फिरूनी, नवी जन्मेन मी...
भाग 1
भाग 1
By sanjay kamble
आज तब्बल पाच वर्षानी मी माझ्या मामाच्या गावी जाणार होतो. शेवट वर्षाच्या परीक्षा संपल्या होत्या आणि आठ दिवसावर माझ्या मामेभावाचे लग्न होते... college चे मित्र आता पुन्हा भेटतील न भेटतील, पन what's app वर सगळ्यांचे नंबर मात्र आठवणीने घेऊन ठेवलेले...सर्व मित्राची भेट घेऊन घरी परतलो.. आणि प्रवासाची आवराआवर सुरु केली.
मामाच्या घरच्यांसाठी खाऊचा डबा माझ्या bag मधे ठेवत आई सांगु लागली..
" मामाला सांग, बाबांना सुट्टी भेटलेली नाही त्यामुळे आम्ही लग्नाच्या दोन दिवस आधी येतो म्हणून. "
" आई माझी इस्त्री केलेली कपडे....?"
अस थोडस आईवर ओरडत मी डबा निट ठेवला आणि Bag हातात घेऊन आई बाबा आणी लहान बहीणीचा निरोप घेऊन बाहेर पडलो...

सायंकाळचे सहा साडेसहा वाजलेले.. महाराष्ट्र शासनाच्या S.T. ने माझा प्रवास सुरू झाला... शहराचे कोंदट वातावरण हळू हळू मागे पडू लागले. डोंगराळ भागातील वेड्यावाकड्या वळणावरून s.t धावत होती. गर्द झाडीतून सूटटेला मंद, गार वारा माझ्या शहरी मनावरचा ताण कमी करत होता. रस्ता तसा कच्चाच, अशाच खडकाळ रस्त्यातून मार्ग काढणा-या S.T. च्या खिडकीवरीला काचांचा खडखडणारा आवाज आणि त्या आवाजातही खिडक्यांमधुन येणा-या थंड वा-याची एखादी लहर मनाला सुखावून जायची. अशातही शांत झोपलेले काही लोक हे मला पंचतारांकीत हॉटेल मधल्या A.C. मधेही झोप न लागणा-या लोकांपेक्षा जास्त सुखी वाटत होते.
पण गावी जाण्यास मी इतक उतावळ असण्याच आणखी एक कारण होत...
माझी मैत्रिण.......
हो ....... मैत्रीणच.....
मैत्रीण की.....आणखी काही..... आणी मघाशा बैगेत डबा ठेवताना आईवर हलकेच का ओरडलो.... कारण काहीतरी होत बैगेत तीच्यासाठी......
लहान पणापासुनच,

जेव्हा मी गावी जायचो ती मला भेटायला खुप आतुर असायची. इतकीशी गोरी नव्हती पन साजरी, हसताना उजव्या गालावर पडणारी ती खळी, कपाळावर हिरव गोंदण, हनुवटीवर बारीकसा तीळ, टपोरे पाणीदार पन निष्पाप डोळे अशी ती........ 'गौरी'....
" पाव्हण... गाव आल तुमच...."
कंडक्टर ने आपल्या हातातील तिकीटावर होल पाडायचे लोखंडी पंचींग खाडकन लोखंडी पाईप वर आपटले तसा मी तीच्या गोड आठवणीतुन बाहेर आलो ... एस.टी. च्या त्या खिडकीतुन बाहेर डोकावुन पहात मी माझी bag उचलुन हातात घेत खाली उतरलो. मोबाइल पाहीला तर रात्रिचे 10.30 वाजुन गेलेले.
'टिन टिन' कंडक्टरने बेल मारली तशी खडखड आवाज करत धुळ उडवीत S.T. आपल्या मुक्कामाला निघाली...
माझ गाव अजुन बरच दुर होत.... आणि तिथपर्यन्त मला पायीच जाव लागणार होत... bag पाठीवर अडकवून एका चिंचोळ्या पायवाटेने माझा प्रवास सुरु झाला ... मामेभावाला फोन लावला पन network......

पांढरशुभ्र चांदण्यात सगळ काही स्पष्ट आणि स्वच्छ दिसत होत... मामाच गाव यापेक्षा ते गौरीच गांव म्हणुन मला जरा जास्तच प्रिय होत.. असच असत ना.... म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तिची प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी सोन्यापेक्षा मौल्यवान असते...
