संचार -A Horror Book
मोहन~ "हां बास बास आल आपल घर! इकडेच थांबवा ट्रक सावलीत.. तिकडे चिखल साठलाय थोडा पावसाने..
किर्ती, उतर ना खाली.. बघ आपल घर...कस वाटल सरप्राइज?"

किर्ती~ "हम्म अस बाहेरून पहायला तर खुपच छान दिसत आहे घर. आधी कधी बोलला नाहीत या घराबद्दल?"
मोहन~ "अग माझी नोकरी शहरातली..आपल मोठ घर गावात.. हे घर माझ्या आज्याने बांधलेल. पण यायला जायला लांब पडत म्हणून हे बंदच ठेवलेल."
किर्ती~ "हो ना तस तर हे गावाच्या बाहेरच दिसत आहे.. आस पास घर ही नाहीत कोणाची फार..."
मोहन~ "अग ह्या माळावर खुप लोकांची जमीन आहे..प्लॉटिंग सुरु आहे. आता आपण आलोय ना मग येतील हळूहळू सगळे!"
किर्ती~ "हम्म hope so!"
मोहन~ "चला मंडळी आता आपण दिवस मावळायच्या आत पटकन सामान उतरवुंन घेऊ, कस...म्हणजे तुम्ही पण मोकळे आम्ही पण मोकळे,,!"
सगळे ट्रक मधून सामान उतरवायला लागले. चावीने दार उघडून किर्तीने घरात प्रवेश केला.. घर आतून ही सुंदर होते. ऐसपैस टू बीएचके. मोठा दरवाजा...मोठ्या खिडक्या... खुश होत तिने नदीच्या दिशेकडील खिडकी उघडली... त्यासरशी एकदम विचित्र राखे सारखा वास भसकन घरात आला..नाकावर हात ठेवत ती खिडकीतुन बाजूला होणार एवढ्यात मावळतीला लालकेशरी होत अस्ताला जाणारा सूर्य नारायण तिला खिडकीतुन दिसला.. तशी ती थबकली आणि तिथच थांबली...
बाहेर दुरवर पण नजरेच्या टप्प्यात असणारी नदी तिला दिसली.. पावसाळा असल्याने तिला प्रवाह सुटला होता. वाहते पाणी असल्याने आणि आजुबाजुला बरीच शांतता असल्याने तिला त्याचा खळखळ आवाज स्पष्ट ऐकू येत होता. झाडाझुडपांच्या आडून मधून मधून दिसणारे नदीचे पात्र आता चहाच्या रंगाचे दिसत होते.
त्या माळावर सध्या तरी त्यांचे एकच घर दिसत होते. आजुबाजूला सगळीकडे भरपूर झाडेझुडपे...नारळाची झाडे...वड-पिंपळाची झाडे...अशी भरपूर झाडे होती.
मुंबईच्या धकाधकीच्या फास्ट शहरात वावरलेली ती एवढ सगळ मोकळ अवकाश पाहुन थोडीशी बुजली..
