शेवटचा प्याला
सुरेशला नुकतीच एक मिटिंग संपवून त्याला खूप लांबचा प्रवास करायचा होता...चार महिन्यापासून तो ह्या प्रोजेक्ट्सची तयारी करत होता....आणि त्याला यश सुद्धा आले होते...एक मोठ्या परदेशी कंपनीने त्याच्या कम्पनी बरोबर डील केली होती....करोडोचा प्रोजेक्ट् होता....त्याच आनंदात तो होता.....सुरेश तसा एकलकोंडा होता....त्याला जास्त गर्दी सहन होत नव्हती...त्यामुळे फक्त तो फक्त कामापूरती माणसे जोडून असायचा.....त्या दिवशी थंडी जरा जास्तच होती.....मस्त हळू आवाजात चालू असलेली गाणी एक वेगळंच वातावरण तयार करीत होती....त्याचा ड्रिंक साठी मूड बनला....आनंद साजरा करायला कारण पण होते....आडवळणी घाट क्रॉस करताच एक झगमगणारा बोर्ड त्याला दिसला आणि त्याच्या गाडीची चाके आपोआप त्या बोर्डाकडे वळली..रात्र झाली होती हायवेवर एक बार त्याला दिसत होता...त्या बार जवळ त्याने गाडी थांबवली.....त्याने गाडी पार्क केली...आणि अंगावरचा कोट काढून गाडीत फेकला...आत जाऊन तो दारू पित बसला ....डोक्यावरचे टेन्शन गेल्याने त्याने जरा जास्तच घेतली होती....मस्त जेवून...त्याने बिल भागवले...तो जरा शुद्ध हरवून बसला होता...त्याचे पाय जरा वेडेवाकडे पडत होते.....वाटेत पिण्यासाठी काही बाटल्या घेतल्या.....सरळ रस्ता होता.....रात्र झाली त्यामुळे वर्दळ जरा कमीच होती.....सुरेशच्या डोक्यात दारू चढली होती.....गाडीमधील गाण्याचा आवाजही चढला होता....स्पीड वाढला होता....मधेच थांबलेलं कुत्र गाडीच्या धडकेने बाजूला पडलं आणि विव्हळत बाजूला गेलं.......पण गाडीतील गाण्याच्या मोठ्या आवाजने सुरेशला झिंग चढली होती....गारठा वाढला होता....गाडीचे हेडलाईट अचानक मंद झाले......पण सुरेशला काही फरक पडत नव्हता बाटलीला लागलेले त्याचे ओठ अगदी मान वर करून मदिरापान करीत होते.....आणखी एक बाटली संपली....त्यांने गाडीची खिडकी उघडून ती बाटली रस्त्यावर फेकली......तसा समोर बघून तो गोंधळला....एक बाई आणि तिची दोन मुले मघाशी तर पास झाली होती....नशेत असला तरी त्याने त्या बाईला ओळखले होते......तीच साडी...तीच दोन मुले....काही काळ त्याच्या मनात तो विचार आला"छे....छे....असल्या काही गोष्टी नसतात" पण त्याच्या मनात उत्सुकता लागली...ती बाई तर चांगल्या घरातली वाटत होती....अगदी सुंदर दिसत होती...पण ह्या वेळी ह्या सुनसान रस्त्यावर तिची अपेक्षा नव्हती..."खरोखर मदत पाहिजे असेल तर??".....सुरेशने जोराचा ब्रेक दाबला तशी गाडी जागेवर थांबली..त्याने आपले ड्रायव्हर उघडले...त्यात त्याची लायसनवाली गन असल्याची खात्री केली....आणि गाडी मागे घेऊ लागला...गाडी थांबली....त्याने काच खाली घेतली...नशेच्या डोळ्यांनी तो तिच्याकडे बघत होता.....सुरेशचे लक्ष तिच्याकडे होतं... एकदम सुंदर सुशिक्षित बाई वाटत होती......