गर्द दाट जंगल, वा-याच्या प्रत्येक झोक्यावर डोलणारी आंब्या, फणसाची झाडे, त्यांवर चमचमणारी आणी प्रकाशाचा खेळ करणारी लखलखणारी काजव्यांची माळ, किर्र्र किर्रर्रर्र किर्रर्रर्रर असे आपापसात संवाद साधणारे रातकिडे, आणि अशातच वाळलेला पालापाचोळ्यातुन सळसळत जाणारा एखादा काळाकुट्ट साप दिसताच काळजात धस्स्स्स्स व्हायच... आणी मनात 'गौरी' ला भेटायची उत्सुकता....... अशा या निर्जन वाटेवर आज हेच माझे सोबती होते... पायाखालची त्या चिंचोळ्या पायवाटेने चालत मी एका नाल्यावर तयार केलेल्या लाकडी पुलावर आलो.. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी खुप कमी झाल होत. मी आणी 'गौरी या पाण्यात तासंतास पाय बुडवुन बाजुच्या दगडावर बसुन असायचो.... नितळ स्वच्छ आकाशातले ते तेजस्वी चंद्रबिंबाच्या प्रकाशाने चमचमणारे ते संथ पाणी पाहताना न रहावून मी एक छोटासा खडा त्या पाण्यात टाकला, तशी त्या संथ पाण्यात क्षणात असंख्या वर्तुळे तयार होत किन-याकडे धाऊ लागली. ते मोहक दृष्य डोळ्यात साठवत आपली वाट चालु लागलो, पुन्हा भावाला फोन ट्राय केला पन network...
sshyyy....

पाठीवर आडकवलेली bag निट करत मोबाइल खिशात ठेवला.. आजुबाजूचा परिसर न्याहाळत पायपीट सुरू होती.. कमी अधीक उंचीची तर लहान मोठ्या आकाराची ती झाडांची गर्दी जशी चांदण्यात न्हाऊन निघालेली... अशातच माझी नजर काही अंतरावर असलेल्या एका ऊंच, दाट झाडाकडे गेली. जस त्या झाडाच्या पलिकडे उभ कोणीतरी मला पहात होत.. तो अस्पष्ट माणसाचा आकार होता की माझ मन या परिसरात गुंतल्यान अशा आकृत्याना तयार करत होत हे उमगत नव्हत... दुर्लक्ष कराव तर जीथे नजर पडेल तीथ असच काहीसा गुढ आकार उमटत होता... असतात मनाचे खेळ... मी दुर्लक्ष करत चालु लागलो तशी समोरच्या झाडावर काजव्यांच्या लपंडावातच थोडी हलचाल जाणवली. मी आपल्या चालण्याची गती कमी करत निरखून पाहु लागलो. जंगली माकडे किंवा तसेच एखादे जनावर असेल अशी मनाची समजुत काढत तसाच पुढे आलो. तोच पुन्हा त्या झाडावर हलचाल वाढली, मी मागे वळून पाहिल तस माझ्या पासुन पन्नस ते साठ फुटावर असलेल्या त्या झाडावरून काही तरी खाली पडल्याचे , नाही अंतराळी खाली येत असल्यासारख दिसले... अगदी एखाद्या पक्षान पंखांची फडफड करताना निसटुन हवेत झेपावलेला पंख हवेवर तरंगत खाली यावा तसे ते खाली आले. जशी एक गडद्द सावली.. जागेवरच उभ रहात ते नेमक काय आहे ते पाहू लागलो.. ते तसेच पडून होते, निपचिप.
त्याकडे दुर्लक्ष करतच मी आपल्या मार्गाला लागलो.. पन न रहावून एक विलक्षण भिती वाटु लागली... जस कोणीतरी माझ्या आजुबाजूला आहे ... मला पहातय..... या चंद्राच्या नितळ सावल्यांमधे दुरच्या गर्द झाडांमधुन... आणी दुस-याच क्षणी मला एक चाहुल जाणवली.... न रहावुन मी मागे वळून पहील तसा काळजात धस्स झाल... मी आलेल्या त्या वाटेवर मागे चंद्रप्रकाशात कोणीतरी उभ होत... एक काळी माणवी आकृति, जशी पारदर्शक सावली भासत होती... ते तसच उभ होत, कोणतीच हलचाल न करता फक्त पहात होत, मझ्याकडे... कोण असेल......? मी नजर चोरून तसाच माझ्या वाटेला लागलो...
अचानक हवेत गारवा जाणवू लागला... सगळ काही शांत होत, तोच मागुन एका मुलीची हाक ऐकु आली.....
" ये संजु........"
मी दचकून जागेवरच ऊभा राहीलो .. तसा पुन्हा आवाज आला
"कित्ती वर्सान आलास र इकड....तुला माजी आटवन बीटवन यत् हुती का न्हाय र.."
आवाज मी ओळखला होता...थोड हसलो पन थोडी गम्मत करायची ठरवुन मागे न पहाता मी म्हणालो....
" कोण हो आपन..... मी नाही ओळखले तुम्हाला..."
तशी ती थोडी रागात म्हणाली..
" शेरातली मानस तुमी...आमची आटवन कशाला यईल तुमास्नी..."
