ते कोण होते...????(भयकथा)
+++++++++++++++++++++
(लेखिका-निशा सोनटक्के)
*****************************************

रात्रीचा दीड वाजला होता...मी नोट्स काढत होते. लग्नानंतर मला नवऱ्याने पुढील शिक्षणासाठी
परवांगी दिली होती.मी डाॅक्टरेट करत होते.... मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असे...माझ्या
सासऱ्यांना माझे भारी कौतुक.... रात्री टाॅयलेटला आले की नेहमी माझ्याजवळ ऊभे
राहून कौतुकाने बघायचे.... माझ्या सासरी फारसे कुणी शिकले नाहीत. पण मी डाॅक्टरेट होते....याचा माझ्या सासऱ्यांना खूप
अभिमान होता..आपल्या पोटच्या मुलीसारखे ते माझ्यावर प्रेम करायचे... आत्तासुध्दा मी वाचता,,,वाचता वर पाहिले तर....
मला पांढरेशुभ्र कपडे घातलेले कुणीतरी माझ्या जवळ येऊन वाकून पहात आहे...असे वाटले.... त्यानंतर मी बोलले...
"बाबा.... अजुनही झोपला नाहीत का...???" उत्तरच नाही.. वर बघते तर कुणीच नाही... एवढ्यात टाॅयलेटची कडी काढल्याचा आवाज... आतमध्ये पाण्याचा आवाज...मला वाटले ते टाॅयलेटमध्ये गेले असतील.... बराच वेळ पाण्याचा आवाज येतच राहिला.... मी टाॅयलेटपाशी गेले तर आत दिवा नाही.काळोख होता.मी दिवा लावला....दार ऊघडले आतमध्ये कुणीच नाही...बाहेर आले तर.... बेडवर सासरे गाढ झोपले होते... सासूबाई खाली गादीवर गाढ झोपल्या होत्या...
बेडरूममध्ये गेले तर नवरा मुलांना कुशीत घेऊन गाढ झोपला होता.. मग टाॅयलेटमध्ये कोण होते....???? माझ्याकडे कोण बघत होते...??? मी दिवा लावला सासऱ्यांना ऊठवले....आणि विचारले... "आत्ता तुंम्ही टाॅयलेटला गेला होतात का...???"
ते बोलले " नाही गं....मला आज झोपेची गोळी घेतल्याने गाढ झोप लागली होती....!!!!""
मी चांगलीच चपापले....परत घरात सगळीकडे जाऊन पाहिले कुणीही नव्हते..... मी घरात कुणाला काही बोललेच नाही.....
पण कुणीतरी मला बघत होते.कुणीतरी टाॅयलेटला गेले होते....मग ते कोण होते....???? एके दिवशी दुपारी मी कपडे वाळत टाकत होते. मुले बाहेर गेली होती....नवरा पण घरात नव्हता.... सासूबाई स्वयंपाक करत होत्या....माझ्या. समोरच

सासरे हाॅलमधे बसले होते.पेपर वाचत होते..... मी काठीने कपडे वाळत घालत असतानाच......पटकन पांढरे कपडे घातलेले कुणीतरी आमच्या बेडरुममध्ये चालत जाताना दिसले....मला त्या क्षणी सासरेच वाटले....पण पटकन लक्षात आले....ते कधीच आमच्या बेडरुममध्ये जात नाहीत..... काही गरजच नाही....ते हाॅल मधेच असतात. त्यांना काही हवे असेल तर आंम्हाला मागतात....मी पटकन हाॅलमध्ये पाहिले....तर तिथे सासरे शांतपणे पेपर वाचत होते....मी बेडरूम मध्ये जाऊन पाहिले तर कुणीही नव्हते... आता मला रात्री अभ्यासाला बसायची भिती वाटायला लागली. शनिवार,,,आमावस्या... हमखास असे भास व्हायला लागले. कधी कधी तर एक पांढरीशुभ्र आकृती सरळ चालत भिंतीतून आरपार जात असे.तर,कधी किचनमधून भांड्यांचे आवाज येत असत...तिकडे जाऊन बघावे तर कुणीच नाही ..... या घरात हे कोण आहे????
एके दिवशी सासरे... सासूबाई शी बोलताना मी ऐकले... ते सांगत होते....की रात्री अपरात्री त्यांना जाग येते.
..घरात सगळे झोपलेले असतात....अणि बाहेर सफेद कपडे घातलेले....म्हातारे गृहस्थ फिरतात....त्यांच्या हातात
काठी असते... पांढऱ्याशुभ्र मिशा...आणि ते फेऱ्या मारत असतात.... सासूबाई पण सांगत होत्या ...रात्री उशिरा येणाऱ्या