सामान उतरवुन झालेल. मोजक सामान ती तिचा नवरा आणि तिचे चुलत दिर या तिघांनी मिळून लावल.
हळूहळू रात्रीचा प्रहर सुरु झाला. तस घाई करत तिचे दिर त्या दोघांना गावात चलायला सांगू लागले.
तस तोंडावर पाण्याचा हबका मारत घाईत ते दोघे फ्रेश झाले आणि गाडीत बसून गावात जायला निघाले.
जाताना गाडीच्या आरशात त्या गर्द वनराई मध्ये ते घर
गुडुप अंधारात एकटेच एकाकी वाटत होते...
किर्तीच्या मनात आले उद्या घराबाहेर एक दिवा लावून घेऊ.. म्हणजे असा अंधार दाटणार नाही..
दिवसभर प्रवास झाल्याने अती दगदगीने वार्याच्या झुळकेने किर्तीचा डोळा लागला..
आणि ती स्वप्नांच्या नगरीत पोहोचली..खुप उत्साह भरलेला तिच्यात...स्वप्नात ती तिच्या नवीन
घरात होती. घरात भरपूर वर्दळ दिसत होती. बहुदा त्यांच्या नव्या घराची पूजा होती.. घरात माणसे तर होती पण त्यांचे चेहरे मात्र धूसर होते..
कोणीतरी हसत हसत तिच्या हातात एक ताट आणून दिले.. कुंकवाचे ताट.. त्यात तिचे हात बुडवुंन घरात त्याचे छाप उठवायचे होते.. तिने ही आनंदाने फुलत त्यात हात बुडवला पण हे काय तिचा एकच तळवा कुंकवाने भरला एक हाताला कुंकु लागलेच नाही... तस तिने नाराजीने थाळी देणाऱ्या व्यक्तीकडे पाहिले.. तो मोहन होता...
कशा कोण जाने पण त्याच्या चेहर्यातून वाफा निघत होत्या...त्या कडे आश्चर्याने बघत त्याला दाखवण्यासाठी म्हणून तिने तिचा दुसरा हात पुढे केला तस त्याच धूसर वाफेतुन काहीतरी लक्खन चमकत पुढे आल आणि तिच्या मनगटातून आरपार छेदत गेल...तो चाक़ू होता.. ती जोरात किंचाळली... रक्ताच्या चिळकांड्या उडून तीच्या हातातील ताटली तिच्याच रक्ताने भरली.. तस सगळ्या घर भर आवाज घुमु लागला...
"बुडव बुडव...त्यात हात बुडव...अग बुडव गं..."
तशी तिने ताटली फेकून दिली... सगळ्या भिंतीवर रक्ताचे ओघळ उमटले.. जणू भिंती रक्ताचे अश्रु रडल्या असे दृश्य दिसू लागले..बधीर होत ती तिचा दुखरा हात तसाच गच्च धरून भेदरून तशीच उभी राहीली...