तीचा राग जाणवत होता, तसा मागे वळुन पहात मी म्हणालो....
"गौरी........गौरी........ अजून नाही बदललीस..आणि इतक्या रात्रिची इथ काय करतेस....."
ती ही उगाच घाबरेल म्हणून काही वेळ आधी घडलेल्या प्रकाराबद्दल काहीच सांगितल नाही.
ती माझ्यासोबत चालत म्हणाली ..
"तुझ्या भावाच लगिन हाय न्हव... मला ठाव हुत, तु यनार ते, म्हणून तुजी वाट बघत होते."
" हो का..." मी ही फिरकी घेऊ लागलो
बोलत बोलत आम्ही गावाच्या दिशेने चालु लागलो... दूर काही अंतरावरुन एक दुचाकी येताना दिसली तशी गौरी म्हणाली...
" चल कोनतरी येतय आपल्याला बगून नग ते समजायचे...आन तुज्या भावाच लगीन हाय तवा आपन रातच्यालाच भेटुया... न्हायतर परत लोक आपल्यावर नग त्यो संशय घेत्याली..."
बर म्हणत तीच्यकडे पहील तशी ती त्या काळोखात कुठेतरी नाहीशी झाली ....
समोरून येणारी दूचाकी माझ्या जवळ येऊन थांबली.
"काय र... फोन तर करायचा... तु पोचलास का इचारायला आत्तीन फोन केला व्हता..."
भिकाजी आजुबाजूला पहात पुन्हा म्हणाला
" बस लवकर....."
माझ्या मामाचा मुलगा थोडा रागवत बोलु लागल..
" नेटवर्क नाही आणी फोन काय घंटा करणार..."
बोलता बोलता गाडीवर बसलो तशी टर्रर्रर्रर्रर टर्रर्रर्रर्रर आवाज करत सायलेंसर निखळून खडखडणा-या जुन्या M80 गाडीवरून दोघे घरी पोहोचलो.. जेवण आवरून सर्व अंगणात गप्पा मारत बसलेले...
घरी पोहोचताच हे कसे आहेत, ते कसे आहेत वगैरे.... नेहमीच्या formality...

जेवण आवरून रात्रि अंथरुनावर पडलो, बाहेरच नितळ चांदण खिडकीतुन किंचीत आत डोकावत होत... काही वेळ आधी येताना इतकी भयावह घटना घडलेली असताना देखील फक्त दोन पावले सोबत चाललेल्या गौरीचा विचार मनातून जात नव्हता...ती अजून ही बदलली नव्हती.
तीच पाच वर्षा पुर्वीची गौरी.. मनातील तीच्या आठवणी अचानक उमलुन डोळ्यांसमोर तरंगू लागल्या.....

*****
तशी लहान असल्यापासुनच आमची मैत्री... मी येताच ओंजळ भरून करवंदे घेऊन यायची. दिवस भर आम्ही दोघे डोंगरावरून जांभळे, करवंदे खात हूंदडत फिरायचो. आंब्याच्या कच्च्या कै-या दगड मारून पाडायच्या आणि त्या खाण्यासाठी सोबत थोडी तीखट आणि मीठ ही खिशात असायच... पण कसे इतके जवळ आलो समजलच नाही. स्वता काट्यांमधुन वाट काढत माझ्यासाठी करवंदे जमवायची, स्वतासाठी नाही पण मला काटा लागला तर मनापासुन हळ हळायची. पण आता मीही तीला जपत होतो. तीला सोडून जावस वाटत नव्हत, रात्र कधी संपेल आणि कधी पुन्हा सकाळी या डोंगर द-यांमधुन हातात हात घालून फिरेन अस व्हायच.. ती सोबत असताना कसलीच तमा नसायची... पण ही बालपनाची मैत्री कधी आणि कशी कुणास ठाऊक मैत्री प्रेमात बदलून गेली...
पन पाच वर्षापुर्वीची ती शेवटची भेट.. ..त्यावेळी मी सतरा वर्षाचा होतो आणि ती कदाचित माझ्या पेक्षा दोन वर्षानी लहान... ती आपल्या वर्गातील गमती सांगणात दंग झालेली ,मी मात्र तीच हसण बोलण मनात साठवत होतो . तीच बोलण मधेच थांबवत मी म्हणालो
" गौरी सुट्टी संपल्यात ग, उद्या मला घरी जाव लागणार..."
हसता हसता एकदम तीच्या डोळ्यात पाणी तरळले... मघापासुनची तीची अखंड बडबड एकदम शांत झाली... आपल्या हातात घेतलेला माझा हात अलगद सोडवत दोन पावले पुढे जात म्हणाली...
" संजु... त्ये बघ डोंगरामाथ्यावर ढग कस उतरल्याती..किती सुरेख दिसतया ना ..."
