Haunted College
लेखन : अभिषेक शेलार
#MBKG_Summer
पहिल्या भागाची लिंक :
HAUNTED COLLEGE (Part 2)
Written By : Abhishek Shelar
Continue From Part 1.......
तो आवाज त्याच वर्गातून येत होता, ज्या वर्गाच्या बाजूला Lights चे switch होते. वारा खूप सुसाट वाहत होता व त्यामुळेच दार वाजून तसा आवाज येत असावा असे अमितला वाटले, म्हणून त्याने दरवाजा बाहेरच्या बाजूने घट्ट पकडून ठेवला. थोड्यावेळाने वारा शांत झाला तसा तो आवाजदेखील थांबला. अमितने सुद्धा जास्त वेळ न दवडता पटापट Floors वरील सर्व Lights off केल्या, तसा पूर्ण Floor वर अंधार पसरला. Lights Off करून झाल्यावर तो राहुलला बोलावण्यास निघाला, तोच समोरून राहुलचा आवाज आला, “अमित !! अरे चल लवकर, खाली सर्वजण आपली वाट बघत असतील.” अंधार असल्याने अमितला समोरचे काही दिसत नव्हते. “हो, अरे हा बघ आलोच”, असे म्हणत अमितने त्याच्या खिशातून मोबाईल काढला व त्याची टॉर्च चालू करून समोरच्या दिशेला पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण समोर कोणीच नव्हते.
“राहुल !! अरे आवाज देऊन कुठे गायब झालास?” मोबाईलची टॉर्च इतरत्र फिरवतच अमित बोलला. परंतु त्याला काहीच प्रतिसाद आला नाही. “हा सर्व काय प्रकार आहे?? राहुलने मला खरच आवाज दिलेला की मलाच भास झाला?? भासच असेल बहुतेक” अमित स्वतःशीच बोलत होता. तो राहुलला शोधण्यास पुढे जाणार इतक्यात, मागून त्याला पुन्हा आवाज आला, “अमितssss मी इथे आहे.... या वर्गात.” आता मात्र अमितचे डोके भांबावले, भीतीने हातपाय सुन्न पडले, कारण तो आवाज त्याच वर्गातून आला जिथून अमित नुकताच Lights Off करून आलेला.
अमितला त्याच्यासोबत काहीतरी विचित्र घडतंय याची जाणीव झाली होती, परंतु न राहून तो त्या वर्गाजवळ गेला आणि त्याने विचारले, “राहुल, तू आत कसा काय गेलास? तू तर त्या बाजूला Lights Off करण्यासाठी गेलेलास ना?? “ परंतु आतून काहीच प्रतिसाद आला नाही.
वातावरणात एक प्रकारची गहनता निर्माण झाली होती.... हवेतील गारवा वाढला होता, इतक्या थंड वातावरणात देखील अमितला दरदरून घाम फुटला होता.... तो कुबट वासदेखील आता अधिकच तीव्र झाला होता.... एखाद्या सडलेल्या प्रेतासारखा....
अमितने घाबरून पुन्हा Lights On करण्याचा प्रयत्न केला पण काय आश्चर्य..... सर्व Buttons दाबूनसुद्धा एकही Light चालू होत नव्हती. इतक्यात पुन्हा त्या वर्गातून कोणीतरी दार ठोकू लागले, यावेळी ते दार आतून जोरात खेचले जात होते. “कोण आहे आत?? राहुल, are you there?? “ घाबरलेल्या आवाजातच अमित विचारत होता. तो दरवाजा पकडणार तोच मागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अमितने घाबरतच मागे वळून पाहिले आणि तो हादरलाच.... मागे दुसरे तिसरे कोणी नसून राहुल उभा होता. “अमित !! काय झाले, तू बरायस ना?? इतका घाबरलेला का दिसतोयस?? आणि एवढा घाम का आलाय तुला?? “ राहुल विचारू लागला.
“अरे तू मघाशी या वर्गातून आवाज दिलेलास ना?? “ घाबरलेल्या आवाजातच अमितने त्याला विचारले.
“वेडा आहेस का अमित तू?? तुझ्यासमोर तर मी Lights Off करायला गेलेलो ना?? मी कसा काय असेन आणि ते सुद्धा या बंद वर्गात?? राहुल प्रश्नार्थक नजरेनेच बोलत होता.
“मग तू इतका वेळ कुठे होतास?? “ न राहूनच अमितने विचारले. “अरे मला घरून कॉल आलेला आणि इथे नेटवर्क भेटत नव्हते म्हणून मी गच्चीवर गेलो होतो” राहुल सहजच बोलत होता.