आणि अचानक एक छोटा हात तिच्या हातावर आला..
"मम्मी उठतेस ना ग... घर आल बघ..."
तिची लहान मुलगी तिला गाडीतुन उतरायला सांगु लागली..तशी ती स्वप्नातून जागी झाली..घामाने डवरलेला आपला चेहरा तिने घाईत साडीच्या पदराला पुसला आणि गाडीचे दार उघडले.. ते त्यांच्या गावातल्या मूळ घरी आलेले.. आजुबाजूला लोकांची गर्दी... रस्त्यावर उजेड पाहुन तिला हायसे वाटले..ते लोक घरात प्रवेश करतात न करताच तोच पावसाला सुरुवात झाली...
ओल्या लाल मातीचा सुवास भरून घेत, दुरवर गर्द झुडपात हरवत जाणाऱ्या वाटेकडे एकवार नजर टाकत तिने घरात प्रवेश केला.. घराच्या उम्बर्यातुन आत जाताना तिच्या लक्षात आले की आपले डाव्या हाताचे मनगट दुखत आहे.. बहुदा सामान उचलल्याने झाले असावे असे मनाशी म्हणत ती मुलीसोबत स्वयंपाक खोलीत शिरली..

दुसऱ्या दिवशी सत्यनारायण आणि वास्तुशांतीची सर्व तयारी करूनच किर्ती आणि मोहन पुन्हा घरी आले.
सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरूच होती म्हणून दुपारी 3 च्या दरम्यानचा मुहूर्त पुजेसाठी काढला.
गावात आमंत्रण गेली. गावात कुजबुज चालूच होती.
त्या माळावर घर टिकनारच नाही म्हणून.
देवांचे फोटो, हार फुले, धुप-अगरबत्त्या, चौरंग पाट अशी पुजेसाठी जय्यत तयारी केलेली.
घरात आल्यावर कालचे स्वप्न आठवून किर्तीला थोडे अस्वस्थ वाटले...पण मनातले सगळे विचार बाजूला ठेवून ती जोमात कामाला लागली.
प्रसादाचा शिरा तयार होत होता.. शेवटी त्यावर तुळशीची पाने ठेवून झाकन ठेवावे म्हणून किर्ती पुन्हा आत आली
तोच किचन मधल्या उघड्या खिडकीत कावळ्यांची कर्कश काव काव ऐकू येवू लागली...
खिडकीच्या काचेच्या दारावर एका कावळ्याने जोरात टोच मारली आणि त्याने चोचित आणलेली घाण त्या शिर्याच्या पातेल्यात पडली...
तेव्हाच तिची जाऊ नेमकी आत आल्याने ते दृश्य पाहुन दोघीही घाबरुन जोरात ओरडल्या... तसे सगळे जमा झाले.. मोठाच अपशकुन झालता..
मोहन ही मनातून चरकला...आपण काही चुकीच तर नाही ना करते.?.. त्याच्या मनात नाना प्रश्न शंकेचे फेर धरुन नाचू लागले... पण चेहऱ्यावर तस न दाखवता..

"अरे काही नाही झाल एवढ.. चुकून झाल असेल अस..
नवीन प्रसाद बनवु एवढ काय त्यात..."
अस म्हणत सगळ्यांची समजुत घालू लागला..आणि पर्यायाने स्वतःचीही.. पुन्हा उसन अवसान आणून किर्ती आणि तिची जाऊ पुन्हा कामाला लागल्या...
तेवढ्यात त्यांना अजुन एक अशुभ वार्ता समजली..
पूजा सांगायला जे पुजारी येणार होते त्यांच्या नात्यात कोणीतरी अचानक वारल म्हणून त्यांना तिकडे जाव लागल... झाल हे ऐकताच किर्तीने होती त्या जागीच डोक्याला हात लावून बसकन मारली..
आलेले पाहुने हळहळत निघुन गेले.. सूर्य अस्ताला जावु लागला तस मोहनचे दादा आणि वहिनी देखील तेथून निघण्यासाठी चुळबुळ करू लागले.. आणि त्या दोघांनाही आपल्या सोबत येण्यास सांगू लागले.

"मोहन चल आता गावात जावु... उद्या सकाळी या तुम्ही परत.."
"कशाला दादा? आता इथच तर राहायच आहे!"
"अरे नवीन जागा आहे. थोडा वेळ लागेल तुम्हाला adjust व्हायला म्हणून म्हणत आहे..."
"काही नाही होत दादा होईल हळूहळू नीट आम्ही राहतो इथेच.. "
बोलता बोलता चौघांची नजर खिडकीतुन बाहेर निघुन दूर नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचली... आणि डोळे विस्फारुन सगळे ते दृश्य पाहू लागले....
तिकडे एका प्रेतावर अग्निसंस्कार विधी करत होते.. बहुदा मरणार्या व्यक्तीचे नातेवाईक मोठ्याने आक्रोश करत होते, त्याचा आवाज वाऱ्या बरोबर येत ह्यांच्या पर्यन्त पोहोचत होता.
बघता बघता चितेला भडाग्नी दिला आणि उंच उंच पेटत्या ज्वाळा त्या चितेतुन निघु लागल्या.. मोठे विचलित करणारे दृश्य होते ते.. खिडकीचे एक तावदान जोरात आपटले तसे सगळे भानावर आले..

