गुप्तधन...
लेखक:- अंकुश सू. नवघरे. (पालघर)
प्रकाशन:- २०.११.२०१७
©Ankush S. Navghare ®२०१७
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
आज आपल्यासाठी जी कथा घेऊन आलोय ती ऐकीव कथा आहे आणि मला माझ्या आजोबांनी सांगितली होती. त्यांच्यामते ती सत्यकथा असून आमच्या भागातच घडलेली आहे. मागच्या माझ्या मुंगळ्या ह्या कथेत ज्या भागाचा उल्लेख आला होता त्याच भागातील डोंगराळ भागातूनच ह्या कथेचा उगम झाला आहे.
पालघर पासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात मनोर हे गाव वसलेले आहे. गाव तसे छोटेसे असले तरी लोकसंख्या जास्त आहे. गाव आत्ता आत्ता सुधारित होत आहे. गावात संमिश्र लोकसंख्या असून मारवाडी, गुजराती, यवन, भय्या, आदिवासी असे सर्वच जाती जमातीचे लोक तिथे राहतात त्याच प्रमाणे मनोर हीे एक छोटीशी बाजारपेठ प्रकारात येत असल्याने तिथे तालुक्याचा बाजार पण भरतो त्यावेळी आजूबाजूच्या गावातील काही लोक त्यांच्या त्यांच्या गावातील वस्तू विक्रीसाठी घेऊन येतात.
अशाच एका सकाळी बाजाराचा दिवस असल्या कारणाने गावातील प्रथिष्टीत मारवाड्याच्या दुकानात सामान लावण्याची वगैरे लगबग चालू असताना अचानक एक माणूस अनोळखी माणुस त्या दुकानात आला आणि तिकडच्या गड्याला म्हणाला की ... शेठ आहेत का? गडी म्हणाला के हवंय तुला काय पाहिजे? शेठ आज लईच घाईत आहेत! ...तालुक्याचा बाजार आहे तिकडे दुकान लावायच आहे म्हणून लगबग चालू आहे तर तू नंतर कधी ये. त्यावर तो म्हणाला की ... लईच महत्वाचं काम आहे. मला एकदा फकस्त मालकांना भेटू द्या. त्या माणसाने साधाच पोशाख केला होता. त्याच्या हातात एक कापडी पिशवी होती आणि त्या पिशवीत काहीतरी वस्तू गुंडाळून ठेवली होती.
तो त्या गड्याला फार विनवण्या करत होता परंतु गडी त्याला उभं राहून देत नव्हता म्हणून शेवटी तो नाईलाजाने जायला निघाला तेव्हा अचानक शेठ बाहेर आले आणि म्हणाले की काय गडबड आहे इकडे, कोण हा माणुस आहे ? त्याला जायला सांगायचं ना कशाला आपल्या कामात खोटी करतोय, असे म्हणत असतानाच त्या माणसाने शेठ चे पाय धरले आणि म्हणाला मालक एक वस्तू दाखवायची होती. एकदा बघून घ्या.. पुन्यांदा नाही येणार बघा. त्याने खूप विनवणी केली म्हणून शेठ नी शेवटी सांगितलं की बरं दाखव. असे म्हटल्याबरोबर त्याने त्याच्या हातात असलेली पिशवी उघडून शेठ ला त्यात डोकावयाला संगीतलं.
शेठ ने त्या पिशवीत डोकावून पाहिले असता अचानक त्याचे डोळे वीस्फरले गेले आणि तो त्या माणसाला म्हणाला चल आतल्या खोलीत चल असे म्हणून जवळपास त्याला ओढताच आतल्या खोलीत घेऊन गेला आणि गड्याला म्हणाला चंदू जरा लिंबू सरबत टाक आणि कोणालाही मला विचारल्या शिवाय आत सोडू नकोस. मालकाने विचारले कुठून आणले हे सर्व, चोरीचा माल नाही ना! आणि दरडावून बोलला की खरं खरं बोल नाहीतर पोलिसांच्या हवाली करीन. तो माणूस गयावया करत बोलला, नाही हो शेटजी हे मला सापडलं. शेठ म्हणाला असं कसं सापडलं, कुठे सापडलं? चल मला घेऊन चल तिकडे असे म्हणत त्याने टेबलावर त्याची पिशवी रिकामी केली तर काय, साधारणतः २ सेमी चौरस जाड आणि १५ सेमी लांब असा एक शुद्ध सोन्याचा कांब होता. तो शेठ त्या गरीब माणसाला सारख खोदून विचारत राहिला पण तो माणूस सारख इतकंच बोलत राहिला की, लालठेन च्या डोंगरावर गावल्या. त्याउपर तो काहीही बोलला नाही.