तिच्या चेहऱ्यावरचे तेज सुरेशला आकर्षित करत होत....."जरा पुढे सोडाल का??माझी गाडी खराब झाली आहे"तिचा तो मधुर आवाज सुरेशच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलू लागलं....त्याने सीट वर ठेवलेली दारूची बाटली पटकन लपवली.....तशी ती सूंदर स्त्री त्याच्या बाजूच्या सीट वर बसली.....मुले पटकन मागे जाऊन बसली......तिचा मुलगा 6 वर्षाचा आणि मुलगी 3 वर्षाची होती.....मागे बसून ती गोंधळ घालू लागली......सुरेश मनोमन खुश झाला...गाडी थांबताच त्या बाईने आपल्या मुलांना मागच्या सीट वर बसवलं आणि आपण मात्र सुरेश जवळ पुढच्या सीट वर येऊन बसली...सुरेश तिच्याकडे बघतच राहिला...तिने गोंधळ घालणाऱ्या मुलांकडे डोळे मोठे करून बघितलं....तशी ती गप्प बसलीथोडं पुढं गेल्यावर सुरेश म्हणाला...."बोला मॅडम कुठे सोडू तुम्हाला?" त्या बाईने बोलायला सुरुवात केली "माझी गाडी खराब झालीय ......मला पुढच्या गावी सोडा......plz....मधुर आवाजातील ती विनवणी सुरेशला खूप भावली....तसं त्याने धाडस केलं....दारूच्या नशेमुळे त्याची जीभ जरा जड झाली होती.....मनोमन "जरा कमीच बोलू" अस ठरवून त्याने खिडकी बाहेर बघून...प्रश्न केला"तुमचं नाव काय??"समोरून एक गाडी अगदी त्यांना घासून गेली.....सुरेशचे डोळे जड झाले होते.....तो चुकीच्या लेन मध्ये गेला होता.....समोरची गाडी हॉर्न वाजवत निघून गेली""अहो अहो समोर बघा....काय करताय?"बाईच्या धीर गंभीर आवाजाने तो भानावर आला..." माझं नाव अंजली ..ही माझी दोन मुले....अंजली मुलांच्या कडे बघून म्हणाली ..."मुलांनो hi करा अंकल ला" मुले सुद्धा एक सुरात बोलली " hi अंकल"सुरेश हसला अंजली चे रूप बघून त्यांचे धाडस वाढले...त्याची पण पत्नी सुंदर होती....पण अंजली जरा वेगळीच होतीतो अंजलीला म्हणला " बर आता मुलांच्या आई बद्दल जरा सांगा..राहता कुठे..??अंजली थोड्या गंभीर आवाजात बोलली " मी इथेच राहते..ह्या रस्त्यावर"सुरेश जरा तोंड वाकडं करून म्हणाला..काय??ह्या रस्त्यावर???दिसायला तर चांगल्या घरातल्या दिसता.....अंजली एकदम स्तब्ध पणे बोलू लागली तिच्या बोलण्यातील नाजूकतेने आता गंभीर स्वरूप घेतलं...तिचा आवाज जड होऊ लागला....."हो मी इथेच राहते ह्या रस्त्यावर...4 वर्षांपासून"सुरेश गोंधळला होता.....ही अस विचित्र का बोलत आहे हे कोडं त्याला पडलं होतं.....त्याचं लक्ष रस्त्यावर नव्हतंच.....एकटक तो अंजलीचे बोलणे ऐकत होता..."मी माझी मुले आणि नवरा एक लग्न उरकून घरी चाललो होतो.....तितक्यात तुमच्या सारख्या एका बेवड्याने एका बेवड्या ट्रक ड्राइव्हर ने दारूच्या नशेत गाडी चालवून आम्हाला धडक दिली ..माझा नवरा वाचला पण आम्ही तिघे......माझी मुलं गेली...मी पण....तू पण त्यातलाच आहेस...दारुडा...तुला सोडणार नाही..तुला मरावं लागेलसुरेशला आता काही सुचेना त्याला प्रचंड राग आला.."ए xxx साली भीती कुणाला दाखवते...