मोहनकडे हेतुपुरस्सर नजर टाकून त्याच्या दादाने पाहीले.. तस त्याची नजर चुकवत मोहनने भर्रकन खिडकी लावून घेतली..तस त्यांना मोहनच उत्तर समजल.
नकरार्थी मान हलवत त्याचा दादा घराबाहेर निघुन गेला.
जाताना मोहनच्या मोठ्या मुलाला ते सोबत घेऊन गेले.
आणि दादा जाता जाता म्हणाला,

" काही वाटल तर नक्की फोन कर...मी आहे..."
"हो दादा नक्की..."
"काळजी घे..."
"हम्म"
ते जाताच किर्ती म्हणाली,
" भाऊजी अस का म्हणत होते?"
" भाऊजी अस का म्हणत होते?"
"अग नवीन जागा आहे ना म्हणून बाकी काही नाही.."
प्रश्नार्थक चेहरा घेऊन कितीतरी वेळ किर्ती झाल्या गोष्टींचा विचार करत राहिली...
आता त्या ओसाड माळावर फक्त ते तिघे उरलेले..
मोहन किर्ती आणि त्यांची दूसरीत जाणारी लहान मुलगी सृष्टी.! जेवण वगैरे उरकुन सगळी आवराआवर करून तिघे ही झोपायच्या तयारीला लागले.
मगासचे दृश्य पाहुन आणि दिवसभरात घडलेल्या गोष्टींचा अर्थ लावत मनावर आलेली अस्वस्थता झटकत दोघेही झोपायचा प्रयत्न करत होते. रात्री मध्येच कधीतरी त्यांचा डोळा लागला.. तेवढ्यात दन दन आवाज करत किचन मध्ये कसलतरी पातेल पडल त्याने किर्तीची झोप मोड झाली. तशी ती उठून बसली.. मांजर वगैरे शिरल की काय या विचाराने ती काळजीत पडली.. तिला लवकर आठवेनाच की तिने किचनची खिडकी लावलेली का नाही ते.. अस्वस्थ होत ती किचनकडे जायला निघाली..

चाचपडत तिने छोटी लाईट लावली. आणि दार उघडून बाहेर आली. अजुन ही किचन मधून खडबड आवाज येतच होता. किचनच दार अर्ध किलकिल होत.. आतल्या हालचालींचा कानोसा घेत किर्ती सावकाश पावल टाकत त्या दाराजवळ पोहोचली.. जेमतेम प्रकाश देणारा उजेड पसरलेला.. त्यातच आतल दृश्य पाहुन काळीज फुटून बाहेर येतय की काय अशी तिची अवस्था झाली.. आत मध्ये एक पाठमोरी बुटकी व्यक्ती किचन ओट्या जवळ थांबून पातेल्यातुन काहीतरी खात होती..त्याच पातेल्यात ज्यात शिरा बनवला होता..पण त्यातून आता काहीतरी गळत पण होते..पाणी असावे की
रक्त? याचा विचार करत असतानाच एक अनपेक्षित हृदयाचा ठोका चुकवणारी कृती त्या व्यक्तीने केली.. खाता खाताच ती व्यक्ती मध्येच समोरच्या भिंतीवर चढायला लागली.. तिच्या हाताला जे काही लागलेले ते रक्त होते.. त्याचे छाप भिंतीवर उमटत होते.. वर आढ़यावर केस पिंजारलेले भरपूर कावळे बसलेले... त्यांची हिरवी नजर किर्तीवरच रोखलेली... लडबडत्या पायांनी ती बुटकी व्यक्ती भिंतीवर चालत आता छताच्या मध्यभागी पोहोचलेली..
किर्तीला तेथून इच्छा असूनही जागच हलता ही येत नव्हते.. थिजली होती ती पण.. तेव्हाच अचानक ती व्यक्ती वरुन खाली पडली.. तेव्हा तिला दिसल..
ते फक्त धडच होते त्याला डोकच नव्हतं...
किंचाळण्यासाठी ती तोंड उघडणार तेव्हाच तिची नजर वर पोहोचली वर छताला कावळ्यांची जोरदार कावकाव सुरु झालेली..आणि त्याच मुंडक तिकडेच होत..आपले दांत विचकत तिच्याकडे बघत तो बिन मासांचा फक्त हाडांचा विद्रूप चेहरा हसत होता.. तस तिने गच्च दार लावून घेतले...
किर्ती पूर्ण घामाने थबथबली होती... तिला खुप रडायला यायले लागले.. किचनला बाहेरुन कडी घालत ती पळत पुन्हा रूमकडे यायला निघाली...
रूम मध्ये तिने घाबरत घाबरत प्रवेश केला..
मुलगी आणि मोहन गाढ़ झोपेत होते .
भसकन रूम मध्ये प्रवेश करत तिने आपल्यामागे दार जोरात लावत ते लॉक केले. त्या खडबडीने मोहनची झोप चाळवली गेली. डोळे किलकिले करून तो तिच्याकडे बघनार एवढ्यात किचन मधून धाड धाड असा काहीतरी जोरात बडवल्याचा आवाज येवू लागला तसा पांघरुन झटकत मोहन पटकन बेडवर उठून बसला..
समोर घामाने थबथबलेली किर्ती तिचा धपापता उर घेऊन मोठ मोठे श्वास घेत उभी होती .. तस तो,
" किर्ती? किर्ती काय झाल? एवढी का घाबरली आहेस??"