हा जास्त काही सांगणार नाही हे ताडून तो शेठ म्हणाला की, हा चोरीचा माल वाटतोय मी ह्याचे तुला जास्त पैसे देऊ शकणार नाही. त्यावर तो माणूस म्हणाला हा चोरीचा माल नाहीय मालक. तुम्हाला जेवढे देता येतील तेवढे द्या आणि काही राशन पाणी भरून द्या. ते त्या शेठजिच्या पाथ्यवरच पडले. ती कांब जवळजवळ १ किलो सोन्याची असेल. त्या शेठला वाटले ह्याला काय त्यातलं कळतंय चार पाच हजार देऊ आणि राशनपाणी देऊ भरून. शेठ त्या माणसाला म्हणाला ह्याचे मी तुला पाच हजार रुपये देईन आणि एक गाडी भरून राशन पाणि देईन. तो माणूस त्यात तयार झाला कारण की तसेही ते सर्व त्याला बाहेर विकता आलेच नसते असे त्याला वाटले. सौदा पूर्ण झाला, शेठजिने त्याला एक बैलगाडी भरून गहू तांदूळ तेल डाळी हे सर्वकाही दिले आणि वर ५००० रुपये देऊन म्हणाला की अजून असेल काही तर सांग. व्हय जी असे म्हणून तो माणूस जाता जाता म्हणाला की मालक हे तुम्ही ६ दिवसाच्या आत विकून टाकल तर बरं होईल करण की मी अस ऐकले आहे की अशा सोन्यावर काही श्राप पण असतात. त्यावर शेठ म्हणाला तुला काय त्याच्याशी तू तुझ्या वाटेने जा, मी माझं बघून घेईन काय ते. जशी तुमची मर्जी म्हणत तो माणूस आल्या वाटेने निघून गेला.
आज एकदमच नफ्याचा सौदा झाला म्हणून शेठ खूपच खुश होता. तो रातोरात लखपती झाला होता. परंतु त्याच्या मनात सारखे येत होते की हा तर फक्त एकच कांब आहे तिकडे असे अजून किती असतील. असेच ५ दिवस सरले आणि ६ व्या दिवशी रात्री तो ह्याचाच विचार करत करत झोपला असता त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात त्याला दिसले की जो सकाळ आलेला तोच माणूस कुठेतरी दूर जंगलात एक डोंगराच्या माथ्याच्या दिशेने चालला होता. त्याला पाहून शेठ ला आठवलं की अरे हा तर तोच त्या दिवशी आलेला माणूस. म्हणून शेठ त्याचा पाठलाग करू लागला असता त्याला दिसले की तो माणूस जंगलातून निघून डोंगरमाथ्यावर आला. तिकडे खूप दाट झाडी होती त्यातीलच एका झाडीत तो घुसला आणि त्याने एक मोठा दगड बाजूला सरकवला असता तिथे एक मोठं खिंडार पडलेलं दिसून आलं. ते खिंडार एक माणूस सहज आत जाईल इतकं मोठं होत. तो अलगद त्या खिंडारात गेला आणि त्याच्या मागोमाग शेठजी पण गेला. त्या खिंडरच्या आत एका बाजूला अजून झाडी उगवली होती ती त्याने बाजूला केली असता तिकडे एक खड्डा सारखा होता परंतु तो खड्डा नसून तिथे खालच्या बाजूला जाणाऱ्या पायऱ्या होत्या त्या कुठेतरी खोल डोंगराच्या आत गडप होत होत्या. सगळीकडे अंधार होता तरीही आजूबाजूच थोडाफार दिसत होते.
तो माणूस पायऱ्या उतरून जाऊ लागला आणि त्याच्या मागोमाग शेठजी जाऊ लागले. त्या पायऱ्या ज्या ठिकाणी संपल्या तिकडे एक मशाल ठेवलेली होती ती त्या माणसाने पेटविली असता समोर पाहतो तर काय सर्वत्र लखलखाट झाला. सगळी कडे खंडीभर सोने हिरे मोती सोन्याच्या काम्बी पडल्या होत्या. ति गुहा आतून खूप मोठी होती. तिच्या आत जागोजागी आरसे लावले होते आणि समोरच एक वेगळाच कुठल्यातरी देवाचा पुतळा होता आणि त्यासमोर एक हवनकुंड होते. तो माणूस त्या पुतळ्यासमोर येऊन उभा राहिला आणि त्याने हवनंकुंडात मंत्र पुटपुटत काही टाकले असता आग प्रज्वलित झाली. त्यानंतर तो त्या अग्नीत आहुत्या देऊ लागला असता अचानक एक मोठा भडका उडून ती आग विझून त्याच्या जागी एक आकृती दिसू लागली. त्या आकृतीला पाहून त्या माणसाने अभिवादन केले असता ती आकृति म्हणाली आज ६ दिवस झाले माझा बळी कुठे आहे. त्यावर तो माणूस म्हणाला की मालक मी ते सोन एका शेठजिला विकले आहे आणि त्याला ६ दिवसांच्या आत विकायला सांगितलंय, जर त्याने तसे नाही केले तर तुमचा बळी तुम्हाला मिळणार नक्कीच. ते ऐकून ती आकृती मोठमोठ्याने हसू लागली आणि म्हणाली के तसं नाही झालं तर तुझी खैर नाही.
तो सर्व प्रकार बघून त्या शेठजीला खूपच घाम फुटला कारण की तो ६ व दिवस होता आणि उद्या ७ वा दिवस उजडणार होता. शेठजी तिकडेच विचार करत करत उभा असताना स्वप्न तुटले. शेटजी धडपडत उठला पाहिले तर रात्रीचे १२ वाजून गेले होते. शेठजी ला खूप हायसे वाटले की १२ वाजून गेले म्हणजे आता दिवस बदलला आहे तरी कुठेच काही झाले नाही म्हणून त्याला खूप आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात तो नाचू लागला तितक्यात त्याच्या बायकोचा ओरडण्याचा आवाज येऊन तो भानावर आला आणि पाहतो तर काय छताला टांगलेला फॅन त्याच्या लहान मुलाच्या अंगावर पडून तो जागच्या जागी गतप्राण झाला होता. त्या दिवसानंतर त्या शेठ ला वेड लागले. त्याचे सर्व दुकान, मालमत्ता नष्ट झाले, त्याची बायको त्याचे आई वडील काही दिवसातच मरण पावले. तो नेहमी बडबडत लोकांना जे काही स्वप्नात दिसले ते सांगत असे परंतु कोणी त्याच्यावर कधी विश्वास ठेवला नाही परंतु माझ्या आजोबांनी ती सोन्याची कांब पहिली होती कारण माझे आजोबाचं त्या शेठजिकडे गडी म्हणून काम करत होते ज्याला त्या शेठजी ने लिंबू सरबत आणायला सांगितले होते. मी चौकशी केली असता गावातील काही जाणकार जुन्या लोकांकडून कळले की ह्याच्या लालठेन च्या सोन्यावरच्या भुताने करणी केलीय. आजही त्या सोन्याच्या शोधात कित्येक लोक जातात आणि आपला जीव गमावतात. गोष्टीची शहानिशा करण्यासाठी काही वर्षांपूर्वी मीही त्या जागेवर जाऊन आलोय. असे वाटते की नक्कीच तिकडे काहीतरी असावे परंतु पुढे जाण्याची हिम्मत झाली नाही कारण कदाचित कोणीतरी मागून हाक मारेल मालक मालक...
Disclaimer :- ज्याना श्रद्धा आहे त्यांनी ह्या गोष्टीकडे सत्यघटना म्हणूंन पहावी आणि ज्याना नाही त्यांनी कृपया काल्पनिक म्हणून पाहणे.
धन्यवाद...
अंकुश नवघरे.