स्मशान
दणदण पावले आपटीत सागर जिन्यावरुण खाली ऊतरला.आईने गॅलरीतुन दिलेल्या आवाजाकडे लक्ष न देता तो पार्किंगला लावलेल्या बाईककडे गेला.बाईकला किक मारुण गेटबाहेर पडला.जाताना गाडीला आडव्या गेलेल्या कुत्र्याला एक लाथ घालुन शिवी हासडली.बाईकची स्पीड वाढवुन तो हायवेवर आला.
गाडीच्या स्पीडबरोबर त्याच्या डोक्यातले विचारही वाढत होते.
गाडीच्या स्पीडबरोबर त्याच्या डोक्यातले विचारही वाढत होते.
सागर घरात सगळ्यात मोठा..त्याच्यामागे दोन लहाण भाऊ.लहाणपणापासुन सागर एकदम तापट स्वभावाचा साध्यासाध्या गोष्टीवरुण चिडचिड करायचा.वडीलांचे आणि त्याचे कधीच पटत नव्हते.दादा..दादा..करत त्याच्याशी बोलणार्या लहाण भावांशी पण तो नीट बोलत नसे.त्याच्यामुळे घरातील वातावरण नेहमी बिघडलेले असे.घरात नेहमी स्मशानशांतता पसरलेली.या सगळ्यात त्याच्या आईचे खुप हाल व्हायचे.त्याची आवडती भाजी ताटात नसली कि त्याच्यावरुण वाद,शेजारीही त्याच्याशी बोलत नसे.जवळचा मित्र तर कोणी नव्हताच.भांडण झाल कि तो बाईकवर बसुन वाट दिसेल तिकडे जाई.आजही नवीन बाईक घेण्यावरुण त्याचे आणि वडीलांचे भांडण झाले.आणि तो बाहेर पडला.दिवस मावळु लागला..तो एका घाटाजवळ पोहोचला होता.पायथ्यालाच एक वाईन शॉप होते.
वाईन शॉपसमोर गाडी थांबवुन तो आत गेला.तिथली गर्दी आणि गोंगाट त्याला सहण होईना.निवांत जागी बसावे म्हणुन ड्रिंक्सच्या बाटल्या घेऊन तो बाईकजवळ आला.आजुबाजुला अशी जागा नाही हे बघुन बाईकवर बसुन तो घाट चढु लागला.घाटावर वाहनांची वर्दळ कमी होती.घाट संपला खाली वातावरण थंड होते.आजुबाजुला दाट झाडी होती.रस्त्यावर गाडी पार्क करूण तो झाडीतुन आत गेला.थोडे आत जाताच एक मोकळी जागा बघुण तो खाली बसला.ड्रिंक्सची बाटली उघडुन एक घोट घेतला.आता त्याला थोडे शांत वाटले.एक बाटली रिकामी केल्यावर त्याने दुसरी ऊघडली.तोच पावलांचा आवाज येऊ लागला...कोणीतरी त्याच्या दिशेने येत होते.त्याने मागे पाहिले.एक काळी आकृती होती.ती त्याच्यासमोर येऊन बसली.
"काय मित्रा एकटाएकटाच एन्जॉय करतोय का?"
"काय मित्रा एकटाएकटाच एन्जॉय करतोय का?"
"मी काहीपण करील तु कोण विचारणारा.."सागरणे दातओठ खात वाचारले.
"शांत हो एवढ रागवायला काय झाल..काहीपण कर मला काय मी जातो.."पलीकडच्या व्यक्तीनेही काहीश्या रागात ऊत्तर दिले.
"अरे बस बस तु पण माझ्यासारखाच रागीट स्वभावाचा दिसतोय..नाव काय तुझे?"त्याच्याकडे बाटली देत सागर म्हणाला.
"मी दिनेश..पण मला माझ्या या स्वभावाचा खुप पश्चाताप होतोय.."
एक घोट घेत दिनेश म्हणाला..
एक घोट घेत दिनेश म्हणाला..
"कसला पश्चाताप....आपल्याशी कोणी चुकिच वागल कि आपल्याला राग येतो."
"हो रे पण आपण समोरच्याला शांतपणे त्याची चुक दाखवायची असते."
"अस कस म्हणतोस समोरच्याला त्याची चुक समजायला नको.माझे आई-वडील भाऊबहिण सगळेच माझ्याशी वाईट वागतात..मग मला खुप राग येतो.अस वाटत आता डोक फुटेल आणि काही होईल.मग ते शांत करायला मी अस कुठेतरी शांत ठिकाणी पित बसतो.."सागर तावातावाने त्याचे म्हणणे पटवुन देत होता.