एक दिर्घ श्वास घेत ती म्हणाली..
" या धरणीमातेला भेटून ते पन असेच निघून जातेत....परतून येण्यासाठी ."
मी तीच बोलन मधेच थांबवत म्हणालो...
"गौरी... आज कदचीत आजची आपली शेवटची भेट असेल... आता वर्षभर नाही भेटता येणार.. .."
खुप उदास वटत होत पन थोडास धाडस करत मी तीला म्हणालो....
" तुला काहीतरी विचारायच होत...
तीचा हात हाती घेतला तशी ती थोडी लाजली. आणि पापण्या खाली झुकवत नाजुक पणे म्हणाली...
"..मलही तुला कायतरी सांगायच व्हत...."
थोड धाडस करत मी तीच्याकडे पहात दिर्घ श्वास घेतला... ते शब्द ओठांवर आलेही नव्हते पन एक गोड शिरशीरी सर्वांगातुन उमटली...
"गौरी.." मी पुढ बोलणार तोच मोटरसाइकिलचा आवाज येऊ लागला.. मी मान तीरकी करत पाहील तसा सावकाराचा मुलगा आणि त्याचा मित्र मोटरसायकल साईड स्टैंडवर लावत आमच्याकडे पहातच पुुढ आला... अंगान तसा भरगच्च होता... रागीट चेहरा, पांढरा कुर्ता आणी साधी दगडी रंगाची पैंट , वीस बावीस वर्षाचा असेल,
माझ्या हातात गौरीचा हात बघुन चिडला आणि मला थोड रागातच म्हणाला...
" ये पाव्हण्या..... काय नाटक चालु हायती रे..जीत्ता जाणार की पार्सल न ...?"
मी काही बोलणार तोच गौरी त्याच्या वर चिडली...
" ये... काय करायच तुले... गप गुमान चालायच हीतन..."
त्यान चिडून गौरीकड पाहिल आणी आपल्या उजव्या हाताच्या आंगठ्यान खुरटी दाढी कुरवाळत वासनेन भरलेल्या नजरेन तीला न्याहाळत म्हणाला...
"तुले तर मीच....."
पुढे काही बोलायच्या आत मी त्याच्या मुस्काटात हानली आणि तीथेच त्या सावकाराच्या मुलासोबत झटापट लागली...'

धापकन पलंगावरून खाली पडलो तशी जाग आली.. सकाळची कोवळी किरणं बाजुच्या खिडकीतुन अंगावर पडत होती झालेली....पाच वर्षापुर्वी घडलेले सर्व जसेच्या तसे आठवत होते...
लग्नाचे घर असल्याने जो तो आपापल्या कामात. गौरी ला भेटता येणार नव्हत कारण पाच वर्षापुर्वी सावकाराच्या मुलाशी झालेल्या भांडणामुळे मामाने मला इकडे न येण्याची ताकीद केलेली... नुसती ताकीद नाही तर चांगलाच धोपटून काढलेल.. म्हणजे आता तीला नेहमी प्रमाने भेटण्याचा प्रश्नच येत नव्हता....

दिवस कसातरी पुढे ढकलत संपला आणि रात्र पडायला लागली... शेजारच्या गावांमधे यात्रा, जत्रा सुरु होत्या रोज जवळ पासच्या एखाद्या गावची यात्रेसाठी आर्केस्ट्रा, तमाशा, कलापथक असे कार्यक्रम असायचेत...
मी पन मस्त फ्रेश झालो... सर्रर्रर कन बैगेची चेन ओढली आणी अलगद कागदात ठेवलेल ते गुलाबाच फुल हातात घेतल तस अंग मोहरून आल... आज तीला विचारायच , नक्की.. यात्रेच निमीत्त सांगुन घरातुन बाहेर पडलो...बाहेर तीच M80 दिसली... 'मामा' आजुनही स्वताला तरूणच समजत होता... आपन 'अपाचे' बाईक घेऊन तालुक्याला ऊसाच बिल आणायला गेलेला आणी आम्हाला ठेवली ही , खटारा.... ही गाडी घेऊन रस्त्यान जाताना जस सारं गाव जाग व्हायच.... पन नाईलाज... गाडीची चाके आमच्या ठरलेल्या ठिकानाकडे निघाली.. वाटेतच त्या सावकाराच घर होत.. आणि नेमका पत्रिका वाटत भाऊ तीथेच आला होता... मी लपण्याचा प्रयत्न करत जाऊ लागलो, पन या सोबतच्या डॉल्बी सिस्टीमच काय....?