उतर.. उतर खाली......"अंजली पुढे बोट दाखवू लागली."तो खांब दिसतोय तिथं चिरडलो गेलो होतो आम्हीजसा जसा तो खांब जवळ येऊ लागला तस ती मागची मुलं रडू लागली...ओरडू लागली......कुबट वास गाडीत सुटला....अंजलीच्या डोक्यातून अचानकपणे रक्त वाहू लागल..तिचा हात वाकडा होऊ लागला.....हातातले हाड खाडकन मोडून बाहेर आलं.....एखाद्या डोक्याचा चेंदामेंदा व्हावा तसं डोकं तीच होऊ लागलं..तिचं रक्त सुरेश च्या पायाला लागत होतं.....बाजूला ठेवलेली दारूची बाटली खाडकन फुटली....त्या बाटलीतली दारू उडाली.....काचा पूर्ण गाडीत पसरल्या.....एक काच उडून सुरेशच्या गळ्यात घुसली.....तो वेदनेने तळमळत होता....त्याने मागे बघितलं तर मुलं सुद्धा अस्थाव्यस्त पडली..... होती...रक्ताच्या थारोळ्यानी त्याची व्हाईट सीट लाल भडक झाली होती...गाडीत तिघांच्या प्रचंड किंचाळ्या ऐकु येत होत्या...सुरेश ला आता सहन होत नव्हतं...त्याने घाबरून गाडी साईड ला घेण्याचा प्रयत्न केला पण समोरून येणाऱ्या ट्रक ची त्याला धडक बसली आणि प्रचंड मोठा अपघात झाला...तो उडून बाहेर पडला ...डोक्याला मार लागल्या मुळे रक्त येत होतं तो तडफडू लागलासमोर त्याला अंजली आणि तिची मुलं दिसतं होती..ती मुलं नाचत हासत म्हणत होती.."अंकल खुळा,अंकल खुळा...मम्मीने अंकल ला फसवलं फसवलंआणि अंजली सुरेशकडे बघत त्या गर्द झाडीत दिशेनाशी झाली......सुरेशने डोळे उघडले......तो एका मोठ्या दवाखान्यात होता....बाजूला त्याची बायको आणि मुलं बसली होती....त्याला शुद्धीवर आलेलं पाहून त्याच्या बायकोचे अश्रू अनावर झाले.......महिना झाला होता सुरेश त्या अपघातातून बरा झाला होता......पण अजूनही त्याच्या डोळ्यासमोर रक्ताळलेली अंजली आणि तिची मुले दिसत होती......त्याने 4 वर्षांपूर्वीचे पेपर चाळले......त्यात खरोखर त्या अपघाताची माहिती होती......पेपरमध्ये अंजली आणि तिचा मुलांचा फोटो बघून तो सुन्न झाला.....तो तडक अंजलीच्या पतीच्या घरी गेला......अंजलीवर त्याचे खूप प्रेम होते.....तिच्या निधनाने तो पार खचून गेला होता.......सुरेशने काहीसं नाटकं रचून त्याला आपल्या कंपनी मध्ये चांगल्या पगाराची नोकरी दिली......काही दिवसांनी त्याने आपल्या सगळ्या स्टाफ ची मिटिंग बोलावली......तो स्टाफ समोर उभा राहिला"तर कामाचा नाहीय तर विषय जरा सामाजिक आहे......रोड सेफ्टीच्या सरकारी मोहिमेत आपली कंपनी भाग घेत आहे.....मी काही करोड रुपये खर्च करीत आहे.....त्यात तुमचेही सहकार्य अपेक्षित आहे.....त्यामुळे फटाफट कामाला लागा....एक प्रोजेक्ट बनवा..आणि तुम्हीही कुणी ड्रिंक करून ड्राइव्ह करत असाल तर तो तुमचाही शेवटचा प्याला ठरू शकतो"सुरेशच्या अश्या बोलण्याची कुणी कल्पनाही केली नव्हती...पण सुरेशच्या चेहऱ्यावर समाधान होतं लेखन----- शशांक सुर्वे
शेवटचा प्याला
