न_जन्मलेल्या -लघुकथा -लेखन :- शशांक सुर्वे
(वैद्यकीय क्षेत्रातील काही गोष्टी तसेच उपकरणांची नावे मला माहित नाहीत त्यामुळे आशा आहे आपण समजून घ्याल)
गाडीचा वायपर अखंड चालू होता....पण पावसाच्या मोठ्या थेंबाना बाजूला करून आपल्या मालकाला स्वच्छ काच देणे त्यालाही शक्य होत नव्हते....अरविंद चिडला होता....आधीच कसल्यातरी टेन्शन मध्ये त्याने गाडीचा स्पीड वाढवला होता.....अपॉइंटमेंट दुपारी 12 ची होती आणि घडयाळाचा काटा तर बाहेर पडणाऱ्या पावसापेक्षा जास्त स्पीड ने पुढे जात होता.....अरविंदच्या तोंडून पावसासाठी शिव्या बाहेर पडत होत्या
"च्यायला....ह्या पावसाला पण आताच यायचं होतं....हे xxx सरकार रस्ता कधी करणार काय माहीत पाठीचा पाक भुगा झाला.....ये अंजे रिपोर्ट घेतले आहेस ना??नाहीतर मागच्या वेळसारखी करायचीस"
इतर वेळी नवऱ्याचा एकही शब्द खाली पडू न देता एखाद्या चाबकाच्या फटक्यानां घाबरून राहणाऱ्या गुलामासारखी ती नवऱ्याच्या आजूबाजूला असायची त्याची प्रत्येक गोष्ट ऐकायची....पण गाडीच्या टपावर पडणाऱ्या टपोऱ्या थेंबांच्या आवाजामुळे आणि तिच्या अंतर्मनातील स्वतःच्या आवाजामुळे तिच्या नवऱ्याची निरर्थक बडबड तिला ऐकू येईनाशी झाली....तिचं लक्ष बाहेर होतं....बाहेरचा हिरवा निसर्ग तिच्या डोळ्यांना सुखावत नव्हता.....ती झाडाची गर्दी कधी संपूच नये असे तिला वाटत होते.....अंजली ही अरविंदची दुसरी बायको......आईवडिलांचे छत्र लहानपणीच हरपलेली.....मामाने तिला लहानाची मोठ्ठी केली.....आणि एका मोठ्या फॅक्टरी आणि अमाप संपत्तीचा मालक असलेल्या अरविंद देसाईशी तिचे लग्न लावून दिले.....अंजलीचा मामा अरविंदच्या फॅक्टरीत कामाला होता....अरविंदचा तापट आणि हेकेखोर स्वभाव अंजलीच्या मामाला माहीत होता.....तरी अंजलीच्या सुखासाठी त्याने अंजलीचे लग्न अरविंदशी लावून दिले...त्याच्या मोबदला सुद्धा मामाला मिळाला होता...अरविंद कमालीचा तापट होता तशी त्याची आईपण होती.....त्या दोघांच्या स्वभावात अंजलीची मात्र प्रचंड घुसमट होत होती.....ती आणि तिची एक मुलगी अगदी घाबरून घाबरून रहायच्या.....त्यातच अरविंद आणि त्याच्या आईचा अंजिलीला "मुलगा हवा" ह्या मागणीसाठी प्रचंड छळ असायचा........ते गरम सिगारेट चे चटके सासूचे काळजाला घाव करतील असे तिखट बोलणे ती सहन करत "आलीया भोगासी" अस जगत होती.....पण हिरव्या झाडांनी नटलेला तो रस्ता तिला काटेरी वाटत होता.....तिच्या डोळ्यातील दुःख पाऊस होऊन बरसत होते....."आता काय होणार?....आता पोटात मुलगाच असू दे" अशी विनवणी ती देवाला करत होती.....तिचा हात आपोआप जोडला जात होता....त्या दवाखान्यात ती तिसऱ्यांदा जात होती तिथला तो रक्तस्त्राव वेदना सहन करण्यापलीकडच्या होत्या....त्या वेदनेहून एका कोवळ्या निष्पाप जीवाचा आपल्या पोटच्या गोळ्याचा बळी जातोय ही आंतरिक वेदना तिला कायम त्रास देत होती......पण ह्या प्रश्नावर तिच्याकडे उत्तर म्हणून परत एक प्रश्न होताच.....माझंच नशीब फुटकं त्याला आपण काय करणार?.....पुढे बसलेल्या अरविंदच्या सिगारेट च्या धुरात तिला आपल्या आयुष्याची झालेली राख दिसत होती
