MDB Rating 6.2/10
2011 साली आपल्या भारतातील पहिला 3D भयपट....

....सुरुवात होते ते शिमल्यातील अतिरम्य परिसरात एकांतात असलेल्या सुसज्ज बंगल्यातुन ,बंगल्याचा मालक बंगला विकायचा म्हणून तिथे येतो ,पण तिथले केयर टेकर त्याला त्या ठिकाणी राहायला मज्जाव करतात कारण त्या बंगल्यात रात्री अज्ञात शक्तींचा नंगा नाच चालतो .
तो उच्चशिक्षित तरुण सर्व गोष्टी हसण्यावर नेतो आणि त्या बंगल्यात नक्की काय आहे हे पाहण्यासाठी त्या बंगल्यात राहण्याचं ठरवतो ,आणि मग सुरू होतो एक थरार जीवन मृत्यू च्या पाठशिवणीचा ,त्याला कळत जातात एक एक गोष्टी, प्रत्येक रात्री बरोबर 3 वाजता त्याला घरात वेगवेगळ्या गोष्टींचे भास व्हायला लागतात ,कधी मुलीचा ओरडण्याचा आवाज येतो ,कधी कुणी पियानो वाजणारी मुलगी दिसते तर कधी फासा वर लटकलेली मुलगी दिसते, नक्की काय प्रकार आहे ह्याचा तो छडा लावायचा प्रयत्न करतो ,त्यातच त्याला एका पुस्तकात एक चिठ्ठी सापडते आणि स्टोरी 1936 मध्ये जाऊन पोहचते ......
त्या घरात 2 शक्त्या असतात एक चांगली जिला मुक्ती हवी असते आणि एक वाईट शक्ती जिच्या तावडीत ती चांगली शक्ती अडकलेली असते आणि ती वाईट शक्ती जिवंत असतांना तिचे वाईट मनसुबे पूर्ण होत नाही म्हणून मृत्यूनंतर त्या मुलीवर 6 दिवस जबरदस्ती करतो ,शेवटी कंटाळून ती मुलगी आत्महत्या करते पण तिची मरणानंतर पण सुटका होत नाही ,मुलीचा आत्मा त्या वाईट आत्म्याच्या ताब्यात असतो तो तिला कैद करून रोज रात्री आपल्या अनैतिक अतृप्त इच्छा पूर्ण पूर्ण करू पाहतो आणि त्या दोघांच्या मध्ये जे पण यायचा प्रयत्न करतात ती वाईट शक्ती कुणालाच सोडत नाही , त्या मुलीची एक डायरी त्या मुलाला भेटते आणि मग त्याला कळत जातं की नेमकं त्या मुली सोबत काय झालं होतं, आणि मग तो मुलगा कश्या प्रकारे त्या मुलीची मदत करतो ,कश्या प्रकारे सर्व गोष्टी सुरळीत करतो हे बघणं खरंच खूप थरारक आहे ,पिच्चर 3D मध्ये आहे त्यामुळे 3D मध्ये बघाल तर तो फील आणखी चांगल्या प्रकारे घेता येईल ,3D असल्यामुळे काही सीन्स अंगावर येतात ,5,6 वेळेस तर हृदयाची धडधड एवढी वाढते की हृदय बंद पडतंय की काय असं वाटतं .....
पिच्चर बघतांना ,भीती पण वाटते,राग पण येतो ,कीवपण येते ,overall संमिश्र भावना निर्माण होतात...
एक वेगळ्या धाटणीचा भयपट ,मला आवडलेला सर्वांत सुंदर पिच्चर ,गाणे सुद्धा श्रवणीय आहेत ....
सर्वांनी एकदा तरी बघावा असा मूवी ...