सुरेशला नुकतीच एक मिटिंग संपवून त्याला खूप लांबचा प्रवास करायचा होता...चार महिन्यापासून तो ह्या प्रोजेक्ट्सची तयारी करत होता....आणि त्याला यश सुद्धा आले होते...एक मोठ्या परदेशी कंपनीने त्याच्या कम्पनी बरोबर डील केली होती....करोडोचा प्रोजेक्ट् होता....त्याच आनंदात तो होता.....सुरेश तसा एकलकोंडा होता....त्याला जास्त गर्दी सहन होत नव्हती...त्यामुळे फक्त तो फक्त कामापूरती माणसे जोडून असायचा.....त्या दिवशी थंडी जरा जास्तच होती.....मस्त हळू आवाजात चालू असलेली गाणी एक वेगळंच वातावरण तयार करीत होती....त्याचा ड्रिंक साठी मूड बनला....आनंद साजरा करायला कारण पण होते....आडवळणी घाट क्रॉस करताच एक झगमगणारा बोर्ड त्याला दिसला आणि त्याच्या गाडीची चाके आपोआप त्या बोर्डाकडे वळली..रात्र झाली होती हायवेवर एक बार त्याला दिसत होता...त्या बार जवळ त्याने गाडी थांबवली.....त्याने गाडी पार्क केली...आणि अंगावरचा कोट काढून गाडीत फेकला...आत जाऊन तो दारू पित बसला ....डोक्यावरचे टेन्शन गेल्याने त्याने जरा जास्तच घेतली होती....मस्त जेवून...त्याने बिल भागवले...तो जरा शुद्ध हरवून बसला होता...त्याचे पाय जरा वेडेवाकडे पडत होते.....वाटेत पिण्यासाठी काही बाटल्या घेतल्या.....सरळ रस्ता होता.....रात्र झाली त्यामुळे वर्दळ जरा कमीच होती.....सुरेशच्या डोक्यात दारू चढली होती.....गाडीमधील गाण्याचा आवाजही चढला होता....स्पीड वाढला होता....मधेच थांबलेलं कुत्र गाडीच्या धडकेने बाजूला पडलं आणि विव्हळत बाजूला गेलं.......पण गाडीतील गाण्याच्या मोठ्या आवाजने सुरेशला झिंग चढली होती....गारठा वाढला होता....गाडीचे हेडलाईट अचानक मंद झाले......पण सुरेशला काही फरक पडत नव्हता बाटलीला लागलेले त्याचे ओठ अगदी मान वर करून मदिरापान करीत होते.....आणखी एक बाटली संपली....त्यांने गाडीची खिडकी उघडून ती बाटली रस्त्यावर फेकली......तसा समोर बघून तो गोंधळला....एक बाई आणि तिची दोन मुले मघाशी तर पास झाली होती....नशेत असला तरी त्याने त्या बाईला ओळखले होते......तीच साडी...तीच दोन मुले....काही काळ त्याच्या मनात तो विचार आला
"छे....छे....असल्या काही गोष्टी नसतात"
पण त्याच्या मनात उत्सुकता लागली...ती बाई तर चांगल्या घरातली वाटत होती....अगदी सुंदर दिसत होती...पण ह्या वेळी ह्या सुनसान रस्त्यावर तिची अपेक्षा नव्हती..."खरोखर मदत पाहिजे असेल तर??".....सुरेशने जोराचा ब्रेक दाबला तशी गाडी जागेवर थांबली..त्याने आपले ड्रायव्हर उघडले...त्यात त्याची लायसनवाली गन असल्याची खात्री केली....आणि गाडी मागे घेऊ लागला...गाडी थांबली....त्याने काच खाली घेतली...नशेच्या डोळ्यांनी तो तिच्याकडे बघत होता.....सुरेशचे लक्ष तिच्याकडे होतं... एकदम सुंदर सुशिक्षित बाई वाटत होती......तिच्या चेहऱ्यावरचे तेज सुरेशला आकर्षित करत होत.....