राहुलचे हे उत्तर ऐकून अमितच्या छातीत चर्रर्रsss झाले. “जर तू गच्चीवर होतास, तर मग मघाशी मला अंधारातुन आवाज कोणी दिला होता?? आणि या वर्गातून.....?? Ohh My God !! राहुल तू बरोबर बोलत होतास, या Floor वर कोणतीतरी वाईट शक्ती आहे. चल यार आपल्याला इथून लगेच निघायला हवे.” अमित राहुलला समजावत होता.
अमितचे बोलणे ऐकून राहुलला कळून चुकले की त्याच्यासोबत काय घडले आहे. आता दोघेही मनातून पूर्णत: हादरले होते. क्षणाचाही विलंब न करता ते तिथून निघणार, इतक्यात त्या वर्गाच्या दारावर पुन्हा आतून कोणीतरी जोरात थाप मारली, आणि कानठळ्या बसतील इतक्या जोरात कणकर्कश किंकाळी ऐकू आली.
“राहुल, Don’t Stop !! चल लवकर इथून” राहुलचा हात खेचतच अमित त्याला म्हणाला. अंगातील सारे बळ एकवटून ते दोघेही पळू लागले. राहुलच्या मोबाईलची टॉर्च पाहून अमितच्या लक्षात आले की त्याचा मोबाईल तो त्या वर्गाजवळच विसरला आहे, पण आता मागे जाण्याची हिंमत कोण करेल.
ते दोघेही भरभर जिने उतरत होते, परंतु त्यांनी पहिल्या Floor पासून Lights बंद केल्याने खालच्या सर्व Floors वर अंधार होता, त्यामुळे वातावरण अजूनच भयाण वाटत होते. कसेबसे ते Ground Floor वर पोहोचले. खाली सर्वजण त्यांचीच वाट पाहत उभे होते. त्यांचे घाबरलेले आणि घामाघूम झालेले चेहरे पाहताच ग्रुपमधील सर्व त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करू लागले.
ते पाहताच शिवमने सर्वांना शांत करत, सर्वप्रथम त्या दोघांना पाणी दिले वर बाजूला असलेल्या एका कठडयावर बसण्यास सांगितले.
ते दोघे थोडे Relax वाटल्यानंतर शिवमने त्यांना विचारले, “काय झालं?? तुम्ही एवढे घाबरलेले का दिसत आहात??” “शिवम, आपल्या कॉलेजच्या 5 व्या मजल्यावर भूत आहे.” अमितचे हे उत्तर ऐकून ग्रुपमधील बरेच जण हसू लागले. शिवमने त्या सर्वांना शांत करत अमितला म्हटले, “अरे भूत वैगेरे अस काहीही नसत, आपल्या मनाचे खेळ असतात सर्व. तुम्ही तिथे कोणाला पाहिलेय का?” त्यावर अमितने नकारार्थी मान हलवली. “शिवम तो बोलतोय ते खरंच आहे, तुम्हांला ती किंकाळी नाही ऐकू आली का?” राहुल शिवमला म्हणाला. “कोणती किंकाळी?” कशाबद्दल बोलताय तुम्ही?? नीट सांगा काय घडलंय तुमच्यासोबत?” शिवमने विचारले. तसा त्यांनी घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला.
त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर शिवम त्यांना म्हणाला, “ठीक आहे !! आपण एक काम करू, आपण सर्व आताच 5व्या मजल्यावर जाऊ आणि तुझा मोबाईलसुद्धा घेऊन येऊ. म्हणजे तिथे खरंच कोणी आहे का?? हे देखील कळेल आपल्याला.”
तसे ते सर्व 5 व्या मजल्याकडे जाण्यास निघाले. तिथे पोहोचताच सर्वप्रथम अमितने त्यांना त्या वर्गाजवळ नेले, जिथे त्या दोघांना तो भयानक अनुभव आला होता. त्या वर्गासमोरच त्याला त्याचा मोबाईल जमिनीवर उलटा पडलेला दिसला. त्याने मोबाईल उचलून स्क्रीनच्या दिशेने केला आणि पाहतो तर काय.... मोबाईलच्या स्क्रीनला पूर्णत: तडे गेले होते. ते पाहून अमित अजूनच हादरला आणि म्हणाला, “हे कसे शक्य आहे?” त्यावर शिवमने त्याला विचारले, “म्हणजे? तुझा मोबाईल तुझ्या हातून पडला नव्हता का?”