"मो मोहन मोहनs बाss हेssर.... बाssहेर किचssन मध्ये.... को को कोणीतरीss आ आ हेss..."
कसतरी अडखळत तिने उत्तर दिल..
"बाहेर?कोणीतरी ? कस काय?"
"माहीत नाहीsss... पण ते ते...माणूस नाही...मोहन आपण इकडे नव्हतं थांबायला पाहिजेsss..."
"अग अग तू शांत हो आधी... तू काय बोलत आहेस काहीच समजत नाही... तू पाणी पी.. मी बघतो काय आहे ते..."
"नकोsssss नकोsss प्लीज तुम्ही जावु नका तिथ..मला खुप भीती वाटत आहे..प्लीज तुम्ही आत्ताच्या आता भाऊजींना फोन करून बोलवुन घ्या मला नाही थांबायच इथ... नाही थांबायच मला..."
अस बोलत ती ओंजळीत तोंड खुपसुन रडायला लागली.

"किर्ती अग अस काय करतेस... बघू तरी देत मला नक्की काय झालय ते...चोर बीर असला म्हणजे...तू घाबरु नको मी आहे ना?"
"नाहीsss नकोss तुम्ही नका जावु... तुम्ही प्लीज लवकर फोन लावा आधी..."
"अग फोन पण बाहेरच आहे माझा. थांब मी घेऊन आलो पटकन. घाबरु नकोस..."
खरतर किर्तीची अवस्था बघुन मोहन ही खुप गोंधळला होता.. पण त्याला एवढ समजत होत की काहीतरी गूढ़, भयंकर अस काहीतरी त्यांच्या वास्तुत शिरल आहे. किचन मधून अजुन आवाज येतच होते. त्यांच्या दृष्टीने घरात थांबने त्यांच्यासाठी सुरक्षित नव्हते. हॉल मध्ये पोहोचताच किचन मधल्या बंद दारावर आतून थापा पडू लागलेल्या... ठप ठप ठपsss!!!
त्या शांततेत तो आवाज कितीतरी मोठा वाटत होता. आतल्या येणाऱ्या आवाजांचा कानोसा घेत तो हॉल मध्ये मोबाईल शोधु लागलेला. खिडकीच्या बरोबर खाली टीपॉय ठेवलेला त्यावर तो मोबाईल होता. मोबाईल बघताच त्याच्या चेहऱ्यावर थोडे समाधान आले. कस ही करून त्याला ह्या परिस्थितीतून सहीसलामत बाहेर पडायचे होते.. एव्हांना किर्तीची घाबरलेली परिस्थिती आणि आतून येणारे आवाज पाहता तिने नक्कीच काहीतरी अमानवीय दृश्य पाहिल असणार याची खात्री त्याला झाली. .
तो खाली वाकुन मोबाईल घेणार एवढ्यात समोरची खिडकी अचानक उघडली आणि मोहनच लक्ष बाहेर गेल..
समोर लांबच लांब... अगदी दूरवर नजर पोहोचेल तिकडे फक्त आणि जळत्या चिता त्याच्या नजरेत पडत होत्या.. त्या चितेत जळणार्या अतृप्त आत्म्याचे क्लेश त्यांच करूण रुदन... जिकदे तिकडे पडलेली हारफुले.. फुटलेली मडकी... उंचच उंच पसरलेल्या आगीच्या ज्वाळा त्याची धग, आता आत घरात पण पोहोचत होती.. मोहनचे तर भानच हरपलेले.. डोळ्यांची पापनी ही न लवता तो बाहेर बघत होता.. ते जीव त्याला साद देत होते.. आणि तेवढ्यात..... वाळलेला पालापाचोळा
उडून आत आला ... त्या सोबत काहीतरी नक्कीच होते..गूढ काहीतरी भयंकर... मोबाईल हातात घेऊन मोहन गुढघ्या जवळ हात दुमडून बसला..आणि पुढे मागे होऊ लागला.. त्याच्या चेहऱ्यावर मोबाईलचा प्रकाश येत होता.. त्याने तो अजुनच भेसुर दिसु लागलेला...