दिनेश हसत म्हणाला..
"जगात सर्वच अशाश्वत असतं.. शेवटपर्यंत काहीच टिकत नाही.तुझ्यावर रागवायला जर तुझ्या घरची माणसच नसतील तर..."
"जगात सर्वच अशाश्वत असतं.. शेवटपर्यंत काहीच टिकत नाही.तुझ्यावर रागवायला जर तुझ्या घरची माणसच नसतील तर..."
"म्हणजे.."
"जर तुला रागावणारे आईवडील हे जग सोडुन गेले तर.."
"काय बोलतोस.."तोंडाला लावलेली बाटली साईडला फेकत सागर म्हणाला..
"मी पण असाच एकदा रागारागाने घरातुन बाहेर पडलो.कारण किरकोळ होत..रागाच्या भरात घरच्यांना खुप बोललो.बाईकवरूण येत असताना समोरून येणार्या ट्रॅकने अशी धडक दिली कि बॉडीचा पार चेंदामेंदा झाला.वेबारस प्रेत म्हणुन म्हणुन ईथल्याच स्मशानात पुरण्यात आले.."एका ठिकाणाकडे बोट दाखवत तो म्हणाला..
"म्हणजे तु..."सागरने थरथरत्या आवाजात विचारले..
"सहा महिने झाले हे जग सोडुन तेव्हापासुन भटकतोय असाच.आता कुणावर आणि कसे रागवायचे.."असे म्हणत दिनेश रडु लागला..
ईकडे सागरचे शरीर थरथर कापु लागले..भीतीने पुढचे काही बोलताही येईना..समोर पसरलेल्या स्मशानाकडे पाहत दिनेश म्हणाला
"क्षणिक सुखाचे पर्व संपले,
ही जिंदगी झाली बेताची.
जगुन घे मनोसोक्त माणसा,
ही स्मशान भुकेली प्रेताची."
स्मशानात त्याचा आवाज घुमला आणि त्याचबरोबर भयानक रडण्याचा आवाज येऊ लागला..चहुबाजुंनी किंकाळ्या निघु लागल्या.आजुबाजुला काळ्या आकृत्या दिसु लागल्या.सागरला काहीही न बोलता दिनेश त्याला पुरलेल्या खड्ड्याजवळ जाऊन आडवा झाला..
"क्षणिक सुखाचे पर्व संपले,
ही जिंदगी झाली बेताची.
जगुन घे मनोसोक्त माणसा,
ही स्मशान भुकेली प्रेताची."
स्मशानात त्याचा आवाज घुमला आणि त्याचबरोबर भयानक रडण्याचा आवाज येऊ लागला..चहुबाजुंनी किंकाळ्या निघु लागल्या.आजुबाजुला काळ्या आकृत्या दिसु लागल्या.सागरला काहीही न बोलता दिनेश त्याला पुरलेल्या खड्ड्याजवळ जाऊन आडवा झाला..
मोबाईलच्या एकसारख्या वाजणार्या रिंगणे सागर भानावर आला.आईचा फोन होता..पण अगोदर तिथने बाहेर पडणे गरजेचे होते.पळतच तो बाईककडे गेला..फोन ऊचलला.आईचा आवाज..
"अरे सागर का असा करतोस बाळा मी यांना सांगते.तुला नवीन बाईक घेऊन द्यायला..आता ये घरी.."
"मला बाईक नको आई मला फक्त तुम्ही सगळे पाहिजे...मी येतो आताच.."डोळ्यात पाणी आणत तो म्हणाला..आणि घराच्या दिशेने जाऊ लागला
"क्षणिक सुखाचे पर्व संपले,
ही जिंदगी झाली बेताची.
जगुन घे मनोसोक्त माणसा,
ही स्मशान भुकेली प्रेताची."
(ही ओळ समाधान शिंदे..नाशिक यांनी लिहीलेली)
हे वाक्य त्याच्या कानात अजुनही घुमत होते..
ही जिंदगी झाली बेताची.
जगुन घे मनोसोक्त माणसा,
ही स्मशान भुकेली प्रेताची."
(ही ओळ समाधान शिंदे..नाशिक यांनी लिहीलेली)
हे वाक्य त्याच्या कानात अजुनही घुमत होते..
#अमित राऊत.