"जरा पुढे सोडाल का??माझी गाडी खराब झाली आहे"
तिचा तो मधुर आवाज सुरेशच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलू लागलं....त्याने सीट वर ठेवलेली दारूची बाटली पटकन लपवली.....तशी ती सूंदर स्त्री त्याच्या बाजूच्या सीट वर बसली.....मुले पटकन मागे जाऊन बसली......तिचा मुलगा 6 वर्षाचा आणि मुलगी 3 वर्षाची होती.....मागे बसून ती गोंधळ घालू लागली......सुरेश मनोमन खुश झाला...
गाडी थांबताच त्या बाईने आपल्या मुलांना मागच्या सीट वर बसवलं आणि आपण मात्र सुरेश जवळ पुढच्या सीट वर येऊन बसली...सुरेश तिच्याकडे बघतच राहिला...तिने गोंधळ घालणाऱ्या मुलांकडे डोळे मोठे करून बघितलं....तशी ती गप्प बसली
थोडं पुढं गेल्यावर सुरेश म्हणाला...."बोला मॅडम कुठे सोडू तुम्हाला?" त्या बाईने बोलायला सुरुवात केली
"माझी गाडी खराब झालीय ......मला पुढच्या गावी सोडा......plz....
मधुर आवाजातील ती विनवणी सुरेशला खूप भावली....तसं त्याने धाडस केलं....दारूच्या नशेमुळे त्याची जीभ जरा जड झाली होती.....मनोमन "जरा कमीच बोलू" अस ठरवून त्याने खिडकी बाहेर बघून...प्रश्न केला
"तुमचं नाव काय??"
समोरून एक गाडी अगदी त्यांना घासून गेली.....सुरेशचे डोळे जड झाले होते.....तो चुकीच्या लेन मध्ये गेला होता.....समोरची गाडी हॉर्न वाजवत निघून गेली"
"अहो अहो समोर बघा....काय करताय?"
बाईच्या धीर गंभीर आवाजाने तो भानावर आला...
" माझं नाव अंजली ..ही माझी दोन मुले....अंजली मुलांच्या कडे बघून म्हणाली ..."मुलांनो hi करा अंकल ला"
मुले सुद्धा एक सुरात बोलली
" hi अंकल"
सुरेश हसला अंजली चे रूप बघून त्यांचे धाडस वाढले...त्याची पण पत्नी सुंदर होती....पण अंजली जरा वेगळीच होती
तो अंजलीला म्हणला " बर आता मुलांच्या आई बद्दल जरा सांगा..राहता कुठे..??
अंजली थोड्या गंभीर आवाजात बोलली
" मी इथेच राहते..ह्या रस्त्यावर"
सुरेश जरा तोंड वाकडं करून म्हणाला..
काय??ह्या रस्त्यावर???दिसायला तर चांगल्या घरातल्या दिसता.....
अंजली एकदम स्तब्ध पणे बोलू लागली तिच्या बोलण्यातील नाजूकतेने आता गंभीर स्वरूप घेतलं...तिचा आवाज जड होऊ लागला.....
"हो मी इथेच राहते ह्या रस्त्यावर...4 वर्षांपासून"
सुरेश गोंधळला होता.....ही अस विचित्र का बोलत आहे हे कोडं त्याला पडलं होतं.....त्याचं लक्ष रस्त्यावर नव्हतंच.....एकटक तो अंजलीचे बोलणे ऐकत होता...
"मी माझी मुले आणि नवरा एक लग्न उरकून घरी चाललो होतो.....तितक्यात तुमच्या सारख्या एका बेवड्याने एका बेवड्या ट्रक ड्राइव्हर ने दारूच्या नशेत गाडी चालवून आम्हाला धडक दिली ..माझा नवरा वाचला पण आम्ही तिघे......माझी मुलं गेली...मी पण....तू पण त्यातलाच आहेस...दारुडा...तुला सोडणार नाही..तुला मरावं लागेल
सुरेशला आता काही सुचेना त्याला प्रचंड राग आला..
"ए xxx साली भीती कुणाला दाखवते...उतर.. उतर खाली......"