अचानक गाडीमध्ये धक्के जाणवू लागले....प्रत्येक धक्क्याबरोबर अरविंदच्या तोंडून बाहेर पडणारी ती शिवी त्याला आलेला राग दर्शवत होती....आता पुढे काय होणार?? अंजलीच्या मनात धडधड होती.....कारण कालच तिने त्याचा प्रचंड मार खाल्ला होता....अरविंदने धाडकन कार चे दार उघडले.....धो धो पडणार पाऊण काही सेकंदात त्याला पूर्ण भिजवून गेला....तो धावत धावत गेला....आणि पुढे जाऊन कारचे बोनेट उघडले आणि चेक करू लागला....कारण ह्या घाटात एखादा मॅकेनिक किंवा मदत मिळणे अशक्य होते.....तो बाहेर जाऊन बोनेट च्या पत्र्याला छत्री बनवून प्रॉब्लेम शोधू लागला.....तिकडे अंजलीला वेगळीच काळजी होती.....मनात आपण एका निष्पाप जीवाचे खुनी आहोत असा भावना तिला खूप त्रास देत होती.....त्या पावसाच्या भयानक रिपरिपी मध्ये कसला तरी आवाज तिला आला.......एक निरागस मनमोकळं बालहास्य त्या पावसाच्या आवाजाला छेदत तिच्या कानावर पडलं...."इतक्या पावसात??आणि तेही लहान मुलं??" अंजलीची नजर तो आवाज शोधत होती....तिची नजर एका झाडाजवळ स्थिरावली....त्या झाडामागून कोणीतरी डोकावून बघत होत.....झाडामागे लपून एका बाजूला झुकलेले ते लांबलचक केस आणि चोरून बघणारा तो एक डोळा.....अंजलीला आश्चर्य वाटलं....तिने आजूबाजूला बघितलं आसपास कोणीच नव्हतं.......ती दुसऱ्या बाजूला बघू लागली पण तिथेही कुणीच नव्हतं.....अचानक अंजलीची मान त्या झाडाकडे फिरली....आणि ती जागेवरून उडालीच.....एक 4 वर्षाआसपासची मुलगी अचानक तिच्या बाजूला बसली होती.....तिला बघून अंजली घाबरली....ती अरविंद कडे बघून किंचाळणार तितक्यात अचानक गाडीच्या काचा आपोआप बंद झाल्या.....ती मुलगी खूपच भयानक दिसत होती....त्या लहान मुलीच्या अंगावर एकही कपडा नव्हता....फक्त एकच पांढरे कापड जे मातीने लाल भडक झाले होते....ते कापड तिचे शरीर झाकू शकत नव्हते....अर्धवट झाकलेल्या शरीरावर सगळीकडे माती लागली होती.....तिचे ते मोकळे केस मातीने चिकट झाले होते.....तिने आपल्या खरवरीत हाताने अंजलीचा हात पकडला.....तिचा तो थंडगार हाताने त्या पावसात सुद्धा अंजलीला घाम फुटला.....त्या भयाण मुलीची नजर अंजलीच्या पोटावर पडली..त्या मुलीला कसला तरी वास आला...तिने एकनजर अंजलीकडे बघितले.....त्या भयानक आणि विद्रुप चेहऱ्यावर तिला केविलवाणे भाव दिसले ....कुणीतरी भेटल्याचा आनंद तिच्या त्या क्रूर चेहऱ्यावर होता त्या मुलीचे पांढरेफेक डोळे आणि पापण्यांची होणारी हालचाल अंजलीला काहीतरी सांगत होती......तिने अंजलीचा हात सोडला आणि गाडीचा दरवाजा न उघडता ती गाडीच्या आरपार बाहेर गेली.....तिने एकनजर अंजलीकडे बघितले.....तो विद्रुप चेहरा तिला आपुलकीचा वाटला.....ती मुलगी आता त्या जंगलात जाऊ लागली.....