साता जन्मिची साथ
अनिल आणि स्वाति एकाच कॉलेज मध्ये शिकायचे. दोघांचे प्रेम जमले. घरच्यांच्या विरोध|ला न जुमानत दोघानी लग्न केले. स्वाति घर संभालायची आणि अनिल ऑफिसात जीवतोड़ मेहनत करायचा. लग्ना नंतर 2 वर्षात त्यांना एक गोंडस मुलगा झाला त्याचे नाव ठेवले अश्विन. अश्विन 4 वर्षाचा असताना स्वातिच्या स्कूटरला एका भरधाव कार ची धडक बसल्याने ती जागीच ख़लास झाली. अनिल वर दु:खाचा डोंगर कोसलला.
अनिल आणि स्वाति एकाच कॉलेज मध्ये शिकायचे. दोघांचे प्रेम जमले. घरच्यांच्या विरोध|ला न जुमानत दोघानी लग्न केले. स्वाति घर संभालायची आणि अनिल ऑफिसात जीवतोड़ मेहनत करायचा. लग्ना नंतर 2 वर्षात त्यांना एक गोंडस मुलगा झाला त्याचे नाव ठेवले अश्विन. अश्विन 4 वर्षाचा असताना स्वातिच्या स्कूटरला एका भरधाव कार ची धडक बसल्याने ती जागीच ख़लास झाली. अनिल वर दु:खाचा डोंगर कोसलला.
ऑफिस, घर, लहान मूल हे सगले करताना त्याची तारांबल उड़ु लागली. स्वातिशी लग्न करताना “तू आमच्यासाठी मेला आणि आम्ही तुझ्यासाठी मेलो” असे म्हणनारे वडील अजूनही तसेच वागत होते. आईला लेकाची व नातवाची परिस्थिति शेजार्यांकडून समजली आणि ती अस्वस्थ झाली. पण अनिलच्या वडिलाच्या भीतीने ती गप्प होती. खूप इच्छा असुन सुद्धा लेकाचे लग्न पाहता न आल्याची सल आजही तिच्या मनात होती. तिने घाबरत अनिल ला फोन केला. अनिल माझ्या राजा, मी मनात असून सुद्धा तुझ्यासाठी काही करू शकत नाहीं रे. तू आता दूसरे लग्न करावे म्हणजे अश्विन चे हाल होणार नाहीत. दूसरी बायको म्हणजे आपल्या लेकाची सावत्र आई....... छे छे.... आई मी कामात आहे आपण नंतर बोलू असे म्हणून अनिल ने फोन ठेवला.
स्वाति ला जाऊन 4 महीने झालेले, पण ती कायम त्याच्या आसपास आहे असे त्याला नेहमी वाटायचे. तो आपल्या वेडया मनाची समजूत घालून पुन्हा कामाला लागायचा. त्या दिवशी संध्याकाली घरी आल्यावर स्वाति इथेच आहे आणि आपल्या भोवती अस्वस्थ होउन घिरट्या घालतिये असा भास त्याला होऊ लागला. पण हे सगले मनाचे खेल आहेत म्हणून त्याने त्या भावने कड़े दुर्लक्ष केले व भाजी-पोली केंद्रातून आणलेला डबा काढला. “अश्विन ये इकडे जेवायला” त्याने अश्विन ला हाक मारली पण अश्विन काही केल्या खोलितून बाहेर येईना. अनिल स्वत: बेडरूम मध्ये गेला. अश्विन शांत झोपलेला. स्वाति गेल्यापासून आज पहिल्यांदाच तो इतका शांत झोपलेला पाहून अनिल क्षणभर सुखावला. पण आज हा उपाशीच झोपला..... असो, नको उठवायला असा विचार करून अनिल बाहेर आला. डबा उघडून पाहतो तो त्याचा डबा रिकामा.... अश्विन उपाशी झोपलाय आता आपण पण उपाशी झोपू म्हणून त्याने डबा ठेउन दिला.
दुसरया दिवशी सकाली अनिल ने अश्विन ला विचारले “माझा राजा काल दमून लवकर झोपला न?” आणि त्याचे उत्तर ऐकून अनिल ला चक्कर यायचीच बाकी होती “बाबा काल आई मला गोष्टी सांगत होती, मग कधी झोप लागली समजलेच नाही” तरीही अनिलने स्वत:ल| सावरले आणि म्हणाला “पण उपाशी पोटी झोप कशी लागली तुला?” अनिलला दूसरा धक्का “आई ने मला पोली भाजी भरवली ना” छे-छे त्याने स्वप्न पाहिले असेल... असे म्हणून अनिलने त्याला तयार केले व पालनाघरात सोडले. पण स्वाति आणि त्या रिकाम्या डब्या चा विचार काय त्याच्या डोक्यातुन जाईना. हे कसे शक्य आहे????
