The Ring (2002) : विहिरीतून बाहेर आलेला शाप…

काही कथा पडद्यावर संपतात…
पण काही कथा डोळे मिटले तरी सुरूच राहतात…
‘The Ring’
हा फक्त एक हॉरर सिनेमा नाही... तो एक शाप आहे.. जो मृत्यू देतो असा..
कथेची सुरुवात कोणत्याही राक्षसाने होत नाही…
ना रक्ताने, ना किंकाळ्यांनी….सुरुवात होते एका साध्या गोष्टीने…
एक व्हिडिओ टेप...
ती पाहिल्यानंतर... बघणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू ठरलेलाच असतो…
सुरुवात होते... टेप संपते…..
स्क्रीन काळी पडते…
आणि त्या क्षणी...
फोन वाजतो…
पलीकडून आवाज येत नाही…
फक्त दोन थंडगार शब्द...
“Seven days.”
बस…
तेवढाच वेळ उरलेला असतो....
पत्रकार रॅचेल केलर सुरुवातीला याकडे एक अफवा, एक शहरी दंतकथा म्हणून पाहते…
तिच्यासाठी ती फक्त एक स्टोरी असते.पण दिवस सरकू लागतात…
आणि मृत्यू हळूहळू तिच्या जवळ येऊ लागतो… आरशात दिसणाऱ्या विकृत छटा…
पाण्याचे आवाज…
स्वप्नात येणाऱ्या दृश्यांतून वाहणारे केस…
रॅचेलला उमगते...
ती फक्त एका बातमीचा पाठलाग करत नाहीये…
ती स्वतःच्या मृत्यू मागे पळतेय…
तिने केलेल्या तपासाची प्रत्येक पायरी तिला एका नावाजवळ घेऊन जाते…
समारा.
एक छोटी मुलगी… पण ती साधे सुधे भूत नाही…
ती आहे दुर्लक्षित वेदनांचा, दाबलेल्या रागाचा,
आणि न ऐकलेल्या किंकाळ्यांचा...
जगाला लागलेला जिवंत शाप....
पाण्यासारखी शांत… पण आतून वादळासारखी उग्र…
जिवंतपणी तिला एका विहिरीत ढकलले गेले...
अंधार…
थंड पाणी…
आणि पाण्यात बुडताना हळूहळू संपणारा श्वास…
शरीर संपले...
पण समारा मरण पावली नाही…..
ती एका टेपमध्ये कैद झाली... त्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये…
त्यातील प्रत्येक चमकणाऱ्या प्रतिमेत… तिचा श्वास अडकलेला आहे...
रॅचेलला वाटते की विहिरीतले अवशेष सापडले,
समाराला शांती मिळाली, की सगळे संपेल…
पण इथेच सिनेमा खरी दहशत दाखवतो…
कारण हा शाप कधीच संपत नाही...
तो फक्त
पुढे ढकलता येतो.
तुमचे आयुष्य वाचवायचे असेल तर तुम्हाला ही टेप
आणखी कोणाला तरी दाखवावी लागते.mm
म्हणजेच... तुमच्या सुटकेसाठी दुसऱ्याचा मृत्यू निश्चित....
यातच The Ring चा सर्वात भयानक अर्थ दडलेला आहे…
हा सिनेमा तुम्हाला घाबरवत नाही… तो तुम्हाला दोषी बनवतो...
शेवटी लक्षात येते... काही जखमा कधीच भरत नाहीत…
त्या दूरपर्यंत पसरत जातात....
ती विहीर…
तो शांत चेहरा…
ते डोळे…
स्क्रीन बंद झाल्यावरही ते तुमच्याकडे पाहतच राहतात…
कारण...
The Ring संपतो तेव्हा सिनेमा संपत नाही…
तो तेव्हाच सुरू होतो...
तुमच्या मनात.
