रामाला कामावरुन घरी यायला ऊशिरच झाला होता...!
एक तर पाउस पडल्यामुळे हवेत गारवा होता... पायवाटेत पण चीखल राडा झाला होता...कचकचाट सगळा...!
लहान गाव असल्यामुळे संध्याकाळ नंतर फार कुणी बाहेर पडत नसत.
शेतामधल्या चीखलाच्या राड्या रस्त्यामधुनच कसाबसा सायकल जोरात पळवत तो घरी जात होता...!
तस म्हटले तर घरी त्याची कोणी वाट पाहणारे नव्हतच...आईबाप नव्हते... दोन वर्षापुर्वी बायको पण वारली होती...मुलबाळ पण तर नव्हतेच...!
बहिण होती पण तिला लांबच्या गावात लग्न करून दिले होते....
ती कधीतरी भावाला भेटुन जायची बिचारी...!
बहिण होती पण तिला लांबच्या गावात लग्न करून दिले होते....
ती कधीतरी भावाला भेटुन जायची बिचारी...!
म्हणूनच एकटाच रहात होता तो....जमेल ते बनवायचे...कामावर राबायचे...असे रात्री बेरात्री घरी यायचे...हाच त्याचा दिनक्रम.
थकल्यामुळे कधी घरी जातोय आणि अंग टाकतोय असे त्याला झाले होते...
अंधार बराच झाला होता..!
रातकिड्यांचा आवाज घुमतं होता...!तळयात बेडकांचा आवाज वाढला होता...मधेच वटवाघुळांच्या चीत्कारायचा आवाज येत होता....
रातकिड्यांचा आवाज घुमतं होता...!तळयात बेडकांचा आवाज वाढला होता...मधेच वटवाघुळांच्या चीत्कारायचा आवाज येत होता....
रामाने सेलवर चालणारी टाॅर्च चालू ठेवून सायकलच्या समोर बांधली होती त्या मुळे पुढचे त्याला बऱ्यापैकी दिसत होते....!
विहीरी जवळ आल्यावर त्याला सायकल एकदम जडजड वाटायला लागली..सायकल चालवताना फार धाप लागायला लागला...चीखलामुळे असेल म्हणून तो सायकल वरून ऊतरला आणि सायकल ढकलत नेवू लागला....
तेव्हाच त्याला ती दिसली....!!
गोरीपान,वय साधारण पंचविसाच्या आत बाहेर,
ईरकली सहावारी साडी,केसांचा कसातरी बांधलेला अंबाडा पण पुर्ण विस्कटून गेलेला...कपाळावर लावलेले भले मोठ्ठ कुंकु ते पण भिजल्यामुळे कपाळभर पसरले होते...कळतच नव्हते कुंकू पसरलेय की रक्त..
ईरकली सहावारी साडी,केसांचा कसातरी बांधलेला अंबाडा पण पुर्ण विस्कटून गेलेला...कपाळावर लावलेले भले मोठ्ठ कुंकु ते पण भिजल्यामुळे कपाळभर पसरले होते...कळतच नव्हते कुंकू पसरलेय की रक्त..
एवढ्या अंधार्या रानात पुर्णपणे भिजलेली.. विस्कटलेल्या केसांनी आणि विस्कटलेल्या मनानीच ती त्या झाडाखाली बसलेली त्याला दिसली...
"ओ बाई...ईथे का बर बसल्यात अशा..? त्याने लांबूनच तीच्या जवळ येता येता तिला विचारले...!
ती फक्त कसतरी हसली....ओठातून ओघाळणारे रक्त ओल्या फाटक्या पदराने पुसत काहितरी गिळल्या सारखे करून तीने त्याला फक्त हाताने पुढे जा म्हणून म्हणाली....!
रामा तिच्या हाताकडे दुर्लक्ष करत म्हणाला..."ओ बाई...अस बाई माणसाला शोभते का असा आड रानात येऊन बसायला..चला जावा घरी....कोणी तुम्हाला अस पाहिले तर घाबरून ईथच मरल की..
अस म्हणत तो पुढे निघाला खरा,पण दोन पावलं पुढे होत नाही तोवर सायकलची चेन निसटली....रामा तस्साच खाली बसून सायकलची चेन बसवत होता की मागुन येऊन ती बाई ऊभी राहिली...अन हळूच म्हणाली...
"मला नवर्याने टाकलंय...मी रोज त्याच्या पुढे हात पसरते रात रात भर दाराबाहेर बसून रहाते,रोज वीनवण्या करते मला घरात घे, पण तो मला घरात घेत नाही,खुप वाईट्ट शिव्या देतो,अंग फुटून रक्ताच्या चीळकांड्या ऊडे पर्यत मारतो....आज पण गुरा सारखे मारले नी बेशूध्द अवस्थेत ईथे आणून टाकलेय...काय करू मी कुठ जाऊ...मला ना आई ना बाप...
