काळी सावली"
सर्व भूत मित्रांनो, ही माझी तिसरी गोष्ट...
मी काही लेखक नाही पण तुमच्या सकारात्मक प्रतिसादामुळे अघटीत असे भयावह सत्य अनुभव तुमच्यापर्यंत पोहोवचण्यासाठी शब्दांची व विचारांची योग्य ती सांगड घालून अर्थपूर्ण वाक्यरचना करून त्याची कथा लिहिण्यात एक वेगळा आनंद मिळतो आहे. मनाला समाधान मिळते आहे. त्यामुळे सर्वांचे आभार....
'भूत' हा माझा लहानपणापासून आवडीचा विषय. भूत कथा , रहस्य कथा, अमानवी जगतातील व मृत्यूच्या पलीकडील विश्वातील तसेच दैवी घटना जाणून घेण्याची आवड मला आहे. पण मी अंधश्रद्धा मानत नाही. म्हणून या ग्रुपचे सजेशन आल्याबरोबर लगेच जॉईन झालो. एकाच विचारांची व आवडीची मनं एकत्र आली आणि माझ्या मनासारखे झाले...मला वाटतं या ग्रुपचे आपण सर्व असेच वेडे आहोत......असो......माफ करा..थोडं मन मोकळे करावेसे वाटले......
मी लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या आजोळी गोव्याला आलो की माझी मावशी आम्हा सर्व मुलांना रात्री अश्या सत्य कथा सांगायची. हॉरर......त्या सत्य कथा असतील हे आता मनाला पटत नाही पण त्या कथेतील रंजकता हृदयाचा ठोका चुकवते. तर अशीच एक मावशीच्या म्हणण्यानुसार सत्य कथा तुमच्या साठी....
तर गोष्ट आहे गोव्यातील एका खेडे गावातील. फार फार जुनी . त्या काळी वीज खेडेगावात पोहोचली नव्हती. तेलाचे किंवा घासलेटच्या मिणमिणत्या दिव्यांशिवाय दुसरा पर्याय नव्हताच. त्याकाळी टीव्ही, मोबाईल इतर करमणुकीची कोणतीच साधने नव्हती. दिवसभर शेतात अंग मेहनत केल्यावर संध्याकाळी लवकर जेवणं आटोपून सर्व गाव लवकरच झोपून जायचा. त्यामुळे विजेशिवाय कोणाचं अडत नव्हतं. मग बाहेर रात्र भयाण असायची आणि तिथे चित्र-विचित्र सावल्यांचा खेळ चालायचा......
गावात वस्ती तुरळकच होती . इन मिन 15-20 घरं. मातीची ...आणि या वस्ती पासून एक फर्लांग दूर एका टोकाला एका झोपडीत एक कुटुंब राहत होते. नवरा , बायको आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा. फार गरीब परिस्थीती... दोघेही गावातील गावकऱ्यांना शेतात कामाला मदत करायची . मग ते देतील त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत असे. हे जोडपं मेहनती आहे , स्वभावाने चांगले आहेत आणि गावाला चांगली मदत होत आहे म्हणून गावकर्यांनीच त्यांना गावापासून थोडं दूर ती झोपडी बांधून दिली होती. हाच त्यांचा संसार.. पण तोही नीटनेटका ...
त्या दिवशी तो, जो घरी आला तो रसरशीत ताप घेऊनच. व्हाण बाहेर तशीच भिरकावून घरात आल्यावर फटकूर अंथरून त्यावर आपले अंग टाकले. नवरा असा यावेळी आलेला पाहून तिला आश्चर्य वाटले. अंगाला हाथ लावताच , हा ताप सहन न झाल्यामुळेच हा गडी घरी आलाय नाहीतर अशा तापाला भिक घालणार नाही हे तिने जाणलं. तिने मुलाला खाकोटीला मारले आणि वैद्याकडे निघाली. नवरा आपल्या संसारासाठी खुप कष्ट करतोय. आपल्या तब्येतीची अजिबात काळजी घेत नाही. आमच्या सुखासाठी.....हा विचार करून तिला रडू येत होतं. तिला आठवलं परवा चांगले पैसे मिळणार म्हणून गडी पार बाहेरच्या गावी गेला. एक दिवस फुकट जाईल म्हणून रात्रीचा चालत अपरात्री घरी आला. रात्रीच्या काळोखाची , आणि रात्री फिरणाऱ्या सावल्यांची भीतीही वाटली नाही त्याला .....???
