला पाया पडायचा...आण्णांची ही अवस्था सर्व लोक पहिल्यांदा बघत होते
"आरं ए आण्णा काय बोलतोय मी?लक्ष कुठं हाय तुझं? सरपंच तावातावाने बोलले

आण्णा ने समोरच्या चंद्रकड बघितलं "संकट घोर संकट आलंय गावावर...बदला घेणार हाय ते गावाकडून...." आण्णा बोलता झाला
कपाळावर प्रश्नार्थी भाव आणत परत सरपंच बोलले "आरं ए आण्णा स्पष्ट बोल बाबा..आधीच भीतीनं मरायची वेळ आल्या लोकांवर त्यात आता पोलीस सुद्धा हात वर करत हाइत मग आता तूच आणि तूझा देवच आधार हाई बघ आमसनी"
त्या लालभडक चंद्राकडे बघत आण्णा हवालदिल झाला त्याचे शब्द आज धीरगंभीर होते "चं...चं...चंद्रग्रहन हाय आज...ते बी साधंसूद नाय आव सरपंच हे लई भयाण चंद्रग्रहन हाय बघा...त्यो बघा चंद्र कसा लाल भडक झालाय...रक्त पहिल्यासारखा...10 वर्षांनी येतोय ह्यो योग...आणि सैतानाची पूजा करत्यात अघोरी लोक...त्या पताळातली भुत बोलावत्यात ह्या ग्रहणात...आव जस सांगताय तस कोण माणूस करणार नाही बघा हे नक्कीच एका पिशाच्च चे काम हाय...कुणीतरी डाव धरून हाय गावावर....त्यो आता आपला सूड उगावणार आणि हे ग्रहण त्याला ताकत देणार बघा...आता देवच रक्षण करील बघा आपलं...जावा लवकर अजून थोडा टाइम हाय तवर गावातल्या लोकांना मारुतीच्या देवळात घेऊन या...आव त्योच रक्षण करील बघा आता"
कधीही गंभीर नसणारा राम आण्णा आज घामाने चिपचिपला होता...त्याचा अवतार बघून सरपंचाने समोर उभा असलेल्या शिरप्याला आदेश दिला
"आरं ए शिरप्या गावाकडं जा आणि सगळ्या गाववाल्याना लगेच देवळात बोलवून घे...जा लवकर..जा...अय सुन्या तू बी जा रं"

शिरप्या आणि सुन्या गावाकडं धावली...तिकडं सरपंच आणि काही मंडळी देवळात ठाण मांडून होती...राम आण्णा चा जप चालू होता...गावात स्मशान शांतता होती...गावात पडलेले खून आणि ती पिशाच्याची बातमी ह्या मुळे निम्मे लोक गाव सोडून गेले होते...सगळ्यांची दारं बंद होती...एकट्या मास्तरांच दार उघड.मास्तर आपल्या लहान मुलांचा अभ्यास घेत बसले होते.....तिकडून त्यांची बायको जेवण करून पदराला हात पुसत मास्तरांच्या जवळ आली
"काय कसा चाललाय अभ्यास....अहो मला दिनेश ची आठवण येते हो...तुम्ही त्याला माझ्या माहेरी का पाठवलंत मला अजून कळलं नाही बघा...अहो आता हा धाकटा दादा कुठे आहे बोलून बोलून घर डोक्यावर घेतोय बघा..."
नेहमीप्रमाणे पत्नीची तक्रार ऐकून मास्तर जागेवरून उठले आणि समोर असलेल्या भिंतीला खेटून उभे राहिले आपल्या बायकोकडे बघत ते बोलले "अग सोन्या गावात वातावरण बघ कसं झालंय...किती खून होत आहेत गावात..त्यात आपला दिनेश गावभर फिरतोय...अक्खा गाव पुरत नाही त्याला खेळायला...मला माहित आहे तुला त्याची आठवण येते...मला पण येते त्याची आठवण पण थोडे दिवस थांब त्याच्या अभ्यासाची काळजी आहे मला...हे प्रकरण मिटले की घेऊन येईन मी त्याला"

मास्तरांची बायको खिन्न होऊन ऐकत होती....मास्तरांनी तिच्या गालावर हाथ फिरवला...अचानक गल्लीतून ओरडण्याचा आवाज येऊ लागला...प्रचंड किंचाळी ने परिसर शहारून गेला मास्तर आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन धावत बाहेर आले त्याची बायको सुद्धा सोबत होती....गल्लीतून लोक धावत त्यांच्या दिशेने येऊ लागले...मास्तरांना काही कळेना त्यांनी आपल्या लहान मुलाला बायकोकडे दिल आणि धावणाऱ्या एकाच्या दंडाला पकडून आपल्या बाजूला ओढलं...."आरे ए का धावताय...काय झालं?"
घामाने चिपचिपलेला गावकरी मास्तरांची मूठ सोडवत म्हणाला
"मास्तर...मास्तर सोडा...पिशाच्च...पिशाच्च आलंय...तात्या जाधवांना ठार केलंय त्यानं...पळा...मास्तर पळा"