बराच वेळ होऊन ही मोहन मोबाईल घेऊन आत न आल्याने काळजीपोटी किर्ती धीर करून बाहेर आली..
जस तिने बाहेर पाऊल टाकले तस तिला हुडहुडी भरली..
हवेत अनाहूत गारठा पसरलेला...सोबत भरीला खिडकीतुन झोम्बरा गार वार आला..त्यात तिला दिसले खिडकीजवळ खाली मोहन बसलेला..
आवंढा गिळत तिने त्याला हाक मारली..

"अहोss, आत येताय ना..? असे का बसलात तिकडे..?"
यावर स्वतःचे दात कडकड वाजवत मोहन वेड्यासारख हसू लागला... आणि दुहेरी आवाजात बोलला..
"हा हा येतो ना पण मला रक्त पाहिजे प्यायला देतेस..?"
तस तोंडात पदराचा बोळा कोंबत किर्ती झटकन पुन्हा आत आली..आणि रडू लागली.. काय करावे तिला सुधरतच नव्हते... आणलेल्या सामानातुन घाईत शोधाशोधी करत तिने कशीबशी मेणबत्ती पेटवली.. तेव्हा तिला दिसले... त्या दोघींकडे एकटक बघत, दुधी रंगाच्या त्यांच्या खिडकीच्या गजांना धरून कोणीतरी डोकं आपटत होतं.. तस ती शिरशिरली... बाहेरील कोलाहल आता वाढला होता... या संकटातुन आता सुखरूप कसे बाहेर पडणार याची चिंता तिला सतावत होती..भीतीने तिला देवाचे नाव घ्यायचे ही सुचत नव्हते.. खोलीत अजिबात वारं नसताना ही मेणबत्ती फडफडायला लागली आणि त्यातच तिला दिसला स्वामींचा फोटो...
तस मनात गजर झाला श्री स्वामी समर्थ.... डोळे पुसत तिने थरथरत्या हाताने तो फोटो बाहेर काढला...
आणि भिंतीला टेकून उभा ठेवला तशी फडफडणारी ज्योत शांत झाली... स्वामींना बघूनच तिला सुपा एवढा धीर आला.. श्री स्वामी समर्थ... असा जाप करत तिने पुजासाहित्या मधून धुप आणि अगरबत्ती काढत ते पेटवले..तस वातावरण निवळू लागले... चितेच्या राखेच्या वास कमी होऊ लागला... फोटोला मनोभावे हात जोडत तिने प्रार्थना सुरू केली...