अनिल ला दुसरयाच दिवशी ऑफिस टूर साठी परगावी जायची ऑर्डर मिलाली. दोनच दिवसाचा प्रश्न आहे म्हणून अश्विन ला श्रद्धा कडे, स्वातिच्या बहिणी कड़े सोडून अनिल निघून गेला. सेमिनार मध्ये अनिल ची ओलख नीताशी झाली. नीता आणि संदीप चा प्रेमविवाह झाला होता. त्यांच्या पत्रिका जुलत नसल्याने घरच्यांचा लागणाला विरोध होता. पण घरच्यांच्या विरोध|ला न जुमानत दोघानी लग्न केले. लग्नानंतर 6 महिन्यातच संदीप हरुदयविकारच्या झटकयाने अकस्मात मरण पावला. नीता मात्र खंबीर. तिने आपला जॉब म्हणजे आपले सर्वस्व मानून तिने स्वत: ला त्यात झोकुन दिले. दोघे समदू:खी आणि एकाच फील्ड मधले... सेमिनार चा पहिला दिवस संपवून दोघे संध्याकाली एकत्र जेवले.....प्रेमाचा अंकुर मनातून बाहेर डोकावत होता... पण सुरुवात कोण करणार? मोबाइल नंबर एक्सचेंज करून दोघे आपापल्या रुम वर निघून गेले.
टूर उरकुन 2 दिवसानी अनिल थेट श्रद्धा च्या घरी गेला. अश्विन एकदम शांत होता. निमुटपणे गाड़ीवर बसून घरी आला. तो वाटेत काहीच न|हीं बोलला. अनिलने डबा टेबलावर ठेवला आणि अंघोलीला गेला. तो आत जाऊन 2 च मिनिट झाले असतील तोच अश्विन जोरजोराने बाथरूम चे दार वाजवु लागला. “बाबा लवकर बाहेर या... बाबा या न.... तो मुलगा बघा न कसा करतोय.... बाबा किती वेल अंघोल करताय ” अनिल पटकन बाहेर आला “राजा काय झाला तुला?? इतका घाबरलेला का तू?” अश्विन घाबरुन सांगू लागला “बाबा माझ्या खोलित एक मुलगा आहे... मी झोपायला लागलों की तो माझे पाय ओढ़तों... आणि आज तर त्याने माझी सगली खेलणी इकडे तिकडे फेकुन दिली ” अनिल त्याला समजावण्याच्या सूरात म्हणाला “तुला पसारा आवरायचा नाही म्हणून तू असे बोलतोयस ना??” अश्विन रागात म्हणाला “तिकडे आई ला सांगयला गेलो तर म्हणते माझा स्वयंपाक होऊ दे मग बघू तुम्ही पण माझे ऐकत नाही”
अनिल स्वयंपाक घरात गेला तर स्वाति तिथे नव्हती पण शेगड़ी वर स्वयंपाकाची भांडी व गॅस पेटलेला दिसत होता..... अनिल मनातून घाबरला.... बाहेर येऊन तो अश्विन ला म्हणाला “आपण आता च्या आता या घरातून निघून जाऊया इथे भूत आहे.... तुझी आई गेली त्याला आता 4 महीने झाले आणि जी बाई तुला दिसते न, ती तुझी आई नाही रे....” इतक्यात लहानग्या अश्विन ने अनिल चा हात घट्ट पकडला..... “अश्विन अरे अस काय करतोस, आपल्याला निघायला उशीर होतोय, मी बैग भरतों आणि आपण आता च्या आता हे घर सोडून जाऊ... अरे माझा हात सोड ना रे असे काय करतोयस ?” अश्विन ने अनिल च्या डोल्यात डोले घालून पाहिले, अश्विनचे डोले लालबुंद झालेले आणि मोठे सुले दात दाखवत तो म्हणाला “जशी ती माझी आई नाही ना, तसा मी तरी तुमचा मुलगा कुठे आहे???? हा हा हा .......”
स्वाति वारली तरी ती मनाने इथेच होती. तिचा आत्मा अनिलच्या घरातच वावरत होता. माझा नवरा, माझा मुलगा हेच तिचे विश्व होते. सासुने दूसरे लग्न करायचा सल्ला देऊन सुद्धा आपल्या नवरयाने तो मानला नाही म्हणून तिचा आत्मा सुखावला होता.... त्याच रात्रि तिने अश्विनला पोली भाजी भरवली आणि थोपटुन झोपवले....
पन इकडे सेमिनार मध्ये नीता आणि अनिलच्यात फुलणारे नाते तिला टोचत होते.... माझ्या बालाची सावत्र आई........ तिच्या आत्म्याची लाही लाही झाली.... आणि तिने अश्विनला आपल्या सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, एका न संपनार्या प्रवासावर..... ज्यात तिच्या लेकाला कुठल्याच सावत्र आईची भीती नव्हती आणि त्यांना कोणी वेगले करू शकत नव्हते...
अश्विनच्या आत्म्याला तिने काल रात्रिच मुक्त केले शरीरातून.... पुढच्या प्रवासावर जाण्यासाठी.... पण तो जितका आपल्या आई चा होता तीतकाच आपल्या बाबाचा पण होता.... आणि म्हणूनच तो आलेला.... त्याच्या बाबाला सोबत न्यायला......पुढच्या प्रवासावर जाण्यासाठी......