“नाही !! कारण जेव्हा राहुलने माझ्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा मी हादरलेलो व भीतीने खाली बसलो. पण त्यावेळी मोबाईल माझ्या हातातच होता, आणि जमिनीवर आपटला नव्हताच. शिवम, हे नक्कीच त्या वाईट शक्तीचे काम आहे, आणि हाच तो वर्ग आहे ज्यात ती शक्ती कैद आहे.” अमित त्या वर्गाकडे बोट करत म्हणाला.
त्यावर शिवम त्याला म्हणाला, “अमित, अरे तुम्हांला भास झाले असतील. जर इथे खरंच कोणी असते, तर आता काहीतरी आपल्याला जाणवलेच असते ना?” शिवमचे वाक्य मध्येच कापत अमित त्याला बोलला “शिवम !! Try to understand यार, तू हव तर राहुलला विचार, अरे आम्ही खरंच सांगतोय या Floor वर भूत आहे. माझाही आधी राहुलच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता, पण आता मी स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे.
“ठीक आहे !! असंच असेल तर मलाही पाहायचं आहे नक्की कोण आहे या Floor वर. उद्या रात्री मी एकटा या floor वर आपल्या Project चे काम करेन” असे बोलून शिवम एकप्रकारे challenge च घेतो.
“No शिवम!! का उगाच विषाची परीक्षा घेतोयस? आपण पुन्हा या Floor वर रात्री न आलेलेच बरे” अमित त्याला समजावतो. परंतु खूप समजावल्यानंतरही शिवम कोणाचे काहीच ऐकत नाही व ते सर्व घरी जाण्यास निघतात.
खाली जाताच सर्वजण आपापल्या Bikes काढतात. तेवढ्यात शिवमचे लक्ष त्यांनी गच्चीवरून सोडलेल्या त्या मोठ्या Flex कडे जाते. त्या Flex कडे पाहतच तो अमितला म्हणतो, “छान झालेय ना यार आपले हे Flex.” अमितदेखील त्या Flex कडे पाहून म्हणतो, “हो रे खरंच.” त्या Flex कडे पाहता पाहताच त्याची नजर Flex च्या बाजूला जाते आणि त्याच्या छातीत धडकी भरते. “Ohh Shit !! Guys त्या Flex च्या बाजूला बघा.” अमित ओरडतच सर्वांना सांगतो, त्यावर सर्व तेथे पाहतात आणि सर्वांनाच धक्का बसतो. त्यांनी बंद करून आलेल्या कॉलेजच्या सर्व Floors वरील Lights पुन्हा चालू झाल्या होत्या.
“शिवम, आता तरी तुझा आमच्यावर विश्वास बसला असेल ना??” अमित शिवमला म्हणतो. “अरे अमित, तुला आता सर्वच गोष्टींमध्ये भूत दिसतेय. Security असतील रे ते, त्यांच्या Round साठी गेले असतील.’’ असे म्हणून शिवमने पुन्हा त्याचे म्हणणे डावलले व ते सर्व आपापल्या घरी निघून गेले.
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे रात्री शिवम त्याच्या प्रोजेक्टचे काम घेऊन 5 व्या मजल्यावरील त्याच Classroom च्या बाजूला एक Desk घेऊन बसला. रात्रीचे 10:30 वाजून गेले होते, शिवमने फक्त त्या वर्गाबाहेरील एकच Light चालू केली होती, बाकी संपूर्ण Floor वर अंधार पसरला होता. शिवम मोबाईलवर Songs लावून त्याचे Drawing चे काम पूर्ण करत होता. काहीच वेळातच त्याचे एक Drawing पूर्ण करून झाले व त्याने दुसरे Drawing काढण्यास सुरुवात केली. 11.30 वाजून गेले होते, इतक्यात त्याच्या मोबाईलची बॅटरी ड्रेन झाली व तो Switch off झाला. “अरे यार !! ह्यालापण आताच बंद व्हायचे होते?” असे म्हणत शिवमने वैतागतच मोबाईल चार्जिंगला लावला.
वातावरणात पुन्हा एकदा भयाण शांतता पसरली. अचानक हवेतील गारवा वाढला व पुन्हा तोच कुबट वास येऊ लागला, एखादी व्यक्ती मरून तिचे प्रेत कुजावे तसा......
क्रमश : (उर्वरित कथा अंतिम भागात)
लेखन : अभिषेक शेलार