"मला नवर्याने टाकलंय...मी रोज त्याच्या पुढे हात पसरते रात रात भर दाराबाहेर बसून रहाते,रोज वीनवण्या करते मला घरात घे, पण तो मला घरात घेत नाही,खुप वाईट्ट शिव्या देतो,अंग फुटून रक्ताच्या चीळकांड्या ऊडे पर्यत मारतो....आज पण गुरा सारखे मारले नी बेशूध्द अवस्थेत ईथे आणून टाकलेय...काय करू मी कुठ जाऊ...मला ना आई ना बाप...
रामाला हे ऐकुन फार वाईट वाटले..तो म्हणाला बाई माझ्याघरी चला,ऊद्या तुमच्या नवऱ्याशी मी बोलून पहातो..ईतक्या रात्री आड रानात असे बसणे बरे दिसत नाही...तुम्ही माझ्याघरी चला...
ती बाई पटकन यायला तयार होईनात,
रामाने तिला समजावले बाई सकाळी ऊठुन तुम्ही परत या वाटल्यास आजची रात्र मी बाहेर पडवीत नीजतो तुम्ही कडीलाऊन आत घरात नीजा..मग तर झाले..!
ती बाई रामाच्या घरी जायला तयार झाली...
हळूहळू पाऊस पडायला सुरुवात झाली.
सायकलची चेन पण लागली गेली ,तसे दोघे घरी निघाले..
घरी पोहोचल्यावर त्याने तीला नेसायला बायकोची साडी चोळी दिली..
तोवर ह्याने खिचडी बनवली दोघं जेवत असतानांच बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला..वीज कडाडून ढगांचा गडगडाट सुरू झाला.
रामाला आता आतच निजण्या शिवाय पर्याय नव्हता.
तिला लोखंडी खाटेवर निजायला सांगुन तो खालतीच जरा लांबच दाराच्या एका कडेला निजला...
जागे अभावी तो असा नीजला होता कि पलंगावर नीजलेली ती त्याला दिसतच होती.
बाहेर पाऊस तुफ्फान पडत होताच..हवेत गारठा खुपच वाढला होता.
कसातरी अंगाचे मुटकुळं करून रामा झोपी गेला..त्याला मध्येच कधीतरी जाग आली.पायांवरून सरकत गेलेले पांघरूण अंगभर लपेटून घ्यावे म्हणून तो ऊठला अन काळजात एकदम धस्सच होवुन गेले..
कारण तो त्या बाईच्या जवळ एकाच पलंगावर झोपला होता.
ती बाई त्याच्याच कडे टक लावून पहात होती.
वीजेचा झटका बसावा तसा तो ताडकन ऊठला आणि स्वत:च्या जागेवर येऊन निजला.
मी पलंगावर कसा आलो...अस काहितरी पुटपुटत..तो विचार करीत राहिला.
मी पलंगावर कसा आलो...अस काहितरी पुटपुटत..तो विचार करीत राहिला.
पण ती काहींचं न बोलता त्याच्याकडे तश्शिच पहात राहिली.एक टक...
ह्याला कसतरी झाले हा तिच्याकडे पाठ करून निजायचा प्रयत्न करू लागला.
त्याचा डोळा लागत नाही तोवर त्याला पाठीवरून काहीतरी वळवळ करतंय अस वाटले..त्याने ऊगाच हाताने झटकल्या सारखे केले.
मग अंगभर कुणाचातरी हात फीरल्या सारखे झाले तो शहारून खडबडून ऊठला.मागे वळुन पाहिले तर ती तशीच्या तशीच एकटक त्याच्याकडे पहात होती.
त्याने तिला झोप म्हणून म्हटले नी पुन्हा आडवा झाला.
परत त्याच्या अंगावरून हात फिरू लागला.पण सोबत काळ्या केसांची पण वळवळ दिसू लागली..
आता तो जरा चरकला..डोक्यापर्यंत चादर ओढून हळूच चादरीच्या फाटलेल्या छिद्रातून त्याने पलंगावर पाहीले....ती तशीच नीजलेली एक टक त्याच्याकडेच पहात होती...पण ह्या वेळी तीचे केस मात्र वळवळ करत त्याच्याच दिशेने येत होते....ईतके लांब केस पाहुन आपण भलतच काहितरी घरात घेतलेय हे त्याला कळून चुकले...थंड वातावरण असुनही त्याला दरदरून घाम फुटला...तो पुढे पहात होता त्याची दातखिळीच बसेल असे दृश्य तर पुढे होते..
त्याच्याकडे एक टक बघत जागची जराही न हलता तिने तीचा हात लांब केला...ईतका लांब लांब की पलंगावरून पार दारापर्यंत तो झोपलाय त्या दिशेने येऊन त्याच्या अंगभर तो हात फिरत राहिला....!
झपक्यात केसांचा विळखा त्याच्या शरीरावर बसला अन एका हातानी सहज ऊचलून तिने तीच्या शेजारी पलंगावर त्याला आणुन आपटला....!
एक जोरदार किंचाळी ढगांच्या गडगडाटात विरून गेली.....!