तसा तो गावकरी मास्तरांचा हाथ सोडवून पळून गेला...तात्या जाधव नामी पैलवान आणि गावातला जेष्ठ माणूस...त्याचा खून
मास्तर अस्वस्थ झाले सगळे लोक धावत होते....तिकडून कुत्री भूकत होती...मास्तरांना प्रचंड राग आला ते त्या दिशेने जाऊ लागले....पण त्यांच्या बायकोने त्यांना अडवलं...तिकडून शिरप्या आणि सुन्या आले त्यानी मास्तरांना पकडलं
"मास्तर पुढं जाऊ नका जी...चला देवळाकड सरपंचानी बोलावलंय...आव सोडा त्ये लई भयानक हाय बघू नका तिकडं...चला मास्तर चला"
दोघांनी मास्तरांना बळजबरीने खेचलं तसे ते आपल्या पत्नीसोबत आपल्या मुलाला घेऊन मंदिराकडे निघाले...चंद्र लालभडक आणि त्याचा लालभडक प्रकाश वातावरण अजून भयानक करत होता...गावातली लोकं जिवाच्या आकांताने पळत होती...सगळं गाव रिकाम झालं होतं....मंदिराच्या समोरच मैदान लोकांनी भरलं होतं....सगळे गावकरी जमले...तिकडे तात्या जाधवांच्या घरातील लोक आक्रोश करू लागले त्याची बायको तर बेशुद्ध पडली होती...बायकांचं रडणं आणि आक्रोश...सोबत पुरुष मंडळींच्या चर्चा चालू होत्या...गावची तरणी पोर त्या मंदिराच्या भोवती जिथपर्यंत लोक आश्रयाला थांबले आहेत तिथपर्यंत कसल्या तरी पांढऱ्या राखेने रिंगण आखत होती....हे बघून तिथे जमलेल्या लोकांची अजून हालत खराब झाली....गावचं एक म्हातारं राम आण्णा कड बघत बोललं
"आण्णा हे काय करतुयास कसली राख ही"
त्याच्या खांद्यावर हात ठेवत आण्णा बोलले "आरं सताप्पा ही मारुतीच्या यज्ञाची राख हाय बघ...बघू काय होतंय काय...अय तुम्ही समदी शांत बसा आणि देवाचं नाव घ्या...हे ग्रहण टळू दे मग जावा आपल्या आपल्या घरला..."
तात्या जाधवांच्या बायकोकडे आण्णा ने बघितलं ती अजून बेशुद्ध आणि त्याच्या घरातली रडत होती...त्या भयाण वातावरणातील त्यांचे रडणे आणि तो गोंधळ
राम आण्णा आणि सरपंच दोघेही चिंतातुर होते गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरची भीती कायम भजन कीर्तनात दंग असणारे ते देऊळ आज आक्रोश,भीतीने शहारून गेलं होतं
शिखरावर बसून पाहणी करणारं पोरगं वरडू लागलं....सगळ्यांच लक्ष त्याच्या आवाजकड गेलं...ते पोरगं धापा टाकत खाली उतरल
"आण्णा....आण्णा कोण तर येतंय हिकडं"
तशी सगळ्यांची नजर समोरच्या रस्त्याकडे गेली.....अचानक कुत्र्यांचे भुंकणे चालू झाले...तो भुंकण्याचा आवाज गगनभेदी होता....गावची सगळीच कुत्री देवळाच्या दिशेने येत होती...प्रचंड धुळीचा लोट उठला होता....त्या चंद्र ग्राहनाच्या लालेलाल प्रकाशात ती धूळ म्हणजे मृत्यू घेऊन आली की काय हेच गावकऱ्यांना वाटत होतं...सगळ्यांची पावलं मागे सरली....कुत्र्यांचे भुंकणे वाढतच होते....त्या मंद उजेडात त्यांचे ते चमकणारे डोळे आणि तोंडातून वाहणारी लाळ...हे दृश्य गावकऱ्यांना अनपेक्षित होतं....आपल्याच भाकरी वर जगणारी ही 100 एक कुत्री आज आपल्याच शरीराचा लचका तोडायला येत आहेत हे बघून गावकरी घाबरले...अचानक काही कुत्री साईड ला झाली आणि...आणि तो येत असलेला दिसला.....त्याच्या डोळ्यात वेगळीच आग होती त्याचा चेहरा रुमालाने झाकला होता पण त्याचे ते लालभडक डोळे त्याच्या डोळ्यातील सूड अजून भडक करून दाखवत होते....

"आरं हे तर बारकं पोरगं हाय की"
गर्दीतून एक आवाज झाला...पण ती पांढऱ्या राखेने आखलेली सीमा रेषा ओलांडून जायला कोण तयार होईना...तो आपल्या बरोबर मागे मातीच्या धुळीचा लोट घेऊन येत होता....एका हातात रक्ताने माखलेली पेन्सिल आणि..आणि दुसऱ्या हातात तात्या जाधवाचा पाय....तात्याचं प्रेत तो फरफटत आणत होता.....मागून एखादं दुसरं कुत्रं तात्या च्या शरीराचं लचक तोडून पळून जात होतं....सीमा रेषा जवळ आली तस ते पोर थांबलं....90 किलोचा तात्या कोंबडी वडत आणावी तस वडत आणणारा हा पोरगा कुणी मामुली नसून काहीतरी सैतानी ताकत त्याच्या अंगात आहे असं लोकांना कळून चुकलं होतं....ते पोरं जवळ आलं...
"घाबरू नका रं....ह्ये देवाचं कडं जोपर्यंत आपल्या बाजूला हाय तोपर्यंत ह्यो राक्षस आत यायचा नाय"
गर्दीतून वाट काढत आण्णा पुढे येऊन त्या पोराच्या डोळ्यात डोळं घालून बघू लागल

"कोण हाईस तू"
आण्णांचा करारी आवाज घुमला
ह्यो आवाज ऐकून त्या पोराने भूकणाऱ्या कुत्र्यांच्या कडे नजर फिरवली आणि भयाण आवाजात भूकणारी ती कुत्री अचानक शांत झाली

त्या पोराने समोर सगळ्या गाववाल्याकडे बघितलं आणि तोंडाला बांधलेला रुमाल खाली केला
गर्दीतून एक आवाज घुमला "दिनेशsssss" मास्तर किंचाळले
शिरप्या जोरात ओरडला "आरं ह्यो तर दिनू...आपल्या मास्तरांचं पोरगं हाय"
दिनेशला ह्या रुपात बघून मास्तर आणि त्यांची बायको तडफडू लागले आपलं कोवळं 10 वर्ष्याच पोरं....त्यो आणि खुनी?? ह्या विचाराने मास्तरांना चक्कर येऊ लागली....ते त्याला जवळ करण्यासाठी बाहेर जाऊ लागले पण लोकांनी आणि राम अण्णांनी त्याला अडवलं...."दिनू....दिनू" करत त्याची आई रडत होती...पण एका हाकेने आईच्या कुशीत शिरणारा दिनू आज हातात एक प्रेत घेऊन उभा होता...त्याची नजर समोरच्या गर्दीकडे होती.....त्याने आपल्या कानामागे खोवलेली पेन्सिल काढली आणि तात्याच्या प्रेताला मानगुटीला धरून बसवलं.....कोवळ्या आणि मधुर बोलून शेजापाजार च्या लोकांचा लाडका झालेला दिनेश आज एका भयाण अश्या कर्णकर्कश अश्या आवाजात हसू लागला....तो आवाज ऐकून गावची म्हातारी लोक एकामेकाकडे बघू लागली...दिनू ने तात्याला बसवलं आणि खसकन पेन्सिल त्याच्या मानेत खुपसली....रक्ताची एक धार वाहू लागली....ती धार त्या कोवळ्या पोराने तीर्थ प्यावं तसं ओंजळीत घेऊन पिऊन टाकली....आपल्या मुलाच हे कृत्य बघून मास्तर हतबल झाले...आगाऊपणा केला म्हणून फटके मारण्याचा हक्क दिनेश चे हे सैतानी रूप बघून हरवून बसले होते....रक्ताळलेली चेहऱ्याने दिनूने त्या लोकांकडे पाहिले आणि तात्याच्या पाय पकडून एखादी बाहुली फेकवी तस ते प्रेत लोकांच्यात फेकलं....तात्याचं प्रेत हवेत उडत लोकांच्या अंगावर रक्ताचे थेंब उडवत आत येऊन पडलं....तात्याच प्रेत बघून गोंधळ माजला....कुत्र्यांची फौज घेऊन दिनेश उभा होता...सगळे लोक तात्याच्या प्रेताजवळ उभे होते...मास्तर आणि त्याची बायको मात्र दिनेश कडे बघून रडत होते...त्या दोघांना लोकांनी सावरलं....मास्तर आता तात्याच्या प्रेताजवळ आले तात्याच्या डोळ्याच्या खाचा झाल्या होता...अंगावर छिद्र पडली होती आणि ती....ती तात्याच्या मानेत खुपसलेली पेन्सिल बघून मास्तर समजून चुकले की हा आता आपला दिनेश राहिला नाही.........(क्रमशः)