अंजली पुढे बोट दाखवू लागली."तो खांब दिसतोय तिथं चिरडलो गेलो होतो आम्ही
जसा जसा तो खांब जवळ येऊ लागला तस ती मागची मुलं रडू लागली...ओरडू लागली......कुबट वास गाडीत सुटला....अंजलीच्या डोक्यातून अचानकपणे रक्त वाहू लागल..तिचा हात वाकडा होऊ लागला.....हातातले हाड खाडकन मोडून बाहेर आलं.....एखाद्या डोक्याचा चेंदामेंदा व्हावा तसं डोकं तीच होऊ लागलं..तिचं रक्त सुरेश च्या पायाला लागत होतं.....बाजूला ठेवलेली दारूची बाटली खाडकन फुटली....त्या बाटलीतली दारू उडाली.....काचा पूर्ण गाडीत पसरल्या.....एक काच उडून सुरेशच्या गळ्यात घुसली.....तो वेदनेने तळमळत होता....त्याने मागे बघितलं तर मुलं सुद्धा अस्थाव्यस्त पडली..... होती...रक्ताच्या थारोळ्यानी त्याची व्हाईट सीट लाल भडक झाली होती...गाडीत तिघांच्या प्रचंड किंचाळ्या ऐकु येत होत्या...सुरेश ला आता सहन होत नव्हतं...त्याने घाबरून गाडी साईड ला घेण्याचा प्रयत्न केला पण समोरून येणाऱ्या ट्रक ची त्याला धडक बसली आणि प्रचंड मोठा अपघात झाला...तो उडून बाहेर पडला ...डोक्याला मार लागल्या मुळे रक्त येत होतं तो तडफडू लागला
समोर त्याला अंजली आणि तिची मुलं दिसतं होती..ती मुलं नाचत हासत म्हणत होती.."अंकल खुळा,अंकल खुळा...मम्मीने अंकल ला फसवलं फसवलं
आणि अंजली सुरेशकडे बघत त्या गर्द झाडीत दिशेनाशी झाली......
सुरेशने डोळे उघडले......तो एका मोठ्या दवाखान्यात होता....बाजूला त्याची बायको आणि मुलं बसली होती....त्याला शुद्धीवर आलेलं पाहून त्याच्या बायकोचे अश्रू अनावर झाले.......महिना झाला होता सुरेश त्या अपघातातून बरा झाला होता......पण अजूनही त्याच्या डोळ्यासमोर रक्ताळलेली अंजली आणि तिची मुले दिसत होती......त्याने 4 वर्षांपूर्वीचे पेपर चाळले......त्यात खरोखर त्या अपघाताची माहिती होती......पेपरमध्ये अंजली आणि तिचा मुलांचा फोटो बघून तो सुन्न झाला.....तो तडक अंजलीच्या पतीच्या घरी गेला......अंजलीवर त्याचे खूप प्रेम होते.....तिच्या निधनाने तो पार खचून गेला होता.......सुरेशने काहीसं नाटकं रचून त्याला आपल्या कंपनी मध्ये चांगल्या पगाराची नोकरी दिली......काही दिवसांनी त्याने आपल्या सगळ्या स्टाफ ची मिटिंग बोलावली......तो स्टाफ समोर उभा राहिला
"तर कामाचा नाहीय तर विषय जरा सामाजिक आहे......रोड सेफ्टीच्या सरकारी मोहिमेत आपली कंपनी भाग घेत आहे.....मी काही करोड रुपये खर्च करीत आहे.....त्यात तुमचेही सहकार्य अपेक्षित आहे.....त्यामुळे फटाफट कामाला लागा....एक प्रोजेक्ट बनवा..आणि तुम्हीही कुणी ड्रिंक करून ड्राइव्ह करत असाल तर तो तुमचाही शेवटचा प्याला ठरू शकतो"
सुरेशच्या अश्या बोलण्याची कुणी कल्पनाही केली नव्हती...पण सुरेशच्या चेहऱ्यावर समाधान होतं
लेखन----- शशांक सुर्वे