(२)
(२)
किती तरी दिवसांनी रामाचा मीत्र,रामा कामावर का येत नाही ? म्हणून बघायला त्याच्या घरी ,कामावरून सुटल्यावर आला. दारावर तिनचार थापा मारून पण दार काही उघडले जात नव्हते.
ईकडच कुठ जवळपास गेला असेल म्हणून तो दारापुढे ऊभा रहातो बराच वेळ.
समोरून त्याला कोणीतरी बाई येतांना दिसते.
हातात बॅग सोबत एक माणूस पण आहे बहुतेक.
हातात बॅग सोबत एक माणूस पण आहे बहुतेक.
ईकडेच येतायत म्हणजे रामा पण सोबत असेल चला भेट होईल म्हणून तो वाट पहात राहतो.
ती बाई तो पुरूष जवळ येऊन भेट झाल्यावर कळते कि हि बाई रामाची बहिण आहे अन तो तीचा नवरा...
ती बाई तो पुरूष जवळ येऊन भेट झाल्यावर कळते कि हि बाई रामाची बहिण आहे अन तो तीचा नवरा...
बराच वेळ आतुन कडी असलेले दार वाजवून कोणि ऊघडत नाही म्हटल्यावर दार तोडावे हाच ऊपाय ठरतो.
दोघंही दाराला जोरदार धक्का देऊन दार तोडतात...जुन्या घराचे दार पण पटकन आतमध्ये ऊघडले जाते..
हलका कुजलेला दर्प नाकात शिरतो... तिघे घरात घुसतात. दारातच विस्कटलेले अंथरुण पडलेले दिसते.
पलंगावर रामा नग्न अवस्थेत अर्धवट कुजलेला वेडा वाकडा पडलेला असतो...एकटाच...!
विचीत्र वाटावे असे सगळे समोर दिसत असते.. बिछान्यातच काय तर भींतीवर,आढ्यावर लांब सडक केसच केस पडलेले असतात. रामा ला जरा सरळ केले असता दिसते कि छातीवर भलंमोठं भोक आणि कुणीतरी त्यातुन त्याचे ह्रदयच खेचून ओरबाडुन काढलेलं होते....सगळी कडे रक्ताचे सुकलेले डाग पडले होते.... ईथे काहितरी अभद्र घडलेय,आणि आपल्याला लोकांची मदत लागेल म्हणून रामाचा मीत्र मदतीसाठी घराबाहेर पडतो.. ईतक्या रात्री एवढ्या लांब कोण येऊ शकेल ह्या विचारात असतानांच... वाटेत थेंबाथेबांने पाऊस सुरू होतो.गार वारा सुटतो.पाऊसाने गाठायला नको म्हणून हा झपाझप चालायला लागतो... पावसाचा वेग वाढतो म्हणून हा विहीरी जवळच्या झाडा खाली थांबतो....
तेव्हाच त्याला ती दिसते..कसातरी बांधलेला अंबाडा...तोंडातून निघालेले रक्त...ऊगाच काहितरी चावल्यासारखे करून ती गिळते...तिच्या हातात काहितरी असते...!
तो तिला विचारतो ईथे काय करताय.. ती हातानेच त्याला जा जा करते...
तो काहींचं न बोलता ऊभा रहातो. मग तिच बोलायला लागते..
ती म्हणते नवर्यानं मला टाकलंय...मी रोज त्याच्या पुढे हात पसरते रात रात भर दाराबाहेर बसून रहाते.रोज वीनवण्या करते......
पुढचे तीला बोलुन न देता हा म्हणतो बर बर...बसा ईथच.तिला पाहुन ह्याला कसेतरीच झालेले असते.
पुढचे तीला बोलुन न देता हा म्हणतो बर बर...बसा ईथच.तिला पाहुन ह्याला कसेतरीच झालेले असते.
तिला पाहुन न पाहिल्यासारखं करून हा झपाझपा पुढे निघून जातो....!
पाऊस अचानक थांबतो... (३)
आत्ता ह्याने मला दुर्लक्षित केले म्हणून सुटला हा...! फक्त अजुन पाच मीनीट थांबला असता तर..आता तो माझ्या ताब्यात असता..! पण पुढचा नाही सुटू देणार मी....!! माझ्या हातात रामाचे काळीज होते म्हणूनच हं...नाहीतर ह्याचाच नंबर होता पुढचा...!
असे म्हणून ती हातातल्या रामाच्या ह्रदयाचा लचका तोडुन कराकरा चावते....! मला जर चिरतरूण रहायचे असेल तर असे सावज गाठायलाच लागेल... त्यांचे गरम ऊबदार काळीज मला सशक्त ठेवेल...! अशी ही अमानवी शय्या सोबत मला चीरकाल तरूण ठेवेल....! माझा वर्ण ऊजळेल..
आता कोण म्हणेल मला शतकानं शतकाची म्हातारी......!!!!
हा हा हा हा असे गडगडाटी हास्य करत ती लांब सडक मोकळ्या केसांनी...हात लांबच लांब करून अलगद विहीरीत ऊतरते.....!
समाप्त
दिपाली ओक(कल्याण)