कावळा
पहिला दिवस-
तो एक आभाळ भरून आलेला दिवस होता.अजून दुपार बरीच असली तरी आभाळा मुळे चोहोबाजूंनी अंधारुन आले होते.वारंही जरा जोरात सुटले होते.आता केव्हाही पावसाला सुरुवात होईल अशी लक्षणे दिसत होती.
अशा वेळी त्या अनाकलनीय गोष्टीने मात्र माझे लक्ष वेधून घेतले होते.
माझ्या बंगल्याशेजारी पानसे वकिलांचा बंगला होता.पानसे वकील आता रिटायर झाले होते. ते आणि त्यांच्या पत्नी दोघेच तिथे राहत होते.
कावळा इतका का ओरडतोय...?
म्हणून मी बाहेर डोकावून पाहिले,त्यावेळी पानसे वकिलांच्या बंगल्याभोवती तो कावळा उडताना दिसला.त्या बंगल्यावर जणू त्याने फेरच धरला होता. आणि बंगल्याभोवती गोल गोल फिरताना तो कर्कश् आवाज करत होता.मी तसाच उभा राहून कितीतरी वेळ ते दृश्य पाहत होतो.अगोदर माझ्या पाहण्यात एक कुतूहल होते.पण लवकरच त्या कुतूहलाचे रूपांतर एका भीतीत व्हायला लागले कारण त्या कावळ्याच्या फेर धरण्यातील एक विशिष्ट लय मला जाणवली होती. जणू तो मुद्दामहुन त्या बंगल्याभोवती प्रदक्षिणा घालत होता.

अचानक त्या कावळ्याने वेग घेतला, त्याचा तो फेरा त्याने चुकवला आणि जोरदार भिंतीवर धडक मारली...
त्याच क्षणी तो फडफडत बंगल्याच्या आवारात पडलेला मला दिसला...
एकप्रकारे त्याने आत्महत्याच केली होती.
त्याच क्षणी तो फडफडत बंगल्याच्या आवारात पडलेला मला दिसला...
एकप्रकारे त्याने आत्महत्याच केली होती.
मला नवल वाटले.त्या घटनेनेचे अपवित्र्य जाणवले. त्यामुळे येणारं फिलिंग निश्चितच चांगलं नव्हतं.
तेवढ्यात पाऊस सुरू झाला.
मी घरात आलो.
मी एकटाच होतो.
कितीतरी वेळ मला करमले नाही.
त्या रात्री मी लवकर झोपलो.
रात्रभर पाऊस कोसळत राहिला.
*****
दुसरा दिवस-
मी घरात आलो.
मी एकटाच होतो.
कितीतरी वेळ मला करमले नाही.
त्या रात्री मी लवकर झोपलो.
रात्रभर पाऊस कोसळत राहिला.
*****
दुसरा दिवस-
दुसरा दिवस उजाडला तोच मुळात दुःखद बातमी घेऊन...
पानसे वकील वारले होते...
रात्री झोपले ते सकाळी उठलेच नाही...
हार्ट अटॅक!
पानसे वकील वारले होते...
रात्री झोपले ते सकाळी उठलेच नाही...
हार्ट अटॅक!
कॉलनीतील सर्व शेजारी जमले होते.
पानसे काकूंना जबर धक्का बसला होता. कोणीतरी त्यांच्या मुलाला बातमी कळवली होती.तो ताबडतोब यायला निघाला होता.
सर्वजण हळहळत होते.
मला कालची ती घटना आठवली.
पानसे काकूंना जबर धक्का बसला होता. कोणीतरी त्यांच्या मुलाला बातमी कळवली होती.तो ताबडतोब यायला निघाला होता.
सर्वजण हळहळत होते.
मला कालची ती घटना आठवली.
त्या कावळ्याने जिथे धडक मारली ती जागा मी पाहिली.भिंतीवर बारीकसा रक्ताचा ओघळ होता मात्र कावळा मला कुठे दिसला नाही.
कदाचित मांजराने उचलून नेला असणार!
कदाचित मांजराने उचलून नेला असणार!
त्या घटनेचा आणि पानसे वकिलांच्या निधनाचा संबंध असू शकतो का?
एक शंका माझ्या मनात चमकून गेली पण मी ती लगेच झिडकारली.
एक शंका माझ्या मनात चमकून गेली पण मी ती लगेच झिडकारली.
मन विषण्ण झाले होते तशाच विषण्ण मनस्थितीत मी घरी परतलो.
जेवायची सुद्धा इच्छा नव्हती.
ती दुपार तसाच पडून राहिलो...केव्हातरी डोळाही लागला...
जेवायची सुद्धा इच्छा नव्हती.
ती दुपार तसाच पडून राहिलो...केव्हातरी डोळाही लागला...
त्या कर्कश आवाजाने मला जाग आली. तो आवाज मी ओळखत होतो.
कुठेतरी कावळा ओरडत होता.
कुठेतरी कावळा ओरडत होता.
घड्याळात चार वाजले होते.
म्हणजे जवळपास कालचीच वेळ होती.
मी टेरेसवर आलो.
मागच्या गल्लीतील त्या घरावर एका कावळ्याने फेर धरला होता.
अगदी कालच्या सारखाच...!
तीच लय,तीच गती त्याच्यात होती...!
म्हणजे जवळपास कालचीच वेळ होती.
मी टेरेसवर आलो.
मागच्या गल्लीतील त्या घरावर एका कावळ्याने फेर धरला होता.
अगदी कालच्या सारखाच...!
तीच लय,तीच गती त्याच्यात होती...!
मी शहारलो !
भयभीत होऊन पुढे काय होणार ते पाहू लागलो.
तितक्यात त्या कावळ्याने भिंतीवर सुर मारला मारला आणि निष्प्राण होऊन खाली कोसळला.
मी अचंबित होऊन पाहत होतो.
मन सुन्न झाले.
योगायोग होता का?
की
काहीतरी अघटित घडणार होते?
तितक्यात त्या कावळ्याने भिंतीवर सुर मारला मारला आणि निष्प्राण होऊन खाली कोसळला.
मी अचंबित होऊन पाहत होतो.
मन सुन्न झाले.
योगायोग होता का?
की
काहीतरी अघटित घडणार होते?
मन मानायला तयार होते पण मेंदू मानायला तयार नव्हता.
ती रात्र तशीच तळमळत गेली.
*****
तिसरा दिवस-
सकाळी जाग आली ती पोलिसांच्या गाडीच्या सायरनने...
आत्महत्या...!
त्या घरात राहणाऱ्याने आत्महत्या केली होती.
मी हादरलो होतो.
ते कावळे आणि ते मृत्यू यांचा निश्चित काहीतरी संबंध होता.
दोन दिवसात ते दोन कावळे आणि दोन मृत्यू झाले होते.
दोन दिवसात ते दोन कावळे आणि दोन मृत्यू झाले होते.
पुढचा नंबर कोणाचा?
आपला तर नाही!
नाही नाही...
आपला तर नाही!
नाही नाही...
मी प्रचंड धास्तावले होतो.
अंगातील सर्व बळ कोणीतरी शोषून घेतले असावे असे वाटत होते.विचार करकरून डोके चकरायला झाले होते.
मी दुपार सरण्याची वाट पाहू लागलो.
काटा संथगतीने पुढे सरकत होता.
अखेर दुपार सरली...
मी वाट पाहू लागलो...
ती कर्कश्श काव-काव माझ्या कानी पडली.
मी टेरेसवर धावलो.

