हॉस्टेल !! भाग : 2
भाग 2 लिंक : ( https://marathighoststories.blogspot.com/2020/06/hostel-horror-story-online-marathi-part1.html)
साक्षी ने मनातच त्या तिसऱ्या मजल्याचे गुपित शोधायचं ठरवले. रज्जो सानिका तर तो प्रसंग केव्हाच विसरल्या होत्या. रात्र झाली सर्वांची जेवणे उरकली, आता उद्या सकाळी कॉलेजला जाव लागणार होत त्यामुळे उद्याची तयारी करावी म्हणून सर्वांनी आपली बुक्स वगैरे बॅग मध्ये भरली आणि बॅग पॅक्स केल्यात. झोपायची तयारी झाली सानिका आणि रज्जो एकाच पलंगावर झोपल्या, साक्षी आपल्या पलंगावर झोपली, झोपली कसली ती नुसताच पडलेली होती तिचा विचार सुरू होता की कश्या पद्धतीने आपल्याला त्या मजल्यावर जाता येईल...तिथे नक्कीच काही तरी गुपित असेल म्हणूनचं आपल्याला तिथे जाण्या पासून रोखले गेले... ते काही नाही याचा सोक्ष मोक्ष लावायचाच हवा, या दोघींना सांगावं तर कदाचित वॉर्डन मॅडमला सांगेल आणि मला त्या ओरडतील, आपणच लपून छपून तिथे जाऊन बघू,
बघुयात तरी असा कुठला खजिना तिथे लपवलेला आहे !!
बघुयात तरी असा कुठला खजिना तिथे लपवलेला आहे !!
सकाळ ऊजेडली होती.... रंजना मोठ्याने घंटी वाजवत देवाची पूजा करत कुठलस स्तोत्र म्हणत होती, त्या घंटीच्या आणि रंजनाच्या आवाजाने झोपलेली साक्षी मोठ्याने ओरडली...
" ओये रज्जो, तुझे दिखाई नही देता सोई हुं ना मे !! बंद कर ये घंटी बजाना...सानिका बोल ना यार इसको एक तो मुझे कल रात देर से नींद आयी, ओर ये है की सोने नहीं देती..." साक्षी आपल्या तोंडावर उशी ठेऊन कान बंद करत बोलत होती.
तोच सानिका आपल्या हातातील केस विंचारण्यासाठी घेतलेला कंगवा हाती ठेवत आणि साक्षीच्या अंगावरचे पांघरुण ओढत म्हणाली...
"साक्षी आता उठ तसाही खूप उशीर झाला आहे, तुला कॉलेजला नाही जायचं का...? तस सांग मी काकूंना कळवतो कॉल करून !!” सानिका आपल्या दोन्ही हातांना कंबरीवत ठेवत बोलत होती...
"उठती हुं मेरी मा !! एक मा क्या काम थी जो भगवान ने मुझे मेरी रूममेट भी मां जैसे दे दी...ओर वो कल की आयी हुई रज्जो मेरी नानी हो गयी !!, अच्छा सूनो, तुम दोन मे से चाय कोन कोन पिएगा...?"
तिचा तो प्रश्न ऐकून सानिका नको म्हणाली..रज्जो मात्र मी पिणार अस पंजा वर करून म्हणाली...
"अरे वा रज्जो तू चाय पियेगी...?" साक्षी.
"
हो पिणार !!" रंजना.
"
हो पिणार !!" रंजना.
"तो जा फिर मेरे लिये भी बनाना ..."
एवढ वाक्य ऐकून तिघी पण हसल्या...दोघींचा चहा झाला आणि शेवटी कॉलेज ला जायची वेळ जवळ आली, म्हणून त्यांची निघायची लगबग सुरू झाली. त्या तिघी ही जायला निघाल्या...साक्षी आणि सानिकाची स्वतःची स्कूटी होती...त्यामुळे त्यांचा प्रश्न न्हवता...पण रंजना मात्र पाई जायच्या विचारात होती...तोच सानिका तिला म्हणाली...
"रज्जो आपण सोबत जाऊयात तु पाई नको जाऊ, माझ्या सोबत चल गाडीवर..." सानिकाचे बोलणे ऐकून रज्जो खुश झाली. ती म्हणाली ....
”आपण शेअरिंग पेट्रोल टाकूयात!!”
"चालेल" सानिका जिना उतरत म्हणाली...
"अरे साक्षी कुठे राहिली...ती तर आपल्याच सोबत निघाली होती..” सानिका म्हणाली.
"येत असेल मागून, कुणाशी तरी chating करत येत असेल...आपण जाऊयात उगाच तिच्या मुळे आपल्याला उशीर नको व्हायला..." रंजना तिचा हाथ ओढत म्हणाली...
सानिका तशीच एक वेळ मागे पाहून तिच्या सोबत कॉलेज ल निघून गेली. इकडे साक्षी मात्र त्या तिसऱ्या फ्लोर च्या जिन्या जवळ येऊन स्तब्ध झाली होती अगदी. तिला दिसत होते की
जीन्या वर जाताना जिथे वळण येत त्या वळणावर दोन मुली तिची वाट बघत उभ्या आहे, आणि तिला बोलावत आहे वर येण्यासाठी. साक्षी मात्र त्यांना न्याहाळत तशीच पायरी जवळ उभी होती.
आणि मनात विचार करत होती,
या मुली इथे काय करताहेत वॉर्डन म्याम तर म्हणत होत्या इथे कुणालाच प्रवेश नाही मग या कोण ? दिसत तर आपल्याच सारख्या आहेत.. .. व्हाईट फ्रॉक घातलेल्या ...पण ह्यांचे फ्रॉक तर फार जुन्या फॅशन चे दिसत आहे जवळपास दहा वर्ष अगोदरचे. आणि कपडे का इतके मळके असावे ह्यांचे... जावं का आपण त्यांच्या कडे विचारावं का त्यांना...पण आपल्याला उशीर होत आहे... मी जायला हवं ...
जीन्या वर जाताना जिथे वळण येत त्या वळणावर दोन मुली तिची वाट बघत उभ्या आहे, आणि तिला बोलावत आहे वर येण्यासाठी. साक्षी मात्र त्यांना न्याहाळत तशीच पायरी जवळ उभी होती.
आणि मनात विचार करत होती,
या मुली इथे काय करताहेत वॉर्डन म्याम तर म्हणत होत्या इथे कुणालाच प्रवेश नाही मग या कोण ? दिसत तर आपल्याच सारख्या आहेत.. .. व्हाईट फ्रॉक घातलेल्या ...पण ह्यांचे फ्रॉक तर फार जुन्या फॅशन चे दिसत आहे जवळपास दहा वर्ष अगोदरचे. आणि कपडे का इतके मळके असावे ह्यांचे... जावं का आपण त्यांच्या कडे विचारावं का त्यांना...पण आपल्याला उशीर होत आहे... मी जायला हवं ...
आता जवळपास सर्व मुली कॉलेज ला गेल्यामुळे हॉस्टेल रिकाम झालं होत. वॉर्डन मॅडम फेरी मरतील...कोणी मुद्दाम खोलीत राहले तर नाही हे बघण्यासाठी...आणि तेव्हा मी त्यांना इथे दिसले तर आली परत पंचाईत... त्यापेक्षा नको ती वॉर्डन नको आणि ती तिची कटकट नको...चला जाऊ या....त्या दोघींना बाय करून धावत पळत जिना उतरत ती गाडीवर बसून निघून गेली...
दुपारी कॉलेज कॅन्टीन ला तिघी एकत्र आल्या, त्यांचं हाय हॅलो झाले. तिघी ही एकाच टेबल जवळ बसल्या..बॅग्स टेबल वरती ठेवल्या आणि निवांत आपल्या मोबाईल चाळत बसल्या..बाकी मुला मुलींचा कॅन्टीन मध्ये नुसता दंगा सुरू होता..
”काय ग तुला का उशीर झालं यायला...निघाली तर आमच्याच सोबत होती...कुणाशी बोलत होतीस.... बॉयफ्रेंड वैगेरे तर नाहीये ना बाई तुझा ?”
रंजना तिला छेडत म्हणत होती...
"नहीं यार bf काहा ऐसे ही थोडी देर हो गयी..!!"
आपल्याच विचारात असताना बोलली.
आपल्याच विचारात असताना बोलली.
साक्षी पहिल्यांदा रंजनाशी निट बोलत होती त्यामुळे तिला आश्चर्य वाटत होते. साक्षी द्विधा मनःस्थितीत होती की यांना सांगावं का त्या मुलीनं बद्दल की नको....
सकाळ पासूनच पाऊस पडत होता, आता त्याची रिप रिप जरा वाढलेली होती आभाळ गर्जत होते...इकडे रंजना ने ऑर्डर घ्यायला सुरुवात केली
सकाळ पासूनच पाऊस पडत होता, आता त्याची रिप रिप जरा वाढलेली होती आभाळ गर्जत होते...इकडे रंजना ने ऑर्डर घ्यायला सुरुवात केली
"ये सानिका तू काय खाणार ?"
सानिका हसून म्हणाली,...
"अग हा काय प्रश्न आहे का रज्जो, मस्त पाऊस पडतोय, आभाळ गरजतय या वातावरणात गरमा गरम कांदा भजी सोडून काही खाल्ले तर पाप लागेल पाप, आणि मला या पापाचे भागीदार नाही व्हायचे. "
"बरं बाई, तुझी कांदा भजी, मला वडापाव आणि साक्षी तू ?" रंजना साक्षी कडे बघून म्हणाली.
साक्षी आपल्या मोबाईल ला टेबल वरती गोलगोल फिरवत आपल्याच तंद्रीत बसली होती..
रंजना ने तिला एक चापट मारली तेव्हा ती भानावर आली.
साक्षी आपल्या मोबाईल ला टेबल वरती गोलगोल फिरवत आपल्याच तंद्रीत बसली होती..
रंजना ने तिला एक चापट मारली तेव्हा ती भानावर आली.
"पागल रज्जो मार क्यू रही हो?” साक्षी आपल्या लागलेल्या हाताला कुरवाळत म्हणाली.
"dumbo...मी तुला विचारलं की तू काय खाणार आहेस ?” रंजना.
"नहीं मुझे कुछ नहीं चाहिए, मुझे थोडा acidity जैसा लग रहा है.." साक्षी.
"मग चहा सांगू का...? "
”चाय चलेगी बोल दे !!” आणि एकदाची साक्षी कडून ऑर्डर मिळाली..ती ऑर्डर घेऊन रंजना food counter वर गेली. तो पर्यंत इकडे साक्षी तशीच परत आपल्या विचारत मग्न झाली होती. तिला बघून सानिका म्हणली,
"साक्षी are u sure तु नक्की ठीक आहेस ? कारण तुला मी कॉलेज मधून आल्या पासून बघत्येय तू कसल्या तरी विचारात आहेस, तुला नसेल सांगायचं तर नो प्रॉब्लेम... "
”सानु देख तू मेरी सबसे अच्छी दोस्त हैं तुझसे क्या छुपाना मै सब कुछ बताऊंगी, मुझे प्लीज थोडा वक्त चाहिए !!” साक्षी सानिकाच्या हाताला पकडून बोलली..
संध्याकाळी कॉलेज सुटले तिघी ही एकत्रच रूम वर आल्या....फ्रेश झाल्या आणि साक्षी मोबाईल बघत होती सानिका हेडफोन्स लाऊन फेऱ्या घालत होती आणि रज्जो खाली चटई वर बसून काही तरी लिहीत बसली होती, साक्षी सर्वांना सांगते की त्या जिन्यावर तिने दोन मुली बघितल्या होत्या..
त्यांची पूर्ण इत्यंभूत माहिती सानिका आणि रज्जोला सांगते.रज्जो आधीच घाबरट त्यामुळे ती म्हणाली..
त्यांची पूर्ण इत्यंभूत माहिती सानिका आणि रज्जोला सांगते.रज्जो आधीच घाबरट त्यामुळे ती म्हणाली..
"ये काहीतरीच काय बोलते असे भूत बित काही नसते उगच तू आम्हाला भीती वगैरे दाखवू नकोस प्लीज." साक्षी रंजना चे हे वाक्य ऐकून सानिकाला आपली गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न करते.
