रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 3)
नितीन काकड
....समर्थ आता तळ्यात जाणार तोच कुणीतरी त्याला जोराने पाठीमागे खेचलं ,त्याने मागे वळून बघितलं तर सरपंच होते ते ,तो तसा शुद्धीवर आला ,त्यालाच कळत नव्हतं कि तो इथपर्यंत कसा आला ते ,पण आता मात्र तो थरथरायला लागला होता ,खूप गंभीर वळण ह्या प्रकरणाला लागलं होतं ,त्याला जो पर्यंत बारीक बारीक गोष्टीं मधून त्याला धमक्या मिळत होत्या तो पर्यंत ठीक होतं पण आता तर हे प्रकरण त्याच्या जीवावर बेतायला लागलं होतं,कुणीतरी त्याला झोपेतच संमोहित करून मारायचा प्लॅन केला होता ,पण सरपंच ऐनवेळी तिथे आल्यामुळे त्याचा जीव वाचला होता,समर्थ आता थोडा चिंतातुर वाटत होता ,कारण शत्रुपक्ष हुशार देखील होता,त्यामुळे आता त्याला प्रत्येक पाऊल काळ्जीपूर्वक टाकावं लागणार होतं, पण राहून राहून त्याला असं वाटत होतं की कुणीतरी जवळचंच आहे जे आपले सर्व प्लॅन शत्रुपक्षाला कळवत आहे म्हणून,पण सर्वांनीच सभ्यतेचे मुखवटे परिधान केलेले होते ,तेच त्याला बाजूला करायचे होते आणि योग्य वेळेची तो वाट बघत होता ,त्या रात्रीचा घटनाक्रम तो आठवू लागला,स्वप्नामध्ये त्याला कल्पना मंदिराकडे येण्यास विनवत होती ,तो जेव्हा तलावाजवळ पोहचला तेव्हा त्याला मंदिरामधून कसलेसे आवाज येत होते ,पण संमोहनाच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्याला ते जाणवले नाही ,किंवा त्याच तिकडे लक्ष गेलं नाही ,पण सरपंच एवढ्या रात्री तिकडे काय करत होते ?एक साधासा प्रश्न त्याच्या डोक्यात तरळून गेला ,पण समर्थ ला आता ह्या बाकी गोष्टींवर लक्ष द्यायला वेळ नव्हता ,प्रकरण हाताबाहेर जात होते अन त्यामुळेच त्याला त्याच्या मित्राची मदत लागणार होती ,मल्हार तसा पेशाने शिक्षक पण, योग ,तंत्र विद्या ,गूढ विद्या ,स्पीरुचल हिलींग ह्याकडे विशेष कल आणि आवड ,समर्थ ने मल्हार ला फोनवर सर्व माहिती समजावली आणि भेटेल त्या गाडीने शिवापूर गाठण्यास सांगितले ,मल्हारने आपल्या योग शक्तीने नक्की प्रकरण काय आहे ते जाणून घ्यायचं प्रयत्न केला आणि त्याला धक्काच बसला कारण समर्थ च्या जीवाला धोका होता ,रात्र वैऱ्याची होती ,ते जे काही होत ते मल्हार ला पूर्ण गोष्ट जाणून घेण्यापासून रोखत होतं, मल्हार सुद्धा इरेला पेटला होता ,आपल्या गुरुच आणि स्वामी समर्थांच नाम स्मरण करून तो आपल्या सूक्ष्म लहरी त्या मंदिराच्या आत घुसवू पाहत होता ,पण तिथे आसपास जे काहीपण होतं ते सुद्धा तेवढ्याच, कणभर जास्तच ताक्तीचं होतं ,मल्हार प्रयत्न करत असतांना अचानक तो ध्यान करत बसलेल्या रूम चा बल्ब आवाज करत फुटला आणि मल्हार ची तंद्री भंग पावली ,तो आता मनातून खूप घाबरला कारण ,ते जे काहीपण होत, जर ते इतक्या दूर माझ्या योग साधनेत अडथळा आणू शकतं तर तिथे गेल्यावर काय करेल?