तो कावळा त्या घराभोवती फिरत होता.
अगदी तसाच फेर त्याने धरला होता.
त्याच्या रूपाने त्या घराभोवती जणू मृत्यू पिंगा घालत होता.
एक क्षण वाटले...
त्यांना वाचवता येईल का?
किमान त्यांना सावध तरी करता येईल?
पण लगेच त्यातील निरर्थकपणा मला जाणवला! कोण माझ्यावर विश्वास ठेवणार?
मी तो विचार सोडून दिला.

दोन दिवसांच्या जागरणाने आणि मानसिक थकव्याने त्या रात्री मला पटकन झोप आली.
*****
चौथा दिवस-
*****
चौथा दिवस-
सकाळी उशिरापर्यंत मी झोपून होतो.
त्या घरात काय घडले हे जाणून घेण्याची मला बिलकुल इच्छा नव्हती.
तिथला मृत्यू अटळ होता.
मी दिवसभर घराबाहेर पडलो नाही.
त्या घरात काय घडले हे जाणून घेण्याची मला बिलकुल इच्छा नव्हती.
तिथला मृत्यू अटळ होता.
मी दिवसभर घराबाहेर पडलो नाही.
मी ठरवले आता तो आवाजही ऐकायचा नाही आणि तो फेराही पाहायचा नाही.
घड्याळात चारचे ठोके पडत असतानाच बेल वाजली.
मी दरवाजा उघडला.
शेजारचा चंदू होता.
मी दरवाजा उघडला.
शेजारचा चंदू होता.
तिसऱ्या मृत्यूची बातमी घेऊन तो आला होता.मी ते आधीच गृहीत धरलं होतं.
खरं तर मला या वेळी एकांत हवा होता. चंदूने खूप वेळ घेतला.त्याने बराच वेळ निष्फळ बडबड केली व शेवटी तो जायला निघाला. मी सुटकेचा निश्वास टाकला. दरवाजापर्यंत त्याला सोडवायला गेलो.तो बाहेर पडताच मी दरवाजा लावून घेणार इतक्यात तो पुन्हा माघारी फिरला.

" समीर , तुझ्या टेरेस वर वर काही मरून पडले आहे का? तो कावळा बघ किती वेळ झाले ओरडत आहे,बघ जरा वर जाऊन!"
मी दचकलो !
कोणता कावळा मला तर कसलाच आवाज येत नव्हता.
मी धावत टेरेसवर टेरेसवर गेलो.
तेथे कावळ्यातला 'क' सुद्धा नव्हता.
मी खाली आलो.चंदू निघून गेला होता.
तेथे कावळ्यातला 'क' सुद्धा नव्हता.
मी खाली आलो.चंदू निघून गेला होता.
यावेळी चंदूला कावळा दिसला होता.
केवळ त्यालाच तो दिसू व ऐकू येणार होता...
केवळ त्यालाच तो दिसू व ऐकू येणार होता...
जसा आधी...
मी जसजसा विचार करत गेलो तसतसा नखशिखान्त हादरुन हादरुन गेलो.
फेरा पुन्हा सुरू झाला होता.
आज रात्री मला झोप लागणे शक्यच नव्हते.आपसूकच माझा हात झोपेच्या गोळ्यांच्या डबीकडे गेला.
आज स्ट्रॉंग डोस घ्यावा लागणार बहुतेक!
*****
पाचवा दिवस-
हवेत पंख पसरून मी झेपावलो.
आनंदाने मी चित्कारात होतो.
माझ्या हलक्या शरीराने मी फेर धरला होता.ती लय, ती गती मला माहिती होती.
आनंदाने मी चित्कारात होतो.
माझ्या हलक्या शरीराने मी फेर धरला होता.ती लय, ती गती मला माहिती होती.
खाली चंदूचे घर दिसत होते.
समाप्त.
(काल्पनिक कथा)
(काल्पनिक कथा)
श्री.आनंद निकम,