पंधरा दिवस झाले पण वैद्याच्या औषधाला गुणच येत नव्हता. वैद्य संभ्रमात होता त्याला निदान करता येत नव्हतं.
औषध लागू पडत नव्हतं. तो मात्र खंगत जात होता. पायात उठायचे अजिबात त्राण नव्हते. बोलणं तर जमतच नव्हतं. जेवणा वरची इच्छाच उडून गेली होती. तिची अवस्था दयनीय झाली होती. काय होतंय हे तिच्या समजण्या पलीकडचे होते. तरीही नवरा बरा होईल या आशेवर वैद्यानी दिलेली औषधे वेळेवर देत होती.
....आणि अचानक त्या रात्री त्याची प्राणजोत मालवली. तिने रडून आकांत केला. पण तिचा आकांत ऐकायला तिच्या चार वर्षाच्या मुलाशिवाय कोणीही नव्हतं. या रात्रीच्या वेळी कुठे जाणार? गावात जाऊन सांगणार कसं? बाहेर मिट्ट काळोख.....तिने मोठयाने टाहो फोडला तरी गावात ऐकायला जाणार नव्हता...... तिने मन घट्ट केलं. रात्रभर नवऱ्याच्या कलेवरासोबत रहायचे ठरवलं. एक मिणमिणती पणती नवऱ्याच्या शवाच्या बाजूला लावली. आणि पोराला कवटाळून भिंतीला डोकं टेकून बसली. त्याच्या चेहऱ्याकडे पाहत मुसमुसुन रडू लागली. त्या मिणमिणत्या पणतीचा प्रकाश त्या झोपडीत भकास व भयावह वाटत होता......
ते कोवळं पोर तर आईच्या कुशीत केव्हाच झोपलं होतं. एकटीच रडून रडून तिची आसवं आटून गेली होती....पापण्या जड झाल्या होत्या..... डोळ्यावर झोपेचं सावट पसरलं...
रात्री केव्हातरी मुलाच्या आवाजाने तिला जाग आली. मुलाला लघवीला झालं होतं. तो आईला आवाज देत होता. मनावरच्या प्रचंड तणावामुळे थोड्यावेळा साठी आपल्या नवऱ्याचे कलेवर समोर आहे याचा तिला विसर पडला होता. तिने डोळे उघडले आणि मुलाला घेऊन बाहेर जाणार इतक्यात .....पणतीच्या मिणमिणत्या प्रकाशात जे दृश्य तिला दिसले त्याने तिच्या अंगावर सरसरून काटा आला. डोळे विस्फारून ती बघत होती........एक काळीकुट्ट सावली तिच्या नवऱ्याच्या प्रेतावर बसून त्याच्या शरीराच्या मांसाचे लचके तोडून खात होती............तिचे पाय तिथेच थिजले....ओरडायचे तर आवाजच फुटत नव्हता..... संपूर्ण शरीर भीतीने थरथरत होतं. सर्व अवसान एकवटून तिने मुलाला उचलले , झोपडीच्या बाहेर येऊन गावाच्या दिशेने धावत सुटली..........
ती जेव्हा परत आली तेव्हा तिच्याबरोबर 10-12 गावकरी हातात काठ्या, कोयते घेऊन आले होते. झोपडीत प्रवेश केल्यावर ......आत कोणीही नव्हतं.....त्या प्रेताचा मागमूसही नव्हता......प्रेत ज्या ठिकाणी होतं तिथली जमीन शेणाने सारवली होती. पणती मात्र शांत पणे तेवत होती.......!!
समाप्त
प्रवीण सावंत