😢 , पण समर्थ साठी त्याला तिथे जावंच लागणार होतं,मल्हार ने लगेच निघण्याची तयारी केली लागणारं सर्व साहित्य तो सोबत घेत होता, आणि त्याने समर्थ ला फोन करून सांगितलं की सर्वांनी सावध राहा ,कुणीही मंदिराच्या आसपास एकट्याने जाऊ नका ,रात्री घराबाहेर पडू नका ,अश्या सूचना देऊन त्याने फोन ठेवला ,त्याला असं जाणवलं की फोन ठेवल्याबरोबर बागेमधल्या झाडावरचा एक पक्षी कर्कश्य आवाज करत उडून गेला,उगाच एक चिंतेची लहर त्याच्या चेहऱ्यावर उमटली ,स्वामी समर्थांना सर्वांचं रक्षण करण्याचं साकडं घालून तो घराच्या बाहेर पडला , तो बाहेर पडल्यानंतर बाहेरच वातावरण त्याला थोडं विचित्रचं वाटलं ,भर उन्हाळ्यात सोसाट्याचा वारा ,काळे जमून आलेले ढग जणू काही त्याला तिथे जाण्यापासून रोखण्याकरताच अवतरले होते , "ह्या वेळी सामना अति शक्तीशाली विरोधकाबरोबर आहे तर ",असं म्हणून तो शिवापुरीच्या दिनेश निघाला ,वाटेत त्याला खूप अडथळे लागले जे त्याला त्याच्या धेय्या पासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते ,पण स्वामींच्या आशीर्वादाने तो सुखरूप शिवापुरीत पोहचला ,त्याच्यासोबत घडलेले सर्व किस्से त्याने समर्थ आणि त्याच्या टीम ला सांगितले ,पुजारी बाबा आणि सरपंच काही कामानिमित्त शेजारच्या गावात गेले होते ते दुसऱ्या दिवशीच येणार होते ,मल्हार ला त्यांना सुद्धा भेटायचं होतं ,सर्वांना आश्चर्य वाटलं की मल्हार येणार हे बाहेर कसं माहिती झालं म्हणून,कारण मल्हार बद्दल फक्त समर्थच्या टीम लाच माहिती होतं, पण लगेच कुणीतरी ओरडल कि काल त्याने पाटलाला इकडे रेंगाळताना पाहिलं होतं म्हणून ,समर्थ ला आता खात्री पटत चालली होती की ह्या मागे पाटीलचं आहे म्हणून, पण त्याला आता पाटलाला रंगे हात पकडायच होतं,मल्हारने आजूबाजूला बघितलं तर त्याला झाडावर तोच कावळ्यासारखा पक्षी बसलेला दिसला जो त्याला त्याच्या बागेत दिसला होता ,"म्हणजे कुणीतरी ह्या पक्ष्याला आपल्या पाळातीवर ठेवलं आहे तर ",त्याने सर्वांना खुणेनेच त्या पक्षाकडे बघण्याचा इशारा केला आणि सर्वांना सांगितलं की तुम्ही हळू आवाजात काहीतरी कुजबुज करा म्हणजे तो पक्षी ते ऐकण्यासाठी आणखी जवळ येईल ,मल्हार च्या प्लॅन प्रमाणे सर्वजण हळू आवाजात कुजबुज करू लागले ,तसा तो पक्षी कुंपणावर येऊन बसला आणि फसला लगेच मल्हार मंत्र म्हणून त्याला स्थानबद्ध केलं आणि तो त्याला पकडायला जाणार तोच एक कर्कश आवाज करत त्या पक्षाने पेट घेतला आणि त्यात तो खाक झाला ,झालेल्या प्रकाराने सर्वजण खूप भयभीत झाले ,इकडे पौर्णिमा जवळ जवळ यायला लागली होती ,मल्हार ने समर्थ ला काही योग क्रिया शिकवल्या कि ज्यातून तो स्वतः चा जीव वाचवू शकेल ,.....
(क्रमश:)
(क्रमश:)