'निःशंक निर्भय हो मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी हे
अतर्क्य अवधूत हे स्मरतुगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी...
श्री स्वामी समर्थ....'
प्रचंड स्वामीबळ पाठीशी हे
अतर्क्य अवधूत हे स्मरतुगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी...
श्री स्वामी समर्थ....'
प्रार्थना म्हणे पर्यन्त तिच्यात वेगळीच शक्ती संचारलेली...
फोटो भोवती पडलेली उदी आपल्या हातात घेत तिने ती स्वतःच्या कपाळाला लावली..थोडी मुलीच्या कपाळावर लावली.. थोडी खिडकी बाहेर फुंकली...आणि उरलेल्या अगरबत्या पेटवत प्रार्थना म्हणत तिने हॉल मध्ये पाऊल टाकलं.. तस जणू तिथे वावटळ आली... पसरलेला पालापाचोळा, राखेचा दर्प, सगळं एकदमच उडायला लागलं... किचन मधून दार ठोकण्याचे आवाज..खिडक्यांची कवाडं उघडबंद होण्याचा आवाज..घराबाहेरून ऐकू येणार किंचाळन.. आणि मुख्य म्हणजे मोहन... तो एकटक तिच्या कडे बघत होता..त्याची ती थंडगार नजर पाहून तिला कापरंच भरलं.. तस डोळे घट्ट मिटत तिने मोठ्या आवाजात
पुन्हा स्वामींच्या धावा सुरू केल्या... तस तस घराचं भारलेपण कमी होण्यास सुरुवात झाली.. जे काहीतरी धोकादायक खिडकीतून आत आलेलं ते तसच वावटळी सारख झपकन बाहेर पडलं... तस तिने घराच्या चार ही कोपर्यात उदबत्त्या लावल्या आणि घाई करत खिडकी ही लावली.. मोहनला शुद्धीवर आणत त्याला ही आत बेडरूम मध्ये नेले...
आता पहाट होत आलेली... हे थरारनाट्य संपायला थोडा अवधी शिल्लक होता..एकमेकांच्या सावल्या पाहून ही भीती वाटत होती..
बाहेरून अजूनही कसले कसले आवाज येतच होते.. खिडक्या दारे जोरात बडवल्याचे आवाज त्यात होते...मधूनच कोल्हेकुई ऐकू येऊ लागली.. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या नसलेल्या सगळ्या जीवांचा संचार त्यांच्या घराभोवती रात्रभर सुरू होता... पूर्ण रात्र त्यांनी जीव मुठीत घेऊन स्वामींचा जप करण्यात घालवली.. आणि शेवटी काळरात्र संपली... स्वामींनीच त्यांना या संकटातून तारले... स्वामींच्या मनोभावे पाया पडून त्यांनी घराचा दरवाजा उघडला...

समस्त वाचकवर्ग या कथेच्या शेवटाचा तुमच्या प्रमाणे मला ही ध्यास होता. ही सलग कथा प्रतिलिपीच्या भूलभुलेया स्पर्धेत मी पाठवली होती. माझ्या आवडत्या भयकथांपैकी ही एक होती जिचा शेवट माझ्या मनासारखा होत नव्हता म्हणून कितीतरी दिवस draft मध्ये राहिलेली शेवटी एके रात्री जागून तिचा शेवट लिहून काढलेला. पण काही Internal irror मुळे ही कथा प्रकाशित झाली नाही.. निकालासाठी मध्ये बरेच दिवस होते जेव्हा स्पर्धेसाठी कथा प्रकाशित होणार होती तेव्हा ती आपोआप रद्द झाली... दरम्यान माझा फोन पाण्यात पडून बाद झाला त्यातून ही ती कथा गेली..प्रतिलिपी कडे ही त्याची कॉपी मिळाली नाही. नंतरही ती कथा मी पुन्हा लिहून काढली आणि ती आपोआपच डिलीट झाली. भयंकर मनस्ताप झालेला..
म्हणून मी तो नादच सोडून दिलेला. मनात वाटलं पनवती लागली वाटत स्टोरीला. पण या वेळेस पुन्हा मी ती लिहून काढली आणि आज फायनली पोस्ट करत आहे.