क्षणाचाही विचार न करता अंजली त्या मुलीच्या मागे मागे चालू लागली.....अरविंद अजूनही गाडी ठीक करण्यात गुंतला होताच.....पण अंजली अचानक त्याला विसरून तिच्या मागे चालू लागली....उतरती वरून चालत असताना रस्त्यावरचे पाणी छोट्या धबधब्याचा आकार घेऊन वाहत होते....अंजली त्यातून वाट काढत त्या मुलीच्या मागे चालत होती.....विशेष म्हणजे त्या मुलीच्या अंगावर पावसाचा एकही थेंब पडत नव्हता....तिच्या अंगावरची माती तशीच कोरडी होती.....एखादा जन्मजात शाप मिळावा तशी......थोड्या उंचीवर जाऊन ती मुलगी थांबली.....अंजली मागे थांबली होती....त्या मुलीने अंजलीला जवळ येण्याचा इशारा केला....तशी अंजली पुढे आली.....तिचे लक्ष त्या मुलीच्या बोटाकडे होते काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न ती करत होती.....अंजलीचा नजर समोरच्या एका खड्यावर गेली....आणि ती खाली कोसळली.....त्या खड्यात अनेक लहान लहान न वाढलेले अर्भक आणि छोटे छोटे हाडाचे सांगाडे पडले होते.......अंजली समोरच दृश्य बघून खाली पडली तिच्या तोंडातून किंचाळी बाहेर पडली.....आजूबाजूचा चिखल तिच्या साडीला अंगाला लागला होता.....ती सरपटत जाऊ लागली.....समोरच्या रस्त्यावर अरविंद गाडीत काहीतरी करत असताना तिला दिसत होता....पण अचानक त्या खड्यातून तिचा पाय कुणीतरी पकडला.....तिची मान मागे फिरली....एक छोटा हात तिचा पाय खेचत होता....त्या छोट्या हातामध्ये एक अमानवी शक्ती होतीच....तिने अक्षरशः अंजलीला फरफटत त्या खड्यात ओढले.....ती त्या खड्यात ओढली गेली आजूबाजूच्या छोट्या सांगाड्यावर पडून तिच्या पाठीत काहीतरी घुसलं.....ती तळमळली त्या खड्ड्याच्या कोपर्याचा आधार घेत ती कोपऱ्यात बसली....दंडात घुसलेले छोटे हाड तिने उपसून काढले.....समोर तीच मुलगी बाजूला अजून एक दीड दोन वर्षांची मुलगी मातीने माखलेली तिच्याकडे बघून हसत होती........त्या खड्ड्यात त्या मुलींचे चेहरे स्पष्ट दिसत होते.....त्या दोघींच्या चेहऱ्यावरची विद्रूपता काही अंशी कमी झाली होती.....त्या दोघी थोड्याफार अंजली सारख्या दिसत होत्या.....अंजली घाबरली होती.....अचानक त्या खड्ड्यात गारवा जाणवू लागला.....त्या खड्यात पडणाऱ्या पाण्याने अंजली पूर्णपणे भिजली होती आजूबाजूला ती छोटी मृत अर्भक तरंगत होती....अचानक त्या साचलेल्या पाण्याचा रंग बदलू लागला....त्या पाण्याची जागा आता रक्ताने घेतली होती.....अंजली किंचाळू लागली.....त्या मुली तिच्या जवळ आल्या मोठया मुलीने तिच्या गालावरून हात फिरवायला सुरवात केली.....लहान मुलगी तिच्या जवळ येऊन बसली......आसपासचे दृश्य अंजलीला सहन करण्या पलीकडचे होते......त्या निर्जीव अर्भकामध्ये अचानक जीव येत होता.....अंजली किंचाळली....त्याचबरोबर त्या मुलींच्या अंगातून धूर निघू लागला.....अंजली हलू शकत नव्हती.....तो धूर अचानक अंजलीच्या तोंडात शिरू लागला.....तिचे डोळे विस्फारले......काही क्षणातच त्या मुली तिथून गायब झाल्या.....अंजलीने मान टाकली.....तिचे अंग थरथरू लागलं....त्या खड्ड्यातील लाल रक्त तिच्या थरथरन्याने उसळत होते.....अचानक ती शांत झाली....तिने डोळे उघडले....बुब्बुळाचा रंग बदललेला होता ती त्या खड्ड्यातुन उठून उभी राहिली आणि खड्ड्याकडे बघून कसलातरी इशारा केला आणि ती संथपणे चालू लागली.....तिच्या अंगावर पडणाऱ्या पावसाच्या सरी तो चिखल धुवून टाकत होत्या.....ती हळूहळू चालत चालत गाडीजवळ आली....आणि दरवाजा उघडून गाडीत बसली......अंजलीचं अंग प्रचंड गरम झालं होतं.....तिच्या शरीरातून वाफा निघत होत्या....अंगावरचे पाणी कधीच वाफ बनलं होतं......तिची पापणी सुद्धा मिटत नव्हती....ती जोरात श्वास घेत होती.....बोनेट झाकले गेले....अरविंद ने गाडी दुरुस्त केली होती.....बाजूला वाहणाऱ्या झऱ्यात त्याने आपले काळे हात धुवून घेतले.....तो गाडीत येऊन बसला

"ह्या गाडीच्या xxx xx .....परवाच नवीन घेतली होती....घरी जाऊ दे त्या मोटार मालकाला बरोबर xx लावतो...."
मागून आवाज येत नव्हता.....हे पहिल्यांदा होत होत....अरविंदच्या प्रत्येक शब्दाची रेघ पुढे ओढणारी अंजली आज शांत होती.....कारण विचारायला अरविंद कडे वेळ नव्हता....आणि गरजही नव्हती.....गाडी पुढे जाऊ लागली....अरविंदला रहावत नव्हतं....तो मिरर मधून अंजली कडे बघायचा पण अंजलीची नजर पापणी न मिटता अरविंदवर होती.....वेडेवाकडे घाट पार करून गाडी एका टेकडावर पोहोचली......पाऊस अजूनही थांबण्याचं नाव घेत नव्हता.....कसल्या तरी जुन्या पडक्या बंद पडलेल्या कन्स्ट्रक्शन जवळ ते आले होते...अरविंदने गाडी थांबवली तशी अंजली लगेच दार उघडून खाली उतरली.....अरविंद सुद्धा मागोमाग उतरला.....5 मजली बंद कन्स्ट्रक्शन....पण ह्या वर्षी पडलेल्या मोठया पावसामुळे आजूबाजूला पाणी साठले होते...अरविंद अंजली जवळ गेला....अंजली मान वर करून एकटक त्या वरच्या मजल्यावर बघत होती
"ए....डोकं फिरलं की काय आज तुझं....मगापासून एक शब्द नाही तोंडातून....ही तुझी नाटकं मला चालणार नाहीत हा.....ह्यावेळी पण पोरगी असेल तर.................."
"तर" च्या पुढे काही बोलणार इतक्यात अंजलीची भेदक नजर अरविंदवर पडली.....अरविंद दचकला.....त्या नजरेत एक वेगळीच आग होती....अंजली काही न बोलता त्या साठलेल्या पाण्यात उतरली.....गुडघ्याभर पाण्यातून ती न अडखळता चालत होती....अरविंद सुद्धा तिच्या मागे मागे चालत होता....लालभडक पाण्यातून वाट काढत चिखलातून चालणे अरविंदला कठीण जात होते पण कंबरे एवढ्या पाण्यातून अंजली जिन्यावर पोहोचली....अरविंद एका हातात मोबाईल आणि पैशाचे पाकीट पकडून मागे आला.....अंजली झपझप पायऱ्या चढत होती.....गळक्या छतावरून टपटप पाणी पडत होते....अरविंद धावत धावत अंजली जवळ आला.....अंजली जागेवर थांबली.....समोर एक खोली दिसत होती.....अरविंद अंजलीला काही बोलण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हता.....
"तू इथेच थांब मी डॉक्टरांना भेटून येतो"
एवढंच बोलून तो त्या केबिन मध्ये शिरला.....इकडे अंजली चौफेर नजर फिरवत होती....मध्येच दात विचकायची.....आपली मान गरागरा फिरवून आपले ओले केस भिंतीवर आपटायची.....बाहेर लावलेला 60 चा बल्ब चालू बंद होत होता.....एक वेगळीच ताकतीने तिथले वातावरण भयाण केले होते.....अरविंद काही वेळानंतर बाहेर आला अंजली खुर्चीवर बसली होती.....तो चालू बंद होणारा बल्ब आणि अचानक बदललेलं वातावरण बघून प्रत्येक गोष्टीचा राग बायकोवर काढणारं त्याचं शूर मन आज पहिल्यांदाच घाबरलं होतं....भिंतीवर पावसाने आलेल्या ओलीमध्ये त्याला वेगवेगळ्या आकृत्या दिसत होत्या.....त्या आकृत्या त्याच्या अंगावर येऊन त्याचे लचके तोडायला तयार वाटत होत्या.....अरविंद घाबरला तिने अंजलीचा हात पकडला आणि तिला केबिन मध्ये घेऊन गेला......अंजली त्या डॉक्टर कडे रागाने बघत होती......अरविंद ने एक मोठा पैशाचा बंडल त्या डॉक्टरच्या हातात ठेवला.....अंजलीने अरविंद कडे बघितले......तिच्या डोळ्यातील भाव बदलत होते.....अचानक अरविंद ला अस्वस्थ वाटू लागले.....त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.....अरविंदला घाम फुटला..... तो डॉक्टरला म्हणाला
"तुम्ही चेक करा....मी आलो"
तस डॉक्टरने अंजलीला समोरच्या बेड वर झोपायला सांगितले.....अंजली झोपली....ती एकटक छताकडे बघत होती.....डॉक्टर आपली तयारी करत होता.....अनधिकृत गर्भलिंग चाचणी करून त्याने बऱ्यापैकी पैसा कमावला होता त्या पैशाची चमक त्याच्या गळ्यातील जाड सोन्याची चेन आणि हातात सोन्याचे ब्रेसलेट मध्ये स्पष्ट दिसत होते......डॉक्टर जवळ आला.....त्याने अंजलीच्या पोटाला स्टेटस्कोप लावला....तो चेक करत होता त्याच बरोबर एक जोराची किंचाळी त्यातून ऐकू आली....कानठळ्या उठवणार्या आवाजाने डॉक्टर दचकला.....तो बाजूला गेला आणि आपला स्टेटस्कोप आपटून तपासू लागला....परत एकदा चेक करताना त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते....अंजलीच्या पोटात एक वेगळीच हालचाल जाणवत होती...छोटे हात पाय तिचे पोट फाडून बाहेर येतात की काय अस काहीसं वाटत होतं....तिच्या पोटाच्या आतून त्या हालचाली स्पष्ट दिसत होत्या....असं हे पहिल्यांदाच त्याला जाणवत होता......डॉक्टरने प्रश्नार्थी भावाने अंजलीकडे बघितले.....अंजली दात विचकून हसली.....हे डॉक्टरला अनपेक्षित होतं....तो गोंधळला.....त्याने आपली गर्भलिंग तपासणी करणारी मशीन काढली आणि त्याने ती अंजलीच्या पोटाला लावली आणि समोरच्या स्क्रीन वर बघू लागला......तेव्हा स्क्रीनवरील दृश्य बघून त्याच्या हातातील मशील खाली पडली......स्क्रीनवर तीन अर्भक दिसत होती.....आणि ते एकदम भयानक पद्धतीने हालचाल करत होती.....स्क्रीनवर त्यातील दोघांचे चेहरे एकदम भयानक दिसत होते....डॉक्टर थरथरू लागला त्याचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता......तो मागे सरकला....अंजलीचा हालचाल वाढू लागली.....ती जोर जोरात तडफडू लागली....तिच्या हालचालींनी तो बेड आणि लावलेली उपकरणे हालु लागली....एक प्रचंड मोठी किंचाळी तिच्या तोंडातून बाहेर पडली....डॉक्टर तिला सावरण्यासाठी जवळ गेला......डॉक्टर प्रचंड घाबरला होता.....अचानक अंजलीचा हालचाल कमी झाली ती शांत झाली.....डॉक्टर तिच्या हाताला हलवून उठवू लागला
"मिसेस अंजली.....काय होतंय तुम्हाला??"
अंजलीच्या तोंडातून काळी उलटी झाली....ती परत तडफडू लागली.....डॉक्टरचा पांढरा शर्ट काळा झाला....तोंडावर उडालेला तो काळा उग्र वासाचा द्रव तो खिशातील रुमालाने पुसू लागला.....अचानक त्याच लक्ष अंजलीकडे गेलं.....तिच्या तोंडातून एक छोटा हात बाहेर येत असताना डॉक्टर ला दिसला.....अंजलीचे तोंड मोठे झाले होते त्यातून एक जीव बाहेर येत होता.....तो गोळा तिच्या तोंडातून बाहेर येऊन खाली फारशीवर पडला......अचानक त्या लाल रक्ताळलेल्या गोळ्याची हालचाल वाढू लागली....याचा आकार वाढू लागला.....मानवी देहाचा आकार त्याने घेतला होता....त्या देहावर सगळीकडे माती लागली होती......तो विद्रुप चेहरा.....चेहऱ्यावर क्रूर भाव बघून डॉक्टर खाली कोसळला.....त्याचबरोबर अंजलीच्या तोंडून एक दुसरा हात बाहेर येत होता......ती 4 वर्षाची मुलगी बाजूला ठेवलेला सर्जरीचा चाकू उचलून डॉक्टर कडे येत होती.....तशी ती दुसरी मुलगी रांगत रांगत हसत डॉक्टरला जवळ बोलवत होती.....मी मुलगी हातात चाकू घेऊन येताना बघून डॉक्टर घाबरला होता....तो उठून धावू लागला.......ती मुलगी मागून हळू हळू चालत होती
"भ.....भ.....भूत......भूत......वाचवा"
डॉकटर मागे बघत धावत होता.....तिकडे अरविंदला अस्वस्थ वाटत होते तो नुकताच उलट्या करून आला होता.....व्हरांड्यात धावत असलेला डॉकटर बघून तो गोंधळला.....तो डॉक्टरच्या मागे धावू लागला.....डॉक्टर धापा टाकीत पायऱ्या उतरत होता....त्याला प्रचंड घाम फुटला होता.....अचानक त्याला ओढल्यासारखं झालं......त्याने खाली बघितलं एका सडक्या हाताने त्याचा पाय पकडला होता.....डॉक्टर किंचाळू लागला......ती परत आली होती तिने त्या डॉक्टर चा पाय जोरात खेचला.....तसा तो डॉक्टर एका बाजूला झाला.....आणि वरून सरळ खाली कोसळला.....कन्स्ट्रक्शन अर्धवट असल्यामुळे तिथे अर्धवट उभारलेल्या कॉलम आणि त्यावर आलेल्या लोखंडी टोकदार जाड सळ्या मध्ये जाऊन पडला....त्या सळ्या त्याच्या शरीराच्या आरपार गेल्या होत्या......त्याला हालता येत नव्हते....प्रचंड वेदनेने तो तडफडत होता......पण ती मुलगी खळखळून हसत होती......त्याचं रक्त त्या साठलेल्या पाण्यात मिसळून ते पाणी लाल करत होत......डॉक्टरच्या निर्जीव शरीराकडे बघून ती खूप खुश झाली आणि जिन्यावरून तिच्या सोबतच्या छोट्या मुलीला कडेवर घेऊन तिथून गायब झाली.....अरविंद पळत पळत आला त्याने वरून बघितले कॉलमच्या जाड सळ्यात मरून पडलेला डॉक्टर बघून प्रचंड घाबरला......तो धावत त्या केबिन मध्ये गेला....अंजलीला शोधू लागला....एका कोपऱ्यातून रडण्याचा आवाज येत होता....त्या आवाजाच्या दिशेने जाताच अंजली कोपऱ्यात रडत बसली होती......अरविंदने अंजलीचा हात पकडला आणि तिला उठवून हाताला पकडून बाहेर घेऊन जाऊ लागला.....त्याच्या हाताची थरथर अंजलीला स्पष्ट जाणवत होती.....अंजली त्या दोघींना शोधत होती......अरविंद तिच्या हाताला पकडून जिना उतरत होता.....अचानक खाली येताच तिची नजर सळ्यात गेली डॉक्टरच्या पाठीतून सळ्या बाहेर पडला होत्या.....अंजली किंचाळली.....अरविंदने तिला मिठी मारली आणि त्या रक्ताळलेल्या साठलेल्या पाण्यातून वाट काढत ते जाऊ लागले....बाहेर येताच अरविंदने गाडी स्टार्ट केली.....अंजली अजूनही त्या धक्यात होती.....गाडीचा स्पीड वाढला होता.....पाऊस थांबला होता.....अचानक एका ठिकाणी गाडी बंद पडली.....अरविंद आणि अंजली घाबरले कारण ती तीच जागा होती जिथे पूर्वी त्यांची गाडी बंद पडली होती.....त्या निर्मनुष्य शांत घाटात फक्त गाडीच्या स्टार्टर चा आवाज येत होता......अंजली बाहेर बघत होती....अचानक ती मुलगी तिला दिसली.....तिच्या हातात तो सर्जरीचा चाकू होता....अंजली किंचाळली
"अहो बाहेर बघा"
अरविंदने तिला बघितले.....ती छोटी मुलगी खूपच भयानक दिसत होती...अंगाला लागलेली माती....पांढरे पडलेले हात....नक्कीच अमानवी शक्ती होती हे त्याला कळून चुकले होते..ती जवळ जवळ येत होती....पण ह्या वेळी तिच्या मागे अजून काही तश्याच सडलेल्या शरीराच्या मुली त्या खड्ड्यातुन बाहेर येत होत्या....अंजलीप्रमाणे अनेक महिलांचा त्यांच्या इच्छेविरुद्ध गर्भपात होऊन स्त्री अर्भक त्या खड्ड्यात तो डॉक्टर पुरत होता.....4 वर्षांपूर्वी अरविंदने ती चूक केली होती.....त्याने आणि डॉक्टरने गाडलेली त्याची मुलगी 4 वर्षानंतर भूतयोनीत मोठी होऊन आता त्याच्याच जीवावर उठली होती.....जवळपास 20-25 लहानमोठ्या मुली तिथे जमा झाल्या.....अरविंद घाबरला आणि गाडीतून बाहेर पडून पळू लागला.....त्या मुली गाडीभोवती जमा झाल्या....त्यांच्या डोळ्यातील क्रूर भाव त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची प्रतिक्रिया होती.....अरविंद जिवाच्या आकांताने पळत होता पळता पळता त्याचा पाय घसरून तो चिखलात पडला.....त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव कायम होते...तो उठण्याचा प्रयत्न करू लागला.....अचानक चिखलातून एक काळामिट्ट हात बाहेर आला....ती जमिनीतून ती बाहेर आली......ती रागाने अरविंदकडे बघत होती तिने अरविंदचा पाय पकडला आणि त्याला फरफटत नेऊ लागली.....सोबत ती छोटी मुलगी रांगत रांगत मागे येत होती.....ती छोटी मुलगी अरविंदच्या छाताडावर बसली....तिचा चेहरा अगदी अंजली सारखा होता....तो समजून चुकला होता की....त्याची चूक कुठे झाली होती....ती छोटी टाळ्या वाजवत हसू लागली.....तिला बघून ती मोठी सुद्धा भयाण क्रूर हसू लागली.....तिने अरविंदला त्या खड्ड्याजवळ आणलं.....
"बाळ....मला माफ कर ही चूक मी परत कधी नाही करणार....प्लिज प्लिज"
पण शेवटी "न जन्मलेल्या" त्या.....त्यांना अरविंदची भाषा थोडीच समजणार होती......तिने अरविंदचा पाय जोरात त्या खड्ड्यात खेचला.....अरविंद त्या चिखलात तडफडत पडला होता.....त्याची ती तडफड सगळ्या जणी वरून बघत होत्या.....भूतयोनीत असून सुद्धा हाच आपला दोषी आहे हे त्या बरोबर जाणून होत्या.....अचानक त्या मुलींनी वरून माती टाकायला सुरवात केली....अरविंद ओरडू लागला......त्याच्या अंगावर ते छोटे हात माती फेकत होते.....तिकडे अंजली गाडी बाहेर पडून त्या जंगलात अरविंदला शोधत होती.....अखेर तिला अरविंदची किंचाळी ऐकू आली....ती त्या दिशेने धावली......अंजली त्या खड्ड्याजवळ आली......अरविंद खड्ड्यात पडला होता त्याच्या अंगावर माती पडली होती त्याचा विव्हळणारा चेहरा दिसत होता....अंजली रडू लागली....गयावया करू लागली....पण त्या सगळ्या मुली तिकडे दुर्लक्ष करीत होत्या.....अंजली त्या खड्ड्यात उतरली पण त्या चिखलातून त्याला वर ओढणे तिला शक्य होत नव्हते.....वरून त्या 25 मुली माती टाकत होत्या....त्यापुढे अंजलीची मानवी ताकत कमी पडत होती....अंजली बाहेर आली आणि तिने तिचे पाय धरले.....ती तिचे पाय पकडून रडू लागली.....
"माफ कर.....माझाच गोळा होतीस.....माझीच चूक झाली मी पण नाही वाचवू शकले तुला....पण आता अस होणार नाही"
अचानक सगळीकडे शांतता पसरली त्या मुली थोड्या मागे सरकल्या होत्या.....अंजलीने तिच्याकडे बघितले.....ती खड्ड्यात उतरली आणि आपल्या हाताने माती बाजूला करून अरविंदला बाहेर काढलं....अरविंदच्या नाकातोंडात माती गेली होती तो जमिनीवर पडून धापा टाकत होता.....थोड्या वेळाने तो नीट श्वास घेऊ लागला......अंजलीने त्याला उठवलं....त्याच्या त्या मातीने माखलेल्या चेहऱ्यावरील अश्रू ती स्पष्ट बघू शकत होती.....अरविंद गुडघ्यावर रांगत रांगत त्या मुलीजवळ गेला आणि तिच्या पायात पडला
"माफ कर मी चुकलो.....तूच लक्ष्मी होतीस....मी नाही ओळखू शकलो तुला.....ह्यापुढे नाही करणार असं"
गुडघ्यावर बसून रडणाऱ्या अरविंद कडे बघून ती मागे सरकली.....तिने आपला चाकू असलेला हात वर केला आणि त्या दोघांना जाण्याचा इशारा केला.....अरविंद उठला.....ती छोटी त्याच्याकडे बघून हसत होती.....त्याने आपल्या गळ्यातील सोन्याची चेन काढून तिला दिली.....छोटी त्याच्याबरोबर खेळू लागली.....अंजलीने अरविंदचा हात पकडला आणि त्याला आधार देत घेऊन जाऊ लागली....चालत असताना अरविंदची नजर मागे गेली....सगळ्या मुली परत त्या खड्ड्यात जात होत्या फक्त ती बाहेर उभी होती.....आपल्या हातातील चाकू वर उंचावून तिने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली...........(समाप्त)
शशांक_सुर्वे
(ही कथा कशी वाटली?? ह्याबाबत आपल्या प्रतिक्रिया कमेंटबॉक्स मध्ये जरूर नोंदवा......धन्यवाद)