" मै सच बोल रही हूं सानू, प्लीज मेरी बातो पर भरोसा कर, तुझसे क्यों झूट बोलू भला मै, मम्मी की कसम सानू वाहा पन कोई था !!" साक्षी आपल्या रडक्या आवाजात सांगत होती..सानिका हे भूत प्रकरण काही मनात न्हवती ती विज्ञानवादी होती पण साक्षी एवढी बिंधास पोरगी जात असे सांगत असेल तर काही तरी तथ्य असावे म्हणून ती तिला धीर देत म्हणाली...
"साक्षी, बघ तू जे काही बघितले त्याला मी नाकारत नाहीये, माझा या वर विश्वास नाही, परंतु मी तुझ्या बोलण्याचा विचार नक्की करेन रात्री आपण त्या जागेवर जाऊन बघू काही दिसतंय का ते, आणि काही दिसलाच तर वॉर्डन ल संगुयात."
सनिकाचा हा धीर देणारा आवाज ऐकून साक्षी थोडी शांत झाली. रंजना आणि साक्षी या दोन्ही मानव गणातील होत्या, सानिका ही देव गणाची असल्याने तिला या सर्वाचा काही फरक पडत न्हवता..सानिका ने ठरवल्या प्रमाणे या तिघी जेवल्या नंतर त्या जीन्या जवळ जाऊन उभ्या राहिल्या...सानिका एकटीच जिण्या वर चडत वर बघत आवाज देत जात होती...एकडे सानिका आणि रंजना एकमेकींच्या हाताला घट्ट पकडून सानिका कडे बघत होत्या..
सानिका आवाज देऊन खाली जिना उत्रत होती तेव्हा तिला बघून आणि मोठ्याने किंकाळी मारून रंजना धपकन खाली बेशुद्ध होऊन पडली...साक्षीच्या चेहरा पण ते दृश्य बघून पांढरा झाला होता. तोच तिला साक्षी आणि सानिका आपल्या खांद्यावर तिचा हाथ टाकून कसा बस खोलीत घेऊन जाते. तिच्या चेहऱ्यावर थांडपणी मारून उठवण्याचा प्रयत्न करते...त्यानंतर काही वेळाने रंजना आपल्या डोक्याला हात लावत उठण्याचा प्रयत्न करते...तोच तिला तो जुन्या जवळचं प्रसंग आठवतो..साक्षी तिला पाणी प्यायला देते...ती आता जरा सावध बसलेली होती, सानिका तिला विचारते,
"काय ग रज्जो आत्ता तर ठीक होती तू अचानक काय झाल तुला, अशक्तपणा पण नाही असू शकत हा आत्ताच जेवलो आपण मग काय झालं तुला अचानक...." सानिका रांजन च्या कपाळाला हाताने स्पर्श करत म्हणाली.
रज्जो आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसत होती...
ति काहीच बोलण्याचा मनस्थितीत न्हवती.. तोच साक्षी म्हणली "सानू तू जेव्हा जिना उतरून खाली येत होती तेव्हा दोन मुली तुझ्या मागे डाव्या आणि उजव्या हाताला पेटती मशाल घेऊन खाली उतर होत्या आणि तुझ्या खांद्यावर तिसरी मुलगी बसून येत होती...ते इतकं विभितसक आणि भयानक होत की माझ्या तोंडून काहीच आवाज नाही निघाला आणि रंजना चक्कर आली...
रज्जो आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसत होती...
ति काहीच बोलण्याचा मनस्थितीत न्हवती.. तोच साक्षी म्हणली "सानू तू जेव्हा जिना उतरून खाली येत होती तेव्हा दोन मुली तुझ्या मागे डाव्या आणि उजव्या हाताला पेटती मशाल घेऊन खाली उतर होत्या आणि तुझ्या खांद्यावर तिसरी मुलगी बसून येत होती...ते इतकं विभितसक आणि भयानक होत की माझ्या तोंडून काहीच आवाज नाही निघाला आणि रंजना चक्कर आली...
तिने जे बघितल ते खरंच अंगावर शहरे आणणारे होते...पुढे,
क्रमशः