मला पाहताच त्याने हाक मारली .... मला जायच नव्हत पन शेवटी नाईलाज, जाण भाग होत त्यांनी आत यायला सांगितल तसे आम्ही आत सोफ्यावर बसलो... त्यांच्या ऊसाच्या , भाताच्या आणी खताच्या म्हणजेच शेतीच्या गप्पा सुरू होत्या ... तोवर सावकाराच्या एका सुनेन सर्वांसाठी चहा आणला.. हातात गरम चहाच्या कपातला एक एक घोट घेत नेहमीच बोलन सुरू झाल...मी शांतपने चहाचा आस्वाद घेत होतो, पन माझी नजर सावकाराच्या घरभर फिरत होती...
प्रशस्त घर, .... घर कसल आलिशीन वाडाच तो..भल मोठ अंगन, पुढे समोरच गावठी पद्धतिचा 'माच्या'..... त्यावर साठीच्या आसपास वय असणारे सावकार आडकित्याने सुपारी फोडत माझ्या भावाला म्हणाले..
"पोरा...कंच्या गावची न्हवरी म्हणायची...."
वय झालेल पन अजुनही करडा आणि भरदार आवाज. त्यांच बोलन चालु होत. समोरच्या भिंतीवर एका म्हातारीचा फोटो होता, सावकाराची बायको असावी कदाचीत. आणि तीच्या बाजुला आणखी एक फोटो. फोटोला घातलेल्या हारामुळे चेहरा नीट दिसत नव्हता... त्यांच बोलन तसच ठेऊत मोबाइलची रिंग वाजवून मी फोन आल्याच नटक करून बाहेर पडलो... आणि भावाची गाडी घेऊन, तीच M80 घेऊन थेट गौरीला भेटायच्या जागी... गाडी खाली लाऊन मी वर आलो....
काही अंतरावरच ते दैत्याकार वडाच झाड गौरी आणि माझ्या भेटीची साक्ष देत होत होत, त्याच्या पारंब्या जमीनीपर्यन्त पोहोचलेल्या. त्या झाडावर नजर पडताच वाटायच की एखादा शक्तिशाली दैत्य डोळे बंद करून देवाची तपश्चर्या करत बसलाय... आणि वहाणा-या मंद वा-या सोबत डोलत देवाशी संवाद साधतोय...
शेजारच्या मोठ्या दगडावर बसुन आजुबाजूला नजर फिरवून गौरीचा वेध घेऊ लागलो...
ती अजुन आली नव्हती , मी तसाच मोबाइल वर गेम चालु केली.. तोच एक थंड वा-याची लहर अंगाला स्पर्श करुन गेली... झाडावर पानांचा सळसळ वाढलेली जाणवत होती. मोबाइल खिशात ठेवत पुन्हा तसाच आजुबाजूला पहू लागलो..
काल सारखच शुभ्र चांदण पडल होत... गाव खुप दूर, खाली डोंगराच्या पायथ्याशी राहिलेल. शुभ्र चांदण्याच्या प्रकाशात गावाचे चित्र अतिशय सुंदर दिसत होत, सावकाराचा प्रशस्त वाडा सोडला तर बाकी छोटी छोटी घर, कुठेतरी एखाद्या घरातुन बल्ब चा पिवळसर प्रकाश घराच्या अंगणात पसरलेला होता आणि त्यात हूंदडणारी काही छोटी मुल, एखादी माऊली घराच्या मगे रचलेल्या छोट्याश्या चुलीवर भाकरी थापत होती. त्या चुलीत फूंकर मारताच धुराची पांढरट रेषा वर वर आकाशात जात सामावुन जायची..... दिर्घ श्वास घेत मी नीट बसण्याची जागा करून घेतली आणी आजुबाजूला पाहु लागलो..
अचानक माझ्या पासुन काही अंतरावरच्या त्या भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली काही हलचाल होत असल्याच जाणवल तस थोड निरखून पाहू लागलो. पण नीट काही दिसत नव्हत. थोड पुढ जात मी पाहील कोणीतरी तीथ असल्याच जाणवल, कदाचित गौरी माझी मस्करी करत असेल म्हणून सौम्य आवाजात हाक दिली..
" गौरी ............ ए गौरी ........."
तशी त्या दैत्याकार वटवृक्षामागुन एक माणवी आकृति किलकील्या नजरेने माझ्याकडे पहात असल्याच जाणवल... पन ती आकृति पुरुषाची होती... असेल कोणीतरी म्हणून मी मागे येत पुन्हा त्या दगडावर बसून मोबाइल सुरू केला... तीची वाट पहात तसच त्या दगडावर अंग टाकल ...