सोसायटीतल्या लोकांना पण हे दिसलेय....हे काहीतरी अमानवी असावे असे वाटते....कुणाची तरी इच्छा राहिली
हो.....कोण असेल...???इच्छा अतृप्त रहिली तर खरचं माणसे भूत योनीत जात असावीत याची मला खात्री पटायला
लागली. आणि तो दिवस ......मी आणि माझा नवरा बाहेरगावाहून येत होतो. रात्रीचे दोन वाजले होते.आंम्ही टॅक्सी तून ऊतरलो तर गॅलरीतून बाबा आमची वाट पहाताना दिसले...अहोंनी त्यांना हात केला...पण मी चपापले...कारण बाबा नसणार
असे जाणवले...कारण मला ते दिसणारे पांढरे,,,पारदर्शक असावे असेच मला जाणवले... आंम्ही जीना चढून वर आलो तर घराला कुलूप.... आई,बाबा,मुले गेले कुठे????हे तर विचारत होते.. बाबांना कोंडून आई मुले कुठे गेले....????

मला तर जाम भिती वाटली... आमच्याकडे सतत घराची एक चावी असतेच...तिने आंम्ही दरवाजा ऊघडला....घरात सगळीकडे पाहिले कुणीच नव्हते.... गॅलरीत तर बाबा नव्हतेच....आता तर अहो पण माझ्याशी खूप आश्र्चर्यचकित होऊन बोलत होते.
त्यात काळजी पण वाटत होती...सगळे गेले कुठे???? तिथे जवळच माझी नणंद राहते तिला फोन लावायला गेलो तर बॅटरी संपलेली.... मी हाॅलमध्ये जाऊन दोन्ही फोन चार्जिंग ला लावले.... आणि वळणार तर मला खिडकीच्या काचेवर दोन काळे हात

दिसले....माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली.....अहोंनी मला सावरले....तसे काही नाही ....बघ खिडकीत कोणी नाही
असे समजावले.....मी बघितले....तर खरचं खिडकीत कुणीच नव्हते.... एवढ्यात फोन वाजला... माझी नणंदच बोलत होती....आमचा फोन लागत नव्हता... किती प्रयत्न केले...बोलत होती... """काल रात्री आठ वाजता बाबांना अॅटॅक आला.... म्हणून हाॅस्पिटलला अॅडमीट केले....आंम्ही सगळे तिकडेच आहोत. बाबांना दैवाज्ञा झाली.....तुंम्ही निघा...!!!!""
आंम्ही धावत निघालो... सगळे विधी पार पडले..... आता घरात सगळेच जमले होते.... तेव्हा अहोंनीच विषय

काढला....की त्या रात्री आंम्हाला गॅलरीत बाबा दिसले ... त्यावर सगळे बोलत होते....बाबा तुमची खूप आठवण
काढत होते....बाबांची इच्छा राहिली आहे....बघा कावळा पण पिंडाला शिवला नाही.... मी स्तब्धच राहिले... मी पण मला जे दिसायचे ते बोलले... त्यावर आमच्या चुलत सासूबाई बोलल्या.... ""घराभोवती मृत्यू फिरत होता....तो त्यांच्या रूपात तुला

दिसला.....जे माणूस जाणार आहे....त्याच्याच रूपात तुला दिसला....आता घाबरू नकोस...रोज ऊदबत्ती लावून रामरक्षा म्हण....अशा बाधा निघून जातात....रामरक्षा अतिशय प्रभावी आहे...!!!.""" मी नियमितपणे. रामरक्षा म्हणते.....
आता ते भास होत नाहीत..... तरीही मला एक कोडे उलगडत नाही....की.... सोसायटीच्या लोकांना.... सफेद कपड्यात कोण दिसते???जे आमच्या बाबांनाही दिसले???? मृत्यू बाबांना घेऊन गेला तरी मला खिडकीच्या काचेवर कुणाचे काळे हात दिसले???? खरच हे सगळे अनाकलनीय आहे.... अमानवीआहे.... भीतीदायक आहे.....
समाप्त निशा सोनटक्के
समाप्त निशा सोनटक्के