✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
या कथेचा भाग - ८ ची लिंक खाली दिलेली आहे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
पण नंतर , जे घडू नये असे वाटत होते तिच घटना घडली अचानक. . . . .
अचानक साऱ्या टॉर्च एकसाथ बंद पडल्या. पूर्ण काळोख काळोख झाला. सगळेच आधी घाबरले होते. जेन ने वॉकीटॉकी वरून वरच्या टीम बरोबर संपर्क साधण्याचा यत्न केला पण सर्व फोल ठरले. सर्व वॉकीटॉकी सुध्दा बंद पडले. एकही काम करत नव्हता. तेव्हा सर्वांना समजले एक तर आता आपण इथून जिवंत बाहेर पडू अन्यथा मरून. काळोखात सगळे एकमेकांचा हात हातात धरून, धीर देत एकाजागी उभे होते. जेन आणि मेरी खूप बिथरून गेले होते पण कोलमडून गेले नव्हते. त्यांची आतली मनाची शक्ती त्यांना लढण्याचं बळं देत होती. त्याच शक्तीच्या जोरावर आणि प्रभू येशूच्या पावित्र्याने त्यांना यश मिळण्याची प्रेरणा मिळत होती. वर दिवस उजाडला होता आणि खाली मात्र त्या सर्वांसाठी काळाकभिन्न सैतान रात्र बनून अमावस्या झालेला होता.....
मुख्य दरवाजा उघडला होता. त्यातून लाल रंग बाहेर पडू लागला होता. काळोख्या रंगातून लाल दोन डोळे दिसू लागले. मेरी किंचाळली, कामगार सुध्दा ओरडले, जेन ने दोघांनाही थांबवले. ती वेळ अस दचकून जाण्याची नव्हती. सर्वांना धीर देत जेन ने आपलस केल. शेवटी ती ही माणसचं होती , त्यांनाही कोणीतरी धीर देण्याची गरज होती.जेन ला आठवले ते मेरीच्या आजीच्या डायरीतले नक्षी चिन्हे आणि तिथल्या दगडावरील नक्षी चिन्हे तंतोतंत जुळत होती. त्याने एका कामगाराला शिडी ने वर पाठवून मेरी ची ती डायरी आणायला सांगितली. कामगार अगदी चपळाईने शिडी चढून वर गेला आणि धावत जाऊन त्याने मेरीच्या तंबूतून तिच्या आजची डायरी आणली. शिडी उतरुन खाली आला, त्याने ती डायरी तिथूनच जेन च्या हातात फेकली. जेन घाईघाईने ती पाने पलटू लागला. कधी एकदा ते पान हाताला लागत आहे आणि त्या नक्षी पाहत आहे असे त्याला झाले होते. भरभर वेगाने हातांच्या पाचही बोटांचा आधार घेऊन तो पाने चाळू लागला. पाने उलगडता उलगडता त्याच्या हाताला ते पान लागले आणि नक्षी भरलेलं ते पान समोर उभ ठाकल. . . . .असंख्य नक्षी भरलेल्या होत्या ,चित्र विचित्र चिन्हे होती . अगदी जशीच्या तशी ती मंदिराच्या खांबांवर , दगडांवर रेखटलेली होती.
ती डायरी घेऊन जेन मंदिराच्या मुख्य दरवाजाकडे निघाला. सर्वांना आपल्या सोबत घेऊन त्यांच्या मनाला खंबीर करून तो सावधान गिरीने आणि आत्मविश्वासाने भरून एक एक पाऊल टाकू लागला.मुख्य दरवाजा सताड उघडा पडला होता. आतून दिसणारे लालबुंद डोळे सर्वांच्याच नजरेत धडकी भरवत होते. जेन आणि सर्व जण हळूहळू पुढे पुढे सरकू लागले. मुख्य दरवाजाच्या आत चार खांब पसरले होते. आणि त्याच्या मधोमध होते या सर्वांचे भविष्य. मधोमध एक विचित्र प्रकारची भयानक विद्या मांडली होती. एक मोठा वर्तुळ त्या वर्तुळामध्ये दोन त्रिकोण मांडले होते. एक त्रिकोण सरळ एक त्रिकोण उलटा . जिथे जिथे त्रिकोण वर्तुळाला स्पर्श करत होते तिथे अनेक कुंड होती. त्या त्रिकोण, वर्तुळ आणि सर्व कुंडाच्या मधोमध एक जांभळट दगड ठेवण्यात आला होता आणि त्या दगडाच्या मध्ये ठेवण्यात आली होती एक विचित्र भयानक मूर्ती. मूर्तीला मोठे डोळे, कान ,नाक एवढेच अवयव होते. फक्त तिचं मुंडकं तिथे ठेवलेलं होतं. काळोख असल्या कारणाने काही दिसत नव्हते. जेन आणि सर्वांना धडकी भरली. आता आपलं काय होणार ? ह्या कल्पनेने सर्वांना घाम फुटला. . . .
जेन ने डायरी उघडली , ते पान उघडलं. एकेक नक्षी चिन्हं तो न्याहाळू लागला. त्याला अंताला पोहोचायचे होते.तो शेवटपर्यंत यत्न करीत होता. त्याने चांगलीच कंबर कसली होती. शेवटी संघाचा प्रमुख म्हणून त्याची जबाबदारी देखील होती कि त्या सर्वांना त्या संकटातून बाहेर काढणे. अचानक त्याला काही जाणवलं. तो जे पान वर उघडून बसला होता त्या पानाला आतून एक गुप्त लिफाफा होता. त्याने तो बाहेर काढला जळकट मळकट झालेला तो लिफाफा काहीतरी गुप्त रहस्य उलगडणार असे जेन ला सांगत होता. लिफाफा उघडला, त्यात असणारा अगदी-अगदी जुनाट कागद जेन ने बाहेर काढला. तो संपूर्ण मोकळा केला आणि दोन्ही हातात धरून ताणून धरला आणि तो वाचू लागला. काही विचित्र चीन्हांनी युक्त असे ते पान होते. वाचता वाचता जेन ची नजर पानाच्या खाली टोकाला गेली आणि जेन हादरला. त्या पानाच्या खाली त्याच मूर्ती च चित्र काढलं होतं जे समोर मांडलेल्या विद्येत वर्तुळात ठेवलं होतं. त्याच्या खाली त्याबद्दल ची माहिती लिहिली होती. मुर्तिखाली एक नाव लिहिले होते. . . . ."Purson". . . !!
त्याखाली लिहिले होते. . . "He is a 4th king. He is a demon.he always harmfull for humans.give the sound of trumpet. He know well what u want .he have a lion head and drive on bear. If we take him for worship, then He give us what we want. He want blood."
( "परसन" चौथा राजा आहे , तो महाबलशाली सैतान आहे. तो मानवासाठी नेहमीच दगा देणारा आणि त्रास देणारा आहे. तो ट्रंपेट वाजवत असतो . त्याला पूर्ण ज्ञात असतं तुम्हाला काय हवय ते . त्याचं शीर वाघाचं असतं आणि तो अस्वला वर स्वार झालेला असतो. आपण समजा या सैतानाची पूजा केली तर तो आपल्याला हवं ते देतो. त्याला रक्त हवं असत.)
ते ऐकून सर्वच चकित झाले. इतका भयानक सैतान आहे , हे त्यांना समजले होते. करायचे काय ? ह्याच विचारात असताना वर्तुळातील कुंडा मध्ये आपोआप अग्नी प्रज्वलित झाले. धगधगत्या अग्निने संपूर्ण काळोखाला जाळून टाकले आणि समोर नजरेत मावले ते परसर चे वाघाचे मुख्य असलेले मुंडके. अग्निचा प्रकाश पडल्याने सार लख्ख दिसत होतं. सर्वजण जागच्या जागी मागे उडाले. त्या वेळेला प्रत्येकाला प्रश्न पडले होते . . .
१) परसन ही विद्या मांडून काय करणार नेमक ?
२) तो प्रकट झाला तर आपण काय उपाय करणार ?
३) त्याला नेमक काय हवय ?
४) मेरीच्या आजीच्या डायरीत ह्याचा उल्लेख का ?
२) तो प्रकट झाला तर आपण काय उपाय करणार ?
३) त्याला नेमक काय हवय ?
४) मेरीच्या आजीच्या डायरीत ह्याचा उल्लेख का ?
प्रश्नांचे मनोरे असे डोळ्यांदेखत रचू लागले. आपल्याला कोण वाचवेल ? येशु ? जेन ? रेजिका ? मेलेले कामगार की स्वतः मेरी ? प्रश्नार्थक नजरेने इकडे तिकडे भिरभिरत असतानाच त्या त्रिकोणी वर्तुळातील विद्येत त्या मधल्या दगडावरील मुंडक्या जवळ काळी सावली जमा होऊ लागली. झरझर झरझर वेगाने ती काळी सावली आकार घेऊ लागले. सगळे प्रचंड घाबरले. . . . बघता बघता त्या काळ्या सावलीने संपूर्ण रूप धारण केले आणि त्या वर्तुळाच्या मधोमध उभी झाली....
ते दृष्य जेव्हा प्रत्येकाने पाहिले आणि त्या सावलीचा चेहरा जेव्हा दिसला , तेव्हा प्रत्येकाला आश्चर्याचा धक्काच बसला. . समोर होतं. . . !!
कथेचा महाअंतिम भाग - १० पुढील टप्प्यात
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
( माझ्या भयकथे व्यतिरिक्त इतरही कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा , आनंद घ्या ...)
(अमर्याद रचना वाचा , मित्रांसोबत शेयर करा )
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
@_by_Chetan_Salkar