ती माणवी आकृति आता झाडामागून पुर्ण बाहेर येऊन उभी माझ्याकडे पहात होती... मी पन त्याच्या कडे पाहू लागलो, तसा मनात एक विचार चमकुन गेला की काल रात्रि हीच आकृति माझ्या मागे होती.. आणि सर्रर्रर्रर्रर्र कन अंगावर काटा आला... ते कोणतीही हलचाल करत नव्हते तरी माझ्या डोळयाच्या लवणा-या पापणीसोबत ते पुढ येत असल्यासारख वाटु लागल. पापणी मिटुन उघडली की अंतर कमी होऊ लागले... खुपच विचित्र वाटू लागल तसा मी तीथुन जायच ठरवल. तोच मागुन एक हाक ऐकु आली... आणि माझ अंग शहारल
"संजु...... " थंड वा-याची एक लहर अंगाला स्पर्श करून गेल्यासारख वाटल..
तो गौरीचा आवाज होता... मी मागे वळतच म्हणालो...
"गौरी ........ किती उशीर ग......."
म्हणत मी मागे वळुन पाहील तस धक्काच बसला, मागे कोणीच नव्हत.. मग तो आवाज कोणाचा होता... आता मात्र भीती वाटु लागली होती... मनात नको नको ते विचार येऊ लागलो... तीथुन निघुन जायचा विचार केला, पन मी गेल्या वर गौरी आली तर .... नको थोड़ा वेळ वाट पाहण्याचा निर्णय घेतला...
पन दुस-या क्षणी एक
काळीकुट्ट माणवी आकृति माझ्यापासुन थोड्याच अंतरावर कोणतीच हलचान न कारता तशीच उभी दिसली आणि काळजाचा ठोका चुकला .. चंद्रप्रकाशात ती काळीकुट्ट आकृति, लांब गुडघ्या पर्यन्त हात, लांब लालसर नख्या, मोठे रागिट आणि क्रुर पांढरे डोळे. त्याला पाहताच माझा मागे तोल गेला आणि खाली पडलो... एखाद्या काळ्या मांजराने घुरघूरताना आपला जबडा पसरावा तसा त्या पिशाच्च्याने माझ्या कडे पाहून आपला जबडा पसरला. त्याचे लाल पांढरे टोकदार रक्तळलेले दात पाहुन काळजाचा थरकाप उडाला... श्वास वाढला, काळीज जोरजोरात धडधडत होत... तोंडातून शब्दच फुटत नव्हते... जागेवरच उभे रहात त्याने आपली भयानक नजर माझ्यावर रोखली होती .. काय करावे सुचत नव्हते... इतक्यात मागुन एक भयानक किंकाळी ऐकु आली. आणी झपकन डोळे उघडले... पन अंग थरथर कापत होत....
मी त्या दगडावर तसाच पडून होतो कदाचीत डोळा लागला असावा.. पन ती किंकाळी......?
आणी पुन्हा तीच किंकाळी
दचकुन जगेवरून उठलो कारण तो आवाज गौरीचा होता... ती जिवाच्या आकांताने ओरडत मला हाक मारत होती... तीच्या आवाजात भयानक वेदना होत्या...
थरथरत उठून उभा राहीलो. तसाच मी गौरीच्या आवाजा मागे धाऊ लागलो... पडत झडत मी त्या गर्द दाट झाडीतून जाणा-या त्या बारीकशा पायवाटेने धावत निघालो..ती जोरजोरात ओरडत होती... एखाद्या निष्पाप जनावरास लाठीने, चाबकाने फोडताना जसे ते हंबरावे, ओरडावे तसा गौरीचा काळीज पिळवटून टाकणारा आवाज कानावर पडत होता, आणि काळजात धारधार कट्ट्यार उतरावी तशी मनाला यातना होत होती... धावता धावता डोळ्यातून पाणी कधी आल कळलच नाही... हूंदका आवरून जीवाच्या आकांताने घनदाट जंगलातुन धावत गौरीला साद घालत तीचा शोध घेऊ लागलो, पण तीचा आवाज आणखी दुर दूर जाऊ लागला... अर्धा पाऊण तास तसाच धावत राहीलो पण गौरी कुठच दिसत नव्हती... खुप दम भरला होत. अंगही घामान भिजल होत. तसाच एका झाडाला तक्या देऊन उभा राहीलो..गौरीला साद घालून घसा सुकला होता... काळीज जोरजोरात धडधडत होते...आणि डोळ्यातून एकसारखे अश्रु वहात होते.. स्वाता:ला सावरत चोहोबाजुला नजर फिरवून पाहील पन काजव्यांची लखलखनारी माळ आणि रातकिड्यांची किर्रर्रर्रर्रर किर्रर्रर्रर्रर किर्रर्रर्रर्रर असा कर्कश्य आवाज एवढ होत... गौरी कुठेच दिसत नव्हती...
डोळ्यातील अश्रु पुसत पुन्हा तीचा शोध घेऊ लागलो. तोच असह्य वेदनेन कण्हत असल्याचा गौरीचा आवाज आला...
"स..............स..............संजु........"
तो गौरीचा आवाज होता.
" गौरी..........गौरी.........कुठ आहेस तु......"
केवीलवाण्या आवाजात साद घालत मी तीचा शोध घेऊ लागलो... डोळ्यातून एकसारखे अश्रु वहात होते..तीचा आवाज येईल त्या दिशेने पुन्हा धावणे सुरू केले...
पुन्हा तीची हाक ऐकु आली... तसा जागेवरच थांबून तीच्या आवाजाचा वेध घेऊ लागलो... तोच उजवीकडे काही अंतरावर झाडाच्या वाळलेल्या पानांवरून कोणीतरी फरपटत जात असल्यासारख जाणवल.. मी नजर फिरवली आणि काळजाचा थरकाप उडाला...
गौरी खाली जखमी अवस्थेत विव्हळत होती.. तीच्या जखमातून रक्त एकसारख वहात होत... कपडे ठीक ठिकानी फाटलेले... सर्व अंगच रक्ताने भीजलेले होते... तीची ही अवस्था पाहुन अंग शहारल, मी तीच्याकडे धावणार इतक्यात ती काळी आकृति गौरी शेजारी उभी दिसली... ते गौरीचा हात पकडून फरपटत तीला घेऊन जाऊ लागले... ती रडत, विव्हळत होती.. माझ्याकडे पहुन कण्हतच बोलु लागली...
"स......स.......संजु.......तु जा इथुन... नाहीतर हे त....त....तुलापन ठार मारील...."
आता मात्र रागाने मी वेडा झालो होते... कमरेला लावलेला चामड्याचा बेल्ट काढला आणी अंगातली सारी शक्ति एकवटली..हाताच्या मुठीत बेल्ट करकचुन आवळतच मी त्या पिशाच्च्यावर ओरडलो...
"ए सैताना ............सोड तीला............" म्हणत रागातच चालू लागलो....
माझ्या कडे पाहून चेहरा आक्राळ विक्राळ करत ते भयान, भरड्या आवाजात हसु लागले... एखाद्या भुकेल्या हिंस्त्र श्वापदाच्या तोंडातुन कुणीतरी त्याच भक्ष हिसकावुन घेताना त्यान पहाव आशा नजरेन ते माझ्याकड पहात होत.. भीतीन मी पुरता थरारलो पन जख्मी गौरीकडे पहात मी रागातच त्याच्याकडे चालू लागलो...
तोच कोणीतरी मला मागुन पकडल आणी काही बोलणार इतक्यात आपल्या हाताने माझ तोंड दाबल, मी प्रतिकार करायच्या आत मागून बारीक आवाज कानावर आला...
" शुssssssssssss....इथच थांब... एकही पाउल पुढ टाकु नग..आन काय बी बोलू नग..."
आवाज ओळखला तस मी गर्रर्रर्रर कन मागे फिरलो...
" ग........ग.....गौरी......तु..."
तीला पहाताक्षणी तीला गच्च मीठी मारली, माझ्या डोळ्यातुन घळाळा आनंदाश्रु वाहु लागले... ती ठीक होती..
दुस-याक्षणी मनात विचार आला, मग ती जखमी आहे ती कोण...? तसच समोर पाहिल. ती जख्मी अवस्थेत पडलेली मुलगी गाडीचा स्टर्टर लागावा तशा आवाजासारखी हसत उठुन उभी राहीली. र्खी खी खी खी, तीचा चेहरा विद्रुप होऊ लागला तसा मी हादरलो...
गौरीन माझा हात मागे ओढला आणि आम्ही दोघे गावाच्या दिशेने धावत सुटलो. पडत होतो, धडपडत होतो पन एकमेकांचे घट्ट पकडलेले हात आम्हाला सावरत होते... तसच कोणीतरी वेगात आमच्या मागे धावत असल्याच जाणवल... मी मागे पहाणार तोच गौरी ओरडली......
"माग बगू नग....."
दोघेही जीवाच्या आकांताने धावत सुटलो... पन कोणीतरी आमच्या मागे वेगाने येत होत ... त्याच्या ओरडण्याचा आवाज मेंदु बधीर करत होता... पन मागे न पहाता आम्ही धावतच राहीलो... काट्याकुट्यातुन , त्या दाट जंगलातुन, मागे न पहाता काही क्षणात मागुन येणारा तो आवाज येईनासा झाला..
माझी गाडी रस्त्यावर दीसली तसा सुटकेचा नि:श्वास टाकला... ती ही दमली होती आणि मी तर धापा टाकत होतो...
जोरजोरात श्वास घेत ती म्हणाली ...
" सारी......( sorry).. मला जरा यायला यळच झाला...एक बी पाऊल पुढ टाकल आसतस तर त्या पिशाच्च्यान तुजा जिव घेतला आसता..."
मी गुडघ्यावर हात ठेऊन धापा टाकत तीच्याकडे पाहीले, घडल्या प्रकाराची थोडी भीती होतीच पन एकमेकांकडे पाहुन आता आम्हाला हासु ही येत होत...
शुभ्र टपोर चांदण . तेच टीम टीमनारे काजवे.. कुठूनतरी रातराणीच्या फुलांचा योणार सुगंध मनावरील ताण कमी करत होता आणि अशातच चंद्राच मोहक रुपही फिक वाटाव अशी ही माझी गौरी...
घडलेल्या प्रसंगातून थोड normal होत तीच्या जवळ आलो... ती तशीच उभी होती... माझ्या थरथरणा-या हातात तीचा हात घेतला तशी काळजाची धडधड वाढली होती... एक हात शर्टच्या आत घातला आणी ते गुलाबाच फुल बाहेर काढु लागलो... एक दोन काटे पोटात , छातीत रूतलेच शेवटी... ती आश्चर्यान पहात म्हणाली...
"काय हे"
आणी तो सुंदर गुलाबही फिक्का पडेल आशा माझ्या निरागस गौरी समोर करत धडधडत्या काळजान, काळजात आजवर लपवुन ठेवलेल ते गुपित, अहं.. गोड गुपित तीला सांगितल,
" गौरी......मला तु खुप आवडतेस..खुप जीव आहे ग तुझ्यावर.."
तीच ही अंग थरथरत होत... नाजुकस गालात हसत तीन मान झुकवली आणी आपल्या दोन्ही हातानी तो गुलाब स्विकारला..
तीचा हात आपल्या दोन्ही हातानी घट्ट पकडत म्हणालो..
"गौरी.........माझ तुझ्यावर खुप प्रेम आहे ग... मला आयुष्यभर अशीच साथ देशील......माझ्याशी लग्न करशील....."
तीने शांतपने आपले डोळे मिटले तसा तिच्या पाणावलेल्या डोळ्यातुन एक थेंब माझ्या मनगटावर पडला... तीच्या चेह-यावर एक समाधान दिसत होत...
माझ्याकडे पहात ती म्हणाली..
" आजवर म्या या दिसाची बगत व्हती..
मला ठाव हुत तु परतून यणार... माजा देव माज्यासोबत एवढा निर्दयी न्हाय वागनार...."
बोलता बोलता तीला अश्रु अनावर झाले तशी ती माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडतच म्हणाली..
"माजा बी लय जीव हाय तुज्यावर... .."
तीच बोलण थांबवत मी म्हणालो...
" मला तुझ्याशीच लग्न करायच आहे....मग जीव गेला तरी चालेल... मी उद्याच माझ्या आईला सांगतो आणि तुझ्या आईसोबत बोलणी करायला सांगतो..."
माझ बोलण ऐकताच ती घाबरली आणि घरी न येण्याची विनवणी करू लागली.. माजी आन हाय वगैरे वगैरे..पन तीच काही ऐकण्याची मला गरज वाटली नाही. तीला गाडीवर बसवले आणि मुद्दाम सावकाराच्या घराजवळुन आलो. आर्केस्ट्रा बघून येणारी लोक, स्त्रीया मुल रस्त्याने चालत येत होती... तिला गाडीवरुन तीच्या घराजवळ सोडली आणि दोन मिनट गाडी थांबवून बोलत उभ राहीलो कारण सावकाराच्या मुलाचे दोघे मित्र काही अंतरावर बोलत उभे होते...

घरी आलो एव्हाना रात्रिचे बारा वाजलेले... थोड जेवण करून अंथरुणावर पडलो. आज खूप खुश होतो... उद्या आईला सांगायच की मला गौरीशी लग्न करायच आहे, पन मामाला काही समजू द्यायच नाही. गौरी बरोबरच्या नव्या आयुष्याची स्वप्न पहातच झोपी गेलो...
सकाळी आईला फोन करून गौरी बद्दल सांगितले. पालकांच्या चौकशी की चौकस स्वभावाप्रमाणे कोण आहे ती, वडिल काय करतात, कोणती जात, कोणत कुळ वगैरे प्रश्नाचा भडिमार सुरू झाला..ते यासाठी की वरच्या जातीतली पोरगी असेल तर आमच्या लव्हस्टोरीचा शेवट सैराट पिच्चर सारखा व्हायचा,
त्या नंतर सर्व मित्राना फोन केला आणि जर घरचे लग्नाला नाही म्हणनार ठाऊकच होत त्यामुळे पुढची फिल्डिन्ग लावायला सांगितले, सगळे खुश होते... शेवटी मित्रच ते, सुखाता आणि दु:खात